Friday, July 24, 2026
Home Blog Page 391

दिल्लीत ‘लेडी डॉन’ अटक! कोण आहे ही जिकरा? भितीपोटी हिंदूंनी घराबाहेर लावले पलायनाचे पोस्टर

0
दिल्लीत ‘लेडी डॉन’ अटक! कोण आहे ही जिकरा? भितीपोटी हिंदूंनी घराबाहेर लावले पलायनाचे पोस्टर


Seelampur Murder Case: दिल्लीच्या सीलमपुरमध्ये 17 वर्षीय कुणालची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यामध्ये लेडी डॉन जिकराचाही समावेश आहे. मात्र यामधील दोन मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. मृत तरुणाच्या वडिलांनी खुलासा केला आहे की, त्यांच्या मुलाला ‘लेडी डॉन’ जिकराने धमकी दिली होती. जिकरा नेहमी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत असते. परिसरात तिला एक दबंग महिला म्हणून कुख्यात होती. 

गुरुवारी रात्री उशिरा ही हत्येची घटना घडली. सीलमपूर येथे कुणाल नावाच्या तरुणावर चार ते पाच तरुणांनी रस्त्यात घेरुन चाकूने हल्ला केला होता. कुणाल दुकानात दूध घेण्यासाठी गेला होता. शेजाऱ्याने त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. हे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले तेव्हा कुणाल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रुग्णालयात नेलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं, कुणालच्या वडिलांनी त्यांचं कोणाशीही शत्रुत्व नव्हतं असं सांगितलं. मात्र हत्येत साहिल, जिकरा आणि त्यांचे मित्र सहभागी होते. 

कुणालचे वडील राजबीर यांनी म्हटलं की, जिकराने याआधीही आपल्या मुलाला तुला सोडणार नाही अशी धमकी दिली होती. या धमकीचं कारण माहिती नाही. सीलमपूर येथे राहणारी जिकरा परिसरात लेडी डॉन म्हणून फिरत असते. तिच्याबद्दल सांगितलं जातं की, ती जेलमध्ये बंद गँगस्टर हाशिम बाबाच्या पत्नी जोयासह वास्तव्यास आहे. जोयाला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. जोया जेलमध्ये गेल्यानंतर जिकरा आपली गँग तयार करत होती. सध्या तिच्यासह काही तरुण होते, त्यांनीच कुणालची हत्या केली. 

लेडी डॉन जिकरा शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत तुरुंगात गेली आहे. या हत्येच्या घटनेच्या फक्त 15 दिवस आधी तिची सुटका करणयात आली होती. ती नेहमी सोबत एक पिस्तूल ठेवायची. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, जिकरा लाला नावाच्या व्यक्तीला शोधत होती. लालाने तिच्या भावाला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. तिने कुणालला लालाबद्दल विचारलं होतं. जेव्हा तिने त्याला मदत केली नाही तेव्हा त्याची हत्या करण्यात आली. कुणालच्या मित्रांनी जिकराचा चुलत भाऊ साहिलवर हल्ला केला होता.

मात्र, मृत कुणालच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याचे कोणाशीही शत्रुत्व नव्हते. तो गिहारा समुदायाचा असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली. कुणालचे वडील राजबीर हे ऑटोचालक आहेत. कुटुंबात तीन भाऊ आणि एक बहीण आहे. स्थानिक लोक आणि सामाजिक कार्यकर्ते कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी करत आहेत. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून शिक्षा करावी अशीही मागणी करत आहेत. पोलिसांनी परिसरात सुरक्षेसाठी निमलष्करी दल तैनात केले आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. 

या घटनेनंतर सीलमपूर परिसरात तणाव आहे. परिसरातील अनेक हिंदू कुटुंबांनी त्यांच्या घराबाहेर ‘हिंदू स्थलांतर’, ‘हे घर विक्रीसाठी आहे योगी जी’, ‘आम्हाला मदत करा योगी जी’ असे पोस्टर्स लावले आहेत. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की परिसरातील हिंदू समाज घाबरला आहे. या घटनेनंतर लोक मृताच्या घरी पोहोचले आणि ‘खुन्यांना फाशी द्या’ अशा घोषणा दिल्या. एका व्यक्तीने सांगितले की त्याच्या भावाची 2012 मध्ये हत्या झाली होती. एका महिलेने सांगितले की तिच्या मुलाला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते.





Source link

पहिलीपासून हिंदीसक्तीला साहित्य महामंडळाचा विरोध

0
पहिलीपासून हिंदीसक्तीला साहित्य महामंडळाचा विरोध



लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यात मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून सक्तीने हिंदी शिकवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाला शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातून तीव्र विरोध करण्यात येत असताना आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानेही हिंदीची सक्ती न करण्याची ठाम भूमिका जाहीर केली आहे, राज्य शासनाने हा निर्णय तातडीने रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची शालेय शिक्षणाच्या स्तरावर अंमलबजावणी २०२०५-२६पासून करण्याबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने बुधवारी प्रसिद्ध केला. त्यानुसार पहिलीपासून अभ्यासक्रमात हिंदी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. अभ्यासक्रम आराखड्यासाठी नियुक्त केलेल्या सुकाणू समितीने हिंदी भाषेची सक्ती न करता अन्य भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करून देण्याची शिफारस केली होती. मात्र, ही शिफारस डावलून शिक्षण विभागाने तिसरी भाषा म्हणून पहिलीपासूनच हिंदी विषय सक्तीने शिकवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात भूमिका घेतली आहे. तसेच, अन्य राजकीय पक्ष, शिक्षण क्षेत्रांतूनही या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याबरोबरच आता साहित्य क्षेत्रातूनही पहिलीपासून हिंदी शिकवण्यास विरोध दर्शवण्यात आला आहे.

‘शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय तत्काळ रद्द केला पाहिजे. कारण तो अन्याय करणारा आहे. मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यासाठी लढा द्यावा लागला हे वास्तव आहे,’ असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. अशा परिस्थितीत हिंदी प्रेम कशासाठी, शासनाने मराठी भाषा सल्लागार समिती स्थापित केली आहे. हा मोठा निर्णय घेताना त्या समितीलाही शासनाने विचारले नाही यासारखे दुर्दैव कोणते, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित करत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या सक्ती विरोधात तीव्र आंदोलन करेल, असेही त्यांनी नमूद केले.

हिंदी सक्तीविरोधात मनसेचे आंदोलन

राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. ‘संपर्कसूत्र म्हणून हिंदी भाषा शिकवली पाहिजे,’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचाही तीव्र निषेध करण्यात आला. राज्य शासनाने शासन निर्णय मागे न घेतल्यास शहरात एकही हिंदी पुस्तक छापू देणार नाही, सक्तीने हिंदी शिकवणाऱ्या शाळांना टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला. आंदोलनावेळी मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी, राज्य संघटक प्रशांत कनोजिया, राज्य उपाध्यक्ष ॲड. सचिन पवार, मनसे कामगार सेना राज्य उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, विभाग अध्यक्ष सुनील कदम, राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, शहर उपाध्यक्ष विक्रांत भिलारे आदी या वेळी उपस्थित होते.



Source link

आता लढाई बिहारची… नितीशकुमार की तेजस्वी यादव? अखेरचे हिंदी राज्य एकहाती जिंकण्यासाठी भाजपही अधीर?

0
आता लढाई बिहारची… नितीशकुमार की तेजस्वी यादव? अखेरचे हिंदी राज्य एकहाती जिंकण्यासाठी भाजपही अधीर?



bihar vidhan sabha election 2025 nitish kumar bjp vs tejashwi Yadav आता लढाई बिहारची… नितीशकुमार की तेजस्वी यादव? अखेरचे हिंदी राज्य एकहाती जिंकण्यासाठी भाजपही अधीर?



Source link

भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष वयाच्या 60 व्या वर्षी अडकले विवाहबंधनात, पक्षातील सहकाऱ्याशीच केलं लग्न, PHOTO व्हायरल

0
भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष वयाच्या 60 व्या वर्षी अडकले विवाहबंधनात, पक्षातील सहकाऱ्याशीच केलं लग्न, PHOTO व्हायरल



पारंपारिक बंगाली पोशाखात आणि डोक्यावर ‘टोपोर’ घालून घोष त्यांच्या पत्नीसह विधीनंतर पत्रकारांसमोर आले आणि लोकांचे आशीर्वाद घेतले.
 



Source link

मुंबईत पाचवी मेट्रो मार्गिका लवकरच सेवेत… काय असेल मार्ग? स्थानके किती?

0
मुंबईत पाचवी मेट्रो मार्गिका लवकरच सेवेत… काय असेल मार्ग? स्थानके किती?



Mumbai Metro Line 2B routes and new metro stations know details विश्लेषण : मुंबईत पाचवी मेट्रो मार्गिका लवकरच सेवेत… काय असेल मार्ग? स्थानके किती?



Source link

Mulank 8 Personality People born on this date become big businessman and famous political leaders get money

0
Mulank 8 Personality People born on this date become big businessman and famous political leaders get money



Mulank 8 Personality People born on this date become big businessman and famous political leaders get money | मोठे व्यवसायिक आणि प्रसिद्ध राजकीय नेते होतात ‘हा’ मूलांक असलेले लोक! सैदव असते शनीची कृपा, घरात असतो पैसाच पैसा



Source link

कुनोमधील काही चित्त्यांचे उद्या स्थलांतर

0
कुनोमधील काही चित्त्यांचे उद्या स्थलांतर



भोपाळ : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधील काही चित्त्यांचे राज्याच्या शेवपूर जिल्ह्यातील गांधी सागर अभयारण्यात केले जाणार आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की २० एप्रिलला हे स्थलांतर केले जाईल. सध्या कुनो नॅशनल पार्कमध्ये १७ चित्ते मोकळ्या जंगलात असून त्यापैकी नऊ चित्ते पिंजऱ्यांमध्ये आहेत.

एक्सवर दिलेल्या माहितीमध्ये यादव यांनी सांगितले की चित्ता प्रकल्पाचा २० एप्रिलपासून गांधी सागर अभयारण्यात विस्तार केला जाईल. चित्त्यांच्या आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे यादव यांनी म्हटले आहे. किती चित्ते स्थलांतरित केले जातील याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली नसली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात दोन चित्ते शेवपूर जिल्ह्यात पाठवले जाणार आहेत. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भुपेंदर यादव यांनी शुक्रवारी यादव आणि राज्यातील अधिकाऱ्यांबरोबर चित्ता प्रकल्पाचा आढावा घेतला.



Source link

‘रोहित वेमुला कायद्या’ची मागणी, राहुल गांधी यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

0
‘रोहित वेमुला कायद्या’ची मागणी, राहुल गांधी यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र



congress leader Rahul gandhi called Karnataka chief minister for rohith vemula act ‘रोहित वेमुला कायद्या’ची मागणी, राहुल गांधी यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र



Source link

महाराणा प्रताप यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे विधान

0
महाराणा प्रताप यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे विधान



Maharana Pratap inspired Chhatrapati Shivaji Maharaj Defense Minister Rajnath Singh महाराणा प्रताप यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे विधान



Source link

द्विपक्षीय सहकार्यास प्रचंड वाव, इलॉन मस्क यांच्याबरोबर चर्चेनंतर पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त

0
द्विपक्षीय सहकार्यास प्रचंड वाव, इलॉन मस्क यांच्याबरोबर चर्चेनंतर पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त



pm Narendra modi elon musk on trade in Indian market opportunities द्विपक्षीय सहकार्यास प्रचंड वाव, इलॉन मस्क यांच्याबरोबर चर्चेनंतर पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त



Source link