Thursday, June 25, 2026
Home Blog Page 3166

Selfiee: नफा तर सोडाच बजेटही कमावू शकला नाही चित्रपट, सेल्फीची विकेंड कमाई आली समोर

0
Selfiee: नफा तर सोडाच बजेटही कमावू शकला नाही चित्रपट, सेल्फीची विकेंड कमाई आली समोर


अक्षयच्या सेल्फी या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात इम्रान हाश्मी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहताने केले. यापूर्वी त्याने अक्षय सोबत ‘गूड न्यूज’ हा चित्रपट केला होता. अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा हा चित्रपट मल्याळम ‘ड्रायविंग लायसेन्स’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात इम्रान आणि अक्षयसोबत नुसरुत भरुचा आणि डायने पेंटी दिसणार आहे.



Source link

Chandravilas : छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार ‘अपसाईड डाऊन’चा थरार; वैभव मांगले प्रेक्षकांना घाबरवणार!

0
Chandravilas : छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार ‘अपसाईड डाऊन’चा थरार; वैभव मांगले प्रेक्षकांना घाबरवणार!


Chandravilas new Marathi Serial: ‘चिंची’ साकारल्यानंतर आता वैभव मांगले प्रेक्षकांना घाबरवायला सज्ज झाले आहेत. त्यांच्या नव्या मालिकेचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.



Source link

Marathi Bhasha Din: लाभले आम्हास भाग्य… ओटीटीवर आज मराठी भाषेचा अनोखा गौरव

0
Marathi Bhasha Din: लाभले आम्हास भाग्य… ओटीटीवर आज मराठी भाषेचा अनोखा गौरव


‘लाभले आम्हास भाग्य’ बद्दल दिग्दर्शक, अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणतो, ” या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कोणाला भाषा शिकवणे, उपदेश करणे हा नसून, आम्हाला मराठी भाषा बोलताना जो आनंद मिळतो, तो तुम्ही सुद्धा घ्यावा, हा एवढाच या मागचा उद्देश आहे. मुळात मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे हा सगळा कार्यक्रम आम्ही गंमतीजंमती, मजा करत केलेला असून मराठी भाषेचं वैभव दाखवण्याचा प्रयत्न आम्ही यातून केला आहे.”



Source link

Hruta Durgule: ‘फुलपाखरू’ हृता दुर्गुळे ठरली महाराष्ट्राची फेव्हरेट; पटकावला ‘पॉप्युलर फेस ऑफ द इअर’

0
Hruta Durgule: ‘फुलपाखरू’ हृता दुर्गुळे ठरली महाराष्ट्राची फेव्हरेट; पटकावला ‘पॉप्युलर फेस ऑफ द इअर’


मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा घेऊन यावर्षी पुन्हा एकदा झी टॉकीज ही वाहिनी रसिकांच्या भेटीला आली. गेल्या वर्षभर प्रदर्शित झालेल्या सिनेमांमधून विविध बारा विभागासाठी हे पुरस्कार देण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा फेव्हरेट ‘पॉप्युलर फेस ऑफ द इअर’, ‘फेव्हरेट अभिनेता’, ‘अभिनेत्री’, ‘खलनायक’, ‘सहाय्यक अभिनेता’, ‘सहाय्यक अभिनेत्री’, ‘फेव्हरेट सिनेमा’, ‘गायक’, ‘गायिका’, ‘गाणं’, ‘संगीतकार’, ‘दिग्दर्शक’ आणि ‘स्टाईल आयकॉन’ अशा विभागांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या कलाकारांमधून प्रेक्षकच त्यांच्या पसंतीची मोहर उमटवत असतात. त्यामुळे कलाकारांनाही हा सन्मान म्हणजे प्रेक्षकांच्या पसंतीची पावतीच असते.



Source link

तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनात शाळकरी मुली; सर्वेक्षणातून समोर आले वास्तव | पुढारी

0









सातारा : मीना शिंदे : तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कॅन्सरसाठी सर्वात मोठे कारण ठरू लागले आहे. यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर ग्लोबल युथ टोबॅको सर्व्हेनुसार शाळकरी मुलींचा टक्का वाढू लागला असून 13 ते 15 वयोगटांतील 7.4 टक्के शालेय मुलींकडून तंबाखूजन्य पदार्थांचा वापर होत असल्याचे दाहक वास्तव समोर आले आहे. शाळा परिसरात कोटपा कायदा फाट्यावर बसवून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थिनींभोवती कर्करोगाचे सावट घोंगावू लागल्याने पालकांनी सजगता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

जीवायटीएस सर्व्हेनुसार 13 ते 15 वयोगटातील 7.4 टक्के मुली तंबाखूजन्य उत्पादनांचा वापर करतात. त्यामध्ये धूम्रपानासाठी 6.2 टक्के असून धूम्रपानाशिवाय तंबाखूचा वापर 3.4 टक्के आहे. धूम्रपानाशिवाय इतर तंबाखूचा वापर 3.4 टक्के एवढा आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून तंबाखू उत्पादनांवरील करांमध्ये वाढ न झाल्यामुळे महागाईच्या तुलनेत तंबाखूजन्य उत्पादने परवडणारी आहेत. तंबाखू उत्पादनांवर कर वाढवण्यासाठी महिला आणि बालकल्याण संस्थांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. तंबाखूच्या दुष्परिणामांपासून बालिकांचे संरक्षणासाठी तसा प्रस्तावही अर्थमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.

तंबाखू वापरात जगात दुसरा क्रमांक…

धुम्रपानामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारतात 10 लाख मृत्यू धूम्रपानामुळे होतात. 2 लाखांपेक्षा जास्त मृत्यू धूम्रपान व 3 लाख 50 हजार पेक्षा जास्त धूररहित तंबाखूच्या वापरामुळे होतात. एकूण कर्करोग रुग्णांपैकी सुमारे 27 टक्के रुग्णांना तंबाखू सेवन हे कारण समोर आले आहे. तंबाखूच्या वापरामुळे होणार्‍या रुग्णांवरील खर्च व त्यांच्या मृत्यूमुळे होणारे एकूण वार्षिक आर्थिक नुकसान 1 लाख 77 हजार 341 कोटी रुपये असून ते भारताच्या जीडीपीच्या जवळपास 1.04 टक्के एवढे आहे.

गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचा धोका…

ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हेनुसार भारतात 15 वर्षांपेक्षा अधिक लोकसंख्येपैकी 28 टक्के लोक तंबाखू उत्पादने वापरत असून यापैकी 14 टक्के स्त्रिया आहेत. तंबाखूच्या सेवनामुळे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. तंबाखूच्या सेवन, सिगारेट व विडीच्या केवळ धुरामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका झपाट्याने वाढतो. राष्ट्रीय कर्करोग नोंदणी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सर्वेक्षणानुसार महिलांमध्ये धूम्रपानाची सवय तसेच तंबाखूचा वापर हा कर्करोगाशी निगडीत सर्वांत प्रमुख धोकादायक घटक आहे. भारतात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा 15 ते 44 वयोगटांतील महिलांमध्ये अधिक असून मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे.

महिलांनी कोणत्याही प्रकारे तंबाखूचा वापर करणे प्रजनन संस्थेसाठी हानिकारक आहे. लहान वयातील तंबाखू सेवन, धूम्रपान किंवा धूरविरहित तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन प्रौढत्वात सहजासहजी सुटत नाही. किशोरवयीन मुलींमधील तंबाखूचा वापर कमी केल्यास त्यांच्या भविष्यातील आरोग्य समस्या टाळू शकतो.
– अ‍ॅड. चैत्रा व्ही.एस.











Source link

राज्यात 9.34 कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन; कोल्हापूर विभाग आघाडीवर | पुढारी

0









सातारा : महेंद्र खंदारे : राज्यात यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाच्या हंगामात बंद पडलेले कारखाने सुरू झाल्याने शिल्लक उसाचा प्रश्न यंदा जाणवला नाही. यंदा 204 कारखान्यांनी 9 कोटी 33 लाख 55 हजार टन उसाचे गाळप करून 9 कोटी 34 लाख 35 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उत्पादनात कोल्हापरू, सोलापूर आणि पुणे विभाग आघाडीवर आहे. राज्याचा उतारा 10 टक्क्यावर आला आहे.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्यात गळीत हंगामाला प्रारंभ झाला. याच कालावधीत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला होता. मात्र, त्यानंतर आजपर्यंत हा हंगाम सुरळीत सुरू आहे. यंदा कारखान्यांना उस तोड टोळ्यांची समस्या जाणवत असली तरी बंद पडलेले कारखाने यंदा चालू झाल्याने उसाचा प्रश्न गंभीर बनला नाही.

या हंगामात राज्यातील 102 सहकारी साखर कारखान्यांनी 24 फेब्रुवारीपर्यंत 4 कोटी 95 लाख 34 हजार 699 टन उसाचे गाळप करून 5 कोटी 11 लाख 74 हजार 860 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर 102 खासगी कारखान्यांनी 4 कोटी 36 लाख, 8 हजार 297 टन उसाचे गाळप करून 4 कोटी 22 लाख 55 हजार 444 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सहकारी कारखान्यांचा सरासरी उतारा हा 10.33 तर खासगी कारखान्यांचा उतारा 9.69 टक्के पडला आहे.

यंदा कोल्हापूर विभागातील 36 कारखान्यांनी 2 कोटी 24 लाख 14 हजार टन उसाचे गाळप करून 2 कोटी 44 लाख 19 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सोलापूर विभागातील 49 कारखान्यांनी 2 कोटी 12 लाख 42 हजार टन उसाचे गाळप करून 1 कोटी 99 लाख 77 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पुणे विभागातील 31 कारखान्यांनी 1 कोटी 96 लाख63 हजार टन उसाचे गाळप करून 1 कोटी 95 लाख 1 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. अहमदनगर विभागातील 27 कारखान्यांनी 1 कोटी 18 लाख 13 हजार टन उसाचे गाळप करून 1 कोटी 12 लाख 27 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. औरंगाबाद विभागातील 25 कारखान्यांनी 89 लाख38 हजार टन उसाचे गाळप करून 82 लाख 23 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. नांदेड विभागातील 29 कारखान्यांनी 91 लाख 22 हजार टन उसाचे गाळप करून 90 लाख 55 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. नागपूर विभागातील 7 कारखान्यांनी 11 लाख 54 हजार टन उसाचे गाळप करून 9 लाख 88 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

साडेपाच लाख क्विंटल कमी उत्पादन

गतवर्षी 196 कारखान्यांनी गाळप केले होते तर यंदा हाच आकडा 204 वर गेला. राज्यात गतवर्षी याच तारखेपर्यंत 9 कोटी 17 लाख 79 हजार टन उसाचे गाळप करून 9 कोटी 39 लाख 94 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. यंदाच्या हंगामात त्या तुलने यावर्षी तब्बल 16 लाख 24 हजार क्विंटल उसाचे गाळप जास्त झाले आहे. मात्र, साखर उत्पादनात आश्चर्यकारक 5 लाख 59 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. गतवर्षी याचवेळी 10.24 टक्के उतारा होता तो आता 10.1 टक्के आला आहे.











Source link

Manu James Death: पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्याचे निधन

0
Manu James Death: पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्याचे निधन


जोसेफ हा केवळ चित्रपट निर्माता नव्हता. त्याने २००४ साली कन्नड आणि मल्याळम चित्रपटसृष्टीमधील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. Am Curious या चित्रपटाने त्याने करिअरसला सुरुवात केली होती. आता निर्माता म्हणून तो एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात करत होता. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचे निधन झाले आहे.



Source link

Rang Majha Vegla: १४ वर्षांची शिक्षा भोगून कार्तिकची सुटका, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत येणार लीप

0
Rang Majha Vegla: १४ वर्षांची शिक्षा भोगून कार्तिकची सुटका, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत येणार लीप


या १४ वर्षात अनेक घडामोडी घडल्या आहेत. दीपिका-कार्तिकी मोठ्या झाल्या आहेत. १४ वर्षांची शिक्षा भोगून कार्तिकची सुटका होईल. मात्र आता दीपाचा वनवास सुरु होणार आहे. यामागे नेमकं काय कारण असेल? कार्तिकने दीपाला माफ केलं का? काय असेल या दोघांच्या नात्याचं भवितव्य? हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.



Source link

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर दिसणार हॉरर कॉमेडी चित्रपटात, लूक चर्चेत

0
Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर दिसणार हॉरर कॉमेडी चित्रपटात, लूक चर्चेत


आतापर्यंत संजय जाधव यांनी ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘तू ही रे’, ‘लकी’,’चेकमेट’, ‘खारी बिस्किट’, ‘ये रे ये रे पैसा’,’तमाशा लाइव्ह’ अशा वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. पण आता पहिल्यांदाच संजय जाधव ‘कलावती’ या चित्रपटाच्या माध्यमातून हॉरर कॉमेडी जॉनर घेऊन भेटीस येत आहेत त्यामुळे निश्चितच उत्सुकता आहे. अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, अभिजित चव्हाण, हरीश दुधाडे, ओंकार भोजने, दिप्ती धोत्रे,संजय शेजवळ,नील साळेकर(इन्फ्लूएन्सर) अशी कलाकारांची तगडी टीम ‘कलावती’ या चित्रपटात दिसणार आहे.
वाचा: नवाजवर पत्नीने केला बलात्काराचा आरोप, व्हिडीओ व्हायरल



Source link

Prakash Jha: फुटपाथवर उपाशी काढले दिवस, संघर्षमय आहे प्रकाश झा यांचे आयुष्य

0
Prakash Jha: फुटपाथवर उपाशी काढले दिवस, संघर्षमय आहे प्रकाश झा यांचे आयुष्य


‘अपहरण’,’ गंगाजल’ आणि ‘राजनीती’ अशा सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या प्रकाश झा यांना सर्वजण ओळखतात. आज २७ फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस आहे. प्रकाश झा यांच्या दिग्दर्शन आणि निर्मितीबाबत जवळपास सर्वांना माहिती आहे. पण त्यांचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय कठीण होता.



Source link