Monday, June 29, 2026
Home Blog Page 3110

सातारा : जिल्ह्याच्या भाजप-ठाकरे सेनेची सूत्रे गोरे बंधूंच्या हाती! | पुढारी

0


म्हसवड : पुढारी वृत्तसेवा : जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात आ. जयकुमार गोरे यांनी भाजपचा झंझावात निर्माण केला. वाडी-वस्तीवर भाजपचा बोलबाला सुरु झाला आहे. आ. गोरे यांचा वारु रोखण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आ. जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांच्याकडे जिल्हा संपर्क प्रमुखपदाची धुरा सोपवली आहे. एकप्रकारे परस्परविरोधी राजकीय पक्षांची जिल्ह्याची सूत्रे गोरे बंधूंकडे आली आहेत. त्यामुळे ‘आ देखे जरा किसमें कितना है दम’ अशी टस्सल भविष्यकाळात पहायला मिळणार आहे. पक्ष वाढीच्या या लढाईत कोण जिंकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आ. जयकुमार गोरे व शेखर गोरे या दोघा भावंडांनी सन 2007 साली एकत्र माणच्या राजकारणात प्रवेश केला. यावेळी तालुक्यावर स्व.सदाशिवराव पोळ तात्यांचे एकहाती वर्चस्व होते. या वर्चस्वाला शह देण्याचे काम याच गोरे बंधूनी करून दाखवले. त्यावेळी आ. जयकुमार गोरे व शेखर गोरे एकत्र होते. त्या काळात शेखर गोरे यांनी आ. जयकुमार गोरेंना साथ दिली होती. मात्र, नंतरच्या काळात दोन्ही भावडांत राजकीय वितुष्ट आल्याने दोघांनी राजकीय सवता सुभा मांडला. आ. गोरेंनी आमदारकी मिळाल्यानंतर मतदारसंघात विविध निधीतून विकासकामे केली. सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. तर दुसर्‍या बाजूला शेखर गोरे यांनीही कोणतीही सत्ता नसताना कोणताही निधी नसताना स्वखर्चातून गावोगावी, वाड्यावस्त्यांवर विविध विकासकामे केली. सन 2014, 2019 ला याच गोरे बंधूंनी समोरासमोर आमदारकीची निवडणूक लढवली. आ. जयकुमार गोरेंनी विधानसभा निवडणुका जिंकल्या. त्याचवेळी शेखर गोरेंनी स्थानिक निवडणुकांमध्ये वरचष्मा दाखवला.

आंधळी प्रकरणामुळे गोरे बंधूंची राजकीय दुश्मनी राज्यभर गाजली. जिल्हा बँकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत आ. गोरेंनी सोसायटी मतदरसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना विरोध करण्यासाठी शेखर गोरेंनी स्व. सदाशिवराव पोळ तात्यांना निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. यात आ. गोरेंनी बाजी मारून जिल्हा बँकेत प्रवेश करून विरोधकाची भूमिका बजावत बँकेच्या कामकाजाबाबत बँक प्रशासन व सत्ताधार्‍यांना चांगलेच धारेवर धरले होते. यावेळच्या जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेखर गोरेंनी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने यावेळी दोन्ही गोरे बंधूच्यात समोरासमोर लढत होईल असे सर्वांना अपेक्षित होते. मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आ. गोरेंनी अनपेक्षितपणे निवडणुकीतून माघार घेतली. शेखर गोरे यांनी आपले कसब पणाला लावून निवडणूक जिंकत शिवसेनेचा संचालक म्हणून जिल्हा बँकेत प्रवेश केला.

स्व. पोळ तात्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी संपत चालली असताना तिला उभारी देत पक्षाला गतवैभव मिळवून देण्याचे काम त्या काळात शेखर गोरेंनी केले होते. मात्र याची परतफेड करण्यापेक्षा जिल्हा बँकेत त्याच राष्ट्रवादीने ज्या स्व.पोळ तात्यांना मदत करणार्‍या शेखर गोरेंविरोधात पोळ तात्यांच्याच मुलाला उभा केले. आ. गोरे अन् राष्ट्रवादीचा उमेदवार एकत्र असतानाही एकट्या शेखर गोरेंनी जिल्हा बँकेची प्रतिष्ठेची निवडणूक जिंकत दोघांनाही चपराक देण्याचे काम करून दाखवले. याच शेखर गोरेंना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख पद मिळाले आहे. आक्रमकता ही शेखर गोरे यांची जमेची बाजू असली तरी त्यांच्याकडून म्हणावा तसा वेळ दिला जात नसल्याचे दिसून येते. त्यांनी पूर्ण वेळ दिला तर नक्कीच मतदार संघासह जिल्ह्यात पक्षाची अजून ताकद वाढण्याची शक्यता आहे.

दोन्ही गोरे बंधूंची कार्य करण्याची आक्रमक शैली माणच्या जनतेसह त्यांच्या पक्षातील पक्षश्रेष्ठींनाही भारावून टाकणारी आहे. भाजपाने आ. जयकुमार गोरे यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात भाजपचा झंझावात उभा केला आहे. आ.जयकुमार गोरेंनी जिल्ह्यात विविध बैठका, शिबीरे घेऊन पक्ष, संघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसर्‍या बाजूला राज्यात शिवसेनेवर मोठे संकट आले असताना अनेक मातब्बर पक्ष सोडून गेल्यानंतर साहेब आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत असे सांगत शेखर गोरेंनी जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी घेतली आहे. नुकतीच त्यांनीही पक्ष, संघटना वाढीसाठी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन विधानसभा, गट, गण निहाय बैठका लावण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे दोन्ही गोरे बंधूंनी आपापल्या पक्षाची जिल्ह्याची सूत्रे आपल्या हाती घेतल्याचे दिसून येत आहे. त्यातून टोकाचा संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. आजपर्यंत जिल्ह्यात भाजपा व शिवसेनेची ताकद नगण्य होती. मात्र आ.जयकुमार गोरेंनी आपल्या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या पिछेहाटीला सुरूवात करत आता जिल्ह्याची जबाबदारी घेतली आहे. शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले असले तरी आता ते शिवसेना एकनाथ शिंदे गटात गेल्याने ठाकरे गट तसा एकटा पडला आहे. मात्र, जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद वाढवण्याची जबाबदारी शेखर गोरे यांनी घेतल्याचे दिसून येते. शेखर गोरे पूर्ण वेळ देणार का?, महाविकास आघाडीबाबत त्यांची भूमिका काय राहणार? भाजपच्या विरोधात ते किती रान पेटवणार? आ. जयकुमार गोरे त्यांना प्रत्युत्तर देणार का? माण-खटावच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय राहणार? शेखर गोरेंना नवी जबाबदारी कशी पेलवणार? याकडेही संपूर्ण जिल्ह्याचे

बोराटवाडीच्या गोरे बंधूंची चर्चा राज्यभर

राज्यात, जिल्ह्यात सत्ता कोणाची असली तरी माणच्या बोराटवाडीतल्या सर्वसामान्य कुटुंबातील या दोन गोरे बंधूनी मात्र आपल्या कर्तृत्वाच्या बळावर एकाने आमदारकीच्या माध्यमातून विधानभवनात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला तर दुसर्‍याने स्वखर्चातून विविध विकासकामे करत धाडसी स्वभावामुळे जिल्हाभर, राज्यभर ओळख निर्माण केली. जिल्ह्याच्या राजकारणात पक्षाची सूत्र पेलण्यासाठी तोडीस तोड नेतृत्व देण्याचे दोन्ही पक्षाने केल्याने दोन्ही गोरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र नसले तरी यानिमित्ताने बोराटवाडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

The post सातारा : जिल्ह्याच्या भाजप-ठाकरे सेनेची सूत्रे गोरे बंधूंच्या हाती! appeared first on पुढारी.



Source link

सातारा : बँक ऑफ महाराष्ट्रची दीड कोटींची फसवणूक | पुढारी

0


पाचगणी : पुढारी वृत्तसेवा : तलाठ्याची खोटी सही करून बनावट सातबारे सादर करून बँक ऑफ महाराष्ट्रच्या कुडाळ, ता. जावली येथील शाखेची सव्वा ते दीड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी जावली तालुक्यातील 49 जणांवर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची फिर्याद शाखाधिकारी सरोजकुमार भगत यांनी मेढा पोलिस ठाण्यात दिली आहे. या 49 जणांनी बोगस सातबारे उतारे तयार करून त्यावर तलाठी यांची खोटी सही करून व शिक्के मारून ते बँकेकडे सादर केले. त्या सातबारावर कर्ज घेऊन घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही व बँकेची संगनमताने फसवणूक केली. बँकेने ही माहिती मेढा न्यायालयास दिल्यानंतर, मेढा न्यायालयाने फिर्याद दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर हा गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रची फसवणूक केल्याप्रकरणी सचिन उत्तमराव शिंदे, विक्रांत बापूसाहेब शिंदे, बाळासाहेब जगन्नाथ अमराळे, सचिन लक्ष्मण जाधव, सचिन बापूसाहेब शिंदे, लक्ष्मण शहाबाद (सर्व रा. आखाडे) प्रवीण शिवाजी यादव (रा. आंबेघर) कांता चंद्रकांत बेलोसे (रा. बेलोशी), महादेव मदने, आदिनाथ लोहार, संगम जरे, छाया दीपक जाधव (सर्व रा. हुमगाव), संतोष शिवाजी पवार, संतोष बाळासाहेब कदम, सयाजी बाळासाहेब कदम, जयश्री सयाजी कदम (सर्व रा. कुडाळ), शिवाजी शंकर करंजकर, श्रीराम शंकर करंजकर, मच्छिंद्र शंकर बनकर(सर्व रा. रानगेघर), अक्षय भाऊसो दुर्गावळे, दिगंबर विठ्ठल गोळे, लिला विजय दुर्गावळे, अक्षय अशोक पवार (सर्व रा. सनपाने), विकास तानाजी नवले, भारती तानाजी नवले, वैभव तानाजी नवले, तानाजी आनंदराव नवले, संताजी दत्तात्रय नवले (सर्व रा. सरताळे), जितेंद्र यशवंत मेंगळे, नितीन यशवंत मेंगळे, (रा. शेते), प्रवीण शामराव परामने सोमर्डी, नवनाथ जगन्नाथ रांजणे वहागाव, सुधीर बबन यादव आंबेघर, अविनाश गायकवाड इंदवली या 49 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी 2014 ते 2023 या कालावधीत ही फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मेढा सपोनि संतोष तासगावकर तपास करत आहेत.



Source link

Aai Kuthe Kay Karte: मालिकेचं कथानक बदला! ‘आई कुठे काय करते’वर नेमके का संतापले प्रेक्षक? वाचा..

0
Aai Kuthe Kay Karte: मालिकेचं कथानक बदला! ‘आई कुठे काय करते’वर नेमके का संतापले प्रेक्षक? वाचा..


अनिश आणि ईशा यांच्या नात्यातील गुंतागुंत सोडवताना त्याचा राग अनावर झाला अन् त्याने अनिशच्या श्रीमुखात भडकावली. मात्र, यानंतर आपल्या वडिलांनी अर्थात अनिरुद्धने अनिशची माफी मागावी, अशी अट ईशाने घातली आहे. मालिकेच्या कथानकातील हाच ट्रॅक प्रेक्षकांच्या पचनी पडलेला नाही. चाहते आणि प्रेक्षक या मालिकेवर टीका करत असून, कथानकात बदल करण्यात यावा अशी मागणी करत आहेत. ‘वडील कितीही वाईट वागत असले, तरी त्यांना सर्वांसमोर माफी मागायला लावणं अतिशय चुकीचं आहे’, असं एका प्रेक्षकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे.



Source link

सातारा : नऊ बाजार समित्यांमधील 88 उमेदवारी अर्ज बाद | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील 9 बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी तापू लागली आहे. सर्व बाजार समित्यांसाठी विक्रमी 913 अर्ज दाखल झाल्यानंतर बुधवारी या अर्जांची त्या त्या तालुक्यांच्या सहायक निबंधक कार्यालयांमध्ये छाननी करण्यात आली. या अर्ज छाननीत 88 अर्ज बाद झाले आहेत, तर लोणंद बाजार समितीत हरकत दाखल झालेले पाच अर्ज निकालासाठी प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता 820 अर्ज शिल्लक राहिले असून, माघारीनंतरच किती उमेदवार मैदानात राहणार हे निश्चित होणार आहे.

सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, कोरेगाव, फलटण, वडूज, कराड, मेढा, पाटण व लोणंद या बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व बाजार समित्यांसाठी मिळून 913 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये सातार्‍यात 61, वाई 38, कोरेगाव 155, फलटण 121, वडूज 177, कराड 80, जावली 121, पाटण 60 व लोणंद बाजार समितीत 100 अर्ज दाखल झाले होते. अर्ज दाखल झाल्यानंतर बुधवारी या अर्जांची तालुक्याच्या सहायक निबंधक कार्यालयात छाननी करण्यात आली.

उमेदवारी अर्जाला सूचक अनुमोदक नसणे, जात पडताळणी प्रमाणपत्र न जोडणे, आर्थिक दुर्बलच्या निकषात न बसणे, सातबार्‍यावर नाव नसणे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडणार्‍यांच्या विकेट या छाननीत पडल्या आहेत. त्यामुळे मतदानापूर्वीच या इच्छुकांना मैदानातून बाहेर पडावे लागले आहे. अर्ज छानणीत सातारा बाजार समितीत सोसायटी मतदार संघातील 4 व ग्रामपंचायतमधील 2 असे 6 अर्ज बाद झाले. वाईमध्ये सोसायटीमधील 1 व ग्रामपंचायतमधील 4 असे 5 अर्ज बाद झाले आहेत. कोरेगावमध्ये सोसायटीमधील 17, ग्रामपंचायतीमधील 7 असे 24 अर्ज बाद झाले आहेत. फलटणमध्ये सोसायटीमधील 8 व ग्रामपंचायत मतदारसंघातील 4 असे 12 अर्ज बाद झाले. वडूजमध्ये सोसायटीमधील 9 व ग्रामपंचायतमधील 5 असे 14 अर्ज बाद झाले. कराडमध्ये सोसायटीमधील 1 व ग्रामपंचायतमधील 1 असे दोन अर्ज बाद झाले. मेढयामध्ये सोसायटीमधील 14, ग्रामपंचायतीमधील 9 आणि व्यापारी मतदारसंघातील 1 असे 24 अर्ज बाद झाले आहेत. लोणंदमध्ये एक अर्ज बाद झाला असून 5 अर्जांवर आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यावर सुनावणी होवून निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. पाटण बाजार समितीमध्ये एकही अर्ज अवैध ठरला नाही. अर्ज छाननीनंतर 9 बाजार समित्यांच्या सोसायटी मतदारसंघासाठी 507, ग्रामपंचायत मतदारसंघासाठी 214, व्यापारी मतदारसंघासाठी 70 आणि हमाल-मापाडी मतदारसंघासाठी 29 अर्ज शिल्लक राहिले आहेत.











Source link

Adipurush Poster: हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळालं ‘खंडोबा’ देवदत्त नागेचं नवं रूप!

0
Adipurush Poster: हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळालं ‘खंडोबा’ देवदत्त नागेचं नवं रूप!


अभिनेता देवदत्त गजानन नागे याने ओम राऊतसोबत त्यांच्या ‘तान्हाजी’ चित्रपटात काम केले आहे. याशिवाय तो ‘बाजीराव मस्तानी’, ‘सत्यमेव जयते’ आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या हिंदी चित्रपटांमध्येही झळकला आहे. देवदत्त हा मराठी चित्रपट आणि कार्यक्रमांमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आता त्याला ‘आदिपुरुष’मध्ये बजरंग बलीच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन स्टारर ‘आदिपुरुष’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. रामनवमीच्या दिवशी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये सनी सिंह, प्रभास आणि क्रिती यांची झलक दिसली होती.



Source link

Padma Awards: रवीना टंडन आणि एमएम किरवानी यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान! पाहा खास क्षण…

0
Padma Awards: रवीना टंडन आणि एमएम किरवानी यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान! पाहा खास क्षण…


अभिनेत्री रवीना टंडन बालहक्क, महिला सक्षमीकरण आणि शिक्षण यांसारख्या सामाजिक विषयांवरही काम करते. रवीनाने कला, साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी आणि विज्ञान अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अभिनेत्री ‘रवीना टंडन फाऊंडेशन’चीही संस्थापक आहे, जी वंचित मुलांना शिक्षण आणि आरोग्य सेवा देण्यासाठी काम करते. पद्मश्री हा देशाच्या सर्वात मोठ्या सन्मानांपैकी एक आहे. याच कार्यक्रमात दिवंगत गायिका वाणी जयराम यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वाणी जयराम यांनी १८ हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली होती.



Source link

Maharashtra Shahir: शाहीर साबळेंच्या आईला पाहिलंत का? ‘महाराष्ट्र शाहीर’मधील आणखी एक चेहरा आला समोर!

0
Maharashtra Shahir: शाहीर साबळेंच्या आईला पाहिलंत का? ‘महाराष्ट्र शाहीर’मधील आणखी एक चेहरा आला समोर!


शाहीर साबळे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान होते. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र आणि राज्याभिमान जागविण्याचे काम केले. या कार्याच्या माध्यामतून ते अनेक जाज्वल्य प्रतिभा असलेल्या मान्यवरांच्या सानिध्यात आले. साने गुरुजी, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, यशवंतराव चव्हाण ही त्यांपैकीच काही नावे. शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने यातील काही व्यक्तिमत्त्वे रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत. २८ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Source link

Gautami Patil: एका कार्यक्रमाचे ३ लाख रुपये घेते? इंदुरीकर महाराजांच्या आरोपांवर पहिल्यांदाच बोलली गौतमी पाटील!

0
Gautami Patil: एका कार्यक्रमाचे ३ लाख रुपये घेते? इंदुरीकर महाराजांच्या आरोपांवर पहिल्यांदाच बोलली गौतमी पाटील!


Gautami Patil First Movie: लावणी स्टार गौतमी पाटीलचा ‘घुंगरु’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: अखेर ईशाने अनिरुद्धला ठणकावून सांगितलंच! ‘आई कुठे काय करते’मध्ये येणार नवं वळण

0
Aai Kuthe Kay Karte: अखेर ईशाने अनिरुद्धला ठणकावून सांगितलंच! ‘आई कुठे काय करते’मध्ये येणार नवं वळण


मात्र, आता ईशा स्वतःहून पुढाकार घेऊन अनिरुद्धला आपल्या प्रेमाविषयी ठणकावून सांगणार आहे. ‘माझं अनिशवर प्रेम आणि मी त्याच्याशीच लग्न करणार’ असं ईशा अनिरुद्धला ठणकावून सांगणार आहे. यावेळी अनिरुद्ध आणखी संतापणार आहे. जर, अनिशसोबत भविष्याचा विचार करत असशील तर, आताच सोडून दे, अन्यथा परिणाम वेगळे दिसतील, असा धमकीवजा इशारा अनिरुद्ध ईशाला देणार आहे. यानंतर मात्र, ईशा देखील टोकाचं पाऊल उचलून स्वतःला एका खोलीत कोंडून घेणार आहे.



Source link

Vastushastra movie: गूढ रहस्याचा चित्तथरारक अनुभव ‘वास्तुशास्त्र’; ‘ही’ नवोदित अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत!

0
Vastushastra movie: गूढ रहस्याचा चित्तथरारक अनुभव ‘वास्तुशास्त्र’; ‘ही’ नवोदित अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत!


Vastushastra marathi movie: ‘वास्तुशात्र’ हा चित्रपट गूढ रहस्याचा चित्तथरारक अनुभव देण्यास सज्ज झाला आहे. या भयपटातील भूमिकेसाठी अभिनेत्रीची सर्वत्र धावपळ सुरू आहे.



Source link