
Sonali Kulkarni Apology: सोनालीने भारतीय मुली आळशी असल्याचे वक्तव्य केले होते. आता तिने तिच्या या वक्तव्यावर माफी मागितली असून, एक निवेदन जारी केले आहे.

Sonali Kulkarni Apology: सोनालीने भारतीय मुली आळशी असल्याचे वक्तव्य केले होते. आता तिने तिच्या या वक्तव्यावर माफी मागितली असून, एक निवेदन जारी केले आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा म्हणाली की, तिच्या आणि अर्जुनच्या वयात खूप अंतर आहे, पण त्याचा तिला काहीच फरक पडत नाही. प्रेमाला वय नसते. तर, अर्जुनशी लग्न करण्याविषयी बोलताना ती म्हणाला की, आम्ही सध्या प्री-हनीमूनच्या टप्प्यात आहे आणि इतक्यात आम्हाला लग्नाची घाई अजिबात नाही.

Oscar entry ticket price: क्रू मेंबर्ससह ऑस्कर सोहळ्यात सामील होण्यासाठी एसएस राजामौली यांना तिकिटे खरेदी करावी लागली होती.
सातारा; प्रवीण शिंगटे : मधाचा अस्सल गावरान ब्रँड सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्येच उपलब्ध असून येथील सेंद्रिय मधाने कार्पोरेट बाजारपेठ मिळवली आहे. महाबळेश्वरच्या या गुणकारी मधाला आता मागणी वाढत चालली आहे. त्याला चांगला दरही मिळू लागला आहे. सेंद्रिय मध, सातेरी मध, मेलिफेरा मध तसेच त्यातून मिळणार्या मेणाची खरेदी खादी व ग्रामोद्योग मंडळ हमीभावाने करत आहे. या खरेदीच्या हमीभावात वाढ केली असून हा सेंद्रिय मध भलताच ‘भाव’ खाऊ लागला आहे.
जागतिक पर्यटनस्थळ म्हणून नावाजलेल्या महाबळेश्वरला आता मधामुळे आणखी नवी ओळख प्राप्त झाली आहे. डोंगररांगांच्या कुशीत महाबळेश्वजवळील मांघर गाव देशातील पहिले मधाचे गाव ओळखले जाते. हाच पॅटर्न आता राज्यभर राबवला जात आहे. त्यासाठी राज्याच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने सन 2014 मध्ये सेंद्रिय मध प्रकल्पाची सुरुवात केली. सुरुवातीला सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर या दोन तालुक्यांतील 23 गावांची तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांतील 33 गावांची निवड करण्यात आली. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला.
– मार्च एप्रिलमध्ये मिळणार्या जांभूळ या मधात पाण्याचे प्रमाण कमी असते. साखर 0.5 ते 0 टक्क्यापर्यंत असते. हा मध चवीला तुरट लागतो. यामुळे मधुमेह रुग्णांकडून या मधाला जास्त मागणी आहे.
– आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय व खादी ग्रामोद्योगने या जांभूळ मधावर प्रयोग केला. जांभूळ मधाचे सेवण ज्या रुग्णांनी केले आहे, त्यांना फायदा झाला असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. सूर्यफूल व ओवा या मधावरही प्रयोग सुरू आहेत, याबाबत लवकरच निष्कर्ष जाहीर होतील.
– जांभूळ व गेळा झाडांना मेमध्ये फुलोरा येत असून त्याचा मध गोड, पारदर्शक पिवळसर असतो. पारंपरिक माहितीनुसार हा मध ब्रेनटॉनिक म्हणून वापरला जातो.
कारवी या मधात जीवनसत्त्वे, क्षार, पोषणमूल्ये जास्त असल्याने 8 वर्षांतून एकदा मिळत असल्याने त्याला मागणी जास्त आहे. व्हायटी कारवी ही वनस्पती आठ वर्षांनंतर फुलत असल्याने त्याच्या मधासाठी लोक वाट बघत असतात.
स सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व वाई तालुक्यातील 146 लाभार्थी सेंद्रिय मध प्रक्रियेशी मंडळासोबत जोडलेली आहेत. या प्रक्रियेत सेंद्रिय मध संकलकांना मंडळाने सेंद्रिय मधसंकलन अद्ययावत प्रशिक्षण दिले आहे. सुरुवातीच्या कालावधीत वर्षाला प्रतिमधपेटी 4 ते 8 किलो उत्पादन मिळत होते. परंतु, सेंद्रिय मधाचे गाव जाहीर केल्यानंतर मधपाळ शेतकर्यांमध्ये उत्पादन वाढीच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली. त्यामुळे मधपाळांना मधाचा जास्त भाव मिळायला लागला. त्यामुळे प्रत्येक पेटीचे मध उत्पादन हे आता 10 ते 15 किलोंपर्यंत वाढले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन मधपाळ शेतकरी घेत आहेत.
सेंद्रिय मधाची खरेदी मंडळामार्फत त्यांच्या मधपाळ शेतकर्यांच्या वाड्या-वस्त्यांवर जाऊन करत आहे. ही देशातील एकमेव शासकीय यंत्रणा असून मधपाळ शेतकर्यांच्या मधाला देशात जादा दर दिला जात आहे. मधपाळ शेतकर्यांची आर्थिक वाढ होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे.
– दिग्विजय पाटील, संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य

सुंबुल तौकीर खान, शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान एकत्र दिसले होते. यादरम्यान, मीडियाला मुलाखत देताना, अब्दू यांनी आता ‘मंडली गँग’ची मैत्री संपल्याची पुष्टी केली. इतकेच नाही, तर त्याने यामागचे कारणही सांगितले. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक एक गाणे रेकॉर्ड करणार होते. मात्र, या गाण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. गाणे रेकॉर्ड न होऊ शकल्याने अब्दू एमसी स्टेनवर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

रजनीकांत आणि ठाकरे कुटुंबीयांचे संबंध खूप चांगले असल्याचे बोलले जात आहे. जेव्हा रजनीकांत काही कामानिमित्ताने मुंबईत येतात, तेव्हा ते मातोश्रीवर जातात आणि ठाकरे कुटुंबाची भेट घेतात. अभिनेते रजनीकांत हे बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे मोठे चाहते आहेत, असेही म्हटले जाते. आदित्य ठाकरेंच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, ‘मातोश्रीची ताकद’. तर, आणखी एकाने लिहिले की, ‘सुपर-डुपर.’ दुसऱ्या एकाने ‘मातोश्रीवर थलायवा’ असे लिहिले आहे.

तनुश्री दत्ता पहिल्यांदा ‘चॉकलेट’ या चित्रपटात झळकली होती. मात्र, या चित्रपटाने तिला फारसे यश मिळवून दिले नाही. परंतु, ‘आशिक बनाया आपने’ या दुसऱ्या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार बनली. २००५मध्ये प्रदर्शित झालेला ‘आशिक बनाया आपने’ हा चित्रपट इमरान हाश्मी, सोनू सूद आणि तनुश्री यांच्या करिअरमध्ये खूप गाजला होता. यानंतर तनुश्री ‘रकीब’, ‘ढोल’, ‘रिस्क’, ‘गुड बॉय-बॅड बॉय’ या काही चित्रपटात तनुश्री झळकली होती. मात्र, तनुश्रीने एकाच चित्रपटातून खूप नाव कमावले. यानंतर तिचे चित्रपट फारसे चालले नाहीत.

कराड; पुढारी वृत्तसेवा : शॉर्टसर्किटमुळे ट्रॕक्टरच्या शोरूमला आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये शोरूममधील पाॅवर टेलर १३ ट्रॕक्टरसह विविध कंपन्यांचे स्पेअरपार्ट, फर्निचर, कॉम्प्युटर लॅपटॉप व १८ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली. या आगीमध्ये सुमारे ५५ लाखाचे नुकसान झाले आहे. कराड शहरातील बैलबाजार रस्त्यालगत शनिवार (दि.१८) रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कार्वे तालुका कराड येथील संतोष पाटील व संदीप पाटील या दोघा भावांनी चार महिन्यांपूर्वी पाॅवर टेलर ट्रॅक्टरचे गजानन इंटरप्राईजेस नावाने नवीन शोरूम सुरू केले आहे. कराड येथे बैल बाजार रस्त्यालगत लक्ष्मीनारायण चौकात हे शोरूम आहे. या शोरूमच्या माध्यमातून ते शेतीच्या कामासाठी उपयुक्त असलेले पॉवर टेलर तसेच त्या ट्रॅक्टरसाठी लागणारे विविध कंपन्यांचे स्पेअर पार्ट, ऑइल याची विक्री करतात. शुक्रवारी रात्री शोरूम बंद करून ते घरी गेले. त्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शोरूमच्या समोरील रस्त्यावरून एक रिक्षावाला जात असताना त्याला शोरूममधून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले. या रिक्षावाल्याने लगेचच संतोष पाटील यांना फोन करुन याची माहिती दिली. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. दरम्यान अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले.
शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. जमलेल्या नागरिकांनी शोरूमच्या शटरचे कुलूप तोडून शटर उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु आतील आगीमुळे व धुराच्या लोटांमुळे शटर उघडताना नागरिकांना त्रास होत होता. तशाही परिस्थितीमध्ये नागरिकांनी तीन ते चार फूट अंतरावरती शटर उचलले. तेवढ्या उचललेल्या जागेमधून अग्निशामक दलाने पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सुमारे तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. तोपर्यंत शोरूम मधील सुमारे २६ लाख रुपये किमतीचे तेरा पॉवर टेलर, साडेसोळा लाख रुपयांचे विविध कंपन्यांचे स्पेअर पार्ट, दोन कॉम्प्युटर, लॅपटॉप फर्निचर, टायर जळून सुमारे ५५ लाखांचे नुकसान झाले होते. या घटनेची पोलीसांत नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पाडव्याच्या मुहूर्तावर विक्री करण्यासाठी पाटील बंधूंनी सुमारे १४ नवीन ट्रॅक्टरची ऑर्डर कंपनीला दिली होती. त्यापैकी चार ट्रॅक्टर शुक्रवारी सायंकाळी शोरूममध्ये आले होते. तर इतर दहा ट्रॅक्टर घेऊन आज शनिवारी कराडमध्ये येणार होते. तत्पूर्वीच पहाटे लागलेल्या आगीत संपूर्ण शोरूम जळून खाक झाले. यामध्ये पाटील बंधूंचे मोठे नुकसान झाले आहे. संतोष पाटील व संदीप पाटील यांनी सकाळी संपूर्ण आग विझवल्यानंतर शोरूमची परिस्थिती पाहिली. आगीत शोरूम मधील सर्वच साहित्य जळाल्याने संदीप पाटील यांना धक्काच बसला. ते अचानकपणे जमिनीवरती कोसळले. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.
महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर मुख्य बाजारपेठेत असलेल्या एका खासगी रेस्टॉरंटमधील चिमणीने पेट घेतल्याने बाजारपेठेत सर्वत्र धुराचे लोट आले पेटलेल्या या आगीवर स्थानिक व्यापाऱ्यांसह पालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने नियंत्रण मिळविण्यात यश आले.
महाबळेश्वर मुख्य बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी अमन रेस्टॉरंट शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चिमणीमधून धुराचे लोट येत होते. या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या लक्षात आले रेस्टोरंटच्या वरील बाजूस आगीने पेट घेतला होता. आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी तातडीने याबाबतची माहिती हॉटेल मालक सय्यद याना दिली. स्थानिकांच्या मदतीने हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या पर्यटकांना तातडीने हॉटेलबाहेर काढण्यात आले. तसेच हॉटेलमधील गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आले, दरम्यान अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच पालिकेच्या अग्निशामक विभागास संपर्क साधण्यात आला पालिकेच्या अग्निशामक दलाच्या मदतीने अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. ही घटना शनिवारी (दि. १८) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने पर्यटकांच्या स्थानिकांची मोठी गर्दी हॉटेल व परिसरात झाली होती आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी समीर शेख ऍड संजय जंगम मंजूर शेख इरफान शेख ताजुद्दीन बागवान गोविंद कदम सर्फराज शेख गणेश भांगडिया मिलिंद खुरासणे आदींनी महत्वपूर्व भूमिका बजावली.

Rang Maza Vegla Latest Update: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचं कथानक तब्बल १४ वर्षांनी पुढे गेलं आहे. आता मालिकेत आणखी एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.