Thursday, July 23, 2026
Home Blog Page 370

डॉ. वळसंगकर आत्महत्याप्रकरणी मनीषा मानेला पोलीस कोठडी

0
डॉ. वळसंगकर आत्महत्याप्रकरणी मनीषा मानेला पोलीस कोठडी


सोलापूर : सोलापुरातील ज्येष्ठ मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (वय ७०) यांना असह्य त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या त्यांच्याच रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा महेश माने-मुसळे हिला आणखी दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मिळाली आहे. तिच्या कृत्यात आणखी कोणाची साथ होती ? रुग्णालयातील अन्य २७ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिच्या विरुद्ध केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी तिला वाढीव पोलीस कोठडी मिळाली आहे.

गेल्या १८ एप्रिल रोजी डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर (वय ७०) यांनी रेल्वे लाईन-मोदी खाना परिसरातील निवासस्थानी स्वतःच्या मस्तकात रिव्हाॅल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत त्यांच्या एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा माने-मुसळे हिने दिलेल्या त्रासामुळे व्यथित होऊन जीवन संपवत असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानुसार त्यांचे पुत्र डॉ. अश्विन वळसंगकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार पोलीस ठाण्यात मनीषा माने-मुसळे (वय ४५, रा. बसवराज नीलयनगर, जुळे सोलापूर) हिला पोलिसांनी अटक केली होती. तिला पुढील तपासासाठी तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली होती. बुधवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपी संशयित माने-मुसळे हिला पुन्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.

तीन दिवसांच्या पोलीस कोठडीदरम्यान आरोपी महिलेकडे विविध मुद्द्यांवर तपास करण्यात आला. परंतु तिने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. मृत डॉ. वळसंगकर यांच्यावर खोटे आणि घाणेरडे आरोप केले असून त्यामागे तिचा कोणता हेतू होता? यात तिला कोणी मदत केली, त्याबाबत सत्यता पडताळण्यासाठी तसेच आरोपी महिला प्रशासकीय अधिकारी हिने स्वतःच्या मर्जीने साहित्य खरेदीचे अधिकार घेऊन त्याचे पैसे घेत असे. ही बाब डॉ. वळसंगकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तिचे हे अधिकार काढून घेतले होते. त्यामुळे ती डॉ. वळसंगकर यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चिडून होती. यासह रुग्णालयातील २७ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोपींविरुद्ध केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी पोलीस तपास अधिकाऱ्यांनी वाढीव पोलीस कोठडी मागितली. त्यावर सुनावणी होऊन न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीला दोन दिवस वाढीव पोलीस कोठडी मंजूर केली. यावेळी सरकारतर्फे ॲड. शिल्पा बनसोडे-सुरवसे तर आरोपीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले. पोलीस तपास अधिकारी अजित लकडे यांनीही म्हणणे मांडले.





Source link

दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाममध्ये अडकलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांशी पालकमंत्र्यांचा थेट संवाद; विशेष विमानाची तयारी सुरू

0
दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाममध्ये अडकलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांशी पालकमंत्र्यांचा थेट संवाद; विशेष विमानाची तयारी सुरू

पहलगाम / सोलापूरजम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील माढा व पंढरपूर तालुक्यांतील ४७ हून अधिक कुटुंबीय तिथे अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अडकलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांची सांत्वनपूर्वक विचारपूस केली.

ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना तातडीने परत आणण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधून विशेष विमानाची व्यवस्था करण्यासंबंधी सकारात्मक चर्चा केली. “घाबरू नका, आम्ही सर्वजण सुरक्षितरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहोत,” असे भावनिक आवाहन पालकमंत्र्यांनी नातेवाईकांना केले.

या संवादावेळी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, सातारा जिल्हा भाजपा अध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते.

राजुरीच्या कुरवली पाटी चौकात अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी, स्थानिकांमध्ये संतापाचा वातावरण

0
राजुरीच्या कुरवली पाटी चौकात अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी, स्थानिकांमध्ये संतापाचा वातावरण

राजुरी (प्रतिनिधी ):राजुरी गावातील कुरवली पाटी चौकात सायंकाळी सुमारे 6.30 च्या सुमारास एक दुचाकी आणि चारचाकी वाहन यांच्यात जबरदस्त धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने नजीकच्या दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

या भागात वारंवार अपघात होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी शासनाकडे जोरदार मागणी केली आहे की, कुरवली पाटी चौकात अपघात टाळण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात.

दर दोन दिवसांनी अपघात घडत असल्यामुळे जनतेत खळबळ माजली आहे. काही वेळा अपघातांमुळे वादविवाद व वाहनचालकांमध्ये मारहाणीच्या घटना देखील घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने व शासनाने लवकरात लवकर या परिसरात ट्रॅफिक नियमन, सीसीटीव्ही, स्पीड ब्रेकर अशा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

सोलापुरात प्रसूतिगृहातून नवजात बाळ चोरण्याचा प्रयत्न

0
सोलापुरात प्रसूतिगृहातून नवजात बाळ चोरण्याचा प्रयत्न


सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या एका प्रसूतिगृहात जन्मलेल्या एका नवजात बाळाची चोरी करण्याचा प्रयत्न उजेडात आला असून याप्रकरणी एका ५३ वर्षांच्या पुरुषाला तत्काळ पकडून ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास लष्कर भागातील सोलापूर महापालिकेच्या प्रसूतिगृहात हा प्रकार घडला. सुदैवाने नवजात बाळ सुखरूपपणे मातेला परत मिळाले आहे.

याबाबत लक्ष्मीबाई गणेश हजारीवाले (वय ३८, रा. लोधी गल्ली, उत्तर सदर बाजार, सोलापूर) हिने सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची गरोदर असलेली मुलगी भारती चौधरी ही प्रसूतिगृहात बाळंतपणासाठी दाखल झाली होती. काल मंगळवारी दुपारी १२.५५ वाजता ती प्रसूत झाली. त्यानंतर भारती हिला नवजात बाळासह रुग्णालयात महिला वाॅर्डातील खोलीत ठेवण्यात आले होते. परंतु पहाटे अडीचच्या सुमारास अचानकपणे तिच्या खोलीत प्रवेश केलेल्या एका पुरुषाने झोपलेली बाळंतीण माता भारती हिचे नवजात बाळ पाळण्यातून चोरून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला.

परंतु सुदैवाने हा संशयास्पद प्रकार रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आला. त्या कर्मचाऱ्याने त्या पुरुषाला हटकले असता त्याच्या ताब्यात नवजात बाळ आढळून आले. या नवजात बाळाची चोरी करून नेण्याचा प्रयत्न फसला. त्याच्या ताब्यातील नवजात बाळ परत घेऊन मातेच्या हवाली करण्यात आले. संबंधित संशयित पुरुषाचे नाव संतोष प्रभाकर सातपुते (रा. लोणारी गल्ली, उत्तर कसबा, सोलापूर) असे आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





Source link

Rohit Sharma Becomes First Batter with Most Sixes for Mumbai Indians Broke Kieron Pollard Record completes 12000 Runs in T20 IPL 2025

0
Rohit Sharma Becomes First Batter with Most Sixes for Mumbai Indians Broke Kieron Pollard Record completes 12000 Runs in T20 IPL 2025


SRH vs MI IPL 2025 Rohit Sharma Broke Kieron Pollard Record: रोहित शर्मा आयपीएलमध्ये फॉर्मात परतला असून त्याची हिटमॅन अंदाजातील फटकेबाजी पाहायला मिळत आहे. रोहित शर्माने सलग दोन अर्धशतकं झळकावत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. त्याने पुन्हा एकदा चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून आपला फॉर्म दाखवला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात ४६ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७० धावांची उत्कृष्ट खेळी केली. रोहित शर्माने २०१६ नंतर प्रथमच आयपीएलमध्ये लागोपाठ अर्धशतकं झळकावली आहेत. रोहित शर्मा आणि सूर्यादादाच्या फटकेबाजीने मुंबईला पुन्हा एकदा शानदार विजय मिळवून दिला. यादरम्यान रोहित शर्माने दोन मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत.

रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. हा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी फक्त विराट कोहलीच टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा टप्पा गाठू शकला आहे. आता रोहितही खास खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. याशिवाय त्याने कायरन पोलार्डला मागे टाकलं आहे.

हेही वाचा

रोहित शर्माने या सामन्यापूर्वी ४५५ टी-२० सामन्यांमध्ये ११,९८८ धावा केल्या होत्या. म्हणजे तो १२ हजार धावांच्या अगदी जवळ होता. हैदराबादमध्ये सनरायझर्सविरुद्ध खेळताना त्याने १२ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करून आणि चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून त्याने हा खास टप्पा गाठला.

हेही वाचा

रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने कायरन पोलार्डला मागे टाकत हैदराबादविरूद्ध सामन्यात हा टप्पा गाठला. रोहितच्या नावावर आता मुंबई इंडियन्सकडून २५९ षटकार आहेत, ज्यामध्ये आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगमधील सामने आहेत. तर त्याने कायरन पोलार्डला मागे टाकलं आहे, ज्याच्या नावावर २५८ षटकार आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे ज्याच्या नावावर १२७ षटकार आहेत तर हार्दिक पंड्या ११५ षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत पाचव्या क्रमांकावर इशान किशन आहे ज्याने १०६ षटकार लगावले आहेत, परंतु तो सध्या सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे.

मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज

२५९ – रोहित शर्मा*
२५८ – किरॉन पोलार्ड
१२७ – सूर्यकुमार यादव*
११५ – हार्दिक पांड्या*
१०६ – इशान किशन





Source link

SRH vs MI: मुंबई- हैदराबाद सामन्यात फिक्सिंग? इशान किशनची विकेट पडताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण; भन्नाट मीम्स व्हायरल

0
SRH vs MI: मुंबई- हैदराबाद सामन्यात फिक्सिंग? इशान किशनची विकेट पडताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण; भन्नाट मीम्स व्हायरल



srh vs mi Ishan kishan wicket sparks fixing claims netizens reacts IPL 2025| मुंबई- हैदराबाद सामन्यात फिक्सिंग? इशान किशनची विकेट पडताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण; भन्नाट मीम्स व्हायरल





Source link

Gold price reaches Rs 1 lakh per 10 grams in the market print eco news |

0
Gold price reaches Rs 1 lakh per 10 grams in the market print eco news |



Gold price reaches Rs 1 lakh per 10 grams in the market print eco news | | किंमतवाढीमुळे सोन्याच्या मागणीला बाधा? लग्नसराईमुळे तूर्त वातावरण सकारात्मक





Source link

Sensex Nifty jump 8 percent in seven days print eco news

0
Sensex Nifty jump 8 percent in seven days print eco news



Sensex Nifty jump 8 percent in seven days print eco news | तेजीचे सप्तकातून गुंतवणूकदारांना तब्बल ३६.६५ लाख कोटींची श्रीमंती; सेन्सेक्स-निफ्टी सात दिवसांत ८ टक्क्यांनी झेप





Source link

मुंबईतील तापमानात घसरण, पण आर्द्रतेमुळे काहिलीत वाढ

0
मुंबईतील तापमानात घसरण, पण आर्द्रतेमुळे काहिलीत वाढ


लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी तापमानात किंचीत घट झाली. मात्र असे असले तरी आर्द्रतेमुळे असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. मुंबईत बुधवारी कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास असून उन्हाचा तडाखाही कमी झाला आहे. मात्र, आर्द्रतेचे प्रमाण ७५ टक्क्यांच्या आसपास असल्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत.

मुंबईमध्ये सलग चौथ्या दिवशी वाढलेल्या आर्द्रतेमुळे नागरिकांची काहिली झाली. सध्या समुद्री वारे वेळेच्या आधी येत असल्यामुळे किनारपट्टी भागातील तापमानात घट झाली आहे. मात्र, आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३३.६ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी तापमानात किंचीत घट झाली.

मुंबईकरांना सध्या घामाच्या धारा लागत असून, अनेक ठिकाणी थंड पेयाची मागणी वाढली आहे. अशा वातावरणात पुरेशी विश्रांती आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेमुळे होणारी काहिली पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहील.

आर्द्रतेमुळे होणारे परिणाम

  • उकाडा आणि अस्वस्थता वाढते
  • उष्मागाताचा धोका
  • घामोळ्याचा त्रास

काळजी काय घ्यावी

  • पाणी भरपूर प्यावे
  • थेट उन्हात जाणे टाळावे
  • घरात हवेशीर व्यवस्था ठेवावी

पावसाला पोषक वातावरण

राज्यातील काही भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया आणि नागपूर जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उष्णतेची लाट कायम

विदर्भात गुरुवारीही उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात गुरुवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रम्हपुरी येथे झाली. तेथे ४५.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल अकोला ४५ अंश सेल्सिअस, अमरावती ४४.६ अंश सेल्सिअस, चंद्रपूर ४५.५ अंश सेल्सिअस, गोंदिया ४२.५ अंश सेल्सिअस, नागपूर ४४.४ अंश सेल्सिअस, पुणे ४१.२ अंश सेल्सिअस, लोहगाव ४३.६ अंश सेल्सिअस, जळगाव ४३ अंश सेल्सिअस, सोलापूर ४३.८ अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर ४२.२ अंश सेल्सिअस आणि परभणी येथे ४४.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.



Source link

विमानाच्या खिडकीवर का असतं छिद्र? यामागचं कारण 99% लोकांना माहितच नाही

0
विमानाच्या खिडकीवर का असतं छिद्र? यामागचं कारण 99% लोकांना माहितच नाही


विमानाची खिडकी ही फक्त एक जाड तुकडा नसते, तर ती प्रत्यक्षात अ‍ॅक्रेलिकच्या तीन थरांनी बनलेली असते. एअरहोरिझॉन्ट (डॉट) कॉमच्या वृत्तानुसार, बाहेरील थर बाहेरील हवेला तोंड देतो आणि बहुतेक दाब हाताळतो. मधल्या थरात एक लहान छिद्र आहे. तुम्ही तुमच्या सीटवरून सर्वात आतल्या थराला देखील स्पर्श करू शकता. मधला थर संपूर्ण प्रणाली सुरक्षित ठेवतो.

विमान जसजसे उंची वाढवते तसतसे वारा अधिक जोरात वाहतो. या वाऱ्यामुळे खिडक्यांवर जास्त दाब पडतो. या दरम्यान, काचेतील एक लहान छिद्र मदत करते आणि ते केबिन आणि खिडकीच्या थरातील जागेतील दाब संतुलित करते. अशा परिस्थितीत, बाहेरील काच दाब सहन करते आणि आतील काच सुरक्षित राहते.

याशिवाय, जेव्हा विमान थंड हवेत उडते तेव्हा हवा वाफेसारखी बनते. अहवालानुसार, या दरम्यान निर्माण होणारे छिद्र ओलावा जमा होण्यापासून रोखते आणि आवश्यक हवा आत आणण्यास मदत करते आणि खिडकी स्वच्छ ठेवते. जेणेकरून तुम्ही 35000 फूट उंचीवरूनही दृश्याचा आनंद घेऊ शकाल.

हे तुम्हाला लहानसहान वाटेल. हे लहान छिद्र तुमचे उड्डाण सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यात खूप मदत करते. बहुतेक प्रवाशांना ते लक्षातही येत नाही, परंतु ही एक हुशार रचना आहे जी प्रत्येक फ्लाइटमध्ये शांतपणे आपले काम करते.

त्या छोट्या छिद्राला प्रत्यक्षात ब्लीड होल म्हणतात. खिडकीच्या थरांमधील दाब आणि ओलावा कमी करण्यास मदत करते म्हणून त्याचे नाव असे ठेवण्यात आले आहे. हा डिझाइनचा एक छोटासा भाग आहे. जो शांतपणे आपले काम करतो. हे आतल्या गोष्टी सुरक्षित ठेवते आणि संपूर्ण उड्डाणादरम्यान तुम्हाला स्पष्ट दृश्य देते.





Source link