Sunday, June 28, 2026
Home Blog Page 3134

Satvya Mulichi Satavi Mulagi: नेत्राच्या विरोधात लढण्यासाठी इंद्राणी रूपालीची मदत करणार का?

0
Satvya Mulichi Satavi Mulagi: नेत्राच्या विरोधात लढण्यासाठी इंद्राणी रूपालीची मदत करणार का?


सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत नुकताच इंद्राणी या नव्या व्यक्तिरेखेने प्रवेश केलेला आहे. ही इंद्राणी कोण आहे, याबद्दल बंटी रूपालीला सांगतो. इंद्राणीला त्रिनयना देवीचं वरदान आहे. तिला माणसाच्या मनातलं ओळखू येतं. रूपाली बंटीचं ऐकून इंद्राणीची भेट घ्यायचं ठरवते. आता ही इंद्राणी रूपालीची मदत करणार का, हे आपल्याला झी मराठी वाहिनीवर १९ मार्चला दुपारी २ आणि रात्री ९ वाजता महाएपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.



Source link

नकट्या रावळ्याची विहीर स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा :  12 व्या शतकात शिलाहार राजवटीत नकट्या रावळ्याची ही ऐतिहासिक विहीर बांधण्यात आली होती. कराड शहराच्या वायव्येस एका टेकडीवर प्रीतीसंगमावरील पंताचा कोट परिसरात ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे. ही विहीर नकट्या रावळ्याची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे. स्थापत्य कलेचा एक अद्भूत नमुना म्हणून ही विहीर प्रसिद्ध आहे. कराडच्या ऐतिहासिक ठेव्यांपैकी ही विहीर असून या विहिरीची जपणूक स्थानिक नागरिक तसेच पुरातत्त्व विभागाकडून केली जाते. ही विहीर कराडचे ऐतिहासिक वैभव आहे. पर्यटक कराडला भेट देताना या विहिरीचा अभ्यास करण्यासाठी येत असतात.

विहिरीचा इतिहास उत्सुकता निर्माण करणारा असल्याने याठिकाणी पुरातत्त्वचा अभ्यास करणारे विद्यार्थी आवर्जून भेट देतात. भुईकोट किल्ल्यात अप्रतिम अशी पाय विहीर आहे. तिला नकट्या रावळाची विहीर असे म्हणतात. 12 व्या शतकातील ‘शिलाहार राजवटीत बांधलेली ही विहीर कोटाच्या पश्चिम टोकाला, कोयनेच्या पात्रापासून सुमारे पंच्याहत्तर फूट उंचीवर आहे. विहिरीची लांबी 120 बाय 90 फूट आहे. विहिरीत उतरण्यासाठी पार्‍यांच्या चोहोबाजूंनी मार्ग असून वरून बारवेचा आकार सुरेख दिसतो. मुख्य विहीर अकराशे अकरा चौरस मीटरची आहे. तिच्या ईशान्य बाजूचा भाग थोडा गोलाकार दिसतो. एकूण 82 पायर्‍या असून प्रत्येक वीस पायर्‍या संपल्यावर मोठी पायरी म्हणजे थांबण्याची जागा आढळते. पायर्‍यांच्या अखेरीस दोन दगडी खांब असून त्यावर सुरेख कमान दिसते. विहिरीचे बांधकाम रेखीव अशा चिर्‍यांचे आहे. ते चुन्यातून घट्ट केले आहे. बांधकामामध्ये ठराविक अंतरावर खाचा दिसतात. विहिरीत खापरी पाटामार्फत कोयनेचे पाणी सोडले जात असावे. त्यामुळे तिची खोली कोयनेच्या पात्राइतकी असावी. अनेक मजल्यांच्या विहिरीचा उपयोग पाणीपुरवठ्यासाठी किंवा वस्तूंच्या साठ्यासाठी करत असावेत, अशी नोंद गॅझेटियरमध्ये पहावयास मिळते.

चावडी चौक परिसरातील मनोरे, सोमवार पेठेतील भुईकोट किल्ला आणि त्याच परिसरातील नकट्या रावळाची विहिरीमुळे आजही कराडचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे. बहामनी राजवटीत कराडला भुईकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले. आज बुरूज या किल्ल्याच्या भव्यतेची साक्ष देत उभे आहेत. 84 चौरस मीटर क्षेत्रावर कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगम परिसरातील हा किल्ला थोरल्या शाहू महाराजांच्या राजवटीत प्रतिनिधींच्या ताब्यात गेला.

आज किल्ल्याच्या तटबंदीचे काही अवशेष भग्नावस्थेत असल्याचे पहावयास मिळते, तर किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा म्हणजे मराठाकालीन वास्तुशैलीचे अप्रतिम उदाहरण होते. वाड्याच्या दक्षिणेस 259 मीटर लांब – रूंद व 4 मीटर उंच असा दरबार हॉल होता. त्याच्या दोन्ही बाजूंस दोन स्वतंत्र दालने होती व पूर्वेस भवानीदेवीची छत्री. मंदिरातील मूर्तीचे मूळ अधिष्ठान हे तेराव्या शतकातील असावे.

पुरातत्त्व विभागाकडून जपणूक

राष्ट्रीय स्मारकात आठ प्रकारच्या वर्गवारी असून त्यातील सातव्या वर्गवारीत या विहिरीचा समावेश असल्याचे सांगितले जाते. या विहिरीची देखभाल तसेच डागडुजी करण्याचा प्रयत्न स्थानिक लोकांनीही केला होता. मात्र, त्यांना मर्यादा होत्या. असे असतानाच 2005 नंतर केंद्रीय पुरातत्त्व विभागाने उपाययोजना करत या परिसरात काही निर्बंध घातले आहेत. मात्र, तत्पूर्वीच काही बांधकामे या परिसरात झाली आहेत. विहिरीची बरीच पडझड झाली होती. त्यामुळे तिची दुरुस्ती करण्यात येणे आवश्यक असल्याचे इतिहास प्रेमीकडून सांगितले जात होते. ही विहीर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे वर्ग झाल्यानंतर मात्र या ‘नकट्या रावळाच्या विहिरी’चे भाग्यच उजळले आहे. अनेक अडचणींनंतर आता विहिरीचे डागडुजीचे काम करण्यात आले आहे. त्याचबरोबर सभोवताली भिंती घालण्यात आल्या असून, प्रवेशद्वाराला ग्रील व लोखंडी दरवाजा बसवण्यात आला आहे.











Source link

कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात शिपायाकडून शवविच्छेदन? | पुढारी

0









तासवडे टोलनाका; पुढारी वृत्तसेवा :  कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरविना शवविच्छेदन होत असल्याचा प्रकार बुधवारी कराड शिवसेना पदाधिकार्‍यांनी उघडकीस आणला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून रुग्णालयातील या गैरसोयीबाबत शिवसेनेने वैद्यकीय अधीक्षकांना धारेवर धरत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

येथील स्व.सौ.वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. रुग्णांना व नातेवाईकांना पिण्याचे पाणी न मिळणे, अस्वच्छता, वॉर्डामध्ये रुग्णाची हेळसांड, स्वच्छतागृह नादुरुस्त,गरोदर मातांना गरम पाणी न मिळणे, शवविच्छेदन कक्षात डॉक्टरविना सफाई कर्मचार्‍याकडून करण्यात येणारे शवविच्छेदन या सर्व तक्रारींची दखल शिवसेना पदाधिकार्‍यांनी घेत बुधवारी अचानक सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी केली. रुग्णांच्या गैरसोयीबाबत व शवविच्छेदन कक्षात डॉक्टरविना सफाई कर्मचारी शवविच्छेदन करीत असल्याचा प्रकार निदर्शनास आणून दिला. वैद्यकीय अधीक्षकांनी याबाबत उडवाउडवीचे उत्तरे दिली.

उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीबाबत यापूर्वीही निवेदने दिली आहेत. परंतु यामध्ये कोणतीही सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह कर्मचारीही याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेती, असे शिवसेनेचे कराड तालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांनी यावेळी सांगितले. महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सुलोचना पवार यांनी रुग्णालयात रुग्णांची व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. यामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालून सुधारणा न केल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल असा इशारा दिला. यावेळी माजी नगरसेवक प्रमोद वेर्णेकर, संकल्प मुळे, संदीप थोरवडे, अवधूत थोरवडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांशिवाय शवविच्छेदन कधीही झालेले नाही. नेहमी डॉक्टर शवविच्छेदन करतात. सफाई कर्मचार्‍याने शवविच्छेन करणे ही बाब चुकीची आहे.
– आर.जी. शेडगे वैद्यकीय अधीक्षक
उपजिल्हा रुग्णालय, कराड.











Source link

Khyali Saharan: स्टँड-अप कॉमेडिन ख्याली सहारनवर बलात्काराचा आरोप

0
Khyali Saharan: स्टँड-अप कॉमेडिन ख्याली सहारनवर बलात्काराचा आरोप


पोलीस उपनिरीक्षक संदीप यादव यांनी या प्रकरणाची माहिती देताना म्हटले की, “तरुणीच्या तक्रारीनंतर ख्यालीविरुद्ध आयपीसी कलम 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस सध्या करत आहेत.”



Source link

AR Rahman On Oscars: ऑस्करबाबत ए आर रहमानचे मोठे वक्तव्य, ‘भारत नेहमी चुकीचे चित्रपट…’

0
AR Rahman On Oscars: ऑस्करबाबत ए आर रहमानचे मोठे वक्तव्य, ‘भारत नेहमी चुकीचे चित्रपट…’



AR Rahman: ‘RRR’ चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळताच गायक ए आर रहमानने मोठा खुलासा केला आहे.



Source link

Swara Bhaskar Wedding: स्वरा-फहादच्या रिसेप्शनला पोहोचले राहुल गांधी अन्…

0
Swara Bhaskar Wedding: स्वरा-फहादच्या रिसेप्शनला पोहोचले राहुल गांधी अन्…



Swara Bhaskar: गुरुवारी स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांचा लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. या रिसेप्शनला राहुल गांधी यांनी हजेरी लावली.



Source link

Guneet Monga: ऑस्कर पटकावल्यानंतर गुनीत मोंगा यांचे भारतात जल्लोषात स्वागत

0
Guneet Monga: ऑस्कर पटकावल्यानंतर गुनीत मोंगा यांचे भारतात जल्लोषात स्वागत


यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळ्यात भारताला दोन ऑस्कर मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ही भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे.



Source link

Bhagyashree Mote: बहिणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर भाग्यश्री मोटेची भावनिक पोस्ट

0
Bhagyashree Mote: बहिणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर भाग्यश्री मोटेची भावनिक पोस्ट



Bhagyashree Mote sister madhu dead: अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भाग्यश्री भावूक झाली आहे.



Source link

Neha Pendase: तीन वर्षांपूर्वी लग्न झालेली नेहा पेंडसे आहे सहा मुलांची आई

0
Neha Pendase: तीन वर्षांपूर्वी लग्न झालेली नेहा पेंडसे आहे सहा मुलांची आई


मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे या गुणी अभिनेत्रीचा समावेश होतो. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु नेहाची अशी एक गोष्ट आहे, जी तिच्या चाहत्यांना अजूनही माहित नाही आणि ती गोष्ट म्हणजे नेहा सहा गोंडस मुलांची आई आहे.



Source link

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीची आई रुग्णालयात दाखल, फोटो शेअर करत दिली माहिती

0
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीची आई रुग्णालयात दाखल, फोटो शेअर करत दिली माहिती



Shilpa Shetty Mother: अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना नेमकं काय झालं आहे जाणून घ्या…



Source link