Sunday, June 28, 2026
Home Blog Page 3137

Salman Khan: लॉरेन्स बिष्णोईने तुरुंगातून दिली सलमान खानला धमकी, भाईजान मागणार माफी?

0
Salman Khan: लॉरेन्स बिष्णोईने तुरुंगातून दिली सलमान खानला धमकी, भाईजान मागणार माफी?


लॉरेंसने पंजाबी गायक आणि कॉंग्रेस नेता सिद्धू मूसेवालाची हत्या केल्याची कबूली दिली. मात्र, सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना कोणतीही धमकी दिली नसल्याचे त्याने म्हटले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्याला Y+ सुरक्षा देण्यात आली होती. सलमानने बुलेट प्रूफ कार वापरण्यास सुरुवात केली होती. तसेच घराबाहेरील सुरक्षा देखील वाढवली होती.



Source link

समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यावर चित्रपट; कॉमेडियन नवीन प्रभाकर महत्त्वपूर्ण भूमिकेत!

0
समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यावर चित्रपट; कॉमेडियन नवीन प्रभाकर महत्त्वपूर्ण भूमिकेत!


नव्याने येऊ घातलेल्या ‘रघुवीर’ या मराठी सिनेमामध्ये आपण नवीन प्रभाकरांना एका निगेटिव्ह भूमिकेत बघणार आहोत. कॉमेडियन म्हणून दिलखुलास हसवल्यानंतर एक गंभीर भूमिकेतसुद्धा प्रभाकरांनी चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आता कॉमेडियन ते व्हिलन या त्यांच्या प्रवासाचे साक्षीदार आपण बनणार आहोत. नवीन प्रभाकरांबरोबरच चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत म्हणजेच समर्थ रामदासांच्या भूमिकेत आपण विक्रम गायकवाड यांना बघणार आहोत. त्याच बरोबर चित्रपटामध्ये ऋजुता देशमुख, शैलेश दातार, विघ्नेश जोशी, राहुल मेहदेंळे, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, निनाद कुलकर्णी, देव निखार्गे, गणेश माने या गुणी कलाकारांची सुद्धा भूमिका आहे.



Source link

सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित प्रेमकथा, ‘रावरंभा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित प्रेमकथा, ‘रावरंभा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


आसमंतात फडकणाऱ्या भगव्या झेंड्याच्या पार्श्वभूमीवर एकमेंकांसोबत दिसणारे ‘राव’ आणि ‘रंभा’, त्यासोबत बेभान होऊन दौडणारे घोडेस्वार दिसताहेत. या आकर्षक पोस्टरमध्ये ओम आणि मोनालिसा यांची छान जुळून आलेली केमिस्ट्री पहायला मिळतेय. एकमेकांसाठी काहीही करण्याची तडफ त्यात दिसतेय. इतिहासाच्या पानांमध्ये ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याप्रती आणि स्वराज्याच्या प्रती असलेली निष्ठा, शौर्याची, त्यागाची आणि समर्पणाची किनार या कथेला असल्याचे दिग्दर्शक अनुप जगदाळे सांगतात. चित्रपटात छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार आहेत.



Source link

Ananya Panday: बहिणीच्या मेहंदी सोहळ्यात धुम्रपान करताना दिसली अनन्या पांडे, फोटो व्हायरल

0
Ananya Panday: बहिणीच्या मेहंदी सोहळ्यात धुम्रपान करताना दिसली अनन्या पांडे, फोटो व्हायरल



Ananya Panday: अनन्या पांडेची बहिण अलाना पांडे ही लग्नबंधनात अडकणार आहे. अलानाच्या मेहंदी कार्यक्रमात अनन्या धुम्रपान करत असल्याचे दिसत आहे. तिचा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.



Source link

माझी भाकरी… माझा झुणका.. सद्गुरू आश्रमशाळेचा शैक्षणिक उपक्रम | पुढारी

0


रेठरे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : स्त्री-पुरुष समानता, स्वच्छता, , ‘स्व’ची जाणीव, पुस्तकी ज्ञानाबरोबर स्वयंपाकाचे कौशल्य अवगत व्हावे तसेच विद्यार्थी स्वावलंबी व्हावा या उद्देशाने शेरे (ता. कराड) येथील सद्गुरू आश्रमशाळेने ‘माझी भाकरी माझा झुणका’ हा आनंददायी आणि अभिनव उपक्रम राबवला. हा उपक्रम आणि स्पर्धा ऐच्छिक ठेवण्यात आली असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन आपले कौशल्य दाखवले.

अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या निमित्ताने या उपक्रमात भाग घेऊन भाकर्‍या बनवल्या. त्यामुळे आपणही स्वावलंबी व्हायला पाहिजे ही जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण झाली. तर भाकरी आम्हाला बनवायला येतच नाही हा गैरसमज या निमित्ताने दूर झाला. तोडकीमोडकी का होईना आम्ही भाकर्‍या बनवू शकतो याची जाणीव आम्हाला झाली, अशा प्रतिक्रिया यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी भात बनवणे, पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांना भाकरी बनवणे तसेच विद्यार्थिनींना झुणका बनवणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या. भाकरीचा आकार व चव हे निकष ठेवून क्रमांक काढण्यात आले. तर झुणक्यासाठी तसेच निकष वापरून क्रमांक घोषित करण्यात आले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनीही भात बनविण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेसाठी प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांचे गट करून एक गटनायक नेमण्यात आला होता. गटनायकाने प्रत्येकाला लागणारे साहित्य वाटून दिले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी उपक्रमासाठी आवश्यक असणारे साहित्य आणले होते. चुल मांडण्यापासून भाकरी तसेच झुणका करण्यापर्यंत सर्व कृती या बालचमुनीं करून एक वेगळा अनुभव या उपक्रमाच्या निमित्ताने घेतला. राज्यातील हा एक आगळावेगळा आणि अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक मिलिंद बनसोडे, संभाजी पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.

यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी आष्पाक अत्तार, प्रमोद रामधुमाळ, विष्णू खरात, अभिजीत आडके, रेखा पाटील, संतोष भालेराव, सुजाता भोसले, सुमती माने, पंडितराव जाधव, रोहित पाटील, नितीन पाटील, वैभव शिंगे, डी. आर. पाटील, प्रकाश निकम, पांडुरंग गायकवाड, स्वाती चांदणे यांनी प्रयत्न केले.



Source link

Prakash Raj: ना ऑस्कर मिळाला ना भास्कर…; प्रकाश राज यांची ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर पुन्हा टीका!

0
Prakash Raj: ना ऑस्कर मिळाला ना भास्कर…; प्रकाश राज यांची ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर पुन्हा टीका!


या जुन्या व्हिडीओमध्ये प्रकाश राज ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या या चित्रपटाला ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट केल्याच्या खोट्या दाव्याची खिल्ली उडवताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये प्रकाश राज म्हणत आहेत की, ‘द काश्मीर फाइल्स’ हा एक बकवास चित्रपट आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरी देखील त्याच्यावर टीका करतात. पण, या चित्रपटाचा दिग्दर्शक आताही हेच म्हणत आहे की, मला ऑस्कर का मिळत नाही? मी म्हणतो, तुम्हाला भास्करही मिळणार नाही.’



Source link

Kapil Sharma: ‘झ्विगॅटो’मध्ये डिलिव्हरी बॉय साकारणाऱ्या कपिल शर्माची एकूण संपत्ती ऐकून व्हाल हैराण!

0
Kapil Sharma: ‘झ्विगॅटो’मध्ये डिलिव्हरी बॉय साकारणाऱ्या कपिल शर्माची एकूण संपत्ती ऐकून व्हाल हैराण!


इतर सर्व अभिनेत्यांप्रमाणे कपिल शर्मानेही आपल्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले आहेत. परंतु, तरीही त्याच्या करिअरचा आलेख नेहमी चढताच राहिला आहे. कपिल शर्माची एकूण संपत्ती तब्बल ३०० कोटींची असल्याचे सांगितले जाते. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने याचा खुलासा केला आहे. ३०० कोटींच्या नेटवर्थबद्दल बोलताना कपिल शर्मा म्हणाला की, ‘मी खूप पैसे कमावले आणि गमावले देखील… पण मी आता या सगळ्याचा विचार करत नाही. माझ्याकडे कुटुंब, घर आणि गाडी आहे, इतकंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.’



Source link

Milind Gawali: रडावसं वाटलं तर माणसानं रडावं… ‘आई कुठे काय करते’च्या अनिरुद्धची ‘ती’ पोस्ट चर्चेत!

0
Milind Gawali: रडावसं वाटलं तर माणसानं रडावं… ‘आई कुठे काय करते’च्या अनिरुद्धची ‘ती’ पोस्ट चर्चेत!


याचाच एक किस्सा त्यांनी यात सांगितला. ते म्हणाले, ‘आमच्या प्रोडूसर कै.वासवानीने ‘सुन लाडकी सासरची’ चित्रपटांमध्ये बायकांना हात रुमाल वाटले होते. त्यांना इतकी खात्री होती की, सिनेमा बघताना बायका भरभरून रडणार. सिनेमात काम करताना आम्हाला बरेच वेळेला रडायचे प्रसंग येतात, आम्ही आमचं काम करत असताना मन मोकळं होतं. सामान्य माणसाचं काय होत असेल, काहींना तर रडायची अजिबात सवयच नसते. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळं मनामध्ये साठवून राहत असेल का? टॉक्सिक होत असेल का? स्ट्रेसफुल होत असेल का? म्हणून लोक आजारी पडत असतील का? महत्त्वाचं म्हणजे जो माणूस रडतो, ज्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, तो संवेदनशील तर असतोच पण तोच खरं आयुष्य जगतो असं मला वाटतं….’ त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.



Source link

Sameer Khakkhar Death: ‘नुक्कड’ फेम अभिनेता समीर खक्कर यांचे निधन

0
Sameer Khakkhar Death: ‘नुक्कड’ फेम अभिनेता समीर खक्कर यांचे निधन


Sameer Khakkhar Passes Away: दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘नुक्कड’ या लोकप्रिय मालिकेत ‘खोपडी’ ही व्यक्तिरेखा साकारून घराघरांत प्रसिद्ध झालेले अभिनेते समीर खक्कर यांचे आज (१५ मार्च) निधन झाले.



Source link

RRR 2: ‘आरआरआर’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार? ऑस्कर मिळाल्यावर काय म्हणाले एसएस राजमौली…

0
RRR 2: ‘आरआरआर’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार? ऑस्कर मिळाल्यावर काय म्हणाले एसएस राजमौली…


यावेळी राजामौली यांना चित्रपटाच्या सीक्वलबद्दल विचारण्यात आले. त्यावर बोलताना एसएस राजामौली सांगितले की, ऑस्कर पटकावल्यानंतर आता या चित्रपटाच्या सिक्वलच्या कामाला वेग येईल. या चित्रपटाची पटकथा विजयेंद्र प्रसाद लिहित आहेत, याची माहिती देखील त्यांनी दिली. एसएस राजामौली, एमएम कीरावानी यांच्यासोबतच्या ऑस्कर आफ्टर पार्टीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांना एका मुलाखतीत ‘आरआरआर २’बद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र, याबद्दल आताच फार काही सांगता येणार नाही, असे त्यांनी म्हटले.



Source link