


भारतात उन्हाळा मोठ्याप्रमाणात सुरु झाला आहे. महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. उन्हाचा झळा इतक्या वाढल्या आहेत की, एसी लावण्याशिवाय लोकांकडे पर्याय राहिलेला नाही. एसीशिवाय घरात बसणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे जवळपास सगळेच लोक घरात एसी लावण्याचा पर्याय योग्य समजतात.
परंतु अशा पद्धतीने AC चा वापर केल्याने वीज बिलात मोठी वाढ होते. जिथे खूप उष्णता असते तिथे लोक 16 अंश तापमानात एसी चालवतात. पण जर तुम्ही एसी 16 अंश तापमानाऐवजी 24 अंशांवर चालवला तर. तर तुम्ही किती वीज बिल वाचवू शकता? हे एक्सपर्टकडून जाणून घ्या.
जर तुमच्या ठिकाणी खूप उष्णता असेल आणि तुम्ही 16 अंश तापमानावर एसी चालवत असाल. तर तुम्हाला उन्हाचा अजिबात त्रास होणार नाही. पण यासाठी तुम्हाला बिल जास्त येईल का अशी शंका सतत मनात येत राहील. 16 अंश हे सर्वात कमी तापमान आहे. ज्यावर तुम्ही एसी चालवता आणि यामुळेच तुम्हाला जास्त गारवा जाणवतो.
एसी जितकी थंड हवा देईल तितकी जास्त शक्ती त्यासाठी वापरावी लागेल. याचा अर्थ त्याच्या कंप्रेसरला जास्त वीज वापरावी लागते. आणि यामुळे, जास्त वीज वापरली जाते आणि जास्त वीज बिल येते.
पण जर तुम्ही 24 अंश तापमानावर एसी चालवला तर. त्यामुळे तुम्हाला थंड हवा मिळत राहील. यासोबतच तुमच्या घराचा वीज वापरही कमी होईल. याचा अर्थ तुमचा एसी कमी वीज वापरेल. मग वीज बिल कमी येईल. जर तुम्ही गणितांच्या दृष्टीने पाहिले तर, तापमानात एक अंश वाढ झाल्यास विजेचा वापर 6% ते 8% कमी होऊ शकतो. जर तुम्ही एसी 16 ऐवजी 24 अंशांवर चालवला तर 8 अंशांचा फरक पडतो. जर प्रति अंश 6% वीज बचत झाली तर. त्यामुळे तुम्ही 48% पर्यंत वीज वाचवू शकता. याचा अर्थ असा की एसी 16 ऐवजी 24 अंशांवर चालवल्याने तुमचे वीज बिल जवळजवळ निम्म्याने कमी होऊ शकते.

पुणे : धाराशिव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एका महिलेला पाच हजारांची अंतरिम पोटगी मंजूर केल्यानंतर, ही बाब लपवून तिने पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात पुन्हा २५ हजारांची पोटगी मागण्याबाबत अर्ज सादर केला. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर महिलेचा अर्ज न्यायाधीश एस. एन. रुक्मे यांनी खर्चासहित फेटाळून लावला.
‘सर्वोच्च न्यायालयाने ‘फोरम शाॅपिंग’बाबत (वेगवेगळ्या न्यायालयांत पोटगी मिळविण्यासाठी अर्ज दाखल करणे) काही निर्देश दिले आहेत. अंतरिम पोटगी मिळत असताना पतीचे उत्पन्न वाढले, तसेच त्याला अतिरिक्त उत्पन्न मिळते, याबाबतचा पुरावा पत्नीने सादर केलेला नाही. त्यामुळे हा दावा कायदेशीर म्हणता येणार नाही,’ असे न्यायाधीश रुक्मे यांनी स्पष्ट केले.
पत्नीपासून घटस्फोट मिळावा, यासाठी हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ नुसार पतीने पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला आहे. पत्नीने कौटुंबिक हिंसाराचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार धाराशिव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात पतीविरोधात दावा दाखल केला होता. धाराशिव येथील न्यायालयाने तिला दरमहा पाच हजार रुपयांची पोटगी मंजूर केली होती. पाच हजारांची पोटगी मिळत असताना तिने पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात २५ हजार रुपयांची अंतरिम पोटगी मिळण्यासाठी दावा दाखल केला.
‘पती बँकेत अधिकारी असून, त्याला दरमहा दोन लाख रुपये वेतन मिळते. त्याच्या आई-वडिलांची खासगी कंपनी आहे. कंपनीच्या माध्यमातून त्यांना दरमहा २५ लाख रुपये उत्पन्न मिळते. माझ्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. पती दैनंदिनी खर्च, तसेच जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी पैसे देत नाही,’ असे महिलेने दाखल केलेल्या अर्जात म्हटले होते.
पतीच्या वतीने ॲड. अजिंक्य साळुंके, ॲड. मयूर साळुंके, ॲड. अमोल खोब्रागडे यांनी बाजू मांडली. पत्नीला पाच हजार रुपये अंतंरिम पोटगी मंजूर करण्यात आली आहे. पत्नी व्यावसायिक आहे. तिला दरमहा ४० हजार रुपये उत्पन्न मिळते. पतीला अतिरिक्त उत्पन्न मिळते, असा दावा महिलेने केला आहे. पतीच्या नावाने संपत्तीबाबतच्या नोंदीही नाहीत, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. महिलेने पोटगी मिळवण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने खर्चासहित फेटाळून लावला.
पोटगी योग्य कारणांवर दिली जाते. गरज असेल, तर आर्थिक मदत करणे योग्य आहे. मात्र, न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतो, असे कौटुंबिक न्यायालायने दिलेल्या आदेशातून स्पष्ट होते. – ॲड. अजिंक्य साळुंके

बारामती : ‘काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचे बळी घेतले आहेत. या हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे, असे अनेकांचे म्हणणे आहे. याबाबत केंद्र सरकारने लक्ष घातले असून, निर्णय घेतला जाईल.’ असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार हे गुरुवारी बारामती दौऱ्यावर होते. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती अजित पवारांच्या उपस्थितीत झाल्या. यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक, किरण गुजर उपस्थित होते. त्यावेळी पवार बोलत होते.
पवार म्हणाले, ‘अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला आहे. पाकिस्तानलाही जरब बसावी यासाठी याचा बदला घेतला पाहिजे, असे अनेकांचे म्हणणे आहे. याबाबत केंद्र सरकारने लक्ष घातले आहे. त्यानुसार निर्णय घेतला जाईल. या हल्ल्यानंतर देश एकजूट झाल्याचे चित्र जगभर निर्माण झाले आहे. जगभरातील अनेक नेत्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
जागतिक पातळीवर हल्लेखोरांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे.’ ‘काश्मीरमध्ये घडलेल्या घटनेनंतर पर्यटकांना राज्यात आणण्यासाठी पयत्न करण्यात येत आहेत. अनेक पर्यटकांना विमान, रेल्वेने आणण्याचे काम सुरू आहे. पर्यटकांचा एक गट विमानाने परतीकडे निघाला असताना त्यांंच्याशी संपर्क साधला आहे.’ असे पवार यांनी सांगितले.



पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि भारतीय अभिनेत्री वाणी कपूर यांच्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटाला अडचणींचा सामना करावा लागला आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत होती आणि आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अबीर गुलाल हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही.
सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील खटाव तालुक्यात औंध येथील शेतकरी जयवंत जगदाळे यांची ढोबळी मिरचीच्या ( chilli) रोपांमध्ये मोठी फसवणूक झाली आहे. सुमारे 50 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. सांगली जिल्ह्यातील सिद्धेवाडीखण येथील वाघमोडे हायटेक रोपवाटिकेतून घेतलेल्या इंडस 11 आणि प्रोफेसर या वाणांची एकूण 48 हजार रोपे निकृष्ट आणि बोगस निघाल्याचा आरोप शेतकरी जयवंत जगदाळे यांनी केला आहे.
जयवंत जगदाळे यांनी डिसेंबर महिन्यात साडेपाच एकर क्षेत्रात ढोबळी मिरचीची लागवड केली होती. अपेक्षेप्रमाणे 30 दिवसात कळी लागणे आवश्यक होते, मात्र रोपांना सहाव्या दिवशीच कळी लागली, जी नैसर्गिक प्रक्रियेविरोधात होती. त्यानंतर सतत रोपांची वाढ खुंटत गेली. शेतकऱ्यांनी वारंवार रोपवाटिका मालकाशी संपर्क साधून प्लॉट पाहणीची विनंती केली. परंतू मालकाकडून टाळाटाळ झाली. 76 दिवस उलटून गेले तरीही रोपांची वाढ झाली नाही. यामागे रोपवाटिकेने ग्रोथ रेग्युलेटर वापरल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. यासंदर्भात पंचायत समितीकडे तक्रार दाखल केल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी रमेश देशमुख आणि इतर तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी शेतावर जाऊन पंचनामा केला आणि नुकसान भरपाईची ग्वाही दिली. मात्र, अद्याप या शेतकऱ्याला कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही.
शेतकऱ्याने अत्यंत महागडी बियाणं, खत, औषध, मजुरी यावर सुमारे 10 लाख रुपयांचे थेट भांडवल खर्च केले आहे. जर रोपे दर्जेदार असती तर एकरी उत्पन्न 25 ते 30 लाख रुपये मिळाले असते. सध्या तरी एकही रुपयाचे उत्पादन या शेतकऱ्याला मिळालेले नाही. त्यामुळं शेतकरी जयवंत जगदाळे यांचे सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, रोपांची वाढ होत नसल्याने शेतकरी जगदाळे यांनी वारंवार रोपवाटीका मालकाला फोन केला होता. मात्र, त्यांनी दुल्रक्ष केल्याचे पाहायला मिळाले. जगदाळे यांनी रोपवाटिका मालकाशी संपर्क साधून प्लॉट पाहणीची विनंती देखील केली होती. परंतू मालकाकडून टाळाटाळ करण्यात आल्याची माहिती शेतकरी जयवंत जगदाळे यांनी दिली आहे. 76 दिवस उलटून गेले तरीही रोपांची वाढ झाली नाही. त्यामुळं शेतकऱ्याची चिंता वाढली होती. अखेर या ठोबळी मिरचीची रोपं वाया गेल्याचं पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..

लोकसत्ता वार्ताहर
परभणी : पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आज येथे पाळण्यात आलेल्या कडकडीत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातल्या मुख्य बाजारपेठेसह सर्वच ठिकाणी दैनंदिन व्यवहार बंद राहिले. दरम्यान आज सायंकाळी येथे महामोर्चाचेही आयोजन करण्यात आले होते.
आज गुरुवारी (दि.२४) सकाळपासूनच शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद होते.छत्रपती शिवाजी चौकात विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. रामेश्वर नाईक, आनंद भरोसे, डॉ. विवेक नावंदर, अनंत पांडे, अनिल डहाळे, संदीप भंडारी, राजकुमार भांबरे आदींसह अनेकजण यावेळी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या घटनेचा आज शहरातील मुख्य चौक, क्रांतीचौक, गुजरी बाजार, नानलपेठ आदी व्यापारी भागात छोटी मोठी सर्व दुकाने बंद होती.
याप्रकरणी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यावतीने घटनेचा निषेध करणारे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. पहलगाम या भागात पर्यटकांवर हल्ला करून दहशतवाद्यांनी निरपराध जिवांचा बळी घेतला आहे. हा हल्ला निंदनीय व भ्याड असून केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरूध्द कठोर पावले उचलावीत असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने परभणीत याप्रकरणी जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन करण्यात आले. दहशतवाद्यांचा समूळनायनाट करण्यात यावा अशी मागणी यावेळी अ.भा.च्या वतीने प्रदेश सहमंत्री सुशांत एकोरगे, अमरजा नरवाडकर, गायत्री लाड आदींनी केले.
मोहमदी सोशल वेलफेअर सोसायटीच्या वतीने पहलगाम येथील हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. अतिरेक्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल कादर, सय्यद वसीम, फेजुल्लाखान पठाण आदींनी केली. काँग्रेसच्या वतीने याप्रकरणी आज जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. देशभरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. दोषी अतिरेक्यांविरूध्द तातडीने पावले उचलावीत अशी मागणी काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी आमदार तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव आदींनी केली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज अॅड. माधुरी क्षिरसागर, ओंकार पवार, अॅड. लक्ष्मण काळे, प्रसाद गोरे, शेख अब्दुल यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. अतिरेकी संघटनांनी केलेल्या कृत्याचा निषेध करत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींची जबाबदारी स्विकारून देशाचे गृहमंत्री अमीत शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

कल्याण – कल्याण पूर्व चक्कीनाका भागात शिवसेना शिंदे गटातर्फे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिकांसोबत महिला, रिक्षा चालक, व्यापारी, व्यावसायिक यांच्यासह विद्यार्थी या निषेध मोर्चात सहभागी झाले होते.
शिंदे शिवसेना कल्याण पूर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिंदे शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख व माजी नगरसेवक नीलेश शिंदे या निषेध मोर्चात सहभागी झाले होते. चक्कीनाका भागातून काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चात पाकिस्तान निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या. शिवसैनिक, महिला शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्या या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. नागरिकही उत्स्फूर्तपणे या निषेध मोर्चात सहभागी झाले होते.
पहलगाम येथील पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ठेचून काढण्याची मागणी संतप्त मोर्चेकरी करत होते. पाकिस्तान निषेधाच्या घोषणांनी मोर्चेकरांनी परिसर दणाणून सोडला होता. घोषणा देण्यात महिला शिवसेना कार्यकर्त्या आघाडीवर होत्या. चक्कीनाका, तिसगाव नाका परिसरातील रिक्षा चालक निषेध मोर्चात रिक्षा बंद करून सहभागी झाले होते. शाळांना सु्ट्टी लागल्याने आपल्या कुटुंबीयांसमवेत शाळकरी मुलेही मोर्चात सहभागी झाली होती. मुलेही मोठ्या आवाजात पाकिस्तान निषेधाच्या घोषणा देत होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणुन कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी मोर्चाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
शहरप्रमुख नीलेश शिंदे यांनी सांगितले, दहशतवाद्यांनी देशातील निष्पाप पर्यटकांचा बळी घेऊन पर्यटकांचे जीव घेतलेच, पण त्यांनी भारत देशावर हल्ला केला आहे. लढवय्या, शूर माणुस समोरून लढतो. हे हल्ले लपुनछपुन भ्याडपणे केले जात आहेत. भारताची ताकद शत्रुला माहिती आहे. त्यामुळे असे क्रूर, भ्याड उद्योग काही विघातक शक्ती करत आहेत. भारताने वेळोवेळी दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे या हल्ल्याचा बदला भारताकडून नक्कीच घेतला जाईल, असा विश्वास आहे. ज्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारण्याचे क्रूर कृत्य केले आहे. त्या दहशतवाद्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना जाहीरपणे कठोरातील कठोर शिक्षा होईल यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत. पुन्हा दहशतवादी डोके वर काढणार नाहीत अशा पध्दतीने त्यांना ठेचुन काढण्याची मागणी मोर्चेकरांनी केली