गोंदिया : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी दिल्लीअंतर्गत नीट परीक्षा रविवार ४ मे रोजी गोंदिया शहरातील एकूण सहा परीक्षा केंद्रावरून दुपारी २ ते सायंकाळी ५ या कालावधीत घेण्यात आली. या सहा परीक्षा केंद्रावरून जिल्ह्यातील एकूण २४०० विद्यार्थीनी परीक्षा देणार होते. पण या पैकी सहा परीक्षा केंद्रावरून एकूण ४५ विद्यार्थ्यांनी नीट च्या परीक्षेला दांडी मारली आहे. जिल्हा प्रशासनाने परीक्षा केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती.
रविवारी दुपारी २ वाजता नीट परीक्षेच्या पेपरला सुरुवात झाली आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरळीत पार पडली . याकरिता विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजतापासन परीक्षा केंद्रावर प्रवेश दिले होते. तसेच दुपारी १:३० वाजतानंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर येताना सोबत मोबाइल, ब्ल्यूटूथ, बेल्ट, कुठलेही दागिने अथवा धातूच्या वस्तू घालून येऊ नये, तसेच पारदर्शक असलेली पाण्याची बॉटल परीक्षा केंद्रावर घेऊन जाता येणार आहे.
परीक्षेदरम्यान कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी सर्व सहा परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची कसून तपासणी करूनच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला गेला. सर्व परीक्षा केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता. पण आयुष्या करिता अत्यंत महत्त्वाचे मानली जाणारी या परीक्षेत पण गोंदिया जिल्ह्यातील २४०० परीक्षार्थी पैकी एकूण ४५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली असे नीट परीक्षेचे जिल्हा समन्वयक महेंद्र जगदाळे यांनी सांगितले. गोंदिया पब्लिक स्कूल पांगोली रोड गोंदिया विद्यार्थी ४३२ पैकी ४२६ नी परीक्षा दिली या केंद्रावर ०६ विद्यार्थी अनुपस्थितीत होते.
स्टार इंटरनॅश्नल स्कूल एमआयटी कॅम्पस कुडवा
४३२ पैकी ४२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या केंद्रावर सर्वाधिक ११ विद्यार्थी अनुपस्थितीत होते.
सेंट झेवियर्स हायस्कूल विजय नगर बालाघाट रोड गोंदिया
४३२ पैकी ४२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या केंद्रावर १० विद्यार्थी अनुपस्थितीत होते
साकेत पब्लिक स्कूल बजाजनगर फुलचूर रोड गोंदिया
४३२ पैकी ४२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ०७ विद्यार्थी अनुपस्थितीत होते.
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल चूलोद रोड गोंदिया
४३२ पैकी ४२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या केंद्रावर ०९ विद्यार्थी अनु उपस्थित
विवेक मंदिर स्कूल हरिओम कॉलनी छोटा गोंदिया
२४२ पैकी २४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ०२ विद्यार्थी अनुपस्थित
फिरते आरोग्य पथक
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून गोंदिया जिल्ह्यातील तापमान ४० अंशांवर गेले आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्कता म्हणून सहा परीक्षा केंद्रावर सहा फिरते आरोग्य पथक कर्तव्यावर ठेवले होते.
IPL 2025 Riyan Parag 6 Ball Six Sixes Video KKR vs RR: राजस्थान रॉयल्स संघाचे यंदा कर्णधारपद सांभाळत असलेल्या रियान परागला अखेरीस सूर गवसला आहे. रियानने केकेआरविरूद्ध सामन्यात वादळी फटकेबाजी करत मोईन अलीची चांगली फटकेबाजी केली. तर वरूण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर स्वीप शॉटने षटकार मारत सर्वांचं लक्ष वेधलं. यासह रियान परागने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे, जो आजवर आयपीएलमध्ये कोणत्याच खेळाडूला जमलेला नाही.
आयपीएल २०२५ चा हंगामा राजस्थान रॉयल्ससाठी चांगला राहिला नाही आणि संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. दरम्यान, कर्णधार संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे संघाचे नेतृत्व करणाऱ्या रियान परागची कामगिरीही चांगली नव्हती आणि तो सतत अपयशी ठरत राहिला. पण केकेआरविरूद्ध सामन्यात रियान परागने वादळी खेळी करत सर्वांनाच चकित केलं.
ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना २०६ धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात राजस्थानची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. संघाने ८ षटकात ७१ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. यानंतर रियान परागने जबाबदारी घेत शानदार फटकेबाजी केली.
हेही वाचा
काही वेळ सावध फलंदाजी केल्यानंतर, रियानने मोठे फटके खेळण्याचा निर्णय घेतला आणि मोईन अलीची त्याने चांगलीच धुलाई केली. या षटकाच्या अगदी आधी, परागने सलग २ चौकार मारले होते. नंतर त्याने १३ व्या षटकात मोईनविरुद्ध सलग पाच षटकार लगावले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शिमरॉन हेटमायरने एक धाव घेतली आणि पराग स्ट्राईकवर आला. त्यानंतर परागने षटकातील उर्वरित ५ चेंडूंवर सलग ५ षटकार मारले. यादरम्यान, त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले आणि त्याच्या एका षटकारामुळे स्टेडियममध्ये ठेवलेल्या टाटा कर्व्ह कारला थोडासा डेंटही लागला.
हेही वाचा
यानंतरही रियान पराग थांबला नाही आणि पुढच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईकवर आला आणि वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर स्वीप खेळत एक कमालीचा षटकार मारला. यासह, राजस्थानच्या कर्णधाराने सलग ६ चेंडूत ६ षटकार मारले आणि राजस्थानला सामन्यात कायम ठेवले. यानंतर, रियन त्याच्या शतकाच्या दिशेने आणि संघाला विजयाच्या दिशेने नेत होता. पण १८ व्या षटकात हर्षित राणाने त्याला बाद केलं आणि त्याचे शतक फक्त ५ धावांनी हुकलं. रियानने ४५ चेंडूत ९५ धावा केल्या, ज्यात ६ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता.
हेही वाचा
रियान परागच्या वादळी खेळीनंतर शुभम दुबेने अखेरच्या षटकात चौकार-षटकार लगावत संघाला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. पण केकेआरचा संघ अखेरच्या चेंडूवर एक धावेने जिंकला आणि त्यांचे आयपीएलमधील आव्हानही कायम ठेवले.
Eknath Shinde : राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले महाबळेश्वरला (Mahabaleshwar) आले की टेम्प्रेचर कमी होतं. पण मी गावाला आलो की इकडे टेम्प्रेचर (Temperature) कमी होतं आणि मुंबईत वाढतं असे वक्तव्य करत राज्याचे उपमुख्यमंत्रपी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांना टोला लगावला. विरोधक याच्या बातम्या करतात, मी मात्र याचा आनंद घेतो. आता पाहिलं असेल की मी इकडे का येतो. निसर्ग आहे इकडे अस एकनाथ शिंदे म्हणाले.
आपण आपला ठेवा जपण्याचे काम केलं आहे
स्थानिक लोकांना इथेच रोजगार मिळावा अशा प्रकारची भूमिका आपल्या सरकारची आहे. महापर्यटन महोत्सव पर्यटनाला चालना देईल असेही एकनाथ शिंदे म्हणाले. इकडचे वातावरण आगळे वेगळे आहे. मी कालपासून अनेक स्टॉलला भेट दिली आहे. सगळ्या ठिकाणची चव आहे. एखाद्याच्या मागे सरकार उभे राहिल्यावर काय होऊ शकते याची प्रचिती आली आहे. पुन्हा कधी होणार याचे उत्तर मुख्यमंत्री देतील. हा महोत्सव यशाकडे जातो आहे. आम्ही सगळ्या योजनांना प्राधान्य दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आपण आपला ठेवा जपण्याचे काम केलं आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासचा रथ उधळत आहे. शंभूराज काळजी करू नका , तुम्ही केलेलं काम मधाचे काम आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.
लंडनपेक्षा महाबळेश्वर बरं, त्यांच्या कुशीत वसलं माझं गाव दरं
महाबळेश्वरमध्ये 80 टक्के स्ट्रॉबेरीचे उत्पादन होते. जे जे वांछील ते तो लावो असा म्हणता येईल. अशा प्रकारचा फेस्टिवल पहिल्यांदाच पाहिला आहे. मी वेळ काढून गावी येतो आणि 2000 झाड लावतो. मी बांबूची लागवड करतो. बांबू कुठे लावतात हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे असेही शिंदे म्हणाले. आपण गट शेती केली पाहिजे. कमी खर्चात जात उत्पादना घेतलं पाहिजे. मी म्हणतो लंडनपेक्षा महाबळेश्वर बरं, त्यांच्या कुशीत वसलं माझं गाव दरं असेही एकनाथ शिंदे म्हणाले. पर्यटकांनं सुरक्षित वाटावं यासाठी दल स्थापन केलं आहे. ब्रिटिशानंतर महाबळेश्वर पर्यटन स्थळ विकसित करणार आपले सरकार असणार आहे. आजचा पर्यटन महोत्सव यशस्वी होत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आज महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सव 2025 समारोप सोहळा आयोजीत केला होता. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
What is Santhara Vrat: पृथ्वीवर ज्याचा जन्म झाला आहे, त्याचा मृत्यू अटळ आहे. जन्मानंर मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. पण ज्याप्रमाणे जन्म घेणं आपल्या हातात नसतं, तसंच मृत्यूचंही आहे. पण अनेकदा काही प्रकरणांमध्ये एखाद्याची जगण्याची इच्छा संपते. पण भारतात इच्छामरण बेकायदेशीर असल्याने त्याला जीवन संपवण्याची परवनागी दिली जात नाही. पण जैन धर्मात संथारा अशी एक प्रथा आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वच्छेने मृत्यू जवळ येईपर्यंत उपवास करते. जैन धर्मतील 3 वर्षांची वियानाच्या मृत्यूमुळे ही प्रथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यानिमित्ताने ही प्रथा नेमकी काय आहे? हे कायदेशीर आहे का? असे अनेक प्रश्न विचारले आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.
नेमकी घटना काय?
जैन दांपत्य पियूष जैन आणि वर्षा जैन यांनी ब्रेन ट्युमर झालेल्या आपल्या 3 वर्षांच्या मुलीला संथारा प्रथेचं पालन करायला लावलं. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. जैन साधू राजेश मुनी महाराज यांनी दिलेल्या आदेशानुसार ही प्रथा पाळण्यात आली. मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये ही घटना घडली आहे. 21 मार्च रोजी वियानाने अखेरचा श्वास घेतला. ही प्रथा पाळणारी वियाना सर्वात तरुण व्यक्ती असल्याने गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने तिची नोंद घेतली असून, प्रमाणपत्र जारी केलं आहे.
काय आहे संथारा प्रथा?
जैन धर्मानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा जैन भिक्षूला आपला मृत्यू जवळ आला आहे असं वाटतं तेव्हा तो स्वतःला एका खोलीत बंद करतात. यानंतर ते अन्न आणि पाणी सोडून देतो. जैन धार्मिक ग्रंथांमध्ये संथारा प्रथेचं वर्णन संलेखाना, समाधीमारण, संन्यासमरण असं म्हणूनही करण्यात आलं आहे.
पण संथारा प्रथेचं पालन वाटेल तेव्हा कोणीही करु शकत नाही. त्यासाठी धर्मगुरुंकडून आदेश मिळणं महत्त्वाचं आहे. जर एखादी व्यक्ती वृद्ध असेल किंवा उपचार होऊ न शकणाऱ्या आजाराने त्रस्त असेल तर अशा स्थितीत संथारा प्रथेचं पालन केलं जातं. संथारा घेतल्यानंत अन्न आणि पाण्याचा त्याग केला जातो. या काळात सर्व मोहमाया बाजूला ठेवून फक्त देवाचं स्मरण केलं जातं.
संथारा प्रथेमागील कारण काय?
इ.स.च्या चौथ्या शतकातील समंतभद्र यांनी लिहिलेला एक महत्त्वाचा जैन ग्रंथ रत्नाकरंद श्रावकचरमध्ये संथारा व्रता आणि ते कसे पाळावं याबद्दल सांगण्यात आलं आहे. या ग्रंथात म्हटलं आहे की, आत्म्याला शरीरापासून मुक्त करण्यासाठी हे व्रत घेतलं पाहिजे जसं की नैसर्गिक आपत्ती, वृद्धापकाळ किंवा बरा न होणारा आजार.
तसंच हे व्रत घेणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे, त्यांच्या सर्व संपत्तीचा त्याग केला पाहिजे आणि आपल्या प्रिय व्यक्तींपासून मानसिकरित्या वेगळं झालं पाहिजे. त्यांनी सर्वांना क्षमा करावी, क्षमा मागावी आणि त्यांच्या चुकांबद्दल पश्चात्ताप करावा. त्यानंतर, शांत मनाने त्यांनी प्रार्थनेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि हळूहळू खाणं-पिणं थांबवावं आणि मृत्यूपर्यंत उपवास करावा.
इतर धर्मांमध्ये अशा प्रथांचा उल्लेख
संथाराचा निर्णय पूर्णपणे संबंधित व्यक्तीवर अवलंबून आहे. यासाठी कोणावरही बळजबरी किंवा दबाव निर्माण करता येणार नाही. मुलं आणि तरुणांना हे करण्याची परवानगी नाही. संथाराची परंपरा केवळ जैन धर्मातच नाही तर इतर धर्मांमध्येही दिसून येते.
संथारा कायदेशीर आहे का?
जैन धर्मात संथारा प्रथा स्विकारण्यात आला असून, तिला फार आदर आहे. मात्र आपल्याकडे या प्रथेला अनेक कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागला. 2015 मध्ये, राजस्थान उच्च न्यायालयाने कलम 306 अंतर्गत संथारा बेकायदेशीर मानली पाहिजे असा निर्णय दिला होता. स्वतःचे जीवन संपवण्याचा स्वेच्छेने घेतलेला निर्णय हा स्वतःला हानी पोहोचवण्याचा एक प्रकार आहे आणि धार्मिक प्रथा म्हणून त्याचे समर्थन करता येत नाही असं कोर्टाने सागितलं होतं.
राजस्थान उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात जैन समुदायाकडून निषेध करण्यात आला. जैन समाजातील संस्था, व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. एका महिन्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली आणि धार्मिक स्वातंत्र्य संरक्षणाखाली संथरा सुरू ठेवण्याची परवानगी दिली.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने शहरातील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान हाती घेतले असून त्या अंतर्गत केवळ १५ दिवसांत १२०० हून अधिक झाडांच्या बुंध्याशी केलेले काँक्रिटीकरण हटविण्यात आले. झाडांवरील फलक, खोडांमध्ये ठोकलेले खिळे, केबल्स काढून झाडांना नवसंजीवनी देण्यात आली. झाडांच्या खोडात ठोकलेले तब्बल ९४.३४ किलो वजनाचे खिळे काढण्यात पालिकेच्या उद्यान खात्याला यश आले. या अभियानात शालेय – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
मुंबईतील वृक्षसंपदा अधिक बहरावी, यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने विविध उपक्रम हाती घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील रस्त्यालगतच्या वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी महापालिकेने नुकतेच ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ हाती घेतले होते. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या आदेशानुसार आणि उप आयुक्त अजीत आंबी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. महानगरपालिकेने २०२२ मध्ये सर्वप्रथम वृक्ष संजीवनी अभियान राबवले होते. पहिल्या टप्प्यात हे अभियान यशस्वी झाले होते.त्यामुळे आता अभियानाचा पुढचा टप्पा हाती घेण्यात आला आहे. उद्यान विभागामार्फत पुरेसे मनुष्यबळ, साहित्य आणि उपकरणांसह सुसज्ज पथके पालिकेच्या विविध विभागात तैनात करण्यात आली होती.
या अभियानात वृक्षांवरील खिळे, जाहिरातीचे फलक, पत्रके, विद्युत तारांचे जंजाळ, वृक्षांच्या बुंध्यालगत केलेले काँक्रीटीकरण काढून टाकण्यात येत आहे. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत १ हजार २९२ झाडांच्या बुंध्याशी केलेले काँक्रीटीकरण हटविण्यात आले. तसेच, झाडांच्या खोडात ठोकलेले खिळे, पोस्टर, फलक, केबल्स आदी मिळून एकूण ६ हजार ३०९ गोष्टी काढण्यात आल्या. तसेच, १८७९.१ झाडांभोवतीचे सिमेंट काढल्यानंतर तेथे लाल मातीची भर घालून झाडांना पुरेसे पाणी टाकण्यात आले. सर्वाधिक म्हणजेच ११८ झाडांच्या बुंध्याशी केलेले काँक्रीटीकरण २५ एप्रिल रोजी हटविण्यात आले. ३० एप्रिल रोजी एकूण १३.४५ किलो खिळे काढण्यात आले.
ज्योतीर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करत असल्याची घोषणा केली आहे. राहुल गांधी यांनी संसदेत मनुस्मृती संदर्भात केलेल्या विधानामुळे सनातन धर्मीय नाराज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बदलापूर: कल्याण तालुक्याच्या ग्रामीण हद्दीतील विविध गावांमध्ये सध्या महापारेषांच्या माध्यमातून विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम सुरू करताना स्थानिक शेतकऱ्यांना कोणतीही सूचना, नोटीस अथवा मोबदला न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. महापारेषण विभागाने जबरदस्तीने काम करू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी नुकतीच शेतकऱ्यांनी कल्याण तालुक्यातील वाहोली गावात आंदोलन केले. तसेच महापारेषण अधिकाऱ्यांना निवेदनही दिले.
कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील खडवली, चिंचवली, उतणे, रुंदे, म्हस्कळ, गोवेली, वाहोली, वसत, शेलवली यांसह १३ गावातून महापारेषण कंपनीची विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे काम करत असताना कंपनीकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुचना, नोटीसा देण्यात आलेल्या नाहीत. तसेच कोणताही मोबदलासुद्धा देण्यात आलेला नाही. जबरदस्तीने महापारेषण काम करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या कामाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. या संदर्भात शेतकऱ्यांना तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यानी पाठिंबा दर्शविला आहे. शनिवारी शेतकऱ्यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाहोली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू. आधी शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला द्या मगच काम करा असा इशारा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते अल्पेश भोईर यांनी दिलाय. यावेळी तालुक्यातील शेकडो बाधीत शेतकरी व विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे पत्र देण्यात आले.
नुकत्याच झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी महापारेषण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपली भूमिका मांडली. आमच्या शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकल्पाला विरोध नाही. प्रकल्पासाठी जमिनी देण्यासाठी आम्हीही तयार आहोत. त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे. मात्र या कामामध्ये शेतकरी केंद्रबिंदू असायला हवा. कोणतेही काम सुरू करताना स्थानिकांना विश्वासात घेतले जावे. कामासाठी किती जागा आवश्यक आहे त्याची सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, महापारेषण आणि महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त मोजणी व्हावी. त्यानंतर आवश्यक जागेचा मोबदला देण्यासाठी त्याचा दर निश्चित व्हावा आणि अखेर त्याचा मोबदला दिल्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरू करावे. या प्रक्रिया पूर्ण न केल्यास आम्ही आमच्या जागेत पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच आमचा प्रकल्पाला विरोध नाही, तर चुकीच्या प्रक्रियेला विरोध आहे असेही शेतकऱ्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे .
नागपूर : लोहा पुलाचे बांधकामामुळे कॉटन मार्केट चौकाकडून सीताबर्डीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे कॉटन मार्केट चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. एका बाजुचा रस्ता बंद असल्यामुळे अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. हा रस्ता बंद केल्यामुळे अनेक वाहनचालक वाहतूक पोलिसांवर आगपाखड करीत आहेत.
गेल्या मंगळवारपासून रेल्वे पुलाचे बांधकाम सुरु असल्यामुळे लोहा पुलाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात करण्यात आला. त्यामुळे कॉटन मार्केट चौकातून सीताबर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक बाधित झाली आहे. विशेषतः सायंकाळी कॉटन मार्केट चौकातून चहुबाजुंना जाणाऱ्यांची मोठी गर्दी असते. तसेच भाजीबाजारात जाणारे ग्राहक आणि रेल्वेस्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांचीही वर्दळ असते.
आता हा मुख्य रस्ता बंद केल्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोहा पुलाच्या दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाने जवळपास ९० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले आहे. परंतु, कामाचे स्वरुप आणि कामाची गती बघता आणखी पाच ते सहा महिने या रस्त्यावरील वाहतूक सुरु होणार नाही, अशी माहिती आहे. रस्ता बंद केल्यानंतर सीताबर्डीकडे जाणाऱ्या वाहनचालकांची अडचण झाली असून अनेक वाहनचालक थेट विरुद्ध दिशेने वाहन चालवून नवीन आरयुबीच्या आतमधून निघण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हेही वाचा
हा प्रकार धोकादायक असून मोठ्या अपघातास निमंत्रण देणारा ठरणारा आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कॉटन मार्केट वाहतूक परिमंडळातील पोलीस कर्मचारी चोवीस तास लोहापुल समोरील रस्त्यावर तैनात करण्यात आले आहे. वाहनचालकांना दिशानिर्देश आणि विरुद्ध दिशेने जाण्यापासून वाहतूक पोलीस रोखत आहेत. मात्र, सीताबर्डी आणि रेल्वेस्थानकाचे मुख्य प्रवेशद्वाराकडून कॉटन मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या बघता कॉटन मार्केटमध्ये मोठी कोंडी निर्माण होत आहे.
हेही वाचा
वाहतूक पोलिसांशी हुज्जत
वाहतूक कोंडी होऊ नये तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालवून नियमांचे उल्लंघन करण्यात येऊ नये म्हणून बंद करण्यात आलेल्या रस्त्यावर वाहतूक पोलीस उभे राहतात. मात्र, अनेक वाहन चालक रस्ता बंद केला म्हणून विचारणा करुन विरुद्ध दिशेने वाहन नेण्याचा प्रयत्न करतात. वाहतूक पोलिसांनी रोकल्यास हुज्जत घालतात, असा प्रकार नेहमीचाच असल्याचे दिसत आहे.
वाहनचालकांना त्रास होऊ नये आणि वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून आम्ही चौकापूर्वीच दर्शनिय भागात रस्त बंद असल्याबाबत फलक लावलेले आहेत. वळण रस्त्याबाबत फलकावर सविस्तर माहिती दिली आहे. विजय टॉकीज चौकातून वळण मार्ग देण्यात आला आहे. चोवीस तास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
प्रमोद पोरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, कॉटन मार्केट विभाग)
राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी १४ वर्षांचा वाटतो का? असा प्रश्न चाहत्यांसह ज्येष्ठ पत्रकार सुनंदन लेले यांनीही उपस्थित केला. यादरम्यान त्यांनी भारतीय क्रिकेटमधील वयचोरी आणि वयचोरी केलेल्या खेळाडूंच्या नावाचा उल्लेख करत उदाहरणं दिली.
सुनंदन लेले यांनी भारतीय क्रिकेटमधील वयचोरीबाबत बोलताना ३-४ किस्से सांगत कोणत्या खेळाडूंनी वयचोरी करत क्रिकेट खेळलं आहे, याबाबत नावाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले. “मी महाराष्ट्राकडून अंडर-१९ सामने खेळायचो तेव्हाची एक गोष्ट, जेव्हा आम्ही रोहतक, चेन्नई जेव्हा झोनल सामने खेळायला जायचो. त्यावेळी आम्ही हादरायचो कारण महाराष्ट्रीयन खेळाडूंची चण त्यामानाने लहान असते आणि अंडर-१९ला आम्हाला मिसरूडही फुटलं नव्हतं, पण पंजाब, दिल्ली, उत्तरप्रदेशचे खेळाडू हिरवी दाढी झालेले असायचे. हिरवी दाढी म्हणजे खूप वेळा जेव्हा यंग जनरेशनी दाढी केल्यावर जशी दिसते, तसे ते दिसायचे नुसते आडदांड आणि आम्हाला वाटायचं हे एवढं कसं काय. मग कळलं, खासकरून उत्तर भारतात वय चोरण्याची एक नेहमीची पद्धत आहे. ही ३५-४० वर्षांपूर्वीची गोष्ट होती.”
इरफान पठाण-युवराज सिंगचा किस्सा
युवराज सिंग आणि इरफान पठाण यांच्यातील किस्सा सांगताना सुनंदन लेले म्हणाले, “इरफान पठाणने मला हा किस्सा सांगितलेला होता. इरफान जेव्हा अंडर-१९ चा खेळाडू म्हणून भारतीय संघात दाखल झाला होता, तेव्हा युवराज सिंग चांगला मुरलेला खेळाडू होता. तेव्हा युवराजने सिनियर म्हणून दादागिरी गाजवत इरफानला विचारलं, काय रे खरं वय काय तुझं? तेव्हा मिश्किल स्वभावाचा इरफानने पाजी तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून चालतोय, असं इरफान म्हणताच युवराजने त्याची गचांडी पकडली आणि मग त्याच्याबरोबर हसताना दिसला, असं लेले म्हणाले.
हेही वाचा
उत्तरप्रदेशच्या संघात १४ खेळाडूंचा जन्म १ ते १० सप्टेंबरदरम्यान
उत्तरप्रदेशचा अंडर-१९चा एक संघ असा होता, ज्यामध्ये १५ पैकी १४ खेळाडूंचे जन्म हे १ ते १० सप्टेंबरमध्ये झाले होते. कटऑफ डेट जी असते ती १५ सप्टेंबर होती. वय चोरण्याची ही गोष्ट भारतीय क्रिकेटमध्ये तर अव्याहत आहे. मुख्य मुद्दा म्हणजे खेळाडू वय का चोरतात? आपल्याला हे माहितीये की, जेव्हा खेळाडू १७ वर्षांचा असतो तेव्हा त्याची ताकद वेगळी असते आणि तो १९,२०चा होतो तेव्हा त्याच्या ताकदीत खूप लक्षणीय फरक दिसायला लागतो. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.
हेही वाचा
वयचोरीबाबत सविस्तर सांगताना लेले म्हणाले, “खरं तर होतं काय की जो २० वर्षांचा मुलगा आहे, तो १८ वर्षाच्या मुलावरती दादागिरी करणं हे एकदम स्वाभाविक आहे. मग बॉलर असो वा बॅटर. बॉलरच्या बॉलिंगमध्ये तर बॅट्समनच्या फटक्यामध्ये ताकद असते आणि मग हे कुरघोडी करून वरचढ ठरतात. पण पुढे जो इतिहास आहे त्यावर लक्ष दिलं तर भारताकडून अंडर -१९ खेळलेले खेळाडू हे कितीही मर्दुमकी गाजवत असले तरी नंतरच्या काळात हे खेळाडू वरच्या ओपन गटात यशस्वी ठरत नाहीत. कित्येक जण जे भारताच्या अंडर-१९ संघाचे कर्णधार होते, पण नंतर मुख्य प्रवाहात ते मिसळू शकले नाहीत आणि ते बाहेर फेकले गेले.”
“भारताच्या अंडर-१९ संघातील फार कमी खेळाडू मुख्य भारतीय संघाकडून खेळले, अशी एक उदाहरणं आहेत. याचं कारण म्हणजे, याला वय चोरीची गोष्ट सुद्धा कारणीभूत ठरते. त्यामानाने वेस्ट झोन, साऊथ झोन यांच्यात वयचोरीचा प्रकार कमी आहे. पण उत्तर भारतात ही वय चोरी प्रचंड मोठ्या प्रमाणात होते”, अशी माहिती लेले यांनी दिली.
हेही वाचा
अंडर-१९ खेळताना सर्फराझचं नेमकं वय किती होतं?
ज्येष्ठ पत्रकार लेले पुढे म्हणाले, “मला हे सांगायचं नव्हतं पण सर्फराझ खान जो भारतीय संघाकडून खेळला, तो अंडर-१९ होता का? अजिबात नव्हता. कारण त्याच्या शाळेत एकत्र शिकणाऱ्या मुलाने सांगितलं की, आम्ही दोघे एका वयाचे आहोत. माझं वय २० उलटून गेलंय आणि सर्फराझ खान अजूनही अंडर-१९ खेळतोय कारण त्यावेळेला या वर्गात शिकलेल्या मुलांचं वय कमी कसं होतं का कळीचा मुद्दा आहे.”
वयचोरीला नेमकं कारणीभूत कोण? प्रशिक्षक की पालक?
“वय चोरीच्या मुद्द्यात प्रशिक्षकांचा सहभाग नसतो. यामध्ये मुलं आणि त्यांच्या पालकांचा मुख्यत्त्वे सहभाग असतो. याचं कारण शाळेत जो जन्मदाखला सादर केलाय, तो नंतरच्या काळात अॅफिडेविट करून ना ना प्रकार करून आणि आता डिजिटलाईझ गोष्टींचा आधार घेऊन जर तुम्ही ती जन्मतारीख बदलली, तर ही खरी चोरी पालकांसमवेत असते, आई बाबा कोणी असो. यामध्ये आईचं प्रमाण कमी आहे. पण बाबा आणि काका, मामा या कॅटेगरीतील लोकं ही या प्रमाणात चोरी करताना मुलांना मदत करतात. कारण मोठ्यांना प्रोसिजर माहित असते. कोणीतरी काका, मामा वकिल असतो आणि मग कुठल्यातरी कोर्टात जाऊन अॅफिडेविट करून त्याची डिजिटल प्रिटं वैगेरे घेऊन ही मुलं चोरलेलं वय दाखवतात, अशी माहिती सुनंदन लेले यांनी दिली.
हेही वाचा
पुढे म्हणाले, मला राग या गोष्टीचा येतो की जर का असोसिएशनला धादांत कळत असतील पुरावे दाखवले जात असतील की अरे या मुलाची जन्मतारीख ही होती आणि आता तो मुलगा वेगळी दाखवतोय तर केवळ याच्याकडे काना डोळा करायचा म्हणून किंवा बीसीसीआयने जे नियम घालून दिलेत, त्याच्याप्रमाणे हा खेळाडू यात बसतो.
बोन टेस्ट नेमकी काय असते?
“दुर्देव असं आहे की १७ वर्षाच्या मुलाची बोन टेस्ट जी असते, ही बोन टेस्ट म्हणजे हाडाची चाचणी ज्यामध्ये खेळाडूच्या मनगटाची चाचणी केली जाते आणि वयाचा अंदाज ठरवला जातो. बिचारी १७ वर्षाची पोर जी धडधाडक असतात डबल आयडी असतात त्यांना या टेस्टमध्ये नापास ठरवलं जातं पण वय चोरणाऱ्या मुलांना नापास ठरवलं जात नाही आणि त्यांच्यावर कोणती कारवाई केली जात नाही आणि म्हणून यामध्ये असं दिसतं की अंडर-१९ ला ही पोरं मैदानावर मर्दुमकी गाजवतात पण नंतर आयुष्यात ओपन क्रिकेटमध्ये हे खेळाडू सपशेल फेल ठरतात”, अशी माहिती लेले यांनी दिली.
लेले यांनी बीसीसीआयचा उल्लेख करत सांगितलं की, “हा एक कळीचा मुद्दा आहे. अनेक वेळा बीसीसीआयने सुद्धा कित्येकदा भाष्यदेखील केलं आहे. पण बोट ठेवून त्याच्यावर कारवाई करणं हे बीसीसीआयलाही जमलेलं नाही आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसुद्धा डोळ्याला स्पष्ट दिसत असून आता याच्यावर कारवाई करत नाहीये.”
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी रणगाड्यावर उभं राहून भारताला पोकळ धमकी दिली. त्यामुळे आपण त्यांना 1971च्या युद्धाची आठवण करून दिली. आता ज्या रणगाड्यावर मुनीरमियाँ उभे होते, त्या रणगाड्यांची आपण आता तुलना करणार आहोत. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडे लष्करी रणगाड्यांचा मोठा साठा आहे.भारताची रणगाड्यांची रचना प्रामुख्यानं मैदानी आणि पर्वतीय भागातील युद्धासाठी तयार केलेली आहेत. भारताकडे एकूण अंदाजे 4,200 रणगाडे आहेत.
भारताकडील प्रमुख रणगाडे T-90S भीष्म रशियन T-90 ची भारतीय आवृत्ती वजन – 46.5 टन रेंज – 650 किमी संख्या – अंदाजे 2,000 आहे वैशिष्ट्ये – 125mm स्मूथबोअर गन, रिअॅक्टिव्ह आर्मर, लेझर-गायडेड मिसाइल्स, आणि रात्री लढण्याची क्षमता
भारताकडील प्रमुख रणगाडे अर्जुन Mk-1/Mk-1A DRDO ने विकसित केलेला स्वदेशी रणगाडा वजन – 58.5 टन रेंज 450 किमी. वैशिष्ट्ये – 120mm रायफल्ड गन, प्रगत फायर कंट्रोल सिस्टम, रिअॅक्टिव्ह आर्मर
भारताकडील प्रमुख रणगाडे T-72 अजय रशियन T-72 ची सुधारित आवृत्ती वजन – 41.5 टन रेंज – 480 किमी. अंदाजे 2,400 युनिट्स वैशिष्ट्ये – 125mm गन, रिअॅक्टिव्ह आर्मर, आणि सुधारित इंजिन
भारताचे हे रणगाडे LAC आणि LoCवर तैनात आहेत. जिथं मैदानी आणि पर्वतीय भूभागासाठी लवचिकता आवश्यक आहे. प्रगत ड्रोन आणि सॅटेलाइट तंत्रज्ञानामुळं टार्गेटिंग आणि समन्वय सुधारला आहे. पाकिस्तानकडे अंदाजे 2,600 रणगाडे आहेत.
पाकिस्तानचे रणगाडे अल-खालिद चिनी MBT-2000 वर आधारित स्वदेशी रणगाडा वजन – 46 टन रेंज – 500 किमी. अंदाजे 600 युनिट्स वैशिष्ट्ये – 125mm स्मूथबोअर गन, रिअॅक्टिव्ह आर्मर, ऑटोलोडर
पाकिस्तानचे रणगाडे अल-झरार चिनी Type-59 रणगाड्याची सुधारित आवृत्ती वजन: 40 टन अंदाजे 600 युनिट्स वैशिष्ट्ये: 125mm गन, सुधारित इलेक्ट्रॉनिक्स, रिअॅक्टिव्ह आर्मर
पाकिस्तानचे रणगाडे T-80UD युक्रेनकडून खरेदी केलेले रणगाडे वजन 46 टन अंदाजे 320 युनिट्स वैशिष्ट्ये: 125mm गन, रिअॅक्टिव्ह आर्मर, आणि रात्री लढण्याची क्षमता
पाकिस्तानचे रणगाडे प्रामुख्यानं LoC आणि पंजाबच्या मैदानी भागात तैनातीवर केंद्रित आहेत. चिनी तंत्रज्ञानावर अवलंबित्व, परंतु ड्रोन आणि सॅटेलाइट तंत्रज्ञानात भारताच्या तुलनेत पाकिस्तानला मर्यादा आहेत.
तुलनात्मक विश्लेषण
भारत
पाकिस्तान
भारताचे संरक्षण बजेट
$80 अब्ज
$10 अब्ज
रणगाड्यांची संख्या
4,200
2,600
प्रमुख रणगाडे
T-90Sभीष्म , अर्जुन, T-72
अल-खालिद, T-80UD, अल-झरार
वजन
41-58 टन
40-46 टन
मुख्य गन
120mm/125mm
125mm/90mm
रेंज
450-650 किमी
500-550 किमी
रणगाड्यांच्या बाबतीतही भारत पाकिस्तानच्या कित्येक पटीनं पुढे आहे. अधिक दूरपर्यंत मारा करणारे अत्याधुनिक रणगाडे भारताच्या लष्कराकडे आहेत. तरीही पोकळ धमक्या देण्याचं काम पाकिस्ताकडून केलं जातंय. युद्धाचा शंखनाद झाल्यास भारताचं सैन्य आणि भारत तयार आहे, हे मात्र निश्चित.