Monday, June 29, 2026
Home Blog Page 3111

Hrithik Roshan: बॉलिवूड चित्रपटांना साऊथचा तडका! हृतिक रोशनच्या ‘वॉर २’मध्ये ज्युनियर एनटीआरची एन्ट्री

0
Hrithik Roshan: बॉलिवूड चित्रपटांना साऊथचा तडका! हृतिक रोशनच्या ‘वॉर २’मध्ये ज्युनियर एनटीआरची एन्ट्री


‘वॉर २’ या सीक्वलच्या दिग्दर्शनाची जबाबदारी यावेळी ‘ब्रह्मास्त्र’ फेम अयान मुखर्जीवर सोपवण्यात आली आहे. तर, ‘आरआरआर’ फेम ज्युनियर एनटीआरची चित्रपटात एन्ट्री झाल्याने आता हा चित्रपट नक्कीच गाजणार आहे. ज्युनियर एनटीआरची क्रेझ केवळ साऊथ पुरतीच मर्यादित नाही, तर ती जगभर पसरली आहे. ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने ऑस्करपर्यंत मजल मारली. त्यामुळे त्याच्या फॅन फॉलोविंगमध्येही मोठी वाढ झाली आहे. याचा फायदा टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ या चित्रपटाला नक्कीच होऊ शकतो. मात्र, अद्याप चित्रपटाच्या टीमकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.



Source link

…हा तर उद्धव ठाकरेंचा बालिशपणा : शिवेंद्रराजे भोसले यांची टीका | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना फडतूस शब्दाचा वापर केला होता. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत बोलत असताना आमदार शिवेंद्रराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालिश पणा असल्याची टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कार्यक्षम मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री अशी आहे. उद्धव ठाकरेंना सत्तेतून बाहेर जावे लागल्यामुळे ते असे बोलत असावेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष नेतृत्वाबद्दल अशी वक्तव्य करणे, ही दुर्दैवी गोष्ट आहे.
आम्ही सर्व सातारकर या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. अशी वक्तव्य थांबवावी, आम्ही देखील उत्तर देऊ शकतो. परंतु, अशी आमची परंपरा नाही. त्यामुळे अशी वक्तव्य थांबवावी. तुम्हाला सुद्धा मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती. परंतु त्यावेळी तुमची कुठेही जायची इच्छाशक्ती नव्हती.

त्यामुळेच लोकांनी तुम्हाला नाकारले. तसेच तुमच्या आमदारांनी सुद्धा तुम्हाला नाकारले. त्यामुळे दुसऱ्यांना फडतूस म्हणून तुमचा नाकर्तेपणा लपणार नाही, अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

हेही वाचा 











Source link

Rang Maza Vegla: १४ वर्षांचा राग विसरून कार्तिकी खरंच दीपाला माफ करणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये ट्वीस्ट

0
Rang Maza Vegla: १४ वर्षांचा राग विसरून कार्तिकी खरंच दीपाला माफ करणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये ट्वीस्ट


या वादादरम्यान कार्तिकने दीपा आणि कार्तिकीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्तिकचं बोलणं पटल्याने दीपा देखील लेकीची माफी मागण्यास तयार झाली. दीपा कार्तिकीकडे गेली असता, आर्यनला भेटायला निघालेली कार्तिकी १४ वर्षात पहिल्यांदाच दीपाशी बोलते. मी तुला माफ केलं, असं कार्तिकी तिला टाळण्यासाठी म्हणते. मात्र, १४ वर्षात आपली मुलगी पहिल्यांदाच आपल्याशी बोलली आणि तिने आपल्यला माफ केलं यामुळे दीपा आनंदी होते. मात्र, कार्तिकीच्या मनात दीपाबद्दलचा हा तिरस्कार अजूनही कायम आहे. मालिकेच्या येत्या भागात आणखी ट्वीस्ट पाहायला मिळणार आहेत.



Source link

सातारा : कारगाव अन् पिसाडीला लाभले निसर्ग सौंदर्य | पुढारी

0









सातारा; साई सावंत :  सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणजे निसर्ग सौंदर्य आणि प्राण्यांनी समृद्ध असा भाग. यामधीलच एक असणार्‍या कात्रेवाडी, वाघजाईवाडी, कारगाव, पिसाडी हा दुर्गम भाग ट्रेकर्सना आकर्षित करतो. ट्रेकर्सचे कमी असलेले प्रमाण व या भागात लोकवस्ती विरळ असल्याने येथील निसर्ग सौंदर्य पुढे आलेले नाही. परंतु, काही दिवसांपूर्वी सातार्‍यातील अजिंक्यतारा ट्रेकर्स ग्रुपने येथील निसर्ग सौंदर्य कॅमेराबद्ध केले आहे.

ग्रुपच्या सागर जाधव, सागर माने, दीपक देशमख,गणेश जगताप, दादा भोसले, पिंटू गवळी, जयेंद्र खोले यांच्यासह 12 जणांनी हा ट्रेक केला. सातार्‍यापासून कास गाव, तांबी, जुंगटी, कात्रेवाडी गावापासून केदारेश्वर मंदिरापर्यंत वाहनाने प्रवास केला. याच परिसरातील एका स्थानिक व्क्तीला घेऊन या ट्रेकर्स ग्रुपमधील जवानांनी वाघजाईवाडी, कारगाव व पिसाडी या भागात भ्रमंती केली. या भ्रमंतीमध्ये ग्रुपच्या सदस्यांना शेकडो प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, साप आढळून आले.

हा परिसर बफर क्षेत्रात असून ट्रेकर्स आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहणार्‍यांसाठी मोठी पर्वणी आहे. या परिसरात लोकवस्ती कमी असल्याने कोणी फारसे फिरकत नाही. दुर्गम भाग असल्याने येथील निसर्गसौंदर्य जगासमोर आले नाही. या परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने सह्याद्री व्याघ्र प्रकल्याच्या अधिकार्‍यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.











Source link

Yogyogeshwar Jai Shankar: ‘योगयोगेश्वर जयशंकर’च्या शीर्षक गीताने पुन्हा पटकावला मानाचा पुरस्कार!

0
Yogyogeshwar Jai Shankar: ‘योगयोगेश्वर जयशंकर’च्या शीर्षक गीताने पुन्हा पटकावला मानाचा पुरस्कार!


शिवाय संगीतकार कुणाल करण यांना ‘प्रोमॅक्स इंडिया’ सोहळ्यात ‘बॅंड बाजा वरात’ या मालिकेसाठी ‘बेस्ट ओरिजनल म्युझिक वीथ लीरीक्स’ असं नामांकन देखील मिळालं आहे. आतापर्यंत त्यांनी ‘महामिनिस्टर’, ‘किचन कल्लाकार’, ‘बस बाई बस’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘बॅंड बाजा वरात’, ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई?’ अशा तब्बल १४ मालिकांच्या शीर्षक गीतांना संगीतबद्ध केलेले आहे.



Source link

सातारा : बाजार समितींसाठी 5 जागा बिनविरोध; राष्ट्रवादीचाच वरचष्मा | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात 9 बाजार समित्यांसाठी विक्रमी 913 अर्ज दाखल झाले आहेत. सर्वच पक्ष व गटांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, यातूनही काही मतदारसंघामध्ये उमेदवार न मिळाल्याने जिल्ह्यातील चार बाजार समित्यांमध्ये 5 जण बिनविरोध निवडून आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी 4 आणि काँग्रेसचा 1 संचालक निवडून आला आहे.

राज्यातील 257 आणि सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, कोरेगाव, लोणंद, फलटण, कराड, पाटण, मेढा, वडूज या बाजार समित्यांचा निवडणुक कार्यक्रम सुरू आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सातारा बाजार समितीसाठी 61, कराड 80, पाटण 60, कोरेगाव 155, वडूज 177, फलटण 121, लोणंद 100, वाई 38 आणि मेढा बाजार समितीसाठी 121 अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील 9 बाजार समित्यांसाठी 162 संचालक निवडून द्यावयाचे आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशी होणार असल्याची चिन्हे आहेत.
सोमवारी अर्ज दाखल झाल्यानंतर बुधवारी अर्ज छानणी होणार आहे. यामध्ये कोणाचे अर्ज बाद होणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यानंतर अर्ज माघारीचा कालावधी सुरू होणार आहे. साधारणत: कोणत्याही निवडणुकीत अर्ज माघारीनंतरच किती जागा बिनविरोध झाल्या हे समजते. मात्र, बाजार समित्यांमध्ये अनेक पक्ष व गटांना उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत.

यामध्ये वाई बाजार समितीमध्ये भटके विमुक्त आणि हमाल या मतदारसंघामधून राष्ट्रवादीचाच अर्ज आल्याने या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. तसेच पाटणमध्ये हमाल-मापाडी मतदारसंघात पाटणकर गटाचीही एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. तर कराडमध्येही काँग्रेसची एक व फलटणमध्ये राष्ट्रवादीचा एक संचालक बिनविरोध निवडून आले आहे. बिनविरोधमध्ये राष्ट्रवादीचे चार आणि काँग्रेसचा एक संचालक आहे.











Source link

सातारा : बंदूक परवाना जिल्ह्याचा.. वापर राज्याचा | पुढारी

0









सातारा; विठ्ठल हेंद्रे : सातारा जिल्ह्यात बेकायदा शस्त्रधारकांचा सुळसुळाट असतानाच परवानाधारकांचीही मनमानी सुरु असल्याचे वास्तव समोर येत आहे. परवानाधारक शस्त्रधारकांनाही जिल्हा, राज्य व देश या तीन ठिकाणी त्या-त्या परवानगीनुसार शस्त्र वापरण्याची परवानगी असताना ते कुठेही वापरले जात आहे. यामुळे सर्वच शस्त्रधारकांची झाडाझडती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, वर्षानुवर्षे परवानाधारकांवर अपवादात्मकच कारवाई झाली आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिस प्रशासन काम करत असते. जिल्हाधिकारी कार्यालय परवानाधारक बंदूक परवाना देण्याचे काम करते. नाहरकतीमध्ये अनेकदा पोलिसांकडून फुलीच मारली जाते. मात्र, वशिला लावून बंदूक परवान्यासाठी खटाटोप केला जातो. आतापर्यंत 6087 जणांनी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला असता त्यापैकी जिल्ह्यात 4019 जणांना परवाना देण्यात आला आहे.
दरवर्षी बंदूक परवानाधारकांना त्याचे नुतनीकरण करावे लागते. बंदूक वापरताना ती सार्वजनिक ठिकाणी कशी वापरावी? याबाबतही निर्देश आहेत. मात्र अनेक परवाना बहाद्दर ती बंदूक दिसेल अशा पध्दतीने त्याचे प्रदर्शन करत आहे. मात्र प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.

जवानांना देशभरासाठी परवाना : बंदूक परवाना घेत असताना कागदपत्रांची चाळण करुनच परवाना दिला जातो. विविध प्रकारची कागदपत्रे व नाहरकत प्रमाणपत्र लागतात. उत्साहापोटी त्याची पुर्तता केली जाते. सुरुवातीला परवाना मिळताना जिल्ह्यासाठी मिळतो. त्यानंतर राज्यभरासाठी परवाना मागणीनुसार मिळतो. अगदी देशभरात कुठेही परवानाधारक बंदूक वापरण्याचा अधिकार आहे. मात्र देशभराऐवजी प्रामुख्याने जिल्हा व राज्यात वापरणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. दरम्यान, जवान तसेच आर्मीतील अधिकार्‍यांना बंदूक घेताना ती देशभरासाठी वापरण्याचाच परवाना दिला जातो. याउपर जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर जिल्हा व राज्यासाठीच परवाना अधिक प्रमाणात दिला जातो.

शेंद्रे फायरिंगची बंदूक परवानाधारक…

शेंद्रे, ता. सातारा येथे 15 दिवसांपूर्वी परवानाधारक बंदुकीला कव्हर घेतले जात असताना बंदुकीतून अचानक फायर झाल्याने त्यातून सुटलेली गोळी थेट कर्मचार्‍याला लागली. क्षणभर मॉल अक्षरश: हादरुन गेला. वास्तविक कव्हर घेतले जात असताना रिव्हॉल्व्हर लोड नसती तर ही दुर्घटना टळली असती. मात्र लोडेड बंदूक सार्वजनिक ठिकाणी काढून कव्हरची हौस भागवताना ती दुसर्‍याच्या जीवावर बेतल्याची घटना घडली.

इलेक्शनवेळी बंदूक पोलिसांच्या कस्टडीत

निवडणूक कालावधीत परवानाधारक व्यक्तींना बंदूक स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये जमा करण्याची सक्ती असते. या कालावधीत हजारोंनी बंदूका जमा करण्यासाठी धावपळ असते. परवानाधारक बंदूक पोलिसांच्या कस्टडीत जमा करायची व इलेक्शन संपले की ती बंदूक परत आणायची यासाठी यंत्रणा अक्षरश: कामाला लागते. अनेकदा परवानाधारक व्यक्ती बंदूक जमा करत नसल्याचे समोर आले आहे. वेळ नसणे, परगावी असणे अशी, कारणे देऊन वेळ मारुन नेली जात आहे. दरम्यान, अनेकदा परवानाधारक व्यक्ती सक्षम नसतानाही (अपंग झाली आहे, अधिक वय, अशी कारणे) त्याचे नावे बंदूक असल्याचेही वास्तव आहे.











Source link

सातारा : एकाच ठिकाणच्या मतदान केंद्रामुळे संताप | पुढारी

0


पाटण; गणेशचंद्र पिसाळ :  पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पाटण तालुक्याच्या एकाच ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आल्याने याचा सर्वसामान्य मतदार व उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे. या निर्णयाविरुद्ध उमेदवार व मतदारांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली असून लोकशाही मार्गाने मिळालेल्या अधिकारांवर गंडांतर आल्याची संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. तातडीने हा निर्णय मागे घ्यावा व पूर्वीप्रमाणेच विभागनिहाय मतदान केंद्रांची निर्मिती करून सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पूर्वीपासूनच तालुक्यातील दहा मतदान केंद्रांवर या समितीसाठी मतदान केंद्रे उभारली जायची. यामध्ये पाटण, कोयनानगर, मोरगिरी, केरळ, चाफळ, तारळे, तळमावले, ढेबेवाडी, मारूल हवेली, मल्हारपेठ या दहा मतदान केंद्रांचा समावेश असायचा व या वेळच्या निवडणूक प्रक्रियेमध्येही पूर्वी त्याचप्रमाणे मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. अचानकपणे झालेल्या शासन निर्णयानुसार आता केवळ पाटण या तालुक्याच्या एकाच ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याने भौगोलिक व नैसर्गिकदृष्ट्या अतिशय अडचणीच्या असणार्‍या पाटण तालुक्यातील सर्वच मतदारांना पाटण येथे येऊन मतदान करावे लागणार आहे. यामुळे मतदार व उमेदवारांना अनेक अडचणी येणार आहेत.

मुळातच सगळीकडे सध्या शेतीची कामे सुरू आहेत. याशिवाय या समितीसाठी सोसायटी. ग्रामपंचायत अथवा अन्य व्यापारी मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने शेतकरी वर्गाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. त्यामुळे एकीकडे दिवसभरातील शेतीची कामे खोळंबली जाणार आहेत. याशिवाय तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी आर्थिक भुर्दंडही सोसावा लागणार आहे. निश्चितच याचा विपरीत परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होणार आहे. वास्तविक बाजार समितीमध्ये सर्वसामान्य माणसाला मतदानाचा हक्क मिळवून देण्याची शेखी शासनामार्फत मिरवली जात असताना आता अशा पद्धतीने अचानकपणे निर्णय घेतल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. घाईगडबडीने घेतलेल्या या निर्णयाविरुद्ध संबंधित मतदार, उमेदवारच नव्हे तर नेते मंडळींनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

निर्णय मागे घ्या

अचानकपणे तालुक्याच्या एकाच ठिकाणी मतदान घेण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मतदार व उमेदवारांसाठी अन्यायकारक आहे. अद्यापही प्रत्यक्ष मतदानाला तब्बल 25 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शासनाने याबाबत गांभीर्याने व भौगोलिक, नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास केला व लोकशाही मार्गाने कोणालाही मतदानापासून वंचित रहावे लागणार नाही याचा सहानुभूतीने विचार केला तर पूर्वीप्रमाणेच विभागनिहाय मतदान केंद्रे करणे अद्यापही सहज शक्य आहे.

तालुक्याच्या एकाच ठिकाणी सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी आदी मतदारसंघनिहाय सरासरी चारशे मतदारांसाठी एक बुथ अशा पद्धतीने मतदान घेण्याचा आदेश आहे. निवडणूक विभागाने बदल केला तर बदल करण्यात येईल.
– उमेश उमरदंड,
निवडणूक निर्णय अधिकारी, पाटण बाजार समिती



Source link

Hrithik Roshan: सुझानशी घटस्फोटानंतर हृतिक झेलतोय गर्लफ्रेंडचे नखरे; भर पार्टीत सांभाळतोय सबाच्या चपला!

0
Hrithik Roshan: सुझानशी घटस्फोटानंतर हृतिक झेलतोय गर्लफ्रेंडचे नखरे; भर पार्टीत सांभाळतोय सबाच्या चपला!


हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या डेटिंगच्या चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये प्रचंड रंगत आहेत. हृतिकने २००० साली सुझेन खान सोबत लग्न केलं होतं. मात्र, २०१४ साली त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हृतिक गेल्या काही महिन्यांपासून सबाला डेट करत आहे. सबा देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. एअरपोर्ट असो किंवा आउटिंग सबा आणि ह्रतिक सगळीकडे एकत्र जाताना दिसतात. तर, ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे देखील बोलले जात आहे.



Source link

Baloch: ‘बलोच’मध्ये दिसणार मराठ्यांची असीम शौर्यगाथा, नव्या मोशन पोस्टरने वेधले सर्वांचे लक्ष

0
Baloch: ‘बलोच’मध्ये दिसणार मराठ्यांची असीम शौर्यगाथा, नव्या मोशन पोस्टरने वेधले सर्वांचे लक्ष



Baloch Movie Poster: बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे.



Source link