Saturday, August 22, 2026
Homeसातारावेगाने घेतला बळी! अपुऱ्या पुलाच्या ठिकाणी पुन्हा एक अपघात; एक ठार, चार...

वेगाने घेतला बळी! अपुऱ्या पुलाच्या ठिकाणी पुन्हा एक अपघात; एक ठार, चार जखमी

फलटण | साहस Times प्रतिनिधी :-फलटण-लोणंद रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपासमोर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना आज बुधवार, 23 एप्रिल 2025 रोजी पहाटे 5:30 वाजता घडली.

फिर्यादी लक्ष्मी किशोर कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुंबईच्या धारावी येथील रहिवासी मनोज वसंत शिवडीकर (वय 45) यांनी भरधाव वेगात चारचाकी चालवत असताना वाहनाचा ताबा सुटून गाडी वळणावर रस्त्यावरील खड्यात घसरली. या भीषण अपघातात किशोर परशुराम कदम यांचा मृत्यू झाला असून, फिर्यादी लक्ष्मी कदम, त्यांचा मुलगा रियांश, पुतणी प्रणाली, आणि तिचा पती किशोर कदम हे जखमी झाले आहेत. अपघातात आरोपी चालक मनोज शिवडीकर यालाही दुखापत झाली आहे.

अपघाताचे ठिकाण म्हणजेच जिथे काही वर्षांपूर्वी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचाही अपघात झाला होता. त्यानंतर अर्धवट असलेला पूल पूर्ण होईल आणि नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत.

या प्रकरणाचा तपास फलटण पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन नम करत असून, आरोपी मनोज शिवडीकर यांच्यावर भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments