Thursday, July 23, 2026
Home Blog Page 369

26 people killed in Kashmir Terror Attack, Maharashtra tourists killed in Kashmir Terror Attack

0
26 people killed in Kashmir Terror Attack, Maharashtra tourists killed in Kashmir Terror Attack


पहलगाम हल्ल्याची तुलना ‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी होऊ लागल्यानंतर आता पाकिस्तानविरोधात एखादी लष्करी कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढू लागल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. दिल्लीतील नॉर्थ व साऊथ ब्लॉकमध्ये दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सूत्रधारांना धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी दिवसभर बैठकांचा सपाटा लावला. 

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पहलगाम मध्ये हल्ला करणारे ७ दहशतवादी होते, त्यापैकी ४ ते ५ जण पाकिस्तानातील होते. त्यांच्या उर्दूच्या लहेजानुसार ते पाकिस्तानातील असल्याचं स्पष्ट झालंय, कारण ती भाषा पाकिस्तानातील एका विशिष्ट भागात बोलली जाते. तर पीर पांजर रेंजमध्ये हे दहशतवादी पळून गेले आहेत.

Live Updates

Pahalgam Terror Attack Live Updates Today 24 April 2025 : पहलगाम हल्ल्यासंदर्भातील लाईव्ह अपडेट्स पाहा

08:53 (IST) 24 Apr 2025

Pahalgam Live Updates : शरद पवारांनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट

पुण्यातील संतोष जगदाळे यांचं पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांचं शरद पवारांनी सांत्वन केलं. आज ते सकाळीच या कुटुंबियांच्या भेटीला गेले होते.

08:51 (IST) 24 Apr 2025

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने कठोर पाऊल उचलत पाच मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना पुढील ४८ तासांत भारत सोडावा लागणार आहे. याचबरोबर कोणत्याही पाकिस्तानी नागरिका भारतात प्रवेश मिळणार नाही. याचबरोबर केंद्र सरकारने १९६० चा सिंधू पाणी करारही स्थगित करण्यात आला आहे. पाकिस्तानने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करणार नाही तोपर्यंत या करारावरील स्थगिती कामय राहणार आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

सविस्तर वृत्त वाचा

08:50 (IST) 24 Apr 2025

Pahalgam Live Update

ते (विदेशी दहशतवादी) ज्या उर्दू भाषेत बोलत होते ती भाषा पाकिस्तानच्या एका भागात बोलली जाते. त्यांच्यासोबत किमान दोन स्थानिक दहशतवादी असल्याचा संशय आहे,” असे सुरक्षा यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले .

What is the probability of a India surgical strike on Pakistan in response to the Pahalgam attack

Pahalgam Terror Attack Live Updates Today 24 April 2025 : पहलगाम हल्ल्यासंदर्भातील लाईव्ह अपडेट्स पाहा





Source link

केंद्र सरकारकडून कृषी योजनांना मिळाले बळ; राज्यासाठीच्या २३१४ कोटींच्या निधीला मंजुरी

0
केंद्र सरकारकडून कृषी योजनांना मिळाले बळ; राज्यासाठीच्या २३१४ कोटींच्या निधीला मंजुरी



Central government approves funds for agricultural schemes for the Maharashtra state Mumbai print news |केंद्र सरकारकडून कृषी योजनांना मिळाले बळ; राज्यासाठीच्या २३१४ कोटींच्या निधीला मंजुरी





Source link

Pahalgam Attack: ‘अमित शाहांच्या मस्तीमुळे…’, ठाकरेंची सेना आक्रमक; म्हणाले, ‘हिंदू मेल्यावर…’

0
Pahalgam Attack: ‘अमित शाहांच्या मस्तीमुळे…’, ठाकरेंची सेना आक्रमक; म्हणाले, ‘हिंदू मेल्यावर…’


Pahalgam Terror Attack: “कश्मीरात पुन्हा एकदा हिंदूंचा नरसंहार झाला आहे. हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष सध्या भारत दौऱ्यावर आहेत. मोदी काळात भारतात आबादी आबाद सुरू असल्याचे चित्र रंगवले जात असतानाच कश्मीरात गेल्या पंचवीस वर्षांतील सर्वात भयंकर दहशतवादी हल्ला झाला. 26 पर्यटकांच्या शरीरांची बंदुकांनी चाळण करून अतिरेकी पसार झाले. जाताना त्यांनी जिवंत पर्यटकांना निरोप दिला, ‘‘मोदींना सांगा इथे काय घडले!’’ पंतप्रधान मोदी वगैरे नेते पाकिस्तानला घरात घुसून मारण्याच्या पोकळ धमक्या आणि इशारे देत असतात. प्रत्यक्षात सीमा पार करून अतिरेकी भारतात घुसून निरपराध हिंदूंना मारत आहेत,” असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पहलगाममधील हल्ल्यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.

…दुसरे काय होणार?

“रक्ताचे सडे आणि हिंदू मृतांचा खच पडल्यावर गृहमंत्री शहा कश्मीरात पोहोचले. शहा आता काय करणार? कश्मीरातील हिंदू नरसंहाराची जबाबदारी घेऊन शहा यांनी राजीनामा द्यायला हवा. पश्चिम बंगालातील हिंसाचारास जबाबदार ठरवून ममता बॅनर्जी यांचा राजीनामा मागितला जातो, पण हिंदू नरसंहाराची जबाबदारी घ्यायला निर्लज्ज केंद्र सरकार तयार नाही. भाजप काळात कश्मीर अशांत आहे. संपूर्ण देशातच धार्मिक द्वेषाचे वातावरण निर्माण केल्यावर दुसरे काय होणार?” असा सवाल ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

कुणाच्या भरवशावर सरकारने इतक्या पर्यटकांना…

“मोदी यांच्या कार्यकाळात उरी आतंकवादी हल्ला झाला. 40 जवानांचे हत्याकांड घडवणारे पुलवामा घडले. पुलवामा हत्याकांड ही सुरक्षा व्यवस्थेची हाराकिरी आणि सरकारची बेफिकिरी होती. आता कालचा पहलगाम हल्लासुद्धा बेफिकिरी आहे. कश्मीरात पर्यटक अतिरेक्यांच्या निशाण्यावर सदैव आहेत. कश्मीरात या वेळी 25 लाख पर्यटक पोहोचले. त्यातले 22 लाख पर्यटक पहलगामला आले. काल हल्ला झाला त्या ठिकाणी दोन हजारांवर पर्यटक होते व त्यांच्या सुरक्षेसाठी एकही जवान किंवा पोलीस नव्हता. त्यामुळेच दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी ही जागा निवडली. पहलगामचा बैसरन भाग हा जंगलाने घेरलेला आहे, उंचावर आहे. येथे पोलीस आणि जवानांची तैनाती नसते, रस्ते निमुळते आहेत. अतिरेकी येथे दबा धरूनच बसले व हल्ला केला. जिथे दोन हजारांवर पर्यटक जमले आहेत, जो कश्मीरचा सगळय़ात संवेदनशील भाग आहे, तेथे काही अतिरेकी लष्कराच्या गणवेशात घुसतात, एकेकाला नाव विचारून 26 जणांना गोळ्या घालतात. अंदाधुंद, बेफाम गोळीबार करून निघून जातात. कुणाच्या भरवशावर सरकारने इतक्या पर्यटकांना संवेदनशील भागात सोडले?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

मोदी खोटे बोलतात

“जे मारले गेले त्यात बहुतेक हिंदू आहेत. एखाददुसरा मुसलमान आहे. पुलवामानंतर पहलगामचा हल्ला म्हणजे गुप्तचर संस्थांचे सपशेल अपयश आहे. कुठे गेले ते जेम्स बॉण्ड म्हणून मिरवणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार? पंतप्रधान मोदी वारंवार सांगत असतात, हा देश सुरक्षित हातात आहे. मोदी खोटे बोलतात. मोदींनी नोटाबंदी जारी केली तेव्हा सांगितले, ‘‘आता दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडेल.’’ अमित शहांनी 370 कलम हटवून जम्मू-कश्मीरला केंद्रशासित राज्य बनवले तेव्हा जाहीर केले, ‘‘आता खोऱ्यातील दहशतवाद संपला आहे.’’ पण येथे रोजच रक्ताचे पाट वाहत आहेत व त्यात यांच्या खोटेपणाची थुंकी मिसळत आहे,” अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.

भाजप सरकारला याची लाज वाटली पाहिजे

“कश्मीर खोऱ्यातला दहशतवाद संपलेला नाही. 370 कलम हटवल्यावर 2019 सालापासून कश्मीरात 197 सुरक्षा कर्मचारी मारले गेले. 135 नागरिक मारले गेले. 700 संशयित अतिरेकी मारले गेले. खोऱ्यातील हिंसाचार संपल्याचे हे लक्षण नाही. हिंदूंना ‘टार्गेट’ केले जात आहे व ज्या कश्मिरी पंडितांसाठी 2014 च्या निवडणुकीत मोदी यांनी आश्वासने दिली, ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत. कश्मिरी पंडितांची घर वापसी झाली नाहीच, उलट उरलेले हिंदूही पलायन करीत आहेत. हिंदूंचे तारणहार म्हणवून घेणाऱ्या भाजप सरकारला याची लाज वाटली पाहिजे,” असं अग्रलेखात म्हटलं आहे.

अमित शहांच्या मस्तीमुळे…

“2019 च्या निवडणूक जाहीरनाम्यात कश्मीरातील 370 कलम हटवण्याची घोषणा होती तसे कश्मीरातील हिंदूंना सुरक्षा देण्याचे वचन होते. 370 कलम हटवल्याचा राजकीय उत्सव मोदी सरकार आणि भाजपवाल्यांनी साजरा केला, पण खोऱ्यातील हिंदूंना निराधार अवस्थेत सोडले. कश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा मोदी-शहांनी काढला. म्हणजे हा भाग केंद्रशासित करून सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आपल्या हातात घेतली. जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री नामधारीच राहिले. राज्यपालांच्या माध्यमातून अमित शहा कश्मीरवर राज्य करीत आहेत. हे राज्य कसे आहे ते काल पहलगाम येथील आक्रोश आणि किंकाळ्यांनी दिसले. कश्मीर प्रश्नात मोदी यांनी राजकारण आणले. वारंवार खापर काँग्रेस आणि नेहरूंवर फोडले. दहा वर्षे देशात स्वतः मोदी आहेत. पुलवामा मोदी सरकारच्या अक्षम्य बेफिकिरीमुळे घडले हे तेव्हाचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी सांगितले व पहलगाम अमित शहांच्या मस्तीमुळे घडले,” असा आरोप ठाकरेंच्या सेनेनं केला आहे.

अंधभक्तीतून डोळे कधी उघडणार?

“कश्मीरचे धोरण मोदी काळात फसले हे नक्की. पाकिस्तानला धमक्या देऊन हा प्रश्न सुटणार नाही. अशा धमक्यांनी मोदींच्या भक्तांना बरे वाटते. पाकिस्तानचे कंबरडे मोडायचे राहिले बाजूला, पहलगाम येथे अतिरेक्यांनी हिंदूंच्या नकली तारणहारांच्या कंबरडय़ावर हल्ला केला. देशात गेले दशकभर हिंदू-मुसलमान द्वेषाचे विष पसरवून सदैव दंगलीचे वातावरण तयार केले जात आहे. गोरगरीब मुसलमानांच्या घरांवर बुलडोझर फिरवून या काळात उन्मत्त उत्सव केले गेले. देशातली शांतता व एकोपा नष्ट केला. देशातील प्रत्येक समस्येवर एकच उत्तर; हिंदू-मुसलमान आणि भारत-पाकिस्तान. मग हा गुजरात फॉर्म्युला जम्मू-कश्मीरात का चालला नाही? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गृहखाते, पोलीस, गुप्तचरांचा वापर राजकारणासाठी करतात, विरोधकांना छळण्यासाठी, सरकारे पाडण्याच्या व बनवण्याच्या खेळासाठी, आमदार व खासदारांच्या फोडाफोडीसाठी करतात. 365 दिवस त्यांचे डोके त्याच कटकारस्थानात गुंतून पडल्यावर राष्ट्रीय सुरक्षेचा विचार कसा होणार? हिंदूंचे रक्षण कसे होणार? हिंदू मेल्यावर मातम करून, मुसलमान आणि पाकड्यांच्या नावाने बोंबा मारून मते मागणे हा यांचा पिढीजात धंदा. पुलवामात तेच झाले. पहलगाम हल्ल्याची तीच गत होईल. हिंदू जागा कधी होणार? अंधभक्तीतून डोळे कधी उघडणार?” असा सवाल लेखाच्या शेवटी विचारण्यात आला आहे.

 





Source link

Koneru Humpy wins FIDE Women Grand Prix Chess Championship sports news

0
Koneru Humpy wins FIDE Women Grand Prix Chess Championship sports news



Koneru Humpy wins FIDE Women Grand Prix Chess Championship sports news | ग्रांप्री स्पर्धेत कोनेरू हम्पी विजेती; चीनच्या झू जीनेरवर टायब्रेकर गुणांवर मात





Source link

Terrorists shot in the head in Pahalgam Jammu and Kashmir

0
Terrorists shot in the head in Pahalgam Jammu and Kashmir



Terrorists shot in the head in Pahalgam Jammu and Kashmir | पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांकडून डोक्यात गोळी; वडिलांचा मृतदेह हताशपणे पाहण्याची २० वर्षांच्या मुलावर वेळ





Source link

शाळांतील समित्यांचे विलीनीकरण किती उपयुक्त?

0
शाळांतील समित्यांचे विलीनीकरण किती उपयुक्त?


राज्यातील शाळांमध्ये किती समित्या होत्या?

राज्यातील शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एकूण १५ समित्या होत्या. शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शालेय पोषण आहार योजना समिती, शिक्षक पालक संघ, नवभारत साक्षरता समिती, तंबाखू नियंत्रण समिती, स्क्वॉफ स्वयंमूल्यांकन समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, तक्रार पेटी समिती, शाळा बांधकाम समिती, परिवहन समिती, शाळा व्यवस्थापन आणि विकास समिती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती अशा समित्यांचा समावेश होता.

समित्यांचे विलीनीकरण का करण्यात आले?

राज्यभरातील शिक्षकांना विविध प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागतात. निवडणुकीचे कामकाज, जनगणनेसारखी काही कामे अनिवार्य आहेत. मात्र, शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या बहुतांश अतिरिक्त कामांचे स्वरूप अशैक्षणिक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. एकीकडे सरकार गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरत असताना अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना शिकवण्यासाठी वेळच मिळत नसल्याची तक्रार होती. त्यामुळे अशैक्षणिक कामांतून सुटका करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून राज्यभरातील शिक्षकांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यासाठी आम्हाला शिकवू द्या, असे आंदोलनही राज्यभरातील शिक्षकांनी काही काळापूर्वी केले होते. या मागणीची दखल घेऊन शिक्षण विभागाने समिती नियुक्त केली. त्या समितीने शिक्षकांच्या शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्याशिवाय शालेय स्तरावरील समित्यांचे कामकाज करण्यातही शिक्षकांचा वेळ जातो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची वेगळी समिती करण्यापेक्षा समित्यांचे विलीनीकरण करून मोजक्या समित्या ठेवण्याचा पर्याय मांडण्यात आला होता. त्यानुसार आता शालेय शिक्षण विभागाने समित्यांचे विलीनीकरण करून चारच समित्या केल्या आहेत.

हेही वाचा

समित्यांचे नवे स्वरूप कसे असेल?

शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार, शाळांतील समित्यांपैकी काही समित्यांचे कामकाज आणि शाळा व्यवस्थापन समितीकडे असलेले कामकाज यात समानता आढळून येत आहे. त्यामुळे विविध समित्यांचे एकत्रीकरण करून समित्यांची संख्या कमी केल्यास मुख्याध्यापक आणि शिक्षकांना अध्ययन, अध्यापनासाठी, शालेय कामकाजासाठी अधिकचा वेळ उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यासाठी समित्यांचे एकत्रीकरण करण्यात येत आहे. संख्या कमी करण्यात आली आहे. शाळांमध्ये आता शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती या चार समित्या राहणार आहेत. माता पालक संघ, शालेय पोषण आहार योजना समिती, शिक्षक पालक संघ, नवभारत साक्षरता समिती, तंबाखू नियंत्रण समिती, स्क्वॉफ स्वयंमूल्यांकन समिती या समित्यांचा समावेश शाळा व्यवस्थापन समितीमध्ये, तर विद्यार्थी सुरक्षा समिती, तक्रार पेटी समिती, शाळा बांधकाम समिती, परिवहन समिती, शाळा व्यवस्थापन आणि विकास समिती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समितीचे विलीनीकरण विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये करण्यात आले आहे. तसेच राज्यात कोणताही नवीन उपक्रम किंवा योजना सुरू झाल्यास त्यासाठी शाळास्तरावर नवीन समिती स्थापन करण्यात येऊ नये. त्याबाबतची कामे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत किंवा विद्यार्थी सुरक्षा आणि भौतिक सुविधा समितीमार्फत करावी, असे शिक्षण विभागाने नमूद केले आहे. शाळा स्तरावर आवश्यक असलेल्या चार समित्यांतील सदस्य नियुक्त, कार्यकाळ, कामकाजाचे स्वरूप याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण, विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती, सीएसआरच्या माध्यमातून शाळेसाठी भौतिक, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणे, शाळेची स्वच्छता, स्वच्छतागृह यासाठीच्या उपायांची अंमलबजावणी, शाळेला मिळणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे अशा स्वरूपाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

समित्यांच्या विलीनीकरणाबाबत शिक्षकांचे म्हणणे काय?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा स्तरावर असलेल्या विविध १५ समित्यांचे वर्गीकरण करून आता चारच समित्या राहणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. याचप्रमाणे शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक ऑनलाइन कामांबाबतही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असे समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी सांगितले. तर प्राथमिक शिक्षक संघ पुणेचे उपाध्यक्ष नितीन मेमाणे म्हणाले, दरवर्षी शाळा स्तरावर विविध समित्या स्थापन करणे, त्यांच्या बैठकांची कार्यक्रमपत्रिका ठरवणे, त्याचे इतिवृत्त ठेवणे यासाठी बारा ते पंधरा नोंदवह्या कराव्या लागत होत्या. त्यात शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा अध्यापनाचा बराच वेळ वाया जात होता. मात्र, आता शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचा ताण कमी होणार आहे. त्या दृष्टीने हे पाऊल स्वागतार्ह आहे.





Source link

‘जरंडेश्वर’ची फसवणूक; कोरेगावमध्ये मुकादमास अटक

0
‘जरंडेश्वर’ची फसवणूक; कोरेगावमध्ये मुकादमास अटक


सातारा : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिल्स या खासगी साखर कारखान्याची सुमारे १५ लाख ६६ हजार ८७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी मुकादम हणमंत नामदेव आजबे (शिराळ, ता आष्टी, बीड) याला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

जरंडेश्वर शुगर मिल्स या खासगी साखर कारखान्यास हणमंत नामदेव आजबे याच्यासह सात जणांनी ऊस वाहतूक व ऊस तोडणीसाठी वाहने व मजूर पुरवण्याबाबत करार करून कारखान्याचा विश्वास संपादन केला होता. प्रत्यक्षात ठरलेल्या करारानुसार वाहने व मजूर पुरवठा न करता अन्य व्यक्तींशी संगनमत करून कारखान्यास वाहनांचे खोटे क्रमांक देऊन करार केलेली वाहने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अन्य कारखान्यास दिली.

आजबे याने कारखान्याची सहा लाख ९९ हजार ८७ रुपयांची फसवणूक केली. त्याचबरोबर प्रत्यक्षात २४ टोळ्यांचे भाडे घेणे अपेक्षित असताना त्याने ४२ टोळ्यांचे भाडे घेऊन आठ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार सन २०२० ते २०२४ या चार वर्षांमध्ये घडला आहे.

हेही वाचा

याप्रकरणी कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक संदीप सावंत यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार हणमंत नामदेव आजबे, दिनकर नामदेव आजबे, नामदेव शामराव आजबे, रविकांत झुंबर अडागळे, प्रकाश अंबादास लवांदे, विशाल अंकुश आजबे, बाबासाहेब राजाराम भंवर यांनी आपापसात संगनमत करून एकूण १५ लाख ६६ हजार ८७ रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी या गुन्ह्याचा तपास करत मुख्य मुकादम हणमंत नामदेव आजबे यास अटक केली.





Source link

in Kolhapur Vikram bhave life spoiled with fake story about dr Narendra Dabholkar murder खोटे कथानक उभे करून माझे आयुष्य उद्ध्वस्त केले

0
in Kolhapur Vikram bhave life spoiled with fake story about dr Narendra Dabholkar murder खोटे कथानक उभे करून माझे आयुष्य उद्ध्वस्त केले


कोल्हापूर : ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या विक्रम भावे लिखित पुस्तकाचे प्रकाशन येथे पार पडले. यावेळी भावे यांनी या हत्या प्रकरणातील माझी अटक, खोटे आरोप आणि अखेर निर्दोष मुक्तता यावर भाष्य केले. खोटे कथानक उभे करून माझे आयुष्य उद्ध्वस्त केले, असे भावनिक उद्गार काढले. व्यासपीठावर हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई, हिंदू जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट उपस्थित होते.

हिंदुत्वासाठी लढणाऱ्या व्यक्तींवर खोटे आरोप करून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप पत्रकार प्रभाकर सूर्यवंशी यांनी केला. हिंदू धर्मासाठी लढणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे संजीव पुनाळेकर यांनी स्पष्ट केले. या प्रकाशन सोहळ्याला कोल्हापूर आणि परिसरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी खंबीरपणे – पुनाळेकर

अन्वेषण करणाऱ्या यंत्रणांकडून हिंदू विधीज्ञ परिषद, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समितीसह इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अतिरेकी संघटना म्हणण्याची समाजात प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. आझाद मैदानावरील दंगलीची नुकसानभरपाई, तसेच अनेक शेतकरी, प्लॉटधारक यांच्या लुबाडून घेतलेल्या भूमी हिंदू विधीज्ञ परिषदेने त्यांना परत मिळवून दिल्या आहेत. जो जो हिंदू धर्म आणि कार्य यांसाठी लढतो त्यासाठी आम्ही सतत लढत राहणार आहोत.

हेही वाचा

खोट्या अधिकाऱ्यांना शिक्षा कधी? – सुनील घनवट

हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘दाभोलकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली, मात्र ज्यांनी त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले, त्या अधिकाऱ्यांना अजूनही शिक्षा झालेली नाही. ते आजही लाखो रुपयांची पेन्शन घेऊन सुखात आहेत, ही न्यायव्यवस्थेची शोकांतिका आहे.’

हेही वाचा

“हिंदुत्वासाठी कारावास – रावसाहेब देसाई

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई म्हणाले, ‘ज्यांनी हिंदुत्वासाठी अन्याय सहन केला, त्यांच्या संघर्षाची दखल घेणे आपले कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्य करत राहा.’





Source link

सोलापुरात पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध

0
सोलापुरात पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध


सोलापूर : जम्मू-काश्मीरमध्ये पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात सर्वपक्षीयांनी रस्त्यावर येऊन स्वतंत्र आंदोलनाद्वारे तीव्र संताप व्यक्त केला. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात ३७ पर्यटकांची क्रूर हत्या झाली. या घटनेबद्दल देशभर संताप व्यक्त होत आहे. सोलापुरात सत्ताधारी भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आदी पक्षांच्या वतीने रस्त्यावर येऊन या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. तसेच पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवून जाळण्यात आला. या वेळी पाकिस्तानच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर भाजप व दोन्ही शिवसेना पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन स्वतंत्रपणे आंदोलन केले, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले.

भाजपच्या आंदोलनात आमदार विजय देशमुख व पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह माजी आमदार नरसिंग मेंगजी, महापालिका माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, मोहन डांगरे, संजय कोळी, राजकुमार पाटील आदी सहभागी झाले होते. आमदार देशमुख यांनी, पाकिस्तानचे शंभर पापे झाले असून, आता भारताने पाकिस्तानचा नायनाट करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दोन ठिकाणी आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी केले. या वेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून तीव्र निदर्शने केली. मोदींनी पाकिस्तानात सैन्य घुसवावे, असे मत जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी व्यक्त केले. या आंदोलनात गणेश वानकर, प्रताप चव्हाण, दत्तात्रय गणेशकर, जगदीश कलकेरी आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा

काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस भवनासमोर पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. काश्मीरमध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेला दहशतवादी भ्याड हल्ला असून, देशाच्या विरोधात असल्याचे मत नरोटे यांनी व्यक्त केले. माजी महापौर अलका राठोड, आरिफ शेख, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, सुदीप चाकोते यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा या आंदोलनात सहभाग होता.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत व जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाकिस्तानच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. आंदोलनात माजी शहरप्रमुख मनोज शेजवाल, तुकाराम मस्के, संजय सरवदे, प्रशांत वायकसकर, रूपा चव्हाण, गीता गवळी, अश्विनी भोसले आदींनी सहभाग घेतला होता.





Source link

उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शक प्राधिकरण, धोरण निर्मितीच्या सल्ल्यासाठी ‘महासार्क’ची स्थापना

0
उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शक प्राधिकरण, धोरण निर्मितीच्या सल्ल्यासाठी ‘महासार्क’ची स्थापना



Maharashtra State Council of Educational Research Training guiding authority for higher education policy formulation उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शक प्राधिकरण, धोरण निर्मितीच्या सल्ल्यासाठी ‘महासार्क’ची स्थापना





Source link