Thursday, July 23, 2026
Home Blog Page 367

‘मामांनी मिठी मारली, पण तरीही त्यांनी…’, डोंबिवलीच्या हर्षल लेलेने डोळ्यांसमोर पाहिला वडिलांचा मृत्यू, ‘सगळा हात रक्ताने…’

0
‘मामांनी मिठी मारली, पण तरीही त्यांनी…’, डोंबिवलीच्या हर्षल लेलेने डोळ्यांसमोर पाहिला वडिलांचा मृत्यू, ‘सगळा हात रक्ताने…’


Dombivli Press Conference: माझे व़डील संजय लेले यांच्या डोक्यात गोळी घातली. गोळ्या घातल्या तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता. माझ्या हाताला काहीतरी जाणवलं. नंतर उठून पाहिलं तर वडिलांचं डोकं रक्ताने माखलेलं होतं हे सांगताना त्यांचा मुलगा हर्षल लेले याला अश्रू अनावर झाले होते. पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या डोंबिवलीमधील संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांच्या कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषद घेत नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती दिली. 

संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यानेही सगळा घटनाक्रम उलगडून सांगितला. ’21 तारखेला आम्ही रात्री तिथे पोहोचलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तीन तास प्रवास करुन तिथे पोहोचलो होतो. आम्ही तिथे असताना गोळीबाराचा आवाज ऐकला. फार दुरून आवाज आल्याने आम्ही दुर्लक्ष केलं. नंतर तो आवाज जवळ येत होता. स्थानिकांनी आम्हाला गोळी लागू नये यासाठी खाली वाकण्यास सांगितलं,” अशी माहिती त्याने दिली. 

‘हिंदूंना वेगळं करुन…’, डोंबिवलीमधील मृतांच्या कुटुंबीयांनी सांगितला भयानक घटनाक्रम; ‘दहशतवादी म्हणाले तुम्ही लोकांनी येथे…’

 

पुढे त्याने सांगितलं की, “दहशतवाद्यांनी हिंदू मुस्लिमांना वेगळं होण्यास सांगितलं. अतुल मोने यांनी दोघींना (पत्नी, मुलगी) मिठी मारुन, यांना सोडून द्या सांगितलं. त्यावर त्याने बाजूला व्हा नाही तर सगळ्यांना मारु असं म्हटलं. यानंतर त्याने पोटात गोळी घातली”.

“माझे व़डील संजय यांच्या डोक्यावर गोळी घातली. गोळ्या घातल्या तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता. माझ्या हाताला काहीतरी जाणवलं. नंतर उठून पाहिलं तर वडिलांचं डोकं रक्ताने माखलेलं होत. जेव्हा मी हे सर्व पाहिलं तेव्हा स्थानिकांनी जीव वाचवून निघून जा असं सांगितलं,” असा खुलासा त्यांनी केला. 

“तिथे घोड्याने जायला 3 तास लागतात. तिथे नेणाऱ्यांनी जमेल तसा घोडा दिला होता. सगळे खाली उतरत होते. आम्ही आईला काही वेळ उचललं होतं. घोडेवाल्याने नंतर आईला पाठीवर उचलून घेतलं. मी आणि माझा भाऊ 4 तास चालत होते. आईला आधीच रुग्णालयात चेकअपसाठी नेलं होतं. 2 ते 2.30 च्या सुमारास गोळीबार झाला होता. आम्ही 7 च्या आसपास खाली पोहोचलो. मला तिघांचा मृत्यू झाल्याचं समजलं होतं. पण अधिकाऱ्यांनी कोणाला सांगू नका अंसं सांगितलं होतं. माझ्या काकांनी आय़पीएस अधिकाऱ्याशी बोलून त्यांच्या मित्राच्या घरी राहण्याची व्यवस्था केली होती. मी त्यांचा आभारी आहे,” असंही त्याने सांगितलं. 

अनुष्का मोने यांनी यावेळी सांगितलं की, “हिंदू कोण आहे विचारलं असता जिजूंनी हात वर केला, तर त्यांना गोळ्या घातल्या. आमच्यासमोर आमच्या तिघांना गोळ्या घालण्यात आल्या. हे सर्वजण आमच्या घरातील कर्ते पुरुषच होते. अशा बऱ्याच जणांना त्यांनी मारलं आहे. दहशतवादी गेल्यानंतर आम्ही त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला काही करता आलं नाही. अनेकांनी आम्हाला तुम्ही तुमचा जीव वाचवून जा असं सांगितलं”.

“तुम्ही लोकांनी येथे दहशत निर्माण करुन ठेवली आहे असं दहशतवादी बोलत होते. असं बोलताना ते फायरिंग करत होते. पर्यटक फक्त फिरायला येतात त्यांचा काय गुन्हा आहे? सरकारने यावर कारवाई करत आम्हाला न्याय मिळवून द्यावा,” अशी मागणीही त्यांनी केली आहे. 





Source link

इतक्या प्रमाणात पर्यटक असतानाही पोलीस कर्मचारी का नव्हते? पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसींचा सवाल

0
इतक्या प्रमाणात पर्यटक असतानाही पोलीस कर्मचारी का नव्हते? पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसींचा सवाल


Pahalgam terror attack : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अनेक प्रश्न विचारले आहेत. ज्या ठिकाणी इतके पर्यटक होते, तिथे एकही पोलिस किंवा सीआरपीएफ कॅम्प का नव्हता? रॅपिड रिस्पॉन्स टीमला घटनास्थळी पोहोचण्यास एक तासापेक्षा जास्त वेळ लागला. त्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारल्यानंतर गोळ्या घातल्या. ते पाकिस्तानातून आले होते आणि पाकिस्तान त्यांना पाठिंबा देतो. त्यांनी सीमा कशी ओलांडली? याला जबाबदार कोण? पहलगामला पोहोचले असेल तर ते श्रीनगरलाही पोहोचू शकले असते. उत्तरदायित्व निश्चित झाले तरच न्याय मिळेल. दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.



Source link

maharashtra recorded 49 heatstroke patients after temperature rises mnb 82 zws 70

0
maharashtra recorded 49 heatstroke patients after temperature rises mnb 82 zws 70



maharashtra recorded 49 heatstroke patients after temperature rises mnb 82 zws 70 | राज्यात तापमान वाढताच उष्माघाताचे रुग्ण वाढले… या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण…





Source link

धुळ्यातील औद्योगिक कंपनीकडे दोन कोटीच्या खंडणीची मागणी…रिपाइं उपाध्यक्षाविरुध्द गुन्हा

0
धुळ्यातील औद्योगिक कंपनीकडे दोन कोटीच्या खंडणीची मागणी…रिपाइं उपाध्यक्षाविरुध्द गुन्हा



in Dhule case filed against RPI vice president in of extortion case धुळ्यातील औद्योगिक कंपनीकडे दोन कोटीच्या खंडणीची मागणी…रिपाइं उपाध्यक्षाविरुध्द गुन्हा





Source link

Police inspector suspended who used abusive language towards Harish Pimpale, the BJP MLA from Murtijapur nagpur

0
Police inspector suspended who used abusive language towards Harish Pimpale, the BJP MLA from Murtijapur nagpur



Police inspector suspended who used abusive language towards Harish Pimpale, the BJP MLA from Murtijapur nagpur | भाजप आमदारांना शिवीगाळ करणे ठाणेदाराला चांगलेच भोवले, पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याने…





Source link

Pahalgam Terror Attack will pakistani seema haider have to go back pakistan question being asked netizens on social media

0
Pahalgam Terror Attack will pakistani seema haider have to go back pakistan question being asked netizens on social media



Pahalgam Terror Attack will pakistani seema haider have to go back pakistan question being asked netizens on social media | पाकिस्तानी सीमा हैदरलाही भारत सोडावा लागेल का? सोशल मीडियावर युजर्सचा सवाल; नेमके काय म्हणाले, वाचा





Source link

Said He Was Christian Shot Dead Family of Sunil Nathaniel recounts Pahalgam terror horror

0
Said He Was Christian Shot Dead Family of Sunil Nathaniel recounts Pahalgam terror horror



Said He Was Christian Shot Dead Family of Sunil Nathaniel recounts Pahalgam terror horror | ‘ख्रिश्चन असल्याचे सांगितल्यावर गोळी झाडली’, पत्नी आणि मुलांसमोरच पर्यटकाचा निर्घून खून; मुलीच्या पायाला लागली गोळी





Source link

7th Pay Commission मुळं सरकारी कर्मचाऱ्यांना दणका; पगाराचा आकडा कमी होणार?

0
7th Pay Commission मुळं सरकारी कर्मचाऱ्यांना दणका; पगाराचा आकडा कमी होणार?


7th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगाराचे भत्ते आणि विविध वेतन आयोग हे अतिशय जिव्हाळ्याचे विषय. याच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे. या बातमीमुळं शासकीय अख्तयारित येणाऱ्या विभागांमध्ये सेवेत असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची निराशा होऊ शकते. कारण, आहे ते म्हणजे पगाराच्या आकड्यात होणारी घट. 

मागील काही दिवसांपासून महागाई भत्ता (DA) आणि DR मध्ये किमान 2 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, ज्यानंतर हा आकडा 55 टक्क्यांवर पोहोचला. पण, आता 2025 मधील पहिल्या तीन महिन्यांतील महागाई दरात झालेली घट पाहता पुढील महागाई भत्तेवाढीचा आकडा 2 टक्के किंवा त्याहून कमीसुद्धा असू शकतो. ज्यामुळं जुलै- डिसेंबर 2025 दरम्यान चांगल्या महागाई भत्तेवाढीची अपेक्षा बाळगणाऱ्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांची निराशा होणार आहे. 

महत्त्वाची बाब म्हणजे ही चालू वेतन आयोगाची अर्थात सातव्या वेतन आयोगाली अखेरची महागाई भत्तेवाढ असून या आयोगाचा 10 वर्षांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी पूर्ण होत आहे. ज्यानंतर नव्यानं गठित करण्यात आलेल्या आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी मिळाली असून, त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची शिफारस केली जाईल. 

डीएमध्ये घट का झाली?

2025 मधील पहिल्या दोन महिन्यांमध्ये  AICPI-IW  च्या आकडेवारीमध्ये घट झाल्याची बाब समोर आली. ज्या कारणास्तव जुलै- डिसेंबर 2025 दरम्यानच्या कालावधीसाठी डीएच्या आकड्यांमध्ये घट पाहायला मिळू शकते. AICPI-IW हा महागाई भत्ता निर्धारित करण्यासाठीचा एक महत्त्वाचा निकष असून कामगार मंत्रालयाच्या माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये AICPI-IW 0.4 घट होत तो 142.8 वर पोहोचला. तर, जानेवारीमध्ये ही आकजेवारी 143.2 इतकी असल्याचं लक्षात आलं.

हा एक सूचकांक असून प्रत्येक महिन्याला कामगार मंत्रालयाकडून त्याबबातची आकडेवारी जारी केली जाते. त्यामुळं सूचकांकात घट झाल्यास डीए हाईक अर्थात महागाई भत्त्यात फारशी वाढ होत नाही. त्यामुळं सलग चार महिन्यांसाठी  AICPI-IW च्या आकडेवारीमध्ये घट आढळली तर, कर्मचाऱ्यांना 2 टक्के किंवा त्याहून कमी भत्तेवाढ लागू होते. परिणामी पूर्णत्वाच्या मार्गावर असणाऱ्या सातव्या वेतन आयोगातून अपेक्षित वाढ झाली नाही, तर मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या सर्वच अपेक्षा आठव्या वेतन आयोगाकडून असतील असं सांगण्यात येत आहे. 





Source link

Pahalgam Attack : भारताच्या ‘सिंधु स्ट्राइक’ मुळे आधीच भिकेकंगाल पाकमधील १ कोटी नागरिकांवर भूकमारीचे संकट

0
Pahalgam Attack : भारताच्या ‘सिंधु स्ट्राइक’ मुळे आधीच भिकेकंगाल पाकमधील १ कोटी नागरिकांवर भूकमारीचे संकट


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची कठोर राजनैतिक कारवाई ‘सिंधू स्ट्राईक’ची पाकिस्तानात आधीच अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. जागतिक बँकेच्या एका नव्या अहवालानुसार या आर्थिक वर्षात पाकिस्तानातील सुमारे एक कोटी लोकांना गंभीर अन्न संकटाचा सामना करावा लागू शकतो. भारत सरकारने १९६० मध्ये पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी करार यापूर्वीच स्थगित केला आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देणे बंद करत नाही, तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे भारताने म्हटले आहे.



Source link

coffin has been given to children to play with in a food packet from a well-known company खाऊच्या पाकिटात ‘शवपेटी’

0
coffin has been given to children to play with in a food packet from a well-known company खाऊच्या पाकिटात ‘शवपेटी’


मुंबई : लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी वेफर्स, बिस्कीट्स, चॉकलेट्स अशा पदार्थांच्या पाकिटांबरोबर छोटी छोटी खेळणी देण्याचा प्रकार वाढला आहे. मुलांना खेळणी मिळत असल्याने मुलेही खाऊ घेण्यासाठी पालकांच्या मागे लागतात. आजपर्यंत या खाऊच्या पाकिटांबरोबर विविध प्रकारचे बाहुल्या, गाड्या, कार्टूनपटातील पात्रे अशी खेळणी मिळत होती. मात्र एका नामांकित कंपनीच्या खाऊच्या पाकिटात चक्क शवपेटी मुलांना खेळण्यासाठी देण्यात आली आहे. पालकांकडून या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

काही वर्षांपूर्वी एका चॉकलेट कंपनीने त्यांच्या चॉकलेटसोबत लहान मुलांना छोटी छोटी खेळणी देण्यास सुरुवात केली. त्या कंपनीच्या उत्पादनाला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हे चॉकलेट महाग असले तरी अनेक पालक मुलांच्या हट्टापायी त्यांना हे चॉकलेट घेऊन देत असे. चॉकलेट कंपनीच्या या क्लुप्तीला मिळत असलेला प्रतिसाद पाहून काही चिप्स, बिस्कीटांबरोबर छोटी छोटी खेळणी देण्यास सुरुवात केली.

खाऊपेक्षाही त्याबरोबर मिळणाऱ्या छोट्या खेळण्याचे आकर्षण मुलांना वाटते आणि पालकांनी खाऊ घेऊन देण्यास कितीही नकार दिला तरी ते खाऊची पाकिटे घेण्याचा हट्ट करतात. या कंपन्यांकडून सुरुवातीला छोट्या बाहुल्या, स्पायडर मॅन, गाड्या, अशी खेळणी मिळत असत. मात्र हळूहळू त्याची जागा बंदुका, तलवारी अशा हिंसक प्रवृतीची खेळणी देण्यास सुरुवात झाली. मात्र आता एका स्नॅक्सच्या पाकिटात चक्क ‘शवपेटी’ ची प्रतिकृती खेळणे म्हणून मुलांच्या हाती ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा

शवपेटी घेऊन मुलांनी नेमके काय खेळणे अपेक्षित आहे, असा प्रश्न पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत बंदुका, तलवारी दिल्या जात होत्या. खरेतर लहान मुलांच्या हाती खेळणे म्हणून हत्यारांच्या प्रतिकृती देणेही चुकीचे आहे. आता शवपेटी खेळणे म्हणून दिले तर त्यात नवल काय बिघडले अशी भावना या कंपन्यांची झाली असल्याचे दिसते, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.

लहान मुलांच्या खाऊच्या पॅकेटमध्ये ‘शवपेटी’ मिळणं, हा केवळ गमतीचा भाग नाही. ही एक भावनिक चूक आहे. शवपेटी हे कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळणे असू शकत नाही. त्यामुळे आयुष्याची अखेर हा १खेळ१ असू शकत नाही, अशा भावना पालकांकडून व्यक्त होत आहेत.

हेही वाचा

मुलांच्या हातात जीवनाची उमेद असणे आवश्यक आहे. तो त्यांचा हक्क आहे. त्यांच्या हातात शवपेटी नव्हे, तर स्वप्ने आणि भावना असाव्यात, असे मत काही पालकांनी व्यक्त केले.





Source link