Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशनागपुरात शिवसेना नेत्यावर महिलेचा गंभीर आरोप; शारीरिक संबंधाची मागणी केल्याची तक्रार, गुन्हा...

नागपुरात शिवसेना नेत्यावर महिलेचा गंभीर आरोप; शारीरिक संबंधाची मागणी केल्याची तक्रार, गुन्हा दाखल

नागपुरात शिवसेना नेत्यावर महिलेचा गंभीर आरोप; शारीरिक संबंधाची मागणी केल्याची तक्रार, गुन्हा दाखल

[ad_1]

नागपूर : शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे शहर संपर्क प्रमुखाने आपल्याला वारंवार स्पर्श केेला तसेच शारीरिक संबंधाची मागणी केली, अशी तक्रार एका व्यावसायिक महिलेने बजाजनगर पोलिसांकडे केली. महिलेच्या तक्रारीवरुन त्या नेत्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी नेता फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

मंगेश विजय काशीकर (४४, रा.मधुमालती, शंकरनगर) असे आरोपी नेत्याचे नाव आहे.बजाजनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश काशिकर हा शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा शहर संपर्क प्रमुख आहे. काशिकर याच्याविरुद्ध यापूर्वीसुद्धा गुन्हे दाखल आहेत.त्याने काचीपुरा परिसरात एक हॉटेल टाकले. त्या हॉटेलमध्ये पीडित महिला रिया (काल्पनिक नाव) हिला भागीदार त्यासाठी तिच्याकडून मंगेश याने दीड कोटी रुपये घेतले. त्या पैशातून रिया हिला हॉटेल व्यवसायातून १० टक्के नफा देण्याचा करारनामा करण्यात आला होता.

१ एप्रिल २०२४ ते १४ डिसेंबर २०२४ यादरम्यान हॉटेलचा व्यवसाय चांगला सुरु झाला. रिया ही हॉटेलमध्ये व्यवस्थापन सांभाळत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मंगेश हा रियाच्या अंगाला नेहमी स्पर्श करीत होता. काही दिवस रियाने मंगेशचा त्रास सहन केला. मात्र, त्याने काही दिवसांपासून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करण्यास सुरुवात केली. मंगेशने तिला थेट शारीरिक संबंधाची मागणी केली. त्यामुळे रियाला धक्का बसला. तिने मंगेशला संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या मंगेशने हॉटेलमध्ये येण्यास मनाई केली. तसेच तिला हॉटेलच्या नफ्यातील हिस्साही देण्यास नकार दिला. रियाने दीड कोटी रुपये परत मागितले असता त्याने पैसे देण्यास नकार दिला. हॉटेलमधील रियाचे काही खासगी सामानही घेण्यास मज्जाव करीत दमदाटी केली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

महिलेच्या भावाला दाखवली पिस्तूल

मंगेश काशिकर याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. रियाला शारीरिक संबंधाची मागणी केल्याची माहिती मिळताच तिचा भाऊ आणि मित्र मंगेशकडे गेला. त्यांनी मंगेशला जाब विचारला. मंगेशने दोघांनाही पिस्तूल दाखवून कुटुंबाला संपविण्याची धमकी दिली. पिस्तूल बघताच दोघेही जीव वाचविण्याच्या उद्देशाने पळून गेले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments