Wednesday, August 19, 2026
Homeमनोरंजनटोल नाक्याजवळ भीषण अपघात; तीन ठार, एक जखमी , मालवाहू वाहनाची ट्रकला...

टोल नाक्याजवळ भीषण अपघात; तीन ठार, एक जखमी , मालवाहू वाहनाची ट्रकला धडक

टोल नाक्याजवळ भीषण अपघात; तीन ठार, एक जखमी , मालवाहू वाहनाची ट्रकला धडक

[ad_1]

नागपूर : गिट्टीखदानमधील टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलीस ठाण्याअतंर्गत नवीन काटोल नाकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडला.

टाटा एस या चारचाकी वाहन चालकाने ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न करताना हा अपघात घडला. रोशन टेकाम (२५) रा. कळमेश्वर, रमेश देहनकर (५२) रा. ब्राम्हणवाडा आणि रामकृष्ण मसराम (२५) रा. छिंदवाडा अशी मृतकांची नावे आहेत. स्कुटीचालक माणिक महादेवराव बंधराम हे गंभीर जखमी असून यांच्यावर मेयो रूग्णालयात उपचार सुरू आहे.

रविवारी दुपारी तीन वाजता स्कुटी चालक माणिक बंधराम हा कळमेश्वरहून नागपूरकडे येत होता. तर चार चाकी वाहन (इको छोटा हत्ती) चालक रोशन व त्याचे दोन सहकारी हे कळमना बाजारात भाजीची गाडी रिकामी करून कळमेश्वरकडे घरी परत जात होते. निर्मनुष्य रस्ता असल्याने चालक रोशन भरधाव वेगाने चालवित होता.

तो ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याचे वाहन नवीन काटोल नाकाकडे जाणाऱ्या ट्रकवर समोरून धडकले. ट्रक चालकही वेगाने जात असल्याने चारचाकी वाहनाचा समोरील भाग चक्काचूर झाला. चालकासह तिघेही जण समोरच्या केबिनमध्ये असल्याने तिघेही रक्तबंबाळ झाले आणि केबिनमध्ये फसले. दरम्यान स्कुटी चालक माणिक हा कळमेश्वरहून नागपूरकडे येत होता.

या दोन वाहनांची धडक स्कुटीला बसली. भीषण अपघात पाहून रस्त्याने जाणारे लोक थांबले. आपपली वाहने थांबवून करून काही लोकांनी केबिनमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले. रूग्णालयात नेले असता तिघांचाही मृत्यू झाला तर स्कुटीचालक गंभीर जखमी आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक शेख रफिक याला ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणी केली आहे. पोलिसांनी स्कुटी चालकाचा जबाब नोंदविला असून त्याने दिलेल्या माहीतीनुसार टाटा एसचा चालक ‘ओव्हरटेक’ करीत होता अधिक तपास करीत आहे.

रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास एका भरधाव कार जीपीओ चौकातून जात होता. मात्र, अचानक एक दुचाकी आडवी आल्यामुळे कारचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट दुभाजकाकावर आदळली. सुदैवाने एअरबँग वेळेवर उघडली. त्यामुळे चालकाला इजा झाली नाही. या अपघातात जण हानी झाली नाही. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments