Thursday, June 25, 2026
Home Blog Page 3165

Crime News : रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक, साताऱ्यातून एकाला ठोकल्या बेड्या

0


मुंबई : रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली आहे. संताराम सकपाळ ( वय, 52  ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सकपाळ हा सातारा येथील रहिवासी असून तो रिअल इस्टेटचा व्यवसाय करतो. भारतीय रेल्वे आणि पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने सकपाळ याने 13 लोकांची 1.56 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड  झाले आहे.

संताराम सकपाळ हा त्याच्या इतर चार साथीदारांसोबत भारतीय रेल्वे आणि पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी देतो, असे म्हणून फसणूक करत होते.  हरिश्चंद्र कदम यांनी यासंदर्भात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिस तपास सुरू होता. रविवारी या प्रकरणात सकपाळ याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. सकपाळच्या चौकशीतून या टोळीच्या मुळापर्यंत जाण्यास मदत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सकपाळसह चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि सकपाळ याला बेड्या ठोकल्या. इतर चार जणांचा शोध सुरू आहे. 

सकपाळ याने आपल्या चार साथीदारांच्या मदतीने सातारा, लातूरसह इतर जिल्ह्यातील 13 जणांची फसवणूक केली. नियुक्तीपत्रे देऊन एका उमेदवाराला प्रशिक्षणासाठी चेन्नईला पाठवल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही रोख रक्कम सकपाळच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती, त्या आधारे त्याला शोधून अटक करण्यात आली. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी एमआरए पोलिस अधिक तपास करत आहेत. 

‘अशी’ करायचे फसवणूक

रल्वेत आणि पोस्टात नोकरी लावण्याच्या आमिषाने सकपाळ आणि त्याचे साथीदार तरूणांकडून पैसे घ्यायचे. रेल्वेतून मेल आल्याचे भासवून रेल्वेची बनावट नोकरीवर हजर होण्याची ऑर्डर द्यायचे. ऑर्डरवर बनावट सही करून, बनावट शिक्क्यांच्या वापर करून ती ऑर्डर खरी असल्याचे भासवून उमेदवारांना देण्यात येत होत्या. अनेक तरूणांना अशा ऑर्डर देखील देण्यात आल्या होत्या. ही ऑर्डर घेऊन काही तरूणांनी सकपाळ याने सांगितल्यानुसार भुसावळ येथे ट्रेनिंग सेंटरला दाखल झाले. परंतु, तेथे गेल्यानंतर ऑर्डर कॉपी बनावट असल्याचे समजताच तरुणांना धक्का बसला. त्यानंतर 13 जणांना चेन्नईला पाठवण्यात आले. तेथे गेल्यानंतर एका रेल्वेचे ट्रेनिंग सेंटर सांगून एका खासगी स्कॅनिंग सेंटरमध्ये एक महिना ट्रेनिंग पूर्ण करण्यास भाग पाडल्याचे फसवणूक झालेल्या तरुणांनी म्हटले आहे.  

news reels reels



Source link

Viral Video: विमानतळावरच हृतिक रोशनने केलं सबा आझादला किस! व्हिडीओ होतोय व्हायरल

0
Viral Video: विमानतळावरच हृतिक रोशनने केलं सबा आझादला किस! व्हिडीओ होतोय व्हायरल


हृतिकने २००० साली सुझेन खान सोबत लग्न केलं होतं. मात्र, २०१४ साली त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हृतिक गेल्या काही महिन्यांपासून सबाला डेट करत आहे. सबा देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. एअरपोर्ट असो किंवा आउटिंग सबा आणि ह्रतिक सगळीकडे एकत्र जाताना दिसतात. तर, ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे देखील बोलले जात आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीचं मंगळसूत्र तोडण्यामागे असणार का अनिरुद्धचा हात? मालिकेत मोठा ट्विस्ट!

0
Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीचं मंगळसूत्र तोडण्यामागे असणार का अनिरुद्धचा हात? मालिकेत मोठा ट्विस्ट!


अरुंधती अनिरुद्धला म्हणते की, तुम्ही किंवा कुणीही काहीही करुदे पण आता आम्ही कधीच वेगळे होऊ शकत नाही. या मंगळसूत्रामुळे काहीच होणार नाही, कारण आम्ही आधीच मनाने एक झालो आहोत. आता आम्हाला कुणीच वेगळं करू शकत नाही. आशुतोष आणि अरुंधतीचे लग्न होऊ नये, यासाठी अनिरुद्ध वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, त्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. अरुंधतीच्या लग्नाच्या विषयामुळे देशमुख कुटुंबात आता चांगलाच गदारोळ माजला आहे. अरुंधती आणि आशुतोषचं लग्न मोडावं, म्हणून अनिरुद्ध नवनव्या शकला लढवताना दिसत आहे.



Source link

Pranali Bhalerao: ‘टकाटक’ फेम बोल्ड अभिनेत्री प्रणाली भालेरावचं नवं गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
Pranali Bhalerao: ‘टकाटक’ फेम बोल्ड अभिनेत्री प्रणाली भालेरावचं नवं गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Pranali Bhalerao new song: प्रेम…प्यार…इश्क… भाषा कोणतीही असो, या भावनेत खूप ताकद असते. प्रेम ही जगातील सुंदर गोष्टींपैकी एक आहे. आजवर इतिहासात ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट.. प्रेम ही जगातील एक सुंदर भाषा आहे, ज्याने ही भाषा त्यालाच ती उमगते आणि स्वर्गाहून सुंदर जगाचा शोध त्याला लागतो. खरं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची आवश्यकता नसते, तरीही अनेकजण आपल्या प्रेमभावना खास व्यक्तीसमोर व्यक्त करतात. हेच प्रणाली भालेराव गाण्याच्या माध्यमातून सांगणार आहे.



Source link

सातारा : वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा निसर्गाचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या कडेकपारीत जंगलाची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वन्य प्राण्यांचा सुळसुळाट सुरु आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या त्रासामुळे डोंगरकपारीसह दऱ्याखोऱ्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. याविरोधात राजू (भैया) भोसले यांच्या नेतृत्वाखाली परळी भागातील शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला.

माजी जि. प. सदस्य राजु भैय्या भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह हजारो शेतकरी महिला,पुरूष सहभागी झाले होते.

हेही वाचा











Source link

Bold Photos: मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो, कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष

0
Bold Photos: मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो, कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष



Bathroom Photos: अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनची सर्वत्र चर्चा रंगली आहे.



Source link

Marathi Bhasha Din 2023: मराठी भाषा म्हणजे संस्कार…. कलाकारांनी दिल्या ‘मराठी भाषा दिना’च्या शुभेच्छा!

0
Marathi Bhasha Din 2023: मराठी भाषा म्हणजे संस्कार…. कलाकारांनी दिल्या ‘मराठी भाषा दिना’च्या शुभेच्छा!


अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील हटके अंदाजात मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ताने तिचे मराठमोळ्या लूकमधील काही फोटो शेअर केले असून, कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी लिहित मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त केलं आहे. ‘प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं.. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं… प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं.. मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं… कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी लिहीलेल्या या ओळींसारखंच प्रेम आहे माझं, माझ्या “मराठीवर”…जे आहे आज, राहील उद्या, परवा.. मरणोत्तरही….. “मराठी भाषा गौरव दिनाच्या”; महाराष्ट्राला आभाळभर शुभेच्छा…’ असे कॅप्शन तिने लिहिले आहे.



Source link

Raj Thackeray : राज ठाकरे लिहिणार लता मंगेशकर यांच्यावर पुस्तक

0
Raj Thackeray : राज ठाकरे लिहिणार लता मंगेशकर यांच्यावर पुस्तक


आपल्या सुमधुर गायनाने केवळ देशातीलच नाही, तर जगभरातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजे गायिका लता मंगेशकर. गेल्या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांच्या जीवनावर पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.



Source link

Swara Bhasker: स्वरा भास्करने सोशल मीडियावर शेअर केले फुलांनी सजवलेल्या बेडचे फोटो! म्हणाली…

0
Swara Bhasker: स्वरा भास्करने सोशल मीडियावर शेअर केले फुलांनी सजवलेल्या बेडचे फोटो! म्हणाली…


स्वराने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझा हनीमून हा फिल्मी असावा, याची पूर्ण काळजी आई घेत आहे.’ याशिवाय तिने या स्टोरीमध्ये एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये खोलीची झलकही पाहायला मिळत आहे. फुलांनी सजवलेला बेड दाखवत स्वरा तिच्या आईला याचे श्रेय देताना दिसत आहे. स्वरा भास्करने एक व्हिडीओ शेअर करून फहादसोबतच्या तिच्या नात्याची अन् रजिस्टर लग्नाची अधिकृत घोषणा केली होती. अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते.



Source link

Marathi Bhasha Din: मराठी भाषा दिनानिमित्त ‘महाराष्ट्र शाहीर’मधील ‘बहरला हा मधुमास’ गाणे प्रदर्शित

0
Marathi Bhasha Din: मराठी भाषा दिनानिमित्त ‘महाराष्ट्र शाहीर’मधील ‘बहरला हा मधुमास’ गाणे प्रदर्शित



Maharashtra Shaheer: बहरला हा मधुमास हे गाणे आहे. गुरु ठाकूर यांनी लिहिलेले आणि श्रेया घोषाल व अजय गोगावले यांनी गायले आहे.



Source link