Thursday, July 16, 2026
Home Blog Page 307

PBKS beat LSG by 37 Runs Prabhsimran Singh 91 Runs Arshdeep Singh 3 Wickets Shreyas Iyer IPL 2025

0
PBKS beat LSG by 37 Runs Prabhsimran Singh 91 Runs Arshdeep Singh 3 Wickets Shreyas Iyer IPL 2025


PBKS vs LSG IPL 2025 Match Highlights in Marathi: पंजाब किंग्सने धरमशालाच्या घरच्या मैदानावर लखनौचा धावांनी मोठा पराभव केला आहे. पंजाबने दणदणीत विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने मोठं पाऊल टाकलंय. तर लखनौ संघाला आता प्लेऑफसाठी पात्र ठरायचं असेल तर रस्ता खूप अवघड असणार आहे. पण पंजाबविरूद्ध आयुष बदोनीने लखनौकडून एकट्याने कमालीच्या धावा केल्या.

पंजाब किंग्सने दिलेल्या २३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरूवात खूप खराब झाली. अर्शदीप सिंगने पॉवरप्लेमध्ये ३ विकेट्स घेत लखनौच्या मुख्य ३ फलंदाजांना माघारी धाडलं आणि लखनौच्या धावांना ब्रेक लावला. मिचेल मार्श आणि ए़डन मारक्रम तिसऱ्या षटकात बाद झाले तर निकोलस पुरन पाचव्या षटकात बाद झाला. हे तिन्ही विकेट अर्शदीपने घेतले. ऋषभ पंतने यानंतर संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तो १८ धावा करत बाद झाला, तर डेव्हिड मिलर ११ धावा करत बाद झाला. यानंतर आयुष बदोनी आणि अब्दुल समद यांनी संघासाठी भागीदारी रचली. अब्दुल समद २४ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४५ धावा करत बाद झाला. तर

आयुष बदोनीने वादळी खेळी करत लखनौचा डाव सांभाळला. बदोनीने ४० चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली. तर आवेश खान १० चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १९ धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंगने ३ विकेट्स, अझमतुल्ला ओमरझाईने २ विकेट्स घेतले. मार्काे यान्सन व चहलने १-१ विकेट घेतली.

हेही वाचा

लखनौने नाणेफेक जिंकत पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पंजाबच्या फलंदाजांनी विस्फोटक फलंदाजी करत २० षटकांत २३६ धावांचा टप्पा गाठला. प्रियांश आर्य पहिल्याच षटकात बाद झाला. पण प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरला. तर जोश इंग्लिस १४ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह ३० धावा करत बाद झाला. यानंतर प्रभसिमरन सिंग ४८ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांसह ९१ धावा करत बाद झाला. अवघ्या काही धावांनी त्याचं शतक हुकलं.

हेही वाचा

श्रेयस अय्यरने २५ चेंडूत २४ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा केल्या. तर नेहाल वधेरा १६ धावा करत बाद झाला. शशांक सिंगने विस्फोटक फलंदाजी करत १५ चेंडूत ४ चौकार आणि एक षटकारांसह ३३ धावा करत संघाला मोठी धावसंख्या गाठण्यात योगदान दिलं. लखनौकडून आकाश सिंग आणि दिग्वेश राठीने २-२ विकेट्स घेतले. तर प्रिन्स यादवने १ विकेट घेतली.



Source link

फलटणमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव उत्साहात साजरा; रक्तदान, आरोग्य शिबिर, भजन व मिरवणुकीने रंगत

0
फलटणमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव उत्साहात साजरा; रक्तदान, आरोग्य शिबिर, भजन व मिरवणुकीने रंगत

फलटण । महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त फलटण येथील वीरशैव लिंगायत समाज सामाजिक संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

बुधवार, ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता श्री अवधूत स्वामी मंदिर, मलठण येथे महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान रक्तदान शिबीर आणि आरोग्य तपासणी शिबिर भरवण्यात आले. दुपारी ४ वाजता वीरशैव महिला भजनी मंडळाने भक्तिमय भजन सादर केले, तर रात्री ८ वाजता श्री सद्गुरु हरिबुवा महाराज सांप्रदायिक भजनी मंडळाचे भजन रंगले.

कार्यक्रमास फलटण संस्थानचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी संस्थेच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

शुक्रवार, २ मे रोजी सकाळी ८ वाजता महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १२ वाजता नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ येथे महाआरती होऊन उपस्थितांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

Crime News लग्नाच्या मंडपात तंदुरी रोटी आधी घेण्यावरुन हाणामारी, प्रचंड लाठीमार झाल्याने दोघांचा मृत्यू; कुठे घडली घटना?

0
Crime News लग्नाच्या मंडपात तंदुरी रोटी आधी घेण्यावरुन हाणामारी, प्रचंड लाठीमार झाल्याने दोघांचा मृत्यू; कुठे घडली घटना?



Crime news Two wedding guests fighting over who should get tandoori roti first die|लग्नाच्या मंडपात तंदुरी रोटी आधी घेण्यावरुन हाणामारी, प्रचंड लाठीमार झाल्याने दोघांचा मृत्यू; कुठे घडली घटना?



Source link

Vaibhav Suryavanshi: पंतप्रधान नरेंद्र मोदीही झाले वैभवचे चाहते! म्हणाले, “मी त्याची बॅटिंग पाहिली, त्याने..”

0
Vaibhav Suryavanshi: पंतप्रधान नरेंद्र मोदीही झाले वैभवचे चाहते! म्हणाले, “मी त्याची बॅटिंग पाहिली, त्याने..”



prime minister Narendra Modi Praised 14 year old sensation vaibhav Suryavanshi for his record breaking 35 Balls century| पंतप्रधान नरेंद्र मोदीही झाले वैभवचे चाहते! म्हणाले, “मी त्याची बॅटिंग पाहिली, त्याने..”



Source link

Shashank Smashes Biggest Six as Ball Goes Out of Dharamsala Stadium Preity Zinta Reaction Goes Viral watch Video PBKS vs LSG IPL 2025

0
Shashank Smashes Biggest Six as Ball Goes Out of Dharamsala Stadium Preity Zinta Reaction Goes Viral watch Video PBKS vs LSG IPL 2025


Shashank Singh Roof Top Six Video Viral IPL 2025: धरमशालाच्या नयनरम्य स्टेडियममध्ये आयपीएल २०२५ मधील पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावत तब्बल २३६ धावांचा डोंगर उभारला. संघातील सर्व फलंदाजांनी योगदान देत ही धावसंख्या उभारली. पण यादरम्यान शशांक सिंगने षटकार लगावला. त्याचा हा गगनचुंबी षटकार थेट स्टेडियमच्या छतावर गेला. दरम्यान प्रीती झिंटाच्या प्रतिक्रियेचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

पंजाबसाठी फिनिशरची भूमिका शशांक सिंगने इतका जबरदस्त षटकार मारला की संघ मालक प्रीती झिंटा श्वास रोखून पाहत होती. शशांतने चेंडू इतका जोरात मारला की तो स्टेडियमच्या छतावर पडला आणि बाहेर गेला. हा अद्भुत शॉट पाहून प्रीती झिंटा थक्क झाली. तिची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

१६ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर, पंजाब किंग्जने नेहल वढेराला बाद करत चौथी विकेट गमावली. यानंतर शशांक सिंग फलंदाजीला आला. या षटकात त्याने २ चेंडूत २ धावा काढल्या. यानंतर, त्याने १७ व्या षटकात मयंक यादवविरुद्ध फटकेबाजी करत चौकाराने सुरुवात केली. दुसऱ्या चेंडूवर त्याने २ धावा काढल्या. पण तिसऱ्या चेंडूवर, त्याने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे एक शक्तिशाली फटका खेळला मारला आणि चेंडू स्टेडियमच्या पलीकडे पाठवून षटकार लगावला.

हेही वाचा

शशांकचा हा दमदार फटका पाहून पंजाब किंग्जच्या मालकीण प्रीती झिंटासह स्टेडियममध्ये उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. शशांक सिंगने पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका लिलया पार पाडली. या सामन्यात त्याने फक्त १५ चेंडूत २२० च्या स्ट्राईक रेटने ३३ धावा केल्या. यादरम्यान त्यांच्या बॅटमधून ४ चौकार आणि १ षटकार पाहायला मिळाला. याबरोबरच, त्याने आतापर्यंत ११ सामन्यांच्या ९ डावात ५२ च्या सरासरीने २१० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १४० राहिला आहे.

हेही वाचा

शशांक सिंग व्यतिरिक्त, या सामन्यात प्रभसिमरन सिंगने १८९ च्या स्ट्राईक रेटने ४८ चेंडूत ९१ धावा केल्या. तर कर्णधार श्रेयस अय्यरने २५ चेंडूत ४५ धावांची स्फोटक खेळी केली. त्याच्याशिवाय, जोश इंगलिसने १४ चेंडूत झटपट ३० धावा केल्या आणि पॉवरप्लेमध्ये चांगली सुरूवात करून दिली. तर नेहल वढेराने ९ चेंडूत १६ आणि मार्कस स्टॉइनिसने ५ चेंडूत १५ धावांचे योगदान दिले. यासह प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब संघाने २० षटकांत लखनौ सुपर जायंट्ससमोर २३७ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.



Source link

टोल नाक्याजवळ भीषण अपघात; तीन ठार, एक जखमी , मालवाहू वाहनाची ट्रकला धडक

0
टोल नाक्याजवळ भीषण अपघात; तीन ठार, एक जखमी , मालवाहू वाहनाची ट्रकला धडक


नागपूर : गिट्टीखदानमधील टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलीस ठाण्याअतंर्गत नवीन काटोल नाकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडला.

टाटा एस या चारचाकी वाहन चालकाने ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न करताना हा अपघात घडला. रोशन टेकाम (२५) रा. कळमेश्वर, रमेश देहनकर (५२) रा. ब्राम्हणवाडा आणि रामकृष्ण मसराम (२५) रा. छिंदवाडा अशी मृतकांची नावे आहेत. स्कुटीचालक माणिक महादेवराव बंधराम हे गंभीर जखमी असून यांच्यावर मेयो रूग्णालयात उपचार सुरू आहे.

रविवारी दुपारी तीन वाजता स्कुटी चालक माणिक बंधराम हा कळमेश्वरहून नागपूरकडे येत होता. तर चार चाकी वाहन (इको छोटा हत्ती) चालक रोशन व त्याचे दोन सहकारी हे कळमना बाजारात भाजीची गाडी रिकामी करून कळमेश्वरकडे घरी परत जात होते. निर्मनुष्य रस्ता असल्याने चालक रोशन भरधाव वेगाने चालवित होता.

तो ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याचे वाहन नवीन काटोल नाकाकडे जाणाऱ्या ट्रकवर समोरून धडकले. ट्रक चालकही वेगाने जात असल्याने चारचाकी वाहनाचा समोरील भाग चक्काचूर झाला. चालकासह तिघेही जण समोरच्या केबिनमध्ये असल्याने तिघेही रक्तबंबाळ झाले आणि केबिनमध्ये फसले. दरम्यान स्कुटी चालक माणिक हा कळमेश्वरहून नागपूरकडे येत होता.

या दोन वाहनांची धडक स्कुटीला बसली. भीषण अपघात पाहून रस्त्याने जाणारे लोक थांबले. आपपली वाहने थांबवून करून काही लोकांनी केबिनमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले. रूग्णालयात नेले असता तिघांचाही मृत्यू झाला तर स्कुटीचालक गंभीर जखमी आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक शेख रफिक याला ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणी केली आहे. पोलिसांनी स्कुटी चालकाचा जबाब नोंदविला असून त्याने दिलेल्या माहीतीनुसार टाटा एसचा चालक ‘ओव्हरटेक’ करीत होता अधिक तपास करीत आहे.

रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास एका भरधाव कार जीपीओ चौकातून जात होता. मात्र, अचानक एक दुचाकी आडवी आल्यामुळे कारचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट दुभाजकाकावर आदळली. सुदैवाने एअरबँग वेळेवर उघडली. त्यामुळे चालकाला इजा झाली नाही. या अपघातात जण हानी झाली नाही. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.



Source link

मुलगा दहावीत नापास झाल्यानंतरही आई-वडिलांचं सेलिब्रेशन; कारण प्रत्येक पालकाला विचार करायला लावणारं

0
मुलगा दहावीत नापास झाल्यानंतरही आई-वडिलांचं सेलिब्रेशन; कारण प्रत्येक पालकाला विचार करायला लावणारं


आपल्या मुलाने खूप शिकावं आणि प्रत्येक परीक्षेत अव्वल यावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मुलांचं भविष्य उज्वल होण्याच्या हेतूने त्यांच्यासाठी सर्वोत्तम शाळा, कॉलेज निवडले जातात. इतकंच नाही तर शाळेव्यतिरिक्त इतर क्लासेसही लावले जातात. त्यामुळेच मूल जेव्हा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतं तेव्हा पालकांना आपल्या सगळ्या कष्टाचं चीज झालं असं वाटतं. पण जर हेच मूल नापास झालं तर मात्र सगळी मेहनत वाया गेली अशी खंत करत राहतात. पण कर्नाटकमध्ये याउलट चित्र पाहायला मिळालं. मुलगा दहावीत अनुत्तीर्ण झाल्यानंतरही आई-वडिलांनी सेलिब्रेशन करत आनंद साजरा केला. 

कर्नाटकच्या बागलकोट येथील बसवेश्वर इंग्रजी माध्यम शाळेतील अभिषेक चोलाचगुड्डा या विद्यार्थ्याला त्याच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत 600 पैकी फक्त 200 गुण मिळाले. तो सर्व सहा विषयांमध्ये नापास झाला. त्याला दहावीच्या परीक्षेत फक्त 32 टक्के मिळाले. मुलाचा निकाल निराशाजनक असला तरी तो जगाचा काही अंत नाही अशीच भावना या आई-वडिलांची होती. आपल्या मुलाची हार न मानण्याची प्रवृत्ती त्यांच्यासाठी आशेचा किरण होती. 

 

एकीकडे परीक्षेत नापास झाला म्हणून मित्र खिल्ली उडवत असताना, त्याचे पालक मात्र पाठीशी उभे राहिले. नापास झाल्याबद्दल मुलाला ओरडण्याऐवजी किंवा त्याला खोलीत कोंडून ठेवत निऱाशा व्यक्त करण्याऐवजी पालकांनी केक कट करुन आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे मुलाचा उत्साह कायम राहिला. 

पालकांनी मुलाला सांगितलं की, “तू परीक्षेत नापास झाला असलास, तरी आयुष्यात नाही. तू नेहमीच नव्याने प्रयत्न करु शकतोस आणि पुढील प्रयत्नात यशस्वी होऊ शकतोस”. अपयश मिळूनही आई-वडील पाठीशी उभे राहिल्याने अभिषेकला भावना अनावर झाल्या होत्या. तो म्हणाला, “मी परीक्षेत नापास झालो असलो, तरी कुटुंबाने प्रोत्साहन दिलं. मी पुन्हा एकदा परीक्षा देईन, उत्तीर्ण होईन आणि आयुष्यात यशस्वी होईन”.

उद्या HSC चा निकाल

सोमवारी 5 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल असून 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी बोर्डाच्या संकेतस्थळावर रिझल्ट पाहू शकणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडाळामार्फत बारावीचा निकाल सोमवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. 





Source link

नागपुरात शिवसेना नेत्यावर महिलेचा गंभीर आरोप; शारीरिक संबंधाची मागणी केल्याची तक्रार, गुन्हा दाखल

0
नागपुरात शिवसेना नेत्यावर महिलेचा गंभीर आरोप; शारीरिक संबंधाची मागणी केल्याची तक्रार, गुन्हा दाखल


नागपूर : शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे शहर संपर्क प्रमुखाने आपल्याला वारंवार स्पर्श केेला तसेच शारीरिक संबंधाची मागणी केली, अशी तक्रार एका व्यावसायिक महिलेने बजाजनगर पोलिसांकडे केली. महिलेच्या तक्रारीवरुन त्या नेत्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी नेता फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

मंगेश विजय काशीकर (४४, रा.मधुमालती, शंकरनगर) असे आरोपी नेत्याचे नाव आहे.बजाजनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश काशिकर हा शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा शहर संपर्क प्रमुख आहे. काशिकर याच्याविरुद्ध यापूर्वीसुद्धा गुन्हे दाखल आहेत.त्याने काचीपुरा परिसरात एक हॉटेल टाकले. त्या हॉटेलमध्ये पीडित महिला रिया (काल्पनिक नाव) हिला भागीदार त्यासाठी तिच्याकडून मंगेश याने दीड कोटी रुपये घेतले. त्या पैशातून रिया हिला हॉटेल व्यवसायातून १० टक्के नफा देण्याचा करारनामा करण्यात आला होता.

१ एप्रिल २०२४ ते १४ डिसेंबर २०२४ यादरम्यान हॉटेलचा व्यवसाय चांगला सुरु झाला. रिया ही हॉटेलमध्ये व्यवस्थापन सांभाळत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मंगेश हा रियाच्या अंगाला नेहमी स्पर्श करीत होता. काही दिवस रियाने मंगेशचा त्रास सहन केला. मात्र, त्याने काही दिवसांपासून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करण्यास सुरुवात केली. मंगेशने तिला थेट शारीरिक संबंधाची मागणी केली. त्यामुळे रियाला धक्का बसला. तिने मंगेशला संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या मंगेशने हॉटेलमध्ये येण्यास मनाई केली. तसेच तिला हॉटेलच्या नफ्यातील हिस्साही देण्यास नकार दिला. रियाने दीड कोटी रुपये परत मागितले असता त्याने पैसे देण्यास नकार दिला. हॉटेलमधील रियाचे काही खासगी सामानही घेण्यास मज्जाव करीत दमदाटी केली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

महिलेच्या भावाला दाखवली पिस्तूल

मंगेश काशिकर याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. रियाला शारीरिक संबंधाची मागणी केल्याची माहिती मिळताच तिचा भाऊ आणि मित्र मंगेशकडे गेला. त्यांनी मंगेशला जाब विचारला. मंगेशने दोघांनाही पिस्तूल दाखवून कुटुंबाला संपविण्याची धमकी दिली. पिस्तूल बघताच दोघेही जीव वाचविण्याच्या उद्देशाने पळून गेले.



Source link

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेने दिली आनंदाची बातमी! लग्नानंतर २ वर्षांनी झाला बाबा, शेअर केला पहिला फोटो…

0
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेने दिली आनंदाची बातमी! लग्नानंतर २ वर्षांनी झाला बाबा, शेअर केला पहिला फोटो…



maharashtrachi hasya jatra fame dattu more blessed with baby boy shares photo ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेने दिली आनंदाची बातमी! लग्नानंतर २ वर्षांनी झाला बाबा, शेअर केला पहिला फोटो…



Source link

Yash Dayal Father Credits Virat Kohli For transforming his son career after 5 Sixes in Last Over IPL 2025

0
Yash Dayal Father Credits Virat Kohli For transforming his son career after 5 Sixes in Last Over IPL 2025


IPL 2025 Yash Dayal Father Gives Credit to Virat Kohli: आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीने एकाच सीझनमध्ये दोन वेळा सीएसकेचा पराभव करत मोठा इतिहास घडवला. आरसीबीच्या या विजयाचा हिरो यश दयालदेखील ठरला. ज्याने अखेरच्या षटकात १५ धावांचा बचाव करत संघाला विजय मिळवून दिला. २०२४ मध्येदेखील यश दयालने आरसीबीला चेन्नईवर असाच विजय मिळवून दिला होता. शेवटच्या षटकात ५ षटकार खाल्ल्यानंतर एकेकाळी नैराश्यात गेलेला दयाल आज इतका भेदक गोलंदाजी करू शकतो, तर त्यात विराट कोहलीचं महत्त्वाचं योगदान आहे. हे त्याच्या वडिलांनी स्वतः उघड केले आहे.

यश दयालने ३ मे ला झालेल्या सामन्यात चेन्नईविरूद्ध अखेरच्या षटकात १५ धावांचा बचाव केला. या षटकात त्याने धोनीला झेलबाद केलं. त्यानंतर शिवम दुबेने एक षटकार लगावला आणि नो बॉलही टाकला पण तरीही यश दयालने उत्कृष्ट यॉर्कर टाकत चांगली गोलंदाजी केली.

यश दयालच्या कामगिरीबद्दल त्याच्या वडिलांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीमुळेच तो आज मोकळेपणाने खेळत आहे आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्याचे वडील चंद्रपाल दयाल यांनी खुलासा केला क विराट कोहली आरसीबीमध्ये सामील झाल्यापासून त्याच्याशी खूप चर्चा करतो. तो अनेकदा त्याला त्याच्या खोलीत बोलावतो, बऱ्याच वेळा तो स्वतः यशच्या खोलीत जातो आणि त्याला खेळाबद्दल समजावून सांगत असतो.

हेही वाचा

यश दयालचे वडिल विराटबद्दल सांगताना म्हणाले, “कठोर मेहनत करत राहा, बिनधास्त खेळ तू, मी तुमच्याबरोबर आहे, काळजी करू नकोस, मेहनत करणं थांबवू नको, चुका कर पण त्यातून शिकवण घे आणि पुढे जा.” यश दयालचे वडील पुढे म्हणाले, “विराटने त्याला खूप स्वातंत्र्य दिलंय आणि त्याला एक निर्भय क्रिकेटपटू बनवलं आहे. मी अनेक क्रिकेटपटूंना तुटून कोसळून जाताना पाहिलं आहे, विशेषतः गोलंदाजांना; पण विराटने त्याला सावरलं आहे.”

हेही वाचा

२०२३ मध्ये, यश दयाल गुजरात टायटन्सकडून खेळत होता, या शेवटच्या षटकात रिंकू सिंगने त्याच्या गोलंदाजीवर ५ चेंडूत ५ षटकार मारले. यामुळे त्याची खूप थट्टा झाली आणि या संपूर्ण घटनेनंतर तो नैराश्यात गेला. पण आयपीएल २०२४ च्या हंगामात, तो धोनीच्या संघाविरुद्ध १७ धावांचा बचाव करून हिरो बनला. गेल्या दोन वर्षांत त्याने क्रिकेटपटू म्हणून खूप चांगली प्रगती केली आहे. गेले दोन सीझन तो आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत आहे आणि आरसीबीने त्याच्यावर दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला.





Source link