Sunday, June 28, 2026
Home Blog Page 3133

Vedat Marathe Veer Daudale Saat: ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधून सत्या मांजरेकर आऊट? चर्चांना उधाण!

0
Vedat Marathe Veer Daudale Saat: ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधून सत्या मांजरेकर आऊट? चर्चांना उधाण!


‘वेडात मराठे वीर दौडले सात’ची संपूर्ण टीम सध्या या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे कलाकार सध्या जीममध्ये घाम गाळत आहेत. अभिनेता जय दुधाणे, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, हार्दिक जोशी, प्रवीण तरडे सगळेच कलाकर एकत्र वर्कआऊट करताना दिसतात. या वर्कआऊटचे व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. या व्हिडीओत मात्र सत्या मांजरेकर कुठेच दिसत नाहीये. तर, या टीमसोबत अभिनेता आरोह वेलणकर वर्कआऊट करताना दिसत आहे.



Source link

Urfi Javed: सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ वक्तव्यावर संतापली उर्फी जावेद! म्हणाली ‘मुलींनो…’

0
Urfi Javed: सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ वक्तव्यावर संतापली उर्फी जावेद! म्हणाली ‘मुलींनो…’


Urfi Javed Reaction On Sonali Kulkarni Statement: उर्फी जावेद हिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या नुकत्याच चर्चेत आलेल्या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.



Source link

सातारा : 100 कोटींमुळे जिल्ह्याच्या विकासकामांची कोंडी फुटणार | पुढारी

0


सातारा जिल्हा

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा नियोजन विभागाला राज्य शासनाकडून 100 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. गेली वर्षभर रखडलेल्या निधीचे वितरण जिल्हा कोषागार कार्यालयास झाले आहे. आता सरकारी कार्यालयांनी कामांच्या प्रशासकीय मंजुर्‍या (प्रमा) घेऊन वेगाने कामे करणे आवश्यक आहे. दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करताच रखडलेला निधी प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील विकासकामांची कोंडी फुटण्यास मदत झाली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या कामांना राज्य सरकारने स्थगिती दिल्याने विकासाला ब्रेक लागला. त्यामुळे कमी कालावधीत कामांना तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मंजुरी देण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. परिणामी जिल्हा नियोजनचा प्रत्येक विभागाकडे कोट्यवधींचा निधी शिल्लक राहिला. आर्थिक वर्ष संपत आले तरी निम्म्याहून अधिक निधी शिल्लक राहिल्याने अखर्चित निधी कधी खर्च होणार असा प्रश्न निर्माण झाला. कोट्यवधीचा निधी अखर्चित असताना ‘नियोजन’च्या सर्वसाधारण योजनेचा 25 टक्के निधीच न मिळाल्याने जिल्ह्याचे प्रचंड नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला होता. या योजनेचे सुमारे 100 कोटी 84 लाखांचा निधी कधी मिळणार याकडे लक्ष लागले होते. हा निधी न मिळाल्यास तो पुन्हा सरकारला जाण्याचाही धोका होता. त्यामुळे हा निधी मिळण्यासाठी जिल्ह्यातील नेतेमंडळींनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी भूमिका दै. ‘पुढारी’ने मांडली होती. ‘जिल्ह्याच्या 100 कोटींवर फेरणार पाणी’ या मथळ्याखाली वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध करत जिल्ह्यातील नेतेमंडळींचे लक्ष वेधून घेतले होते. या वृत्तानंतर राज्याच्या नियोजन विभागाने 100 कोटी 84 लाख 65 हजाराचा निधी वितरित केला. सातार्‍यासह अहमदनगर, हिंगोली, चंद्रपूर आणि बुलढाणा या जिल्ह्यांना 449 कोटी 74 लाखांच्या उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित विभागांकडून जसा खर्च होईल त्याप्रमाणे हा निधी वितरित करण्यात येणार आहे.

The post सातारा : 100 कोटींमुळे जिल्ह्याच्या विकासकामांची कोंडी फुटणार appeared first on पुढारी.



Source link

सातारा : ‘अवकाळी’चा 483 हेक्टर शेतीला तडाखा | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील खटाव, वाई आणि माण तालुक्यातील 84 गावांतील सुमारे 483.85 हेक्टरवरील शेती पिकांना जबर तडाखा दिला. अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, कांदा या खरीप पिकांसह स्ट्राबेरी, आले, भाजीपाल्याचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले असून कृषी विभागाने प्राथमिक नजरअंदाज अहवाल सादर केला आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम मध्यावर आला असून शेतामध्ये गहू, ज्वारी व इतर खरीप पिकांच्या काढणीची कामे वेगाने सुरू आहेत. गेली आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. पाऊस पडण्याच्या भीतीने धास्तावलेल्या शेतकरीवर्गाकडून सुगी घरापर्यंत आणण्याची धांदल सुरू आहे. दि. 20 मार्चपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने तडाखे दिले. कोरेगाव, खंडाळ्यासह काही तालुक्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे काढून पडलेल्या ज्वारीच्या कणसांत माती शिरली. काही ठिकाणी पावसाने भिजलेली ज्वारी काळी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती गव्हाच्या लोंब्यांमध्ये पाणी शिरल्याने झाली आहे. भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकर्‍यांची दाणादाण उडवली.

वाई तालुक्यातील सर्वाधिक 80 गावांना अवकाळीने झोडपले. या गावांतील सुमारे 470.75 हेक्टर शेतीतील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, स्ट्रॉबेरी, भाजीपाला या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. माण तालुक्यात एका गावात झालेल्या अवकाळी पावसाने भाजपाल्यासह ज्वारी आणि गव्हाचे नुकसान झाले. खटाव तालुक्यातील 2 गावांतील 10.70 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, आले व भाजीपाल्याची नासधूस झाली. जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने शेती पंचनाम्यांचे काम सुरु केले असून प्रथमिक नजरअंदाज अहवाल सादर केला आहे. पंचनाम्याचे काम सुरू आहे. ज्या शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे राहिले असतील त्या शेतकर्‍यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.











Source link

Bhalchandra Kulkarni: ‘थरथराट’ फेम अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन; ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
Bhalchandra Kulkarni: ‘थरथराट’ फेम अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन; ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


भालचंद्र कुलकर्णी गेले पाच दशकं मनोरंजन विश्वात सक्रिय होते. पाच दशकांच्या या बहारदार कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. ‘पिंजरा’, ‘मुंबईचा जावई’, ‘थरथराट’, ‘खतरनाक’, ‘सोंगाड्या’, ‘नवरा नको गं बाई’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘जावयाची जात’ अशा अनेक चित्रपटातून भालचंद्र कुलकर्णी यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांनी मोठ्या पडद्यावर साकारलेल्या सहाय्यक भूमिकांसाठी ते नेहमीच लक्षात राहिले. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून काहीसे दूर होते.



Source link

Kartik Aaryan: लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान कार्तिक आर्यन जखमी; पायाला झाली दुखापत

0
Kartik Aaryan: लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान कार्तिक आर्यन जखमी; पायाला झाली दुखापत


मीडिया रिपोर्ट्सनुसार एका कार्यक्रमात लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान कार्तिक आर्यनच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या लाईव्ह परफॉर्मन्स पूर्ण होईपर्यंत कार्तिक आर्यनने आपली दुखापत बराच काळ लपवून ठेवली होती. या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये कार्तिक आर्यन त्याच्या ‘भूल भुलैया २’ची सिग्नेचर स्टेप करत होता. यादरम्यान त्याच्या पायाच्या घोटा मुरगळला आणि पाय हवेत अडकला. त्याच्या घोट्याला इतकी दुखापत झाली आहे की, तो परत स्टेजवर आपला पाय टेकवू शकला नाही. आधी लोकांना वाटले की, कार्तिक आर्यन मस्करी करतोय. पण, जेव्हा त्यांनी कार्तिकची अवस्था पाहिली तेव्हा सगळे घाबरले होते.



Source link

Shivali Parab: ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम शिवाली परबचं धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

0
Shivali Parab: ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम शिवाली परबचं धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!


खानदेशातून असणाऱ्या विशालच्या कलेची जिद्द या गाण्यातून पडद्यावर रेखाटतेय. विशाल राठोडसोबत या गाण्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब झळकत असून, व्ही.आर. म्युझिक या यूट्यूब चॅनलवर हे गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘म्याड केलंस तू’ म्हणत प्रेमाची परिभाषा मांडणारे असे आणि तरुणाईला भुरळ पाडणारे हे अल्बम साँग रसिकांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज झाले आहे. १२ मार्चला या गाण्याचा टीझर आला होता, तेव्हापासून या गाण्याची चर्चा सुरू आहे. आता मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, हे गाणंही प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे.



Source link

Shashi Kapoor Birthday: पैशांसाठी शशी कपूर यांना विकावी लागली होती स्वतःची कार! वाचा ‘तो’ किस्सा…

0
Shashi Kapoor Birthday: पैशांसाठी शशी कपूर यांना विकावी लागली होती स्वतःची कार! वाचा ‘तो’ किस्सा…


अमिताभ बच्चन यांचा ‘अजूबा’ हा चित्रपट शशी कपूर यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केला होता. त्या काळात हा चित्रपट ८ कोटींमध्ये बनला होता. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा तो सुपरफ्लॉप ठरला. या चित्रपटामुळे शशी कपूर यांना ३.५० कोटींचे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे शशी यांची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. त्याकाळी हा तोटा भरून काढण्यासाठी शशी यांना आपली काही मालमत्ता देखील विकावी लागली. तर, ‘उत्सव’ या चित्रपटाच्या वेळी देखील त्यांना तब्बल दीड कोटींचे नुकसान सहन करावे लागले होते.



Source link

Malaika Arora: मुलीला दुलर्क्षित का केले? ; मलायकाचे वागणे पाहून नेटकरी संतापले Video Viral

0
Malaika Arora: मुलीला दुलर्क्षित का केले? ; मलायकाचे वागणे पाहून नेटकरी संतापले Video Viral


मलायकाला एअरपोर्टवर बॉडीगार्डशिवाय चालत येत असल्याचे पाहून अनेकजण तिच्याजवळ सेल्फी घेण्यासाठी येतात. मात्र, मलायकाने चाहत्यांना दिलेली वागणून पाहून नेटकरी संतापले आहेत. त्यांनी मलायकाला चांगलेच सुनावले आहे.



Source link

Lokmanya: टिळकांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्रे कशी सुरु केली पाहायला मिळणार ‘लोकमान्य’ मालिकेत

0
Lokmanya: टिळकांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्रे कशी सुरु केली पाहायला मिळणार ‘लोकमान्य’ मालिकेत



Lokmanya: लोकमान्य मालिकेत आता नवे वळण आले आहे. टिळकांना केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू करताना कोणत्या संकटांचा सामना करावा लागला हे आगामी भागात दाखवले जाणार आहे.



Source link