Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशपुष्पक विमान कोणाचं होतं; इंद्र देव की रावण? 99 टक्के लोकांना माहित...

पुष्पक विमान कोणाचं होतं; इंद्र देव की रावण? 99 टक्के लोकांना माहित नाही योग्य उत्तर

पुष्पक विमान कोणाचं होतं; इंद्र देव की रावण? 99 टक्के लोकांना माहित नाही योग्य उत्तर

[ad_1]

Who was the real owner of Pushpak Viman : पुष्पक विमानाचं नाव सगळ्यांनी नक्कीच ऐकलं असेल. ज्या लोकांना पुष्पक विमानाबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी सांगायचं झालं, तर रामायणामध्ये याचा उल्लेख आहे. त्रेतायुगात जेव्हा रावणानं माता सीतेचं अपहरण केलं, तेव्हा तो त्यांना पुष्पक विमानातून लंकेला घेऊन गेला होता. आज जसं आपण विमानात बसून एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो, तसंच ते विमान होतं. आकाशात उडणारं, वेगानं जाणारं. रावाणाचा वध केल्यानंतर श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण हे पुष्कप विमानात बसून अयोध्येला जातात. पण मग आता प्रश्न असा आहे की पुष्पक विमान होतं तरी कुणाचं? पुष्पक विमान रावणाचं होतं की देवांचे देव इंद्र यांचं?

तर याचं उत्तर थोडं वेगळं आहे. पुष्पक विमान रावणाचं किंवा इंद्र देवाचं नव्हतं. पौराणिक ग्रंथ रावण संहितानुसार, ब्रह्मदेवानं हे विमान त्यांच्या भक्त वैश्रवण  यांना दिलं होतं. तर पुष्पक विमानाचं तेज हे सुर्यासारखं होतं. हे ज्या कोणाला मिळणार तो देवांच्या समान होणार असं म्हटलं जातं होतं. पुष्पक विमान ना रावणाचं होतं ना देवांचा राजा इंद्र देवाचं.

कोण होता वैश्रवण?

वैश्रवण म्हणजेच रावणाचा सावत्र भाऊ कुबेर. त्यांनी ब्रह्मदेवांची खूप तपश्चर्या केली होती, त्यामुळे ब्रह्मदेवांनी त्यांना दोन वर दिले. एक म्हणजे त्यांना चौथा लोकपाल बनवलं आणि दुसरं म्हणजे पुष्पक विमान दिलं. हे विमान विश्वकर्मा यांनी बनवलं होतं.विश्वकर्मा म्हणजे देवतांचे मुख्य शिल्पकार. त्यांनी हे विमान खास ब्रह्मदेवांसाठी तयार केलं होतं, पण त्यांनी ते कुबेराला दिलं.

विश्रवा हे कुबेर आणि रावण यांचे वडील होते. कबुरचा जन्म हा विश्रवा यांच्या पहिल्या पत्नीपासून जन्माला आले होते आणि रावण त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा अर्थात कैकेसीचा मुलगा. यामुळे कुबेर आणि रावण हे सौतेले भाऊ होते.

रावण जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने कुबेराकडून लंका आणि पुष्पक विमान दोन्ही जोरजबरदस्तीने हिसकावून घेतलं. तर एकंदरीत काय पुष्पक विमान आधी कुबेराचं होतं आणि नंतर रावणानं ते हिसकावून घेतलं. 

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments