Sunday, June 28, 2026
Home Blog Page 36

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, बहुमतात असणाऱ्या शिवसेना राष्ट्रवादीला मोठा धक्का

0


सातारा :  सातारा जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेत यश मिळवले आहे. या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ केवळ 28 सदस्यांपर्यंत असताना, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राजकीय रणनीतीती आखून अतिरिक्त पाठिंबा मिळवत एकूण 33 सदस्यांचा पाठिंबा भाजपला मिळवून दिला आहे. त्यामुळं सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली आहे. भाजपाच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष पदी राजू भोसले यांना संधी मिळाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

कोणत्या पक्षाकडे किती सदस्य आहेत?

सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20, शिवसेना शिंदे गटाकडे 15, काँग्रेसकडे 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे 1, भाजपकडे 27 तर अपक्ष 1 असे 65 सदस्यांचे बलाबल होते. भाजपच्या झालेल्या बैठकीला अपक्ष 1 धरुन 28 सदस्य उपस्थित होते. आजच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचे तीन सदस्य फोडले, तसेच शिवसेना शिंदे गटाचेही दोन सदस्य फोडले. त्यामुळं भाजपचे संख्याबळ 33 झाले. 

भाजपाच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड 

निर्णायक बहुमताच्या आधारे भाजपाच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष पदी राजू भोसले यांना संधी मिळाली आहे. या विजयामुळे केवळ सत्ता परिवर्तन झाले नाही, तर साताऱ्यासारख्या पारंपरिक राजकीय बालेकिल्ल्यात भाजपाने आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. स्थानिक पातळीवरील सूक्ष्म नियोजन, प्रभावी संवाद आणि संघटन कौशल्य यामुळं भाजपाला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला. सातारा जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा फडकला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची धुरंधर राजकीय खेळी मानली जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर भाजपने बाजी उलटवली असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा एका मताने थरारक विजय हा साताऱ्यात भाजपाचा करिश्मा पुन्हा एकदा अधोरेखित करणारा विजय ठरला आहे.

सातारा जिल्हा परिषद एकूण संख्याबळ 65

भाजप – 27
राष्ट्रवादी – 20
शिवसेना – 15
काँग्रेस – 1
अपक्ष – 2

आजच्या निवडी मध्ये फुटलेले सदस्य 

राष्ट्रवादी काँग्रेस

लता करणे – (बुध खटाव) 
ऋतुजा जगताप – (फलटण) 
कामेश कांबळे – (सातारा

अपहरणाच्या गुन्ह्याखाली राष्ट्रवादीचे उचलून नेलेले सदस्य 

अनिल देसाई (माण)
संदीप मांडवे  (खटाव)

 शिवसेनेचे फुलटेले सदस्य

हणमंत जगदाळे (कोरेगाव कुमठे)
सारिका फाळके (सतार रोड)

आणखी वाचा



Source link

सातारा जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता; अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांवर विजय

0
सातारा जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता; अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांवर विजय


सातारा : जिल्हा परिषद सत्तेसाठी झालेल्या चुरशीच्या राजकीय लढतीत भारतीय जनता पक्षाने प्रभावी रणनीती राबवत अखेर सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कुशल नियोजनाची या विजयामागे मोठी भूमिका असल्याची चर्चा रंगली आहे.
भाजपने अचूक राजकीय डावपेच आखत संख्याबळाची प्रभावी जुळवाजुळव केली आणि अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर विजय मिळवला. अध्यक्षपदी प्रिया शिंदे यांची निवड झाली असून, उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र भाजपच्या नियोजनबद्ध हालचालींसमोर त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
या निकालामुळे सातारा जिल्ह्यात भाजपचा प्रभाव अधिक मजबूत झाला असून, आगामी राजकीय घडामोडींवरही त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात सत्तासंग्राम रंगात; ‘३३’ चा जादुई आकडा कोण गाठणार?

0
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात सत्तासंग्राम रंगात; ‘३३’ चा जादुई आकडा कोण गाठणार?


सातारा प्रतिनिधी :- गुढीपाडव्याच्या उत्सवी वातावरणात सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेची राजकीय रंगभूमीही सजली आहे. नववर्षाच्या स्वागताबरोबरच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी-शिवसेना युती असा थरारक सामना रंगणार आहे. गुढीप्रमाणे सत्तेची गुडी कोण उभारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने जिल्ह्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून, सत्तेसाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत.
‘३३’ चा आकडा ठरणार निर्णायक
जिल्हा परिषदेच्या एकूण ३३ जागांमध्ये बहुमताचा आकडा गाठणे हे सर्व पक्षांसमोरचे मोठे आव्हान आहे. भाजपकडे २७ सदस्य आणि १ अपक्षाचा पाठिंबा मिळून २८ सदस्य आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्यांना अजून ५ सदस्यांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून विरोधी पक्षातील सदस्यांना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी सावध रणनीती आखत आपला गट मजबूत ठेवण्यावर भर दिला आहे. फोडाफोडी टाळण्यासाठी त्यांनी आपल्या सदस्यांना बाहेर सुरक्षित ठेवल्याचेही समोर आले आहे.
हाय व्होल्टेज ड्रामा आणि व्हीपची तयारी
सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी-शिवसेना युतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीदरम्यान सर्व सदस्यांना व्हीप जारी केला जाणार असून, प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्हा परिषद परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, सदस्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
रणनीती विरुद्ध आक्रमकता
भाजपने ‘एकला चलो’ धोरण स्वीकारत स्वबळावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. तर राष्ट्रवादी-शिवसेना युतीने संयम आणि नियोजनबद्ध पद्धतीने सत्ता टिकवण्यावर भर दिला आहे. अंतिम क्षणी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भविष्यातील राजकारणावर परिणाम
ही निवडणूक केवळ अध्यक्ष-उपाध्यक्ष पदापुरती मर्यादित नसून, साताऱ्यातील पुढील राजकीय दिशा ठरवणारी आहे. मतदारांनी दिलेल्या कौलामुळे सत्तेवर संतुलन राहणार असून, विरोधकांनाही प्रभावी भूमिका बजावण्याची संधी मिळणार आहे.
सातारा जिल्हा परिषद निवडणूक ही स्थानिक स्वराज्य, लोकशाही मूल्ये आणि राजकीय रणनीती यांचा संगम ठरत असून, तिचा परिणाम दीर्घकाळ जाणवणार आहे.

फलटणच्या सर्वांगीण विकासामागील दूरदर्शी नेतृत्व : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रेरणादायी वाटचाल

0
फलटणच्या सर्वांगीण विकासामागील दूरदर्शी नेतृत्व : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रेरणादायी वाटचाल

फलटण प्रतिनिधी :- फलटणच्या सर्वांगीण विकासामागील दूरदर्शी नेतृत्व : रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रेरणादायी वाटचाल
फलटण तालुक्याच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनात वेगळी छाप उमटवणारे नाव म्हणजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. सुसंस्कृत विचार, अभ्यासू वृत्ती, स्पष्टवक्तेपणा आणि दूरदृष्टी या गुणांच्या जोरावर त्यांनी नेतृत्वाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधत त्यांनी फलटण तालुका आणि सातारा जिल्ह्याच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे.
बालपणापासून घडलेले सर्वांगीण व्यक्तिमत्त्व
८ एप्रिल १९४८ रोजी जन्मलेल्या रामराजे यांच्या व्यक्तिमत्त्वात लहानपणापासूनच शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक जाणीव यांचा उत्तम संगम दिसून येतो. उच्च शिक्षण घेत असताना त्यांनी विविध क्षेत्रांत सक्रिय सहभाग घेतला. विशेषतः क्रिकेटसारख्या खेळांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवत नेतृत्वगुण विकसित केले.
जनतेशी नाळ जुळवणारा राजकीय प्रवास
राजकारणात प्रवेश करताच त्यांनी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम करण्यावर भर दिला. लोकाभिमुख निर्णय, अभ्यासपूर्ण भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
१९९१ मध्ये फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष
१९९९ मध्ये महसूल राज्यमंत्री
२००४ मध्ये कॅबिनेट मंत्री
पुढे विधान परिषदेचे सभापती
सभापती म्हणून त्यांनी संयम, शिस्त आणि निष्पक्षतेच्या आधारे सभागृहाचे कामकाज प्रभावीपणे हाताळले.
जलसिंचन आणि पायाभूत विकासात मोठी झेप
फलटण तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले. विशेषतः जलसिंचन आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे.
नीरा-देवघर जलसिंचन योजना
धोम-बलकवडी प्रकल्प
शेतीसाठी पाणी उपलब्धता
रस्ते आणि पायाभूत सुविधा विकास
या उपक्रमांमुळे हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला असून कृषी क्षेत्राला नवे बळ मिळाले.
शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान
ग्रामीण भागात उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. विविध शैक्षणिक संस्था स्थापन करून विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी निर्माण केल्या. विशेषतः समाजातील दुर्बल घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर त्यांनी भर दिला.
सर्वसमावेशक समाजघडणीचा दृष्टिकोन
रामराजे नाईक निंबाळकर यांनी सामाजिक एकजूट, समता आणि प्रगती यांना नेहमीच प्राधान्य दिले. जात, पंथ आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक विकास साधण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यांच्या साधेपणामुळे आणि जनतेशी असलेल्या जवळिकीमुळे ते ‘रयतेचे राजे’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
नव्या पिढीसाठी प्रेरणादायी वारसा
आजच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीतही त्यांचे कार्य आणि विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांनी घालून दिलेला विकासाचा मार्ग, समाजहिताची जाणीव आणि नेतृत्वाची मूल्ये ही भविष्यासाठी दिशादर्शक आहेत.
त्यांच्या कार्याचा आढावा घेतला असता स्पष्ट होते की त्यांनी केवळ राजकारण केले नाही, तर समाजघडणीचे भक्कम कार्य उभे केले. फलटणच्या विकासगाथेत त्यांचे नाव कायम स्मरणात राहील.

साताऱ्यात विद्यार्थ्यांकडून पेपर तपासणी, अकोल्यात 268 शिक्षकांचा बदली घोटाळा

0


मुंबई : राज्यातील शिक्षण क्षेत्रात दोन धक्कादायक प्रकार समोर आले असून शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सातारा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर सहावीच्या विद्यार्थ्यांकडून तपासून घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे, तर अकोला येथे शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर आला आहे.

Satara Paper Scandal : सहावीच्या विद्यार्थ्याकडून दहावीचे पेपर तपासले

साताऱ्यातील फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सहावीच्या विद्यार्थ्याकडून दहावीचे पेपर तपासून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला, ज्यामुळे शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता आणि विश्वासार्हता यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या वेळी संबंधित शिक्षकांचे नाव वैभव शेंडे असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचा दावा शाळेने केला. 

Satara SSC Paper Checking Scam : तक्रारदारालाच नोटीस

हा प्रकार उघड करणाऱ्या तक्रारदारालाच संस्थेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने वाद अधिकच वाढला आहे. विशेष म्हणजे, पेपर तपासणारा शिक्षक आणि तक्रार करणारा व्यक्ती या दोघांनाही समान नोटीस देण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे.

Akola Transfer Scam : 268 शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे वापरली

दुसरीकडे अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागात आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघड झाला आहे. बदलीत फायदा मिळवण्यासाठी 268 शिक्षकांनी दिव्यांग, परित्यक्त आणि अंतराच्या नावाखाली बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे. काही शिक्षकांनी स्वतःला दिव्यांग दाखवले, तर काहींनी खोटा घटस्फोट दाखवून लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.

Maharashtra Education Scam : अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

या प्रकरणात प्रभारी गट शिक्षणाधिकारी दिनेश दुतोंडे यांच्यासह चार जणांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच सुमारे 300 जणांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे.

Teachers Transfer Scam : चौकशीत गंभीर त्रुटी

तक्रारीनंतर झालेल्या त्रिस्तरीय चौकशीत अनेक अहवाल त्रुटीपूर्ण आढळले असून, अपात्र शिक्षकांना बदलीचा लाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शिक्षण विभागाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Education System Collapsed : शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न

एकीकडे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारे प्रकार, तर दुसरीकडे शिक्षकांकडूनच नियमांचा गैरवापर होत असल्याने सातारा ते अकोल्यातील शिक्षणातील घोटाळ्यांमुळे शिक्षण व्यवस्थेचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

अवकाळी पावसाचा धुमाकूळ! फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, राज्यात कुठं कुठं पडतोय पाऊस?

0


Maharashtra Unseasonal Rain :  राज्यात सध्या अवकाळी पावसानं धउमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरु झाला आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. विशेषत फळ बाग शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. द्राक्ष बागांसह, आंबा, काजू, केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, राज्याच्या कोणकोणत्या भागात अवकाळी पाऊस झाला त्याबाबतची माहिती पाहुयात. 

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात गारांचा तुफान पाऊस

सांगोला तालुक्यातील जुनोनी जुजारपूर वगैरे परिसरात गेले दोन तासापासून तुफानी गारांचा पाऊस सुरू असल्याने द्राक्ष आंबा आणि डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन तासापासून मेघगर्जनेसह गारांचा अक्षरशः सडा सर्वत्र पडत असून यामुळे शेतातील द्राक्षांचे मणी फुटले आहेत तर डाळिंबाचा मोहोर गळून पडला आहे. त्याशिवाय फळाला आलेल्या केशर आंब्याचे ही मोठे नुकसान झाले असून अनेक कैऱ्या पडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला गहू आणि शेतातून उतरवलेल्या ज्वारीलाही याचा मोठा फटका बसला आहे. आज सायंकाळी बीजाचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यानंतर या गाराच्या पावसाला सुरुवात झाली. दरम्यान डिकसळ येथे एका झाडावर वीज पडून झाड भस्मसात झाल्याची माहिती समोर आली आहे जुनोनी , तिप्पेहळी ,जुजारपूर , करांडेवाडी , गौडवाडी , कोळे , बुद्धेहाळ या सांगोला तालुक्यातील परिसरामध्ये जोरदार गारांचा पाऊस झाला आहे. शेतमालाचे बरेच नुकसान झाल्याची शक्यता आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात गारांचा मोठा पाऊस

सातारा जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून आज संध्याकाळच्या सुमारास फलटण तालुक्यात धुमाळवाडी सह गिरवी भागात विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळं काढणीस आलेल्या पिकांसह धुमाळवाडीतील डाळिंब फळा बरोबर आंब्याचा मोहराचे देखील नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साधारण अर्धा तास पडलेल्या गारपिटीमुळे याचा पिकांवर परिणाम होणार आहे.

अवकाळी पापवासामुळं नाशिक जिल्ह्यात शेती पिकांचं नुकसान

नाशिक जिल्ह्यातील ताहाराबाद येथे अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वादळ वारा व विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली आहे. काढणीला आलेला कांदा व शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सटाणा तालुक्यातील मुल्हेर, अंतापूर, ताहाराबाद परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. बाजारपेठेतील व्यापारी वर्गाची पावसामुळे झाली धावपळ झाली. 

गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट

गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील शिरोली महागाव परिसरात आज अचानक वादळी वारा व गारपिटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मका पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला असून गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील महागाव शिरोली परिसरात अचानक गारपटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळं मका पिकाला फटका बसण्याची शक्यता असून धान पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे. अचानक आलेल्या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अवकाळी पाऊस

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या कडाक्याचे ऊन पडत असतानाच, सोयगाव शहरात निसर्गाचे वेगळेच रुप पाहायला मिळाले. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडावली. केवळ पाऊसच नाही, तर सोयगाव शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गारांचा वर्षाव झाला आहे. रस्त्यावर आणि घरांच्या छतावर गारांचा पांढरा शुभ्र थर साचलेला पाहायला मिळत होता. मार्च महिन्याच्या उत्तरार्धात अशा प्रकारे गारा पडल्याने स्थानिक नागरिकही अवाक झाले आहेत. या गारपिटीमुळे हवेत तात्पुरता गारवा निर्माण झाला असला तरी, हे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.

 

आणखी वाचा



Source link

फलटणमध्ये बांधकामांचा बेजबाबदारपणा; रस्त्यांवरील साहित्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका

0
फलटणमध्ये बांधकामांचा बेजबाबदारपणा; रस्त्यांवरील साहित्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका

फलटण प्रतिनिधी :- फलटण शहरात सुरू असलेल्या विविध बांधकाम कामांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कथित निष्काळजीपणामुळे रस्त्यांवरच खडी, मुरूम, सिमेंटचे तुकडे आणि राडारोडा साचलेला दिसत असून, यामुळे अपघातांची मालिका वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.
रस्त्यांवरच बांधकाम साहित्य; वाहतुकीला अडथळा
शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर बांधकामासाठी लागणारे साहित्य थेट रस्त्यावर टाकले जात आहे. काही ठिकाणी तर रस्त्याच्या मधोमधच खडी व मुरूमचे ढिगारे ठेवण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांना अचानक अडथळ्यांना सामोरे जावे लागत असून दुचाकीस्वार, सायकलस्वार आणि पादचाऱ्यांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे.
विशेषतः हडको परिसरात ही समस्या अधिक तीव्र असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
अपघातांची मालिका; अनेक जखमी
गेल्या काही दिवसांत दुचाकी घसरून पडण्याच्या तसेच वाहनांचे संतुलन बिघडून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना समोर येत असून काहींना गंभीर दुखापती झाल्याची माहिती आहे.
तथापि, या अपघातांची अधिकृत नोंद किंवा तपासाबाबत स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
रात्री धोका अधिक वाढतो
दिवसाच्या तुलनेत रात्री परिस्थिती अधिकच गंभीर होते. अनेक ठिकाणी अपुरी प्रकाशयोजना असल्यामुळे रस्त्यावर साचलेले साहित्य दिसत नाही. परिणामी वाहनचालक अचानक अडथळ्यांवर आदळतात.
याशिवाय अनेक ठिकाणी चेतावणी फलक किंवा बॅरिकेड्स नसल्याने अपघातांचा धोका अधिकच वाढतो.
तक्रारींकडे दुर्लक्ष? नागरिकांचा संताप
स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र या तक्रारींवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
“काम सुरू करताना सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत. अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नियमांचे उल्लंघन; कारवाईचा अभाव
शहरी भागात बांधकाम करताना रस्त्यावर साहित्य टाकणे, बॅरिकेड्स न लावणे आणि चेतावणी फलक न ठेवणे हे नियमांचे उल्लंघन मानले जाते.
तरीही संबंधित ठेकेदार व बांधकाम व्यावसायिकांकडून नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे आरोप आहेत. यावर कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विकास की धोका?
शहराच्या विकासासाठी सुरू असलेली कामेच नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक ठरत असतील, तर अशा विकासाचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे. नियोजनशून्य कामकाजामुळे विकासाऐवजी धोका वाढत असल्याची टीका होत आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
रस्त्यांवरील बांधकाम साहित्य तात्काळ हटवावे
प्रत्येक कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स व चेतावणी फलक लावावेत
रात्री योग्य प्रकाशयोजना करावी
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
अपघातग्रस्तांसाठी मदत व नुकसानभरपाईची यंत्रणा उभारावी
प्रशासनाची अग्निपरीक्षा
सध्याची परिस्थिती पाहता फलटणमधील नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
वेळेत उपाययोजना न झाल्यास नागरिकांकडून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

फलटणमध्ये संयमाचे आवाहन : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचा वाढदिवस यंदा साजरा न करण्याचा निर्णय

0
फलटणमध्ये संयमाचे आवाहन : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचा वाढदिवस यंदा साजरा न करण्याचा निर्णय

फलटणमध्ये संयमाचे आवाहन : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचा वाढदिवस यंदा साजरा न करण्याचा निर्णय


फलटण : विधानपरिषद माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे कार्यकर्ते व हितचिंतकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. गुढीपाडवा निमित्त येणारा त्यांचा वाढदिवस यंदा साजरा करू नये, अशी त्यांनी स्पष्ट विनंती केली आहे.
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व .अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाबद्दल (स्टेटसमधील उल्लेखानुसार) शोक व्यक्त करत, यावर्षी कोणत्याही प्रकारचे वाढदिवसाचे कार्यक्रम, शुभेच्छा फलक किंवा सत्कार आयोजित करू नयेत, असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या संदेशात त्यांनी नमूद केले की, “सर्व कार्यकर्ते व हितचिंतकांनी कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत, ही नम्र विनंती.”
दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात साजरा होणारा त्यांचा वाढदिवस यंदा साधेपणाने पाळला जाणार असून, कार्यकर्त्यांनाही संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फलटण नगरपरिषदेचा ३५१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; ‘सीटिंग’ वादाने राजकीय वातावरण तापले

0
फलटण नगरपरिषदेचा ३५१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; ‘सीटिंग’ वादाने राजकीय वातावरण तापले

फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषदेची अत्यंत महत्त्वाची विशेष सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत सन २०२६–२०२७ या आर्थिक वर्षासाठी तब्बल ३५१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शहराच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प मंजूर झाला असला, तरी सभागृहात घडलेल्या राजकीय घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधले.
सकाळी सुमारे ११ वाजता झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नगराध्यक्षांच्या आदेशानुसार अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर समितीने मंजुरी दिल्यावर दुपारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत हा अर्थसंकल्प बहुमताने आणि सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
अर्थसंकल्पाचा तपशील
यंदाच्या अर्थसंकल्पात महसुली आणि भांडवली लेखाशीर्षांत नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत.
प्रारंभीची शिल्लक: ५९,३७,६०,९४४ रुपये
महसुली जमा: ५०,५८,२८,५०० रुपये
एकूण जमा (शिल्लकसह): ३५१,६९,१९,४४४ रुपये
महसुली खर्च: ५६,८०,९२,४८० रुपये
भांडवली खर्च: २,९४,८३,००,००० रुपये
एकूण खर्च: ३५१,६३,९२,४८० रुपये
अखेरची शिल्लक: ५,२६,९६४ रुपये
बैठक व्यवस्था’ वादाचा ठरला मुख्य मुद्दा
सभेदरम्यान सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो बैठक व्यवस्थेचा. विरोधी गटाचे स्वीकृत नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित असताना त्यांना मागील बाकावर बसवण्यात आले, तर अनुपस्थित असलेले शिवसेना गटनेते व माजी नगराध्यक्ष पांडुरंग (आबा) गुंजवटे यांची जागा पहिल्या रांगेत राखीव ठेवण्यात आली होती.
या निर्णयामुळे शिवसेना गटातील काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत थेट नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना पहिल्या रांगेत बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. या घटनेमुळे नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
निधी वाढवण्याची मागणी
आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती सचिन अहिवळे यांनी अर्थसंकल्पातील २९ शीर्षकांमध्ये विकासकामांसाठी निधी अपुरा असल्याचे सांगत निधी वाढवण्याची मागणी केली. या मागणीला भाजपा गटनेते रोहित नागटिळे यांनी अनुमोदन दिले.
अर्थसंकल्प सादरीकरणातील विलंबावरून सवाल
विरोधी नगरसेवक पंकज पवार आणि विकास काकडे  यांनी अर्थसंकल्प उशिरा सादर झाल्याबद्दल प्रशासनाला जाब विचारला. “२८ फेब्रुवारीपूर्वी अर्थसंकल्प सादर होणे अपेक्षित असताना तो उशिरा का सादर करण्यात आला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सर्व गटनेत्यांशी चर्चा करूनच आणि शासकीय नियमांनुसार अर्थसंकल्प सादर केल्याचे स्पष्ट केले.
लहान फॉन्ट’वरही आक्षेप
विरोधी नगरसेवक विकास काकडे यांनी अर्थसंकल्पाची छपाई लहान अक्षरात करण्यात आल्याची तक्रार केली. पुढील बैठकीत अहवाल मोठ्या फॉन्टमध्ये देण्याची मागणी त्यांनी केली, ज्यास अध्यक्षांनी मान्यता दिली.
उपस्थित मान्यवर व नगरसेवक
या सभेस सार्वजनिक बांधकाम सभापती सोमाशेठ जाधव, आरोग्य सभापती सचिन अहिवळे, नियोजन सभापती संदीप चोरमले, पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. मोहिनी हेंद्रे, मागासवर्गीय समिती सभापती सौ. सुपर्णा अहिवळे उपस्थित होते.
याशिवाय स्वीकृत नगरसेवक अशोकराव जाधव, भाजपा गटनेते रोहित नागटिळे, पंकज पवार, अझरुद्दीन (पप्पू) शेख, विशाल तेली, किरण राऊत, तसेच सौ. रुपाली सस्ते, अमित भोईटे, सौ. अस्मिता लोंढे, सुदाम (अप्पा) मांढरे, सौ. कांचन व्हटकर, सौ. मीना काकडे, सौ. स्मिता शहा, सौ. रुपाली जाधव, सौ. श्वेता तारळकर आदी नगरसेवक-नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अखेर, विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर हा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

फलटणमध्ये मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक आज; नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार व भविष्यातील धोरणांवर चर्चा

0
फलटणमध्ये मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक आज; नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार व भविष्यातील धोरणांवर चर्चा


फलटण प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील मराठा समाजासाठी आज, बुधवार दि. १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चा मध्यवर्ती कार्यालय, फलटण येथे होणाऱ्या या बैठकीस तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अलीकडेच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत कुणबी मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करत कु. शिवाजंली भोसले या सभापतीपदी निवडून आल्या आहेत, तर अमोल दशरथ सस्ते यांनी उपसभापती पदाची धुरा सांभाळली आहे. त्यांच्या या निवडीच्या पार्श्वभूमीवर बैठकीदरम्यान दोन्ही मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या बैठकीत स्थानिक राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यात येणार असून, मराठा समाजासमोरील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा होणार आहे. तसेच आगामी काळातील धोरणात्मक भूमिका, संघटनात्मक बळकटीकरण आणि समाजाच्या एकजुटीसाठी आवश्यक पावले याबाबतही विचारविनिमय करण्यात येणार आहे.
मराठा समाजाच्या भविष्यासाठी दिशा ठरवणारी ही बैठक महत्त्वाची मानली जात असून, सर्व समाजबांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवून बैठकीस यशस्वी करावे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.