Saturday, August 22, 2026
Homeमनोरंजन26 people killed in Kashmir Terror Attack, Maharashtra tourists killed in Kashmir...

26 people killed in Kashmir Terror Attack, Maharashtra tourists killed in Kashmir Terror Attack

26 people killed in Kashmir Terror Attack, Maharashtra tourists killed in Kashmir Terror Attack

[ad_1]

पहलगाम हल्ल्याची तुलना ‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी होऊ लागल्यानंतर आता पाकिस्तानविरोधात एखादी लष्करी कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढू लागल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. दिल्लीतील नॉर्थ व साऊथ ब्लॉकमध्ये दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सूत्रधारांना धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी दिवसभर बैठकांचा सपाटा लावला. 

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पहलगाम मध्ये हल्ला करणारे ७ दहशतवादी होते, त्यापैकी ४ ते ५ जण पाकिस्तानातील होते. त्यांच्या उर्दूच्या लहेजानुसार ते पाकिस्तानातील असल्याचं स्पष्ट झालंय, कारण ती भाषा पाकिस्तानातील एका विशिष्ट भागात बोलली जाते. तर पीर पांजर रेंजमध्ये हे दहशतवादी पळून गेले आहेत.

Live Updates

Pahalgam Terror Attack Live Updates Today 24 April 2025 : पहलगाम हल्ल्यासंदर्भातील लाईव्ह अपडेट्स पाहा

08:53 (IST) 24 Apr 2025

Pahalgam Live Updates : शरद पवारांनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट

पुण्यातील संतोष जगदाळे यांचं पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांचं शरद पवारांनी सांत्वन केलं. आज ते सकाळीच या कुटुंबियांच्या भेटीला गेले होते.

08:51 (IST) 24 Apr 2025

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने कठोर पाऊल उचलत पाच मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना पुढील ४८ तासांत भारत सोडावा लागणार आहे. याचबरोबर कोणत्याही पाकिस्तानी नागरिका भारतात प्रवेश मिळणार नाही. याचबरोबर केंद्र सरकारने १९६० चा सिंधू पाणी करारही स्थगित करण्यात आला आहे. पाकिस्तानने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करणार नाही तोपर्यंत या करारावरील स्थगिती कामय राहणार आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

सविस्तर वृत्त वाचा

08:50 (IST) 24 Apr 2025

Pahalgam Live Update

ते (विदेशी दहशतवादी) ज्या उर्दू भाषेत बोलत होते ती भाषा पाकिस्तानच्या एका भागात बोलली जाते. त्यांच्यासोबत किमान दोन स्थानिक दहशतवादी असल्याचा संशय आहे,” असे सुरक्षा यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले .

What is the probability of a India surgical strike on Pakistan in response to the Pahalgam attack

Pahalgam Terror Attack Live Updates Today 24 April 2025 : पहलगाम हल्ल्यासंदर्भातील लाईव्ह अपडेट्स पाहा



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments