Thursday, July 16, 2026
Home Blog Page 309

उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी; ढोबळी मिरची, फ्लॉवर, घेवडा, मटारच्या दरात वाढ

0
उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी; ढोबळी मिरची, फ्लॉवर, घेवडा, मटारच्या दरात वाढ



पुणे : उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. ढोबळी मिरची, फ्लॉवर, घेवडा मटार या फळभाज्यांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १८ ते २० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, कर्नाटक आणि गुजरातमधून २ ते ३ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून ३ ट्रक मटार, कर्नाटकातून २ टेम्पो भुईमूग शेंग, तसेच २ टेम्पो पावटा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकातून ५ ते ६ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात आणि मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ५५० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ७ ते ८ टेम्पो, शेवगा २ ते ३ टेम्पो, भुईमुग शेंग ५० ते ६० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा १०० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ५० ट्रक बटाट्याची आवक झाली.

कोथिंबीर, मेथीच्या दरात वाढ

कोथिंबीर,मेथीच्या दरात वाढ झाली. कोथिंबिरीला मागणी वाढल्याने दरात वाढ झाली. कोथिंबिरेच्या तुलनेत मेथीची आवक कमी झाली असून, अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. तरकारी विभागात कोथिंबीर एक लाख जुडी, मेथीच्या ३० हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- १५०० ते २०००, मेथी – १५०० ते २०००, शेपू – ८०० ते १५००, कांदापात- ८०० ते १५००, चाकवत – ४०० ते ७००, करडई- ३०० ते ७००, पुदिना – ३०० ते ६००, अंबाडी – ४०० ते ६००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ६००, चुका – ५०० ते ८००, चवळई- ३००-६००, पालक- ८००- १५००



Source link

‘तुमच्या काँग्रेस पक्षाने…,’ शीख तरुणाने 1984 मधील ऑपरेशन ब्ल्यू स्टारवरुन सुनावलं; राहुल गांधींनी काय उत्तर दिलं पाहा

0
‘तुमच्या काँग्रेस पक्षाने…,’ शीख तरुणाने 1984 मधील ऑपरेशन ब्ल्यू स्टारवरुन सुनावलं; राहुल गांधींनी काय उत्तर दिलं पाहा


Rahul Gandhi on 1984 Riots: 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलींमधील काँग्रेसच्या भूमिकेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उत्तर दिलं आहे. मी तिथे नसताना, यातील अनेक चुका घडल्या अशी कबुली राहुल गांधी यांनी दिली आहे. यादरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षाने आपल्या इतिहासात केलेल्या सर्व चुकांची आपण आनंदाने जबाबदारी घेण्यास तयार असल्याचंही म्हटलं आहे. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठातील वॉट्सन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेयर्समध्ये (Watson Institute for International and Public Affairs at Brown University) संवाद साधण्यासाठी पोहोचले होते. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या या कार्यक्रमात एका शीख तरुणाने राहुल गांधींना प्रश्न विचारला. शीख तरुणाने राहुल गांधींच्या आधीच्या विधानाचा उल्लेख केला ज्यात त्यांनी म्हटलं होतं की, “भारताचा लढा हा शिखांना पगडी घालण्याची परवानगी द्यायची की नाही, शिखांना कडा घालण्याची परवानगी द्यायची का किंवा गुरुद्वारात जाण्याची परवानगी द्यायची का याबद्दल आहे.”

“तुम्ही शिखांमध्ये भाजपा भविष्यात कसा असेल याबद्दल भीती निर्माण करता, तुम्ही राजकारण कसं निर्भय असावं याबद्दल बोललात. पण आम्हाला फक्त कडे घालायचे नाहीत, आम्हाला फक्त पगडी बांधायची नाही, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवं आहे, जे पूर्वी काँग्रेस पक्षाच्या काळात नव्हतं,” असं शीख तरुणाने राहुल गांधींना सांगितलं.

आनंदपूर साहिब ठराव दलितांच्या हक्कांबद्दल बोलतो आणि त्यात अलगाववादाचा काहीही उल्लेख नाही, परंतु तत्कालीन काँग्रेसने त्याला अलगाववादी कागदपत्र म्हटलं आहे असंही तरुणाने अधोरेखित केलं. “हे तुमच्या पक्षाने केलं आहे. तुमच्या पक्षात आपण केलेल्या चुका स्वीकारण्याची परिपक्वता दिसत नाही,” असंही तो म्हणाला. 1984 च्या दंगलीशी संबंधित हत्येच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचा उल्लेख करताना त्याने काँग्रेसमध्ये आणखी बरेच सज्जन कुमार बसले आहेत असं सुनावलं. 

“तुम्ही आम्हाला ‘भाजप इंडिया’ कशी दिसेल याबद्दल मनात भिती बाळगण्यास सांगता. पण तुम्ही शिखांशी समेट करण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्ही नेमके कोणते प्रयत्न करत आहात. कारण तुम्ही असंच सुरु ठेवलं तर भाजप पंजाबमध्येही प्रवेश करेल,” असा प्रश्न तरुणाने विचारला.

तरुणाच्या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधींनी शिखांना कोणतीही गोष्ट घाबरवते असं वाटत नसल्याचं म्हटलं. “मी जे विधान केले ते असं होतं की, आपल्याला असा भारत हवा आहे का जिथे लोक त्यांचा धर्म व्यक्त करतानाही अस्वस्थ असतील? काँग्रेस पक्षाच्या चुकांबद्दल बोलायचं झाले तर, मी तिथे नसताना बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. परंतु काँग्रेस पक्षाने आपल्या इतिहासात केलेल्या सर्व चुकांची जबाबदारी मी आनंदाने स्विकारण्यास तयार आहे,” असं उत्तर राहुल गांधींनी दिलं. 

“80 च्या दशकात जे घडलं ते चुकीचं होतं हे मी जाहीरपणे सांगितलं आहे. मी अनेक वेळा गोल्डन टेम्पलमध्ये गेलो आहे. भारतातील शीख समुदायाशी माझे खूप चांगले संबंध आहेत,” असं राहुल गांधींनी सांगितलं. 

1980  च्या दशकात, इंदिरा गांधी सरकारने पंजाबमध्ये कट्टरपंथी धर्मोपदेशक जर्नेलसिंग भिंद्रनवाले वरील कारवाईसाठी शीख धर्माच्या सर्वात पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या सुवर्ण मंदिराच्या आत सैन्य घुसवलं होतं. अकाल तख्त उद्ध्वस्त करणाऱ्या लष्करी कारवाईमुळे समुदायात प्रचंड संताप निर्माण झाला होता. काही महिन्यांनी इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांच्या हत्येनंतर शिखांविरुद्ध हिंसाचार उसळला होता. या हिंसाचाराला अनेक काँग्रेस नेत्यांनी खतपाणी घातल्याचा आरोप आहे. दिल्ली आणि इतर ठिकाणी जवळपास 3 हजारांहून अधिक शीख मारले गेले अशी माहिती आहे. 





Source link

फलटणमध्ये श्रामणेर शिबिराचे आयोजन ,   बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर सभागृहात 6 मेपासून सुरूवात

0
फलटणमध्ये श्रामणेर शिबिराचे आयोजन ,   बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर सभागृहात 6 मेपासून सुरूवात

फलटण— सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील सामाजिक परिवर्तनाचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे बुद्ध-फुले-शाहू आंबेडकर सामाजिक सभागृह, कोळकी येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा, फलटण तालुका यांच्यावतीने श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 6 मे 2025 ते 15 मे 2025 दरम्यान पार पडणार असून, सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी तालुका पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. विशेष म्हणजे, शिबिरासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

शिबिराचे नेतृत्व आणि संपर्क तपशील

  1. महावीर भालेराव (अध्यक्ष) – 9146776611
  2. बाबासाहेब जगताप सर – 7774819398
  3. विठ्ठल निकाळजे (कोषध्यक्ष) – 9922643202
  4. बजरंग गायकवाड (संस्कार सचिव) – 9552377278
  5. चंद्रकांत मोहिते (कार्यालयीन सचिव) – 9284869175
  6. केशव ठोंबरे (संस्कार उपाध्यक्ष) – 9881876976
  7. संपत भोसले (संरक्षण उपाध्यक्ष) – 7030177100
  8. अमोल काकडे सर – 7588638441
  9. राजेंद्र गायकवाड (संस्कार व पर्यटन सचिव) – 9881532017
  10. अमोल भोसले (संस्कार सचिव) – 9766949643
  11. राम मोरे सर – 7796692009

या सर्व पदाधिकाऱ्यांकडून शिबिराची माहिती मिळवता येईल. शिबिरामुळे युवकांमध्ये बौद्ध संस्कृती, नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव वृद्धिंगत होण्यास हातभार लागणार आहे.

अनुसूचित जातींच्या निधीवर पुन्हा गदा! ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ४१० कोटींची तुकड्या; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्रोश

0
अनुसूचित जातींच्या निधीवर पुन्हा गदा! ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ४१० कोटींची तुकड्या; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्रोश

मुंबई – अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या निधीवर पुन्हा एकदा सरकारने घाला घातला आहे. राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अनुसूचित जातींच्या अर्थसंकल्पीय निधीतील तब्बल ४१०.३० कोटी रुपये वळवले असून, यामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन युवा आघाडीने थेट राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे.

याआधीच सरकारने सामाजिक न्याय विभागाचे ३ हजार कोटी आणि आदिवासी विकास विभागाचे ४ हजार कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी वापरले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा निधी हस्तांतर केल्याने सरकारचा जातीयवादी चेहरा स्पष्ट झाल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे.

या संदर्भातील शासन निर्णय अवर सचिव प्रसाद कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला असून, संबंधित निधी महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी हे पैसे परत मिळावेत म्हणून उग्र भूमिका घेतली आहे.


Saptahik Ank Rashifal 5 To 11 May 2025 In this week people with number 3 will get a new job sudden financial gain now weekly numerology horoscope

0
Saptahik Ank Rashifal 5 To 11 May 2025 In this week people with number 3 will get a new job sudden financial gain now weekly numerology horoscope



Saptahik Ank Rashifal 5 To 11 May 2025 In this week people with number 3 will get a new job sudden financial gain now weekly numerology horoscope | ——————————————Saptahik Ank Rashifal 5 To 11 May 2025: या आठवड्यात ३ मूलांकच्या लोकांना मिळेल नवी नोकरीची सधी, अचानक होईल धनलाभ, जाणून घ्या साप्ताहिक अंक ज्योतिष



Source link

Pahalgam Terror Attack Updates in Two arrested for spying for Pakistan Punjab Police takes major action

0
Pahalgam Terror Attack Updates in Two arrested for spying for Pakistan Punjab Police takes major action



Pahalgam Terror Attack Updates in Two arrested for spying for Pakistan Punjab Police takes major action | पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक, पंजाब पोलिसांची मोठी कारवाई



Source link

उन्हाळी सुट्टी लागल्याने चाकरमान्यांनी धरली कोकणची वाट; रेल्वे, एसटी हाऊसफुल्ल तर महामार्गावर वाहनांच्या रांगा

0
उन्हाळी सुट्टी लागल्याने चाकरमान्यांनी धरली कोकणची वाट; रेल्वे, एसटी हाऊसफुल्ल तर महामार्गावर वाहनांच्या रांगा



in ratnagiri traffic jam holiday mumbai residents going to konkan due to summer holidays उन्हाळी सुट्टी लागल्याने चाकरमान्यांनी धरली कोकणची वाट; रेल्वे, एसटी हाऊसफुल्ल तर महामार्गावर वाहनांच्या रांगा



Source link

मुंबईमध्ये कधीपर्यंत धावणार बुलेट ट्रेन, कुठंपर्यंत पोहोचलं काम?; रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितलं

0
मुंबईमध्ये कधीपर्यंत धावणार बुलेट ट्रेन, कुठंपर्यंत पोहोचलं काम?; रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितलं


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मुंबईतील बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनच्या पहिल्या स्थानकाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील निर्माणाधीन भूमिगत स्थानकाला भेट देऊन तेथील प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी नवी मुंबईतील पनवेल आणि जुईनगर रेल्वे स्थानकांवर सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांची पाहणी केली. रेल्वे आणि मालवाहतुकीच्या प्रमुख प्रकल्पांच्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. बीकेसीच्या दौऱ्यात रेल्वेमंत्र्यांसोबत नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएचएसआरसीएल) अधिकारी, तसेच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे प्रतिनिधी उपस्थित होते. एनएचएसआरसीएल ५०० किलोमीटर लांबीचा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राबवित आहे.



Source link

‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीचे व्हिडिओ पाहण्यासाठी VPN खरेदी करत आहेत भारतीय फॅन्स

0
‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीचे व्हिडिओ पाहण्यासाठी  VPN खरेदी करत आहेत भारतीय फॅन्स



Hania aamir : सर्व पाकिस्तानी कलाकारांप्रमाणेच पाकिस्तानी अभिनेत्री हनिया आमिरच्या अकाऊंटवरही भारतात इन्स्टाग्रामवर बंदी घालण्यात आली आहे. पण आता भारतीय चाहते व्हीपीएनसह त्यांचे अकाऊंट अॅक्सेस करत आहेत.



Source link

Success Story : कोणालाही न सांगता दिली UPSCची परीक्षा, अधिकारी झालेल्या मुलीला पाहून आई-वडिलही झाले भावूक

0
Success Story : कोणालाही न सांगता दिली UPSCची परीक्षा, अधिकारी झालेल्या मुलीला पाहून आई-वडिलही झाले भावूक


यूपीएससीमध्ये यश मिळवणाऱ्या स्पर्धकांच्या यशाच्या गाथा या नक्कीच प्रेरणादायी असतात. या यशोगाथा नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि अशा कथा त्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम प्रेरणा आहेत. अशीच एक कहाणी कविता किरणची आहे. कविताने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले आहे. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे. या परीक्षेत त्याने 586 वा क्रमांक मिळवला आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे कविताने नागरी सेवा परीक्षा देण्यापासून ते उत्तीर्ण होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रक्रिया पालकांपासून लपवून ठेवली होती. क. जेव्हा परीक्षेचा निकाल आला तेव्हा कविताने तिच्या कुटुंबाला आनंदाचा धक्का दिला. कविताने परीक्षा दिली आहे हे कुणाला माहीतही नव्हते. 

खरंतर कविता किरण ही उत्तर प्रदेशातील मऊ येथील रहिवासी आहे. तिचे वडील सुरेंद्र नाथ सिंग हे वकील आहेत. ते मऊ जिल्हा बार असोसिएशनचे माजी मंत्री देखील राहिले आहेत. कविताचा धाकटा भाऊ प्रशांत किरणने दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. तो आता सर्वोच्च न्यायालयात वकिली करतो.

कविताने दिल्लीतील मिरांडा हाऊसमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये प्रवेश घेतला. कविताने जेआरएफ आणि नेट परीक्षाही उत्तीर्ण केल्या आहेत. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) संशोधन सुरू केले.

दुसऱ्या प्रयत्नात मिळाले यश 

कविताने २०२२ मध्ये यूपीएससीची परीक्षाही दिली होती, पण तिला यश मिळाले नाही. या वर्षी त्याच्या मेहनतीचे चीज झाले आणि त्याने चांगला रँक मिळवला. तिच्या कुटुंबाला आधीच एक आशादायी मुलगी असल्याचा अभिमान होता. दरम्यान, कविताने तिच्या यूपीएससी निकालाने त्यांना एक सुखद आश्चर्य देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला.





Source link