Sunday, June 28, 2026
Home Blog Page 3136

सातारा- धक्कादायक! साखरवाडीत अल्पवयीन मुलीची प्रसुती, बलात्काराचा गुन्हा दाखल | पुढारी

0









साखरवाडी (जि. सातारा) : पुढारी वृत्तसेवा – साखरवाडी तालुका फलटण येथे १ वर्षांपूर्वी प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाला होता. सदर मुलीची सातारा जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली असून पती इंद्रजीत जाधव याच्यावर पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

फलटण पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, साखरवाडीतील इंद्रजीत जाधव याचा ४ एप्रिल, २०२२ रोजी अल्पवयीन मुलीशी प्रेम प्रकरणातून विवाह करण्यात आला होता. त्यातून सदर मुलगी गर्भवती राहून तिचा 14 मार्च रोजी सातारा जिल्हा रुग्णालयात प्रस्तुती झाली. डॉक्टरांनी तिच्याकडे वयाचा दाखला मागितला असता मुलीचे वय प्रसुतीवेळी १८ वर्षांचे असल्याचे व विवाहवेळी मुलगी अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. पतीवर पोक्स अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून पुढील अधिक पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.











Source link

Prashant Damle: ‘नियम व अटी लागू’, प्रशांत दामलेंचे नवे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला

0
Prashant Damle: ‘नियम व अटी लागू’, प्रशांत दामलेंचे नवे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला



Prashant Damle: त्यात जर या नियम व अटी नवरा व बायकोच्या नात्याला लागू करायच्या असतील तर काय? याचे उत्तर प्रेक्षकांना नाटक पाहिल्यावर मिळणार आहेत.



Source link

Rajpal Yadav: बॉलिवूडचा ‘छोटा पंडीत’ कसा बनला राजपाल यादव? जाणून घ्या प्रवास

0
Rajpal Yadav: बॉलिवूडचा ‘छोटा पंडीत’ कसा बनला राजपाल यादव? जाणून घ्या प्रवास


सुरुवातीला राजपालने काही मालिकांमध्ये केले. त्यानंतर १९९९ सालात आलेल्या अजय देवगणच्या ‘शूल’ या सिनेमातून राजपाल यादवने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. दोन दशकांच्या कारकीर्दीत राजपालने विविध भूमिका साकारल्या आहेत. हंगामा, गरम मसाला, मुझसे शादी करोगी, मालामाल विकली, भूलभुलैया, पार्टनर, जुडवा-२ अशा अनेक सिनेमांमधून त्याने कॉमेडी भूमिका केल्या आहेत. तर जंगल, डरना मना है, मै माधुरी दीक्षित बनना चाहती हू या प्रकराच्या काही सिनेमांमधून त्याने कॉमेडी न करता काहिशा हटके भूमिका साकारल्या आहेत.



Source link

Pathaan: ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘पठाण’, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार

0
Pathaan: ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘पठाण’, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार


मीडिया रिपोर्ट्सनुसार, पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनाला ५६ दिवस पूर्ण झाल्यावर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अॅमेझॉन प्राइमने सोशल मीडियावर पठाणमधील एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.



Source link

Pathaan: प्रदर्शनाच्या ५० दिवसानंतरही ८०० चित्रपटगृहात ‘पठाण’चे स्क्रिनिंग

0
Pathaan: प्रदर्शनाच्या ५० दिवसानंतरही ८०० चित्रपटगृहात ‘पठाण’चे स्क्रिनिंग


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पादूकोणचा ‘पठाण’ हा चित्रपट रिलीज होऊन आत तब्बल ५० दिवस झाले आहेत. तरीही चित्रपटाची कमाई कमी झालेली नाही. आजही ८०० चित्रपटगृहांमध्ये पठाण हा चित्रपट दाखवला जात आहे. चाहत्यांमध्ये पठाणची क्रेझ कायम असल्याचे समोर आले आहे.



Source link

प्रेमाच्या प्रवाहाचा रंग निराळा! जयदीप-गौरी, अप्पू-शशांक झाले रोमँटिक

0
प्रेमाच्या प्रवाहाचा रंग निराळा! जयदीप-गौरी, अप्पू-शशांक झाले रोमँटिक


आपल्या माणसांचा आपला सोहळा ही यावर्षीच्या सोहळ्याची थीम असल्यामुळे कलाकारांनी परफॉर्मन्समधूनही ही थीम अनोख्या पद्धतीने सादर केली. जयदीप-गौरी, सायली – अर्जुन, दीपा-कार्तिक, अप्पू-शशांक, पल्लवी – शांतनू, अंजी – पश्या, आकाश-भूमी आणि युवराज-पिंकी या प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्यांचा रोमॅण्टिक अंदाज सोहळ्याची रंगत वाढवणार आहे.



Source link

सातारा जिल्ह्यातील ‘त्या’ जवानाची आत्महत्या नव्हे हत्या; वडिलांच्या 10 महिन्यांच्या लढ्याला यश

0


Satara News : सातारा जिल्ह्यातील (Satara News) जावळी तालुक्यातील बामनोलीमधील प्रथमेश पवार यांनी लष्करात भरती झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र तब्बल 10 महिन्यांच्या कालावधीनंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी या प्रकरणाचा उलघडा करून प्रकरणाला वाचा फोडली आहे. प्रथमेश पवार यांनी आत्महत्या नव्हे, तर त्यांची त्यांच्याच आर्मी कॅम्पमधील जवानाने एके-47 मधून गोळी झाडून हत्या केल्याचे सिद्ध झाले आहे. आपला मुलगा आत्महत्या करूच शकत नाही, अशी प्रतिक्रिया प्रथमेश पवार यांनी त्यावेळी देत प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. यानंतर या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून प्रथमेश पवार यांच्या वडिलांना भारतीय लष्करापासून ते पंतप्रधान, राष्ट्रपतींपर्यंत पाठपुरावा केला होता. त्यामुळे या प्रकरणाला तब्बल 10 महिन्यांनी वाचा फुटली आहे. 

नेमका प्रकार काय घडला?

जावळी तालुक्यातील बामनोली उर्फ कुडाळ गावचे सुपुत्र जवान प्रथमेश पवार यांनी जम्मू काश्मीरमधील सांबा कॅम्पमध्ये आत्महत्या केल्याचे भारतीय सैन्य दलाकडून जाहीर करण्यात आले होते. तथापि, प्रथमेश पवार यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सांबा कॅम्पमध्ये असणाऱ्या जवान वैद्य खुशरंगला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एके-47 रायफल जप्त करण्यात आली आहे.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न? 

दरम्यान गेल्या वर्षभरापासून या प्रकरणाचा प्रथमेश पवार यांचे वडील संजय पवार यांच्याकडून सुरु होता. प्रथमेश 2022 मध्ये भारतीय सैन्य दलात जवान म्हणून दाखल झाले होते. ट्रेनिंगनंतर त्यांची पहिली पोस्टिंग जम्मू-काश्मीरमधील सांभा सेक्टरमध्ये झाली होती. यानंतर मिलिटरी कॅम्पमध्येच गोळी मारून प्रथमेश पवार यांनी आत्महत्या केल्याचा निरोप जम्मू-काश्मीरमधून बामनोलीमधील पवार कुटुंबीयांना मिळाला होता. मात्र, आपला मुलगा आत्महत्या करू शकत नसल्याचं पवार कुटुंबियांचा विश्वास होता. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचे शंकाही त्यांनी व्यक्त केली होती. 

पार्थिव स्वीकारण्यास कुटुंबीय तयार नव्हते. या घटनेचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली होती. मुलाच्या निधनानंतर वडील संजय महादेव पवार स्वतः जम्मूला गेले होते. त्यांनी लिखित स्वरूपात तक्रार दाखल करून मुलाच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला होता. मात्र, सैन्य दलातील अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती पवारांना मिळाली नव्हती. त्यामुळे पवार यांनी पंतप्रधान, संरक्षण मंत्री, केंद्रीय गृहमंत्री व भारतीय सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्र लिहिले होते. 

जम्मू पोलिसांकडून तपास 

त्यामुळे संबंधित प्रकरणाचा तपास गृह विभागाने जम्मू-काश्मीर पोलीस दलाकडे सोपवला होता. तब्बल दहा महिन्यांच्या तपासानंतर प्रथमेश पवार यांच्या संशयास्पद मृत्यूचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले.  प्रथमेश ड्युटीवर असताना वैद्य खुशरंग या सैनिकाने प्रथमेश पवार यांच्यावर गोळी झाडून हत्या केल्याचे उघड झाले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी संशयित वैद्य खुशरंगला अटक केली आहे. त्यामुळे प्रथमेश पवार यांच्या वडिलांनी दिलेल्या लढ्याला तब्बल एक वर्षांनी यश आलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Satish Kaushik: अन् सतीश कौशिक यांची शेवटची इच्छा राहिली अपूर्ण

0
Satish Kaushik: अन् सतीश कौशिक यांची शेवटची इच्छा राहिली अपूर्ण


प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. होळीच्या दिवशी सतीश कौशिश हे दिल्लीतील एका फार्म हाऊसवर पार्टीसाठी गेले होते. याच ठिकाणी त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. त्यानंतर ९ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. वैद्यकीय तपासात सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. अचानक निधन झाल्यामुळे सतीश कौशिक यांची शेवटची इच्छा अपूर्ण राहिली आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीच्या लग्नानंतर अनिरुद्ध-संजनाचं नात तुटणार; घटस्फोटही होणार?

0
Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीच्या लग्नानंतर अनिरुद्ध-संजनाचं नात तुटणार; घटस्फोटही होणार?


अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नानंतर आता अरुंधती देशमुखांच्या घरातून, केळकरांच्या घरात गेली आहे. यानंतर आता देशमुखांच्या घरात मात्र, वाद सुरू होणार आहेत. एकीकडे अरुंधतीचा संसार नव्याने फुलणार आहे. तर, दुसरीकडे अरुंधतीला नेहमीच त्रास देणाऱ्या अनिरुद्धचा संसार आता पूर्णपणे मोडण्याच्या मार्गावर आला आहे. अनिरुद्ध आणि संजना यांच्या आता वाद सुरू झाले आहेत. या वादांचं कारण देखील आता अरुंधतीचं लग्नच असणार आहे.



Source link

सुर्वेंच्या कवितेला जातीय लेबल लावण्याचा प्रयत्न; नाट्य सेन्सॉर बोर्डाविरोधात पुरोगामी एकवटले!

0
सुर्वेंच्या कवितेला जातीय लेबल लावण्याचा प्रयत्न; नाट्य सेन्सॉर बोर्डाविरोधात पुरोगामी एकवटले!



Kashala Mage Rahaych:’कशाला मागं सरायचं’ या नाटकात लेखक विजय गायकवाड यांनी वापरलेल्या ‘शीगवाला’ या कवितेच्या ओळी हटवण्याची सुचना देण्यात आली आहे.



Source link