Saturday, August 22, 2026
Homeमनोरंजन‘जरंडेश्वर’ची फसवणूक; कोरेगावमध्ये मुकादमास अटक

‘जरंडेश्वर’ची फसवणूक; कोरेगावमध्ये मुकादमास अटक

‘जरंडेश्वर’ची फसवणूक; कोरेगावमध्ये मुकादमास अटक

[ad_1]

सातारा : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिल्स या खासगी साखर कारखान्याची सुमारे १५ लाख ६६ हजार ८७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी मुकादम हणमंत नामदेव आजबे (शिराळ, ता आष्टी, बीड) याला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

जरंडेश्वर शुगर मिल्स या खासगी साखर कारखान्यास हणमंत नामदेव आजबे याच्यासह सात जणांनी ऊस वाहतूक व ऊस तोडणीसाठी वाहने व मजूर पुरवण्याबाबत करार करून कारखान्याचा विश्वास संपादन केला होता. प्रत्यक्षात ठरलेल्या करारानुसार वाहने व मजूर पुरवठा न करता अन्य व्यक्तींशी संगनमत करून कारखान्यास वाहनांचे खोटे क्रमांक देऊन करार केलेली वाहने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अन्य कारखान्यास दिली.

आजबे याने कारखान्याची सहा लाख ९९ हजार ८७ रुपयांची फसवणूक केली. त्याचबरोबर प्रत्यक्षात २४ टोळ्यांचे भाडे घेणे अपेक्षित असताना त्याने ४२ टोळ्यांचे भाडे घेऊन आठ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार सन २०२० ते २०२४ या चार वर्षांमध्ये घडला आहे.

हेही वाचा

याप्रकरणी कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक संदीप सावंत यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार हणमंत नामदेव आजबे, दिनकर नामदेव आजबे, नामदेव शामराव आजबे, रविकांत झुंबर अडागळे, प्रकाश अंबादास लवांदे, विशाल अंकुश आजबे, बाबासाहेब राजाराम भंवर यांनी आपापसात संगनमत करून एकूण १५ लाख ६६ हजार ८७ रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी या गुन्ह्याचा तपास करत मुख्य मुकादम हणमंत नामदेव आजबे यास अटक केली.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments