


चंद्रपूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील ३६० लिपीक आणि शिपाई पदाची नोकर भरती आरक्षण वगळून करण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी भंडाऱ्याचे जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे यांच्या नेतृत्वात एक चौकशी पथक ७ मे रोजी चंद्रपुरात दाखल होणार आहे. नोकर भरतीत आरक्षण का वगळले याचे पुरावे तक्रारकर्त्यांकडे मागणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ३६० लिपिक व शिपाई पदांची नोकर भरतीची ऑनलाईन प्रक्रीया डिसेंबर महिन्यात त्यानंतर जानेवारी महिन्यात मुलाखतीची पक्रिया पार पडली.या भरतीत मागासवर्गीय, अपंग, महिलांचे आरक्षण नव्हते. संपूर्ण प्रक्रीया खुल्या प्रवर्गातून राबविण्यात आली. याच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. नोकर भरतीचा प्रक्रीयाच सुरुवातीपासून संशयास्पद राहीली. जिल्हा बाहेर परिक्षा केंद्र देण्यात आले. पहिल्याच दिवशी ऑनलाईन परिक्षा घेणाऱ्या पोर्टल मध्ये तांत्रिक बिघाड आला. त्यामुळे राज्यभरातील परिक्षा केंद्रावर एकच गोंधल उडाला. दरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार देवराव भोंगळे यांनी नोकर भरतीत मोठा आर्थिक गैरव्यहार झाल्याचा आरोप केला. मुलाखती दरम्यान सुद्धा प्रचंड गोंधळ उडाला.ती प्रक्रीया सुद्धा पारदर्शक नव्हती. त्यांच्या विरोधात
परिक्षार्थ्यांनीच गंभीर आरोप केले. विद्यार्थ्यांचे गुण लपविण्यात आले. भाजप ओबीसीसेलचे महानगर अध्यक्ष मनोज पोतराजे यांनी आरक्षण डावलून होत असलेल्या या नोकर भरती विरोधात बेमुदत उपोषण केले. या उपोषणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. नोकर भरतीचा चौकशी करणार, असे आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी भंडाऱ्याचे जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे यांच्या
नेतृत्वात एक चौकशी पथक तयार करण्यात आले आहे. येत्या ७ मे रोजी ते पथक चंद्रपुरात दाखल होईल. आरक्षण डावलून झालेल्या नोकर भरतीचा चौकशी, हाच केंद्रबिंदू ठेवून हे पथक तक्रारकर्त्यांकडून पुरावे मागणार आहे. विशेष म्हणजे तक्रार कर्त्यांनीच पुरावे उपलब्ध करुन द्यावे, असे या समितीचे म्हणणे आहे. दरम्यान माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या
मागणीवर या नोकर भरतीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी शासनाने विशेष तपास पथक गठीत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान उपोषणकर्ते भाजप ओबीसी सेलचे मनोज पोतराजे, राजु कुकडे, मनोहर राठोड (आर्णी), प्रकाश बनसोड, महेंद्र खंडाके, विशाल पारिसकर, रोहीत रामटेके, सतीश सकनुरे, शिवेसेचे माजी जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे, सुरज गुने, जी.के. उपरे, सय्यद आबीद अली यांना चौकशी
पथकाने पुरावे सादर करण्यावे यासाठी पत्र पाठविले आहे. तसेच ७ मे जिल्हा बॅंकेतचे हे चौकशी पथक उपस्थित राहणार आहे. दरम्यान सहकारी बँका या स्वायत्त संस्था असल्या तरी, त्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत कार्यरत असतात. शासकीय नियमांचे पालन करणे त्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे, शासकीय धोरणानुसार आरक्षण लागू होते. बँकेच्या स्वत:च्या उपविधीनुसार आणि शासनाच्या मंजुरीनुसार आरक्षणाच्या टक्केवारीत बदल होवू शकतो. मात्र संपूर्ण आरक्षण वगळता येत नाही, असे सहकार क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.


Omar Abdullah Attends Funeral of Muslim Killed in Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अबदुल्ला यांनी बुधवारी सय्यद अदिल हुसैन शाह या व्यक्तीच्या अंत्यस्काराला हजेरी लावली. पहलगामच्या बैसरन येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सय्यद अदिल हुसैन शाह नावाच्या स्थानिक नागरिकाचाही मृत्यू झाला. या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्यांमध्ये अदिल हा एकमेव मुस्लीम व्यक्ती आहे. अदिलच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्यामागील कारण काय आहे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
मंगळवारच्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांमध्ये अदिल हा एकमेव काश्मिरी मुस्लीम व्यक्ती आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार सुरु केल्यानंतर या दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न दिलने केला. दहशतवाद्यांकडून बंदूक खेचण्याचा प्रयत्न अदिलने केला. त्यावेळेस दहशतवाद्यांनी अदिलला गोळ्या घातल्या. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अदिलचा मृत्यू झाला. अदिलवर बुधवारी अत्यंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना, “अदिलने दिलेलं बलिदान वाया जाणार नाही. अदिल हा फार शूर होता असं स्थानिक सांगतात. अदिलच्या कुटुंबाची काळजी मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेतली जाईल” असं आश्वासन दिलं.
“हा तरुण पैसे कमवण्यासाठी फार कष्ट करायचा. त्याने मंगळवारी नेहमीप्रमाणे गामावर गेला. मात्र त्या दिवशी दुर्देवाने त्याचं पार्थिव घरी आलं. मात्र त्याने दिलेली प्राणांची आहुती व्यर्थ जाणार नाही. तो फार शूर होता आणि त्याने दहशतवाद्यांशी लढा देण्याचा प्रयत्न केला. त्याने हल्ला रोखण्यासाठी बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला असता त्याला लक्ष्य करण्यात आलं. आपल्या सर्वांनाच आता त्याच्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागणार आहे. सरकार अदिलच्या कुटुंबासोबत आहे, हेच अधोरेखित करण्यासाठी मी या अत्यंस्काराला उपस्थित आहे. आम्हाला त्याच्या कुटुंबासाठी जे काही करता येईल ते आम्ही करु,” असं ओमर अब्दुल्ला म्हणाले.
He tried to save tourists by snatching guns from Militants. Locals said he was a brave man and his family will be taken care of says HCM @OmarAbdullah at Adil’s funeral. pic.twitter.com/NIuZBkr9Pv
— JKNC (@JKNC_) April 23, 2025
अदिलच्या वडिलांनी या हल्ल्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांना सोडू नका अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. हल्लेखोरांना संपवून मृतांना न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळालीच पाहिजे, असंही अदिलचे वडील म्हणाले.

नवरा : लोक उगाचच म्हणतात बायको चूक मान्य करत नाही, माझी तर रोज मान्य करते.
बायको : तुमच्याशी लग्न करून चूक केली.
ही अशी चूक आहे जिचं प्रायश्चित्तदेखील नाही.
जीवनातली खूप मोठी चूक झाली.

Satara News: सातारा: साताऱ्यातील (Satara) संगम माहुली या ठिकाणी एक कलाकार पाण्यात बुडाल्याची दुर्घटना घडलेली. अभिनेता रितेश देशमुख (Rietesh Deshmukh) याच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटात काम करणारा कलाकार कृष्णा नदीत (River) बुडालेला. त्याचा मृतदेह अखेर सापडला आहे. सौरभ शर्मा असं मयत कलाकाराचं नाव आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडलेली.
अभिनेता रितेश देशमुख याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित असलेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे चित्रीकरण संगम माहुली या ठिकाणी सुरू आहे. या चित्रपटाचं दिवसभरातील शूटिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर चित्रपटात काम करणारा एक कलाकार कृष्णा नदीत (River) बुडाला आहे. सौरभ शर्मा असं या कलाकाराचं नाव असून तो डान्सर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, सौरभ पाण्यात बुडतानाचा व्हिडीओ समोर आलेला. पण त्याला पोहायला येत असल्याची माहिती समोर आली होती.
मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अभिनेते रितेश देशमुख यांचा राजा शिवछत्रपती या चित्रपटाचं चित्रीकरण आटोपल्यानंतर ही दुर्घटना घडली होती. साताऱ्यातील शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड ट्रेकर्स यांच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू होती.
कृष्णा नदीत पोहोण्यासाठी गेलेला कलाकार पाण्याचा अंदाज न आल्यानं डोहात बुडालेला. चित्रकरण करणाऱ्या टीमकडून स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं सौरभचा शोध सुरू करण्यात आला. मात्र, अंधार पडल्यानं शोधमोहीमेत अडथळा निर्माण होत होता. अखेर, अंधार पडल्यानं शोध मोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू करण्यात आली. अखेर तब्बल 36 तासांनी कलाकाराचा मृतदेह हाती लागला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीनं ‘राजा शिवाजी’ सिनेमाची घोषणा केली होती. तसेच, या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख करणार असल्याचंही जाहीर केलं होतं. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा करताना रितेशने लिहिलं होतं की, ‘इतिहासाच्या गर्भात एक असं व्यक्तिमत्व जन्माला आलं ज्याचं अस्तित्व नश्वरतेच्या पलीकडे होते. छत्रपती शिवाजी महाराज… हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नाहीत. ही 350 वर्षांची भावना आहे, असाधारण शौर्याची ठिणगी आहे… प्रत्येकाच्या हृदयात उगवणारा आशेचा एक महान सूर्य आहे.’ सध्या या सिनेमाचे चित्रीकरण वेगाने सुरू असून सर्वांनाच सिनेमाची उत्सुकता आहे. चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार असून या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान यांना त्याने साइन केलं आहे.
अधिक पाहा..


