Sunday, June 28, 2026
Home Blog Page 3135

Shweta Bachchhan: ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता श्वेतासाठी लिहायचा पत्र, अभिषेकने केला होता खुलासा

0
Shweta Bachchhan: ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता श्वेतासाठी लिहायचा पत्र, अभिषेकने केला होता खुलासा



Shweta Bachchhan Birthday Special: अभिषेकने एकदा बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याला बहिण श्वेता बच्चन विषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा त्याने हा खुलासा केला होता.



Source link

Sukh Mhanje Nakki Kay Asta: जयदीपच्या आईची होणार धमाकेदार एण्ट्री, मालिकेत नवे वळण

0
Sukh Mhanje Nakki Kay Asta: जयदीपच्या आईची होणार धमाकेदार एण्ट्री, मालिकेत नवे वळण



Sukh Mhanje Nakki Kay Asta Update: सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक साकारणार जयदीपची आई ‘मंगल’



Source link

Chowk: महाराष्ट्रातील चौकाचौकात घडणारी गोष्ट पाहायला मिळणार ‘चौक’ चित्रपटात

0
Chowk: महाराष्ट्रातील चौकाचौकात घडणारी गोष्ट पाहायला मिळणार ‘चौक’ चित्रपटात



Chowk Movie Poster: चौक चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टर सध्या चर्चेत आहे.



Source link

Nagran Manjule: नागराज मंजुळेंची हवा! ‘घर बंदूक बिरयानी’चा ट्रेलर प्रदर्शित

0
Nagran Manjule: नागराज मंजुळेंची हवा! ‘घर बंदूक बिरयानी’चा ट्रेलर प्रदर्शित


नागराज मंजुळेने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके चित्रपट दिले आहेत. एका सर्वसाधारण विषयाला अनन्यसाधारण बनवणे, ही यांची खासियत आहे. हीच खासियत जपत आता लवकरच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ प्रदर्शित होणार आहे. यापूर्वीच या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले. टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आणि ही उत्सुकता शिगेला पोहोचवण्यासाठी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील याच्या प्रमुख भूमिका आहेत.



Source link

Suyash Tilak: सुयश टिकळ पुन्हा दिसणार ‘या’ मालिकेत

0
Suyash Tilak: सुयश टिकळ पुन्हा दिसणार ‘या’ मालिकेत


तेवढ्यात आता मालिकेत कार्तिक देवराज या व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार आहे. कार्तिक देवराज गावातला सरकारी अधिकारी असून कोकटनूर यांचावर त्याची जबाबदारी असेल. कार्तिक देवराज याची भूमिका सुयश टिळक करत आहे. अशा प्रकारची भूमिका सुयशने कधी केली नाही. त्याच्या वेशाची विशेष चर्चा होईल यात शंका नाही. अर्जुन आणि कार्तिक देवराज यांची चांगली मैत्री असेल, पण कार्तिक देवराज ही नकारात्मक व्यक्तिरेखा असेल. तो रेवथी आणि अर्जुन यांच्यात फूट पडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. कार्तिक देवराज याच्या येण्याने रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम होणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल.



Source link

Tu Jhoothi Main Makkaar: रणबीर-श्रद्धाच्या जोडीची बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ! पार करणार १०० कोटींचा आकडा

0
Tu Jhoothi Main Makkaar: रणबीर-श्रद्धाच्या जोडीची बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ! पार करणार १०० कोटींचा आकडा



TJMM Box Office Collection: अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची कमाई पाहाता लवकर १०० कोटी रुपये कमावणार असल्याचे म्हटले जात आहे.



Source link

सातारा जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; वाई, खंडाळा तालुक्याला झोडपले | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  बुधवारी दुपारी व नंतर सायंकाळी जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला. जिल्ह्यात सातारासह वाई, खंडाळा, जावली तालुक्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. ऐन सुगीत अचानक आलेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सातारा शहरात सायंकाळी विजांच्या कडाकडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसाने शहर परिसरात धडकी भरवणारा विजांचा कडकडाट रात्री सुरू असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शहर परिसरातील वीजही अधूनमधून गायब होत होती.

वाईत मुसळधार

वाई शहर व परिसराला बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातीरपीट उडाली. पावसापूर्वी आलेल्या सोसाट्याच्या वार्‍यामुळे फळबागांसह बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेले काही दिवस सर्वत्र ढगाळ वातावरण होते. हुलकावणी देणार्‍या पावसाने बुधवारी दुपारी वाई शहरासह तालुक्याच्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून थोडाफार दिलासा मिळाला असला तरी पाऊसाआधी आलेल्या सोसाट्याच्या वार्‍यामुळे आंब्यासह इतर फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच ढोबळी मिरची, भुईमुग, काकडी, टमॅटो या बागायती पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. शेतात सध्या गहू, ज्वारी काढणीला सुरुवात झाली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे हाता-तोंडाशी आलेली रब्बी हंगामातील पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भुईंजला पिकांचे नुकसान

 भुईंज-पाचवड परिसरात अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा, टोमॅटो या पिकांसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. परिसरातील सर्वच गावांमध्ये वीज पुरवठाही खंडीत झाला होता.

खंडाळ्यात गहू व हरभरा भिजला

पारगाव खंडाळा परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे तासभर विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकरी व नागरिकांची एकच धांदल उडाली. गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी रब्बीची पिके कापून शेतात ठेवली असल्याने ती पावसापासून वाचवण्यासाठी शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागली . सध्या गव्हाची कापणी सुरू असून सर्वत्र गहू कापून ठेवलेला आहे. मात्र संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकर्‍यांचा कापून ठेवलेला गहू, हरभरा भिजला. त्यामुळे काही शेतकर्‍यांचे नुकसान झाले. या पावसामुळे सायंकाळी हवेत गारवा निर्माण झाला.

कुडाळ व परिसरात नागरिकांची त्रेधा

बुधवारी दुपारी कुडाळ ता. जावली येथे वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस कोसळला. बुधवार हा कुडाळचा आठवडी बाजाराचा दिवस होता. मात्र, वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. गेली काही दिवस उष्णतेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून दररोज आभाळही येत आहे. बुधवारी वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे आठवडी बाजार लवकर उठला. कुडाळसह करहर, मेढा, सरताळे, सायगाव, आणेवाडी, केळघर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारे व विजांच्या कडकडाटात तसेच ढगांच्या गडगडाटात पाऊस पडला. ऊस हंगाम अंतिम टप्प्यात असताना पाऊस पडल्याने ऊसतोड मजूर व ऊस उत्पादक शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. गहू, हरभरा अशा काढणीला आलेल्या पिकांना पावसाचा फटका काही प्रमाणात बसला आहे.

वीज कोसळून दोन म्हशींचा मृत्यू

दांडेघर येथील टेबल लॅन्ड पठारावर वीज कोसळून दोन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला. दांडेघर गावातील ग्रामस्थ आपल्या म्हशी चरण्यासाठी पठारावर घेऊन गेले होते. पडलेल्या पावसामुळे जोरदार वीज कोसळल्याने दोन म्हशी जागीच ठार झाल्या. या घटनेने सौ. गीता बाळू राजपुरे यांचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे.



Source link

Shivangi Joshi: किडनीला इंफेक्शन झाल्यामुळे शिवांगी जोशी रुग्णालयात दाखल, जाणून घ्या प्रकृतीविषयी

0
Shivangi Joshi: किडनीला इंफेक्शन झाल्यामुळे शिवांगी जोशी रुग्णालयात दाखल, जाणून घ्या प्रकृतीविषयी


शिवांगीने हे फोटो शेअर करत ‘सर्वांना नमस्कार, गेले काही दिवस माझ्यासाठी कठीण होते. माझ्या किडनीला इन्फेक्शन झाले आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की कुटुंबीय, मित्रपरिवार, डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे मी आता ठिक आहे. आपले शरीर, मन आणि आत्मा यांची योग्य काळजी घ्यायला हवी हे लक्षात आणण्यासाठी मी पोस्ट लिहिली आहे. तुम्हाला कायम हायड्रेटेड रहायला हवे’ या आशयाचे कॅप्शन तिने फोटो शेअर करत दिले आहे.



Source link

कामगार नोंदणी आता केवळ 1 रुपयांत होणार | पुढारी

0


सातारा; विशाल गुजर :  बांधकाम कामगारांना आता मासिक एक रुपया शुल्क भरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करता येणार आहे. अशा नोंदणीकृत कामगारांना घरकुल, गृहकर्जासह शासनाच्या विविध 32 योजनांचा लाभही घेता येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त कर्मचार्‍यांनी नोंदणी करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील 18 हजार 437 जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यातील 9 हजार 145 जणांना योजनांचा लाभ मिळाला आहे.

घरकुलासह विविध योजनांचा लाभ

विविध क्षेत्रातील अकुशल, कुशल कामगारांसाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून त्यांना विविध प्रकारचे लाभही दिले जातात. त्यांना कामगार आयुक्त कार्यालयातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करावी लागणार आहे. पूर्वी या नोंदणीसाठी 25 रुपये शुल्क भरावे लागत होते. आता नवीन धोरणानुसार मासिक केवळ एक रुपया भरून नोंदणी करता येणार आहे. अशा कामगारांना घरकुल योजनेच्या माध्यमातून घरच नाही तर इतर महत्त्वाच्या योजनांचा देखील लाभ मिळणार आहे.

नोंदणी कशी करावी…

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर बांधकाम कामगार म्हणून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येते. मोबाईलवर देखील ही नोंदणी करता येते.

ही कागदपत्रे आवश्यक…

नोंदणीसाठी वयाचा पुरावा, दहा दिवस काम केल्याचा पुरावा, रहिवाशी दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, तीन पासपोर्ट फोटो अशी कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत.

गृहकर्जासह विविध योजना…

नोंदणीकृत कामगारांना शासनाच्या विविध 32 योजनांचा लाभ घेता येतो. ज्यामध्ये घरकुल तसेच विविध कल्याणकारी योजना, शासनाच्या शैक्षणिक योजना तसेच आरोग्य, आर्थिक मदतीच्या योजनेसह गृहकर्जाचाही समावेश आहे.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून विविध योजना राबवल्या जातात. आता एक रुपया मासिक शुल्क भरून बांधकाम कामगारांना नोंदणी करता येणार आहे. ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी करावी.
-रेवणनाथ भिसले, सहायक कामगार आयुक्त



Source link

Oscar 2023: ऑस्कर सोहळ्यात दीपिका पादूकोणला ओळखण्यात झाली मोठी चूक

0
Oscar 2023: ऑस्कर सोहळ्यात दीपिका पादूकोणला ओळखण्यात झाली मोठी चूक


ऑस्कर प्रेझेंटर्स दीपिका पादूकोणची निवड करण्यात आली होती. दीपिकासोबत रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, जेनिफर कॉनेली, एरियाना डीबोस, सॅमुअल एल जॅक्सन, ड्वेन जॉनसन, माइकल बी जॉर्डन, ट्रॉय कोत्सुर, जोनाथन मेजर्स, मेलिसा मॅक्कार्थी, जेनेल मोनाए, क्वेस्टलव, जो सलदाना आणि डोनी येन हे प्रेझेंटर्स दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून दिसणार असल्याची माहिती दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.



Source link