Thursday, July 2, 2026
Home Blog Page 3064

Video: ब्रेकअपच्या २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच रवीना-अक्षय एकत्र, भेटताच केले कौतुक

0
Video: ब्रेकअपच्या २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच रवीना-अक्षय एकत्र, भेटताच केले कौतुक



Akshay Kumar-Raveena Tandon: अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचे अफेअर जगजाहीर होते. मात्र, ब्रेकअपनंतर त्यांनी कधीही एकमेकांचे तोंड पाहिले नव्हते. आता नुकताच एका कार्यक्रमात ते एकत्र आले. त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



Source link

आमचा पक्ष साडे तीन जिल्ह्यातला, मग कशाला चिंता करता? अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

0


Ajit Pawar:  आमचा पक्ष जर साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असेल तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आमची चिंता करू नये, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. कर्नाटकमधील प्रचार सभेत बोलताना फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असल्याची खोचक टीका केली होती. या टीकेलाही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांनी म्हटले की, आम्ही साडे तीन जिल्ह्यातले आहोत. तर, त्यांनी आमच्या नेत्यांबाबत चिंता करता कामा नये. भाजपचे नेते राष्ट्रवादी नेहमी आमच्या बद्दल बोलत असतात. शिवसेना फोडली…आणि काँग्रेसबद्दलही तसाच प्रचार भाजपकडून करण्यात येतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र ‘दैनिक सामना’तील अग्रलेखावरही अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. अजित पवार यांनी म्हटले की, राज्यात वेगवेगळी वृत्तपत्रे असून त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. त्या भूमिका मांडण्याचं काम संपादक करतात. त्या वृत्तपत्रातील मत हे राज्यातील लोकांचे मत नाही असेही पवार यांनी सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटकामध्ये गेले आहेत. त्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, अवकाळी पाऊसामुळे राज्यावर संकट असताना मुख्यमंत्री कर्नाटकमध्ये गेल आहे,  शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यता आहे, असे त्यांनी म्हटले. यंत्रणेला कामाला लावले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. 

समाजात तेढ निर्माण करण्याचे काम कोणत्याही संघटनेने करू नये. संविधानविरोधी कारवाई करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असेही अजित पवार यांनी बजरंग दलाच्या बंदीच्या आश्वासनाबाबत म्हटले. कर्नाटकमधील निवडणूक आता भावनिक झाली असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सीमाभागातील निपाणीमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. फडणवीस यांनी म्हटले की,  इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील उमेदवार आहे. मात्र, हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो. काँग्रेसला आता राहिलेच नाही अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणीस यांनी हल्लाबोल केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:



Source link

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’वर तामिळनाडूमध्ये बंदी, काय आहे कारण?

0
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’वर तामिळनाडूमध्ये बंदी, काय आहे कारण?


चित्रपट निर्माते विपुल अमृतलाल यांचा ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या रिलीजचा आज चौथा दिवस आहे. मात्र, चित्रपटावरून सुरू असलेला वाद अद्याप थांबलेला नाही. चित्रपटावरुन सुरु असलेला वाद एका बाजूला आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर करत असलेली कमाई एका बाजूला. आता या चित्रपटावर तामिळनाडूमध्ये बंदी घालण्यात आली आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: स्वत: चैनीत राहाचं आणि मुलीला मन मारायला सांगायचं; ईशाच्या लग्नावरुन अनिरुद्ध संतापला

0
Aai Kuthe Kay Karte: स्वत: चैनीत राहाचं आणि मुलीला मन मारायला सांगायचं; ईशाच्या लग्नावरुन अनिरुद्ध संतापला


प्रोमोमध्ये अनिशच्या घरचे ईशाला काही महागड्या गोष्टी भेट म्हणून देतात. मात्र, देशमुख कुटुंबीय अनिशला साधा सुती कुर्ता भेट म्हणून देतात. त्यावरु ईशा चिडते. जेव्हा ही गोष्ट अनिरुद्धला कळते तेव्हा तो अरुंधतीला ‘स्वत: चैनीत राहाचं आणि मुलीला मन मारायला सांगायचं’ असं बोलतो. ते ऐकून अरुंधती आणखी चिडते.



Source link

Alia Bhatt: तुमचा मुलगा मला त्रास देतो; फोटोग्राफरच्या आईकडे आलियाने केली तक्रार Video viral

0
Alia Bhatt: तुमचा मुलगा मला त्रास देतो; फोटोग्राफरच्या आईकडे आलियाने केली तक्रार Video viral


व्हिडीओमध्ये आलिया फोटोग्राफरच्या आईशी बोलताना दिसत आहे की, ‘खूप बरे वाटले तुम्हाला भेटून.’ पुढे त्यांच्या मुलाकडे ईशारा करत आलिया म्हणाली, ‘तुमचा मुलगा मला खूप त्रास देतो.’ ते ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना हसू अनावर झाले. सध्या सोशल मीडियावर आलियाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.



Source link

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’वर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांना शबाना आझमींचे सडेतोड उत्तर

0
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’वर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांना शबाना आझमींचे सडेतोड उत्तर


सुदिप्तो सेनने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात चार सर्वसामान्य कॉलेजमधील मुलींना जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटनेत कशा प्रकारे सामिल करण्यात आले हे दाखवण्यात येणार आहे. जवळपास पाच महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली देखील केली आहे.



Source link

मुख्यमंत्री शिंदे नुसत्या चिठ्या वाचून दाखवतात; अजित पवारांची टीका | पुढारी

0









पुढारी ऑनलाईन डेस्क : आताच्या सरकारचे पाय जाग्यावर नाहीत. सर्व घटकांना सोबत घ्यायच असतं. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुसत्या चिठ्या वाचून दाखवतात आणि काही झालं की दोन- तीन दिवस साताऱ्यात येवून राहतात. शेती करायला आलो म्हणतात पण स्ट्रॉबेरी बघून शेती होते का, काय चाललयं तेच कळना, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. सातारा येथे ते बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री ३ दिवसात ६५ फाईल्स क्लिअर केल्या सांगतात मात्र मंत्रालयात ३ हजार फाईल्स पडून आहेत. वर्षभरात आढावा बैठक कधीही घेतली नाही. मी कधीही खोट आरोप करत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुसत्या चिठ्या वाचून दाखवतात. मला कुणाची चिठ्ठी देण्याची हिम्मत आहे का? त्यांनी एखादी नोट घ्यावी आणि पॉईंटने बोलावे. त्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे.  सत्ता असताना आम्ही सत्तेची मस्ती येवू दिली नाही. खर बोललो तर तुम्हाला राग येतो. एक वर्ष पुर्ण झालं सरकारने आतापर्यंत काय केलं. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत नाही. राज्य सरकार झोपा काढतय का? असा सवाल अजित पवार यांनी केला.

आताच्या सरकारचे मंत्री कुणाला विचारत नाहीत. मंत्री मंत्रालयात बसायला तयार नाहीत. आर्थिक पाहणी अहवालमध्ये सरकारची पिछेहाट का होत आहे, याचं उत्तर सरकारने द्यायला हवे. जाहीरातबाजीवर आम्ही कधी खर्च केला नाही. जनतेच्या पैशातून प्रसिद्धी चालली आहे. मी पण चार वेळा अर्थमंत्री होतो पण गरजेपुरताच जाहीरातीवर खर्च केला. काही लोकप्रतीनिधींना दुसऱ्यांना शिव्या देणं म्हणजेच सभा जिंकली अस वाटतं. पण आम्हाला शिव्या देण्यापेक्षा काम करा, असेही पवार यांनी म्हटले आहे.











Source link

The Kerala Story: द करेळ स्टोरीची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

0
The Kerala Story: द करेळ स्टोरीची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई


चित्रपट निर्माते विपुल अमृतलाल यांचा ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या रिलीजचा आज चौथा दिवस आहे. मात्र, चित्रपटावरून सुरू असलेला वाद अद्याप थांबलेला नाही. चित्रपटावरुन सुरु असलेला वाद एका बाजूला आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर करत असलेली कमाई एका बाजूला. चित्रपटाने चार दिवसात बक्कळ कमाई केली आहे.



Source link

Padma Lakshmi : वयाच्या ५२व्या वर्षी मॉडेल पद्मलक्ष्मीच बोल्ड फोटोशूट; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

0
Padma Lakshmi : वयाच्या ५२व्या वर्षी मॉडेल पद्मलक्ष्मीच बोल्ड फोटोशूट; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…


या स्विमसूट फोटोशूट दरम्यान पद्मलक्ष्मी खूपच बोल्ड झाली आहे. पद्मलक्ष्मी स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड स्विमसूट २०२३मध्ये झळकणार आहे. या शूटमधील काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत पद्मलक्ष्मीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्ही मला जगातील सर्व संपत्ती देऊ शकता, पण तरीही मी माझ्या २०व्या वर्षात परत जाऊ शकणार नाही.’ पद्मलक्ष्मी या वयातही हे बोल्ड फोटोशूट एन्जॉय करताना दिसली आहे.



Source link

Maharashtra Shahir: ‘महाराष्ट्र शाहीर’कडे पाठ; सत्ताधारी नेत्यांकडून ‘द केरळ स्टोरी’चे कौतुक; दिग्दर्शक भडकला

0
Maharashtra Shahir: ‘महाराष्ट्र शाहीर’कडे पाठ; सत्ताधारी नेत्यांकडून ‘द केरळ स्टोरी’चे कौतुक; दिग्दर्शक भडकला


Maharashtra Shahir: सध्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटांचीच गळचेपी होताना दिसत आहे. याचाच फटका आता ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाला देखील बसला आहे. निर्माते-दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे.



Source link