
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानचाच एक कुख्यात दहशतवादी असल्याचं आता समोर आलं आहे.
Source link

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानचाच एक कुख्यात दहशतवादी असल्याचं आता समोर आलं आहे.
Source link





लोकसत्ता टीम
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मिंडाळाचे सरपंच गणेश गड्डमवार व त्यांचे कुटूंब असे आठ जण तसेच चंद्रपूर शहरातील नगराळे, नळे व गाडीवान कुटूंबातील सात जण असे एकूण पंधरा जण काश्मीर येथे अडकून पडले आहेत. या सर्व १५ पर्यटकांना चंद्रपूरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
चंद्रपूर शहरातील तीन कुटुंबांतील सात नागरिक देखील पहलगाम येथे अडकले असून, त्यांना चंद्रपूरला परत आणण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या तत्पर प्रयत्नांमुळे हालचालींना वेग आला आहे. दरम्यान आज येथे शिवसेना शिंदे गटाकडून पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला व पाकिस्थान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीर पर्यटनासाठी जात असतात. यंदाही काश्मीर खोऱ्यात पर्यटकांची गर्दी असताना पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला. त्यामुळे अनेक पर्यटक तिथे अडकले आहेत. यामध्ये चंद्रपूर शहरातील तीन कुटुंबांतील सात सदस्य अडकले असल्याची माहिती मिळताच, आमदार किशोर जोरगेवार यांनी तात्काळ व्हिडिओ कॉलद्वारे संबंधित कुटुंबांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली.
यावेळी आम्ही हल्ल्याच्या ठिकाणाजवळच थांबलेलो होतो. आम्हाला चंद्रपूरला परत यायचे आहे, मात्र सध्याचे वातावरण पाहता ते शक्य नाही. आम्ही घाबरलो आहोत असे त्यांनी आमदार जोरगेवार यांना सांगितले. ही बाब गांभीर्याने घेत आमदार जोरगेवार यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके आणि तसेच जम्मू-काश्मीर येथील प्रशासनाशी थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या कुटुंबाच्या सुटकेसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची विनंती केली.
सदर कुटुंब थांबलेले स्थान आणि त्यांची सर्व माहिती आमदार जोरगेवार यांनी जम्मू-काश्मीर प्रशासनाला दिली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधल्याची माहितीही समोर आली आहे. आमदार जोरगेवार यांच्या तत्परतेमुळे या कुटुंबांच्या सुरक्षित चंद्रपूरकडे परतीच्या हालचालींना गती मिळाली आहे. अंकीत नगराळे, शिल्पा नळे, स्पर्श नळे, प्रितेश नळे, अजय गाडीवान, वर्षा गाडीवान, तेजस्विनी गाडीवान असे या कुटुंबियांची नावे असून ते नागीनाबग येथील रहिवासी आहेत. हे कुटुंब सुरक्षितपणे घरी परतेपर्यंत मी सातत्याने प्रशासनाशी संपर्कात राहणार असून, त्यांना आवश्यक ती प्रत्येक मदत दिली जाईल, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
तसेच नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथील सरपंच गणेश गड्डमवार व त्यांचे कुटूंबिय यामध्ये तीन पुरूष, दोन महिला, तीन मुली असे एकूा आठ जण पहलगाम येथे अडकून पडले आहेत. त्यांनाही चंद्रपूर येथे सुखरूप आणण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पाकिस्तानचा तीव्र निषेध करण्यात आला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. दरम्यान चंद्रपूर येथे शिवसैनिकांनी घटनेच्या निषेध करत “आतंकवाद मुर्दाबाद”, “पाकिस्तान मुर्दाबाद” अशा जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला.शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र व राज्य सरकारकडे जशास तसे उत्तर देण्याची मागणी करत. हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना हीच खरी श्रद्धांजली असेल अशा भावना व्यक्त केल्या. या आंदोलनात शिवसैनिक बंडू हजारे, प्रतिमा ठाकूर व भरत गुप्ता यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.

फलटण | साहस Times प्रतिनिधी :-फलटण-लोणंद रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपासमोर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना आज बुधवार, 23 एप्रिल 2025 रोजी पहाटे 5:30 वाजता घडली.
फिर्यादी लक्ष्मी किशोर कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुंबईच्या धारावी येथील रहिवासी मनोज वसंत शिवडीकर (वय 45) यांनी भरधाव वेगात चारचाकी चालवत असताना वाहनाचा ताबा सुटून गाडी वळणावर रस्त्यावरील खड्यात घसरली. या भीषण अपघातात किशोर परशुराम कदम यांचा मृत्यू झाला असून, फिर्यादी लक्ष्मी कदम, त्यांचा मुलगा रियांश, पुतणी प्रणाली, आणि तिचा पती किशोर कदम हे जखमी झाले आहेत. अपघातात आरोपी चालक मनोज शिवडीकर यालाही दुखापत झाली आहे.
अपघाताचे ठिकाण म्हणजेच जिथे काही वर्षांपूर्वी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचाही अपघात झाला होता. त्यानंतर अर्धवट असलेला पूल पूर्ण होईल आणि नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत.
या प्रकरणाचा तपास फलटण पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन नम करत असून, आरोपी मनोज शिवडीकर यांच्यावर भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फलटण | साहस Times
उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिझन, आणि आंबा म्हटलं की आमरस! पण आता पुण्यात जाऊन आमरस थाळीचा आस्वाद घेण्याची गरज नाही, कारण हॉटेल सेलिब्रेशनने फलटणमध्येच सुरू केली आहे खास शाही आमरस थाळी – तीही अनलिमिटेड!
रिंगरोडवरील रॉयल क्राऊन इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या हॉटेल सेलिब्रेशनमध्ये ही थाळी दररोज दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत उपलब्ध आहे. या थाळीत हापूस आंब्याचा ताजातवाना आमरस, स्पेशल पनीर भाजी, मिक्स व्हेज, बटाटा भाजी, छोटे सामोसे, थंडगार ताक, गरम फुलके आणि हंगामातील इतर स्वादिष्ट पदार्थांचा समावेश आहे.
तसेच दररोज शाही व्हेज थाळी चाही पर्याय येथे उपलब्ध आहे. तुमचा ग्रुप असेल तर विशेष बैठकीची सुविधा हॉटेलकडून करण्यात येईल.
हॉटेल सेलिब्रेशनने ही थाळी उपलब्ध करून देत पुण्याच्या चविष्ट अनुभवाला फलटणमध्येच आणले आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात आमरसाचा आनंद आपल्या शहरातच नक्की घ्या!
पत्ता:
हॉटेल सेलिब्रेशन,
पाचवा मजला, रॉयल क्राऊन, रिंगरोड, फलटण
संपर्क: 9096962854 / 9421180201

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांनी बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे सातत्याने गेली ४२ वर्षे चालविलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला यंदाही ४३ व्या वर्षी त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांनी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार २८ एप्रिल, मंगळवार २९ एप्रिल आणि बुधवार ३० एप्रिल २०२५ असे तीन दिवस ही वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहे.