Tuesday, August 11, 2026
Homeसातारामाढा लोकसभा विकासाला वेग : रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी...

माढा लोकसभा विकासाला वेग : रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दिल्लीत

फलटण प्रतिनिधी : माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली. पद असो वा नसो, मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची भूमिका या भेटीत पुन्हा अधोरेखित झाली. या बैठकीत माढा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध प्रलंबित आणि महत्त्वाच्या विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत ‘मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन’ प्रकल्पावर विशेष भर देण्यात आला. निंबाळकर खासदार असताना या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता मिळाली होती. यासंदर्भात पंतप्रधानांनी तातडीने लक्ष घालून संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या असून, लवकरच कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी प्रस्ताव मांडण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ‘मुंबई-बेंगलोर कॉरिडॉर हायवे’ प्रकल्पाबाबतही सविस्तर चर्चा झाली असून, त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
फलटण आणि माढा मतदारसंघासाठी महत्त्वाचे मानले जाणारे ‘बारामती-फलटण’ आणि ‘फलटण-पंढरपूर’ रेल्वेमार्ग याबाबतही पंतप्रधानांनी सविस्तर माहिती घेतली. या प्रकल्पांच्या प्रगतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.
याशिवाय, माढा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाची संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. या निर्णयामुळे प्रलंबित कामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या भेटीमुळे मतदारसंघाच्या विकासाला नवे बळ मिळेल आणि अनेक प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments