Sunday, June 28, 2026
Home Blog Page 37

माढा लोकसभा विकासाला वेग : रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दिल्लीत

0
माढा लोकसभा विकासाला वेग : रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दिल्लीत

फलटण प्रतिनिधी : माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली. पद असो वा नसो, मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची भूमिका या भेटीत पुन्हा अधोरेखित झाली. या बैठकीत माढा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध प्रलंबित आणि महत्त्वाच्या विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत ‘मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन’ प्रकल्पावर विशेष भर देण्यात आला. निंबाळकर खासदार असताना या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता मिळाली होती. यासंदर्भात पंतप्रधानांनी तातडीने लक्ष घालून संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या असून, लवकरच कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी प्रस्ताव मांडण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ‘मुंबई-बेंगलोर कॉरिडॉर हायवे’ प्रकल्पाबाबतही सविस्तर चर्चा झाली असून, त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
फलटण आणि माढा मतदारसंघासाठी महत्त्वाचे मानले जाणारे ‘बारामती-फलटण’ आणि ‘फलटण-पंढरपूर’ रेल्वेमार्ग याबाबतही पंतप्रधानांनी सविस्तर माहिती घेतली. या प्रकल्पांच्या प्रगतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.
याशिवाय, माढा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाची संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. या निर्णयामुळे प्रलंबित कामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या भेटीमुळे मतदारसंघाच्या विकासाला नवे बळ मिळेल आणि अनेक प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

फलटणमध्ये गॅस तुटवड्याचा गंभीर परिणाम : हॉटेल व्यवसाय ठप्प, प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

0
फलटणमध्ये गॅस तुटवड्याचा गंभीर परिणाम : हॉटेल व्यवसाय ठप्प, प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

फलटण :- फलटण तालुक्यात सध्या निर्माण झालेल्या एलपीजी गॅसच्या तीव्र तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर फलटण तालुका हॉटेल असोसिएशनने तहसीलदारांना लेखी निवेदन सादर करत गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण-अमेरिका संघर्षामुळे स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. अन्न हा जीवनावश्यक घटक असल्याने गॅस अभावी हॉटेल चालकांना अन्न शिजवणे कठीण झाले असून ग्राहकांना सेवा देण्यात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.
फलटणमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि पर्यटक येत असतात. त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रामुख्याने हॉटेल्सवर अवलंबून असते. मात्र गॅसचा पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक हॉटेल्सना सेवा बंद ठेवावी लागत असून, त्यामुळे ग्राहकांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
यासोबतच, हॉटेल व्यवसायाशी संबंधित असंख्य कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक व्यावसायिकांनी बँकांकडून कर्ज घेतले असून, उत्पन्न घटल्यामुळे कर्जफेड करणेही कठीण झाले आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करून हॉटेल असोसिएशनने प्रशासनाकडे गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आणि हॉटेल व्यवसायिकांना प्राधान्याने गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. प्रशासन यावर कोणती भूमिका घेते आणि कोणत्या ठोस उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोना काळातील योगदानाची आठवण
कोरोना महामारीच्या कठीण काळात हॉटेल व्यवसायिकांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतःच्या जीवाची व आर्थिक नुकसानीची पर्वा न करता नागरिकांना अन्नपुरवठा केला होता. लॉकडाऊनच्या काळात अनेक हॉटेल्स सुरू ठेवून त्यांनी गरजू नागरिक, रुग्ण आणि प्रशासनाला मोठे सहकार्य केले होते.
आता पुन्हा एकदा संकटाचा सामना करत असताना, “आम्ही समाजासाठी उभे राहिलो, आता शासनाने आमच्या पाठीशी उभे राहावे,” अशी भावना हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
हॉटेल व्यवसाय टिकवण्यासाठी आणि ग्राहकांना अखंड सेवा देण्यासाठी गॅसचा नियमित व पुरेसा पुरवठा होणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

फलटणमध्ये पंचायत समिती सभापती निवडीवरून वाद; ओबीसी समाज आक्रमक

0
फलटणमध्ये पंचायत समिती सभापती निवडीवरून वाद; ओबीसी समाज आक्रमक

फलटण :- फलटण तालुक्यात पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला असून ओबीसी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना या निवडीवर गंभीर आक्षेप घेत, कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे.
प्रा. हाके यांच्या मते, सभापती पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असताना गैर-ओबीसी व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचा अपमान झाल्याची भावना निर्माण झाली असून हा प्रकार घटनाविरोधी असल्याचा त्यांनी दावा केला.
या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे प्रा. हाके यांच्या उपस्थितीत ओबीसी बांधवांची बैठक पार पडली. बैठकीनंतर मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी विश्रामगृह ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी अनेकांनी आपली नाराजी आणि भावना व्यक्त केल्या.
प्रा. हाके यांनी सांगितले की, पंचायत समितीच्या अलीकडील निवडणुकीत ओबीसी समाजाचे नऊ सदस्य निवडून आले आहेत. तरीदेखील मूळ ओबीसी प्रतिनिधींना डावलून इतर प्रवर्गातील व्यक्तीला सभापती पद देण्यात आले, हे अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले. “ओबीसींसाठी राखीव असलेले पद ओबीसींनाच मिळत नसेल, तर त्यांनी जगायचे कसे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, राजकीय नेते ओबीसी समाजाचा केवळ मतांसाठी वापर करत असल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यात ओबीसी आरक्षण कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, या प्रकरणाविरोधात लवकरच मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.

साक्षात महालक्ष्मीचं गोंडस रूप; साताऱ्याच्या चिमुकलीत दिसलं महालक्ष्मीचं रूप, व्हिडीओ तुफान व्हायरल

0



Satara : साक्षात महालक्ष्मीचं गोंडस रूप; साताऱ्याच्या चिमुकलीत दिसलं महालक्ष्मीचं रूप, व्हिडीओ तुफान व्हायरल



Source link

फलटणच्या राजकारणात खळबळ! नंदकुमार मोरे यांचा गंभीर आरोप – “जनतेची घोर फसवणूक, आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी”

0
फलटणच्या राजकारणात खळबळ! नंदकुमार मोरे यांचा गंभीर आरोप – “जनतेची घोर फसवणूक, आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी”

फलटण (प्रतिनिधी): फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते Nandkumar More यांनी केलेली एक सोशल मीडिया पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमधून त्यांनी फलटणच्या जनतेची “घोर फसवणूक” झाल्याचा आरोप करत काही नेत्यांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. तसेच शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या आणि पक्ष विकणाऱ्या प्रवृत्तींवरही त्यांनी थेट निशाणा साधला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
नंदकुमार मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये काही धक्कादायक दावे करत फलटणमधील राजकारणात घडलेल्या एका कथित कूटनीतीचा उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही काळापूर्वी भावनिक वातावरण तयार करून राजकीय खेळी करण्यात आली.
शिवसेनेचा मोठेपणा आणि सभापती पदाचा मुद्दा
मोरे यांच्या मते, त्या काळात Shiv Sena कडे सदस्यसंख्या पुरेशी होती आणि ईश्वर चिठ्ठीचा पर्यायही उपलब्ध होता. तरीदेखील केवळ दिवंगत नेत्यांना आदरांजली म्हणून Nationalist Congress Party ला पहिल्या वर्षासाठी सभापती पद देण्याची विनंती करण्यात आली होती.
शिवसेनेच्या नेत्यांनी मोठेपणा दाखवत ही विनंती मान्य केली आणि स्वतः उपसभापती पद स्वीकारले, असेही मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
‘भावनिक कार्ड’ आणि कूटनीतीचा आरोप
मात्र, हा संपूर्ण प्रकार एक मोठ्या राजकीय कूटनीतीचा भाग असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सत्तेची महत्त्वाकांक्षा असलेल्या काही नेत्यांनी भावनिक कारणांचा आधार घेत मित्रपक्षाचा विश्वासघात केला.
विद्यमान आमदारांना थेट आव्हान
या प्रकरणावरून नंदकुमार मोरे यांनी फलटणच्या विद्यमान आमदारांवरही कडक शब्दांत टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की,
“आज महाराष्ट्रातील पहिलाच तालुका असा असेल, जिथे लोकनियुक्त आमदार असणाऱ्या पक्षाची एवढी दुरवस्था होत आहे. जर विद्यमान आमदारांकडे हिंमत असेल, तर त्यांनी आजच राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी. मग जनतेचा खरा कौल काय आहे, ते स्पष्ट होईल.”
या विधानामुळे फलटणमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
‘पक्ष विकणारी माणसं’ असा घणाघात
मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत तीव्र शब्दांचा वापर करत काही नेत्यांवर ‘पक्ष विकणारी माणसं’ असा आरोप केला आहे.
तसेच भविष्यात अशा राजकारणाचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
त्यांनी लिहिले की,
“ज्यांना आज हे राजकारण गोड वाटत आहे, त्यांचा भविष्यात होरपळून जळफळाट झाल्याशिवाय राहणार नाही. पक्ष विकणारी ही माणसं आहेत. दादांचा आत्मा लागणारच – हा आमचा शब्द आहे.”
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फलटण तालुक्यात नंदकुमार मोरे हे ज्येष्ठ आणि प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी थेट विद्यमान आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आता मोरे यांच्या आरोपांना विरोधी गटाकडून काय उत्तर दिले जाते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

फलटण पंचायत समितीत ओबीसींना दुय्यम वागणूक?सभापती-उपसभापती निवडीनंतर ओबीसी समाजात नाराजी; १७ मार्चला तातडीची बैठक

0
फलटण पंचायत समितीत ओबीसींना दुय्यम वागणूक?सभापती-उपसभापती निवडीनंतर ओबीसी समाजात नाराजी; १७ मार्चला तातडीची बैठक

फलटण : फलटण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेनंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून ओबीसी समाजामध्ये नाराजीची लाट उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पंचायत समितीत ओबीसी समाजाचे तब्बल नऊ सदस्य असतानाही सभापती किंवा उपसभापती पदासाठी ओबीसी समाजाला संधी देण्यात आली नसल्याने समाजामध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
पंचायत समितीच्या नेतृत्वाच्या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर निवड करताना ओबीसी समाजाला पूर्णपणे डावलण्यात आल्याची चर्चा सध्या फलटण तालुक्यात जोर धरत आहे. समाजातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. समाजाच्या संख्याबळाच्या तुलनेत नेतृत्वात योग्य प्रतिनिधित्व न दिल्याने समाजावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
राजकीय समीकरणांमध्ये ओबीसी समाजाची ताकद मोठी असतानाही पंचायत समितीच्या सत्ताकारणात त्यांना स्थान न मिळाल्याने समाजातील विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून सामाजिक व राजकीय पातळीवर आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर समस्त ओबीसी समाज, फलटण यांच्या वतीने या विषयावर सखोल चर्चा करून पुढील भूमिका ठरविण्यासाठी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पंचायत समितीच्या निवड प्रक्रियेबाबत चर्चा केली जाणार असून समाजाच्या हक्कासाठी पुढे कोणती भूमिका घ्यायची यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
बैठकीत आंदोलनात्मक किंवा संघटनात्मक पावले उचलण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
समाजातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले मत मांडावे व समाजाच्या हक्कासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बैठकीचा तपशील
📅 दिनांक : १७ मार्च २०२६
⏰ वेळ : सायंकाळी ५.०० वाजता
📍 स्थळ : श्रीसंत सावतामाळी मंदिर, फलटण
फलटण तालुक्यातील ओबीसी समाजाच्या पुढील राजकीय व सामाजिक भूमिकेचा निर्णय या बैठकीतून होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

फलटण पंचायत समितीवर भाजपचा झेंडा; शिवांजली भोसले सभापती, अमोल सस्ते उपसभापती बिनविरोध

0
फलटण पंचायत समितीवर भाजपचा झेंडा; शिवांजली भोसले सभापती, अमोल सस्ते उपसभापती बिनविरोध

फलटण पंचायत समितीवर भाजपचा झेंडा; शिवांजली भोसले सभापती, अमोल सस्ते उपसभापती बिनविरोध


फलटण – फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या शिवांजली विक्रम भोसले यांची तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अमोल सस्ते यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनिमित्त फलटणच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड पाहायला मिळाली असून नाईक निंबाळकर गटातील मतभेद बाजूला ठेवत दोन्ही गटांमध्ये मनोमिलन झाल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे जवळपास तीस वर्षांनंतर भाजपने फलटण पंचायत समितीवर प्रथमच सभापती पद मिळवत सत्तांतर घडवून आणले आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत फलटण पंचायत समितीच्या एकूण १६ जागांपैकी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप-राष्ट्रवादी आघाडीला ८ जागा मिळाल्या होत्या. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेलाही ८ जागा मिळाल्या. त्यामुळे सभापती व उपसभापती निवडीत मोठी उत्सुकता आणि राजकीय पेच निर्माण झाला होता.
दोन्ही गटांचे सदस्य समान संख्येने निवडून आल्यामुळे महिनाभर राजकीय हालचाली सुरू होत्या. काही सदस्य सहलीवर गेल्याने राजकीय चर्चांना अधिक रंग चढला होता. अखेर आज सर्व सदस्य थेट पंचायत समितीच्या सभागृहात दाखल झाले आणि निवड प्रक्रियेला सुरुवात झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेची माहिती दिली. अर्ज दाखल करण्याच्या वेळेत सभापती पदासाठी शिवांजली विक्रम भोसले तर उपसभापती पदासाठी अमोल सस्ते यांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडणुकीपूर्वी सकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीपसिंह भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी शिवसेनेचे नेते तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर सभापती पद भाजप-राष्ट्रवादी आघाडीला आणि उपसभापती पद शिवसेनेला देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान सकाळी आणखी एक नाट्यमय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवांजली विक्रम भोसले यांची सभापतीपदी निवड करण्यात आली.
निवडीनंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते शिवांजली भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आनंद व्यक्त करत पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे राबविण्यात येतील, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व सदस्यांना समान संधी दिली जाईल आणि राजकारण बाजूला ठेवून विकासाला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली.
या वेळी आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

फलटण पंचायत समिती सभापती निवडीवरून राजकीय वाद; ओबीसी सेल अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनाम्याचा निर्णय

0
फलटण पंचायत समिती सभापती निवडीवरून राजकीय वाद; ओबीसी सेल अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनाम्याचा निर्णय


फलटण प्रतिनिधी : फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या पदावर कुणबी-मराठा दाखला असलेल्या सदस्याची बिनविरोध निवड झाल्याने तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदावर अशा प्रकारे निवड झाल्यामुळे ओबीसी समाजातील विविध संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून या निर्णयावरून राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समितीतील सभापतीपद हे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होते. मात्र निवड प्रक्रियेदरम्यान कुणबी-मराठा दाखला असलेल्या सदस्याची बिनविरोध निवड करण्यात आली. या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वावर गदा आली असल्याचा आरोप स्थानिक ओबीसी कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर “OBC से पंगा महंगा पडेगा” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दरम्यान, या घडामोडींवर नाराजी व्यक्त करत भाजप फलटण तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष तसेच विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांशी तडजोड होत असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
याचवेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भातही या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करताना मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा जाहीरपणे मराठा समाजाला आरक्षण हे शिक्षण व नोकरीपुरतेच हवे असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र फलटण पंचायत समितीतील ओबीसी आरक्षणाच्या पदावर कुणबी-मराठा दाखल्याच्या आधारे सदस्याची निवड झाल्यामुळे या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याची चर्चा आहे.
या प्रकरणामुळे फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील ओबीसी संघटनांमध्ये नाराजी वाढत असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता वर्तवली जात असून संबंधित निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणीही काही संघटनांकडून केली जात आहे.

ओबीसी आरक्षणावर अन्याय; फलटण तालुका भाजपा ओबीसी अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

0
ओबीसी आरक्षणावर अन्याय; फलटण तालुका भाजपा ओबीसी अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा


फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी आरक्षित असलेल्या पदावर अन्याय झाल्याचा आरोप करत फलटण तालुका भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष तथा विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे.
पंचायत समितीच्या सभापती पदासाठी ओबीसी समाजाला आरक्षण असतानाही ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखी घटना घडली असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत ओबीसी समाजावर झालेला अन्याय मन सुन्न करणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या घटनेचा निषेध करताना सागर अभंग म्हणाले की, “मी पक्षाचा नाही तर माझ्या ओबीसी समाजाचा आहे. माझा कोणत्याही नेत्यांवर किंवा नेतृत्वावर राग नाही. मात्र, ओबीसी समाजाला सभापती पदाचे आरक्षण असतानाही अन्याय का करण्यात आला? याचे उत्तर मिळाले नाही, ही खंत आहे.”
या पार्श्वभूमीवर सभापती पदाच्या निवडीचा निषेध म्हणून आपण फलटण तालुका भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

फलटण पंचायत समिती सभापतीपदाचा सस्पेन्स कायम; 8 विरुद्ध 8 जागांमुळे पेच, राजे गट विरुद्ध खासदार

0


Satara Panchayat Samiti News : सातारा जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापती (Panchayat Samiti Chairman) निवडींकडे आज राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. पण सगळ्यात जास्त उत्सुकता आहे ती फलटण पंचायत समितीच्या (Phaltan Panchayat Samiti Chairman)सभापतीपदाच्या निवडीची. कारण येथे सत्तेचा आकडा कुणाच्याही बाजूने स्पष्ट नाही. एकीकडे राष्ट्रवादी-भाजप युतीकडे आठ जागा, तर दुसरीकडे शिवसेनेकडेही आठ जागा असल्याने सभापतीपदाचा पेच अधिकच वाढला आहे.

Satara Panchayat Samiti  : अटीतटीच्या, हाय व्होल्टेज निवडणुकीनंतर आता सभापतीपदाची लढत प्रतिष्ठेची

दरम्यान, राजे गट आणि खासदार गट यांच्यात झालेल्या अटीतटीच्या, हाय व्होल्टेज निवडणुकीनंतर आता सभापतीपदाची लढत प्रतिष्ठेची बनली आहे. एका बाजूला माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर दुसऱ्या बाजूला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील यांच्यासाठीही ही सभापतीपदाचे निवडणूक तितकीच महत्त्वाची मानली जात आहे.

Phaltan News : फलटणमध्ये नशिब, डावपेच आणि राजकारणाचा तिहेरी सामना

फलटणमध्ये सभापतीपदासाठी नशिब, डावपेच आणि राजकारणाचा तिहेरी सामना पाहायला मिळणार आहे. सदस्यांची पळवापळवी, शेवटच्या क्षणापर्यंत चालणारे राजकीय डावपेच आणि संभाव्य वादाच्या शक्यतेमुळे फलटण पंचायत समितीची सभापती निवड आता केवळ निवडणूक न राहता राजकीय प्रतिष्ठेचा रणसंग्राम ठरत आहे.आता या हाय व्होल्टेज सामन्यात नशीब कुणाच्या बाजूने उभं राहतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Phaltan News : फलटणमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर सामना 

फलटणमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला होता. काही दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यात पुढं काही घडलं नाही. आता पुन्हा दोन्ही निंबाळकर आमने सामने आले आहेत.

Phaltan : फलटणमध्ये आगीचे तांडव: तरडगावात 5 एकरातील गहू जळून खाक; हाता-तोंडाला आलेला घास हिरावला

फलटण तालुक्यातील तरडगाव परिसरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. काढणीला आलेलं सुमारे 5 एकरातील गव्हाचं पीक भीषण आगीत जळून खाक झालं आहे. तरडगाव येथील शेतात गव्हाचे काड्या पेटवत असताना शेजारी शेतात उभ्या गव्हाच्या पिकाला झळ बसल्याने पाच एकर गहू जळून खाक झाला आहे. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. जळालेल्या गव्हाच्या क्षेत्राचा पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.

 इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा



Source link