Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशदिल्लीत 'लेडी डॉन' अटक! कोण आहे ही जिकरा? भितीपोटी हिंदूंनी घराबाहेर लावले...

दिल्लीत ‘लेडी डॉन’ अटक! कोण आहे ही जिकरा? भितीपोटी हिंदूंनी घराबाहेर लावले पलायनाचे पोस्टर

दिल्लीत ‘लेडी डॉन’ अटक! कोण आहे ही जिकरा? भितीपोटी हिंदूंनी घराबाहेर लावले पलायनाचे पोस्टर

[ad_1]

Seelampur Murder Case: दिल्लीच्या सीलमपुरमध्ये 17 वर्षीय कुणालची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यामध्ये लेडी डॉन जिकराचाही समावेश आहे. मात्र यामधील दोन मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. मृत तरुणाच्या वडिलांनी खुलासा केला आहे की, त्यांच्या मुलाला ‘लेडी डॉन’ जिकराने धमकी दिली होती. जिकरा नेहमी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत असते. परिसरात तिला एक दबंग महिला म्हणून कुख्यात होती. 

गुरुवारी रात्री उशिरा ही हत्येची घटना घडली. सीलमपूर येथे कुणाल नावाच्या तरुणावर चार ते पाच तरुणांनी रस्त्यात घेरुन चाकूने हल्ला केला होता. कुणाल दुकानात दूध घेण्यासाठी गेला होता. शेजाऱ्याने त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. हे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले तेव्हा कुणाल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रुग्णालयात नेलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं, कुणालच्या वडिलांनी त्यांचं कोणाशीही शत्रुत्व नव्हतं असं सांगितलं. मात्र हत्येत साहिल, जिकरा आणि त्यांचे मित्र सहभागी होते. 

कुणालचे वडील राजबीर यांनी म्हटलं की, जिकराने याआधीही आपल्या मुलाला तुला सोडणार नाही अशी धमकी दिली होती. या धमकीचं कारण माहिती नाही. सीलमपूर येथे राहणारी जिकरा परिसरात लेडी डॉन म्हणून फिरत असते. तिच्याबद्दल सांगितलं जातं की, ती जेलमध्ये बंद गँगस्टर हाशिम बाबाच्या पत्नी जोयासह वास्तव्यास आहे. जोयाला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. जोया जेलमध्ये गेल्यानंतर जिकरा आपली गँग तयार करत होती. सध्या तिच्यासह काही तरुण होते, त्यांनीच कुणालची हत्या केली. 

लेडी डॉन जिकरा शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत तुरुंगात गेली आहे. या हत्येच्या घटनेच्या फक्त 15 दिवस आधी तिची सुटका करणयात आली होती. ती नेहमी सोबत एक पिस्तूल ठेवायची. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, जिकरा लाला नावाच्या व्यक्तीला शोधत होती. लालाने तिच्या भावाला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. तिने कुणालला लालाबद्दल विचारलं होतं. जेव्हा तिने त्याला मदत केली नाही तेव्हा त्याची हत्या करण्यात आली. कुणालच्या मित्रांनी जिकराचा चुलत भाऊ साहिलवर हल्ला केला होता.

मात्र, मृत कुणालच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याचे कोणाशीही शत्रुत्व नव्हते. तो गिहारा समुदायाचा असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली. कुणालचे वडील राजबीर हे ऑटोचालक आहेत. कुटुंबात तीन भाऊ आणि एक बहीण आहे. स्थानिक लोक आणि सामाजिक कार्यकर्ते कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी करत आहेत. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून शिक्षा करावी अशीही मागणी करत आहेत. पोलिसांनी परिसरात सुरक्षेसाठी निमलष्करी दल तैनात केले आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. 

या घटनेनंतर सीलमपूर परिसरात तणाव आहे. परिसरातील अनेक हिंदू कुटुंबांनी त्यांच्या घराबाहेर ‘हिंदू स्थलांतर’, ‘हे घर विक्रीसाठी आहे योगी जी’, ‘आम्हाला मदत करा योगी जी’ असे पोस्टर्स लावले आहेत. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की परिसरातील हिंदू समाज घाबरला आहे. या घटनेनंतर लोक मृताच्या घरी पोहोचले आणि ‘खुन्यांना फाशी द्या’ अशा घोषणा दिल्या. एका व्यक्तीने सांगितले की त्याच्या भावाची 2012 मध्ये हत्या झाली होती. एका महिलेने सांगितले की तिच्या मुलाला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments