Thursday, July 2, 2026
Home Blog Page 3063

Get Together: पहिल्या प्रेमाची आठवण सांगणारा ‘गेट टुगेदर’; शरद पवार यांनी केलं चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण!

0
Get Together: पहिल्या प्रेमाची आठवण सांगणारा ‘गेट टुगेदर’; शरद पवार यांनी केलं चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण!


Get Together Movie Poster Launch: माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ‘गेट टुगेदर’ या आगामी मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.



Source link

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या टीमला धमक्यांचे मेसेज, मुंबई पोलिसांनी पुरवली सुरक्षा

0
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या टीमला धमक्यांचे मेसेज, मुंबई पोलिसांनी पुरवली सुरक्षा


‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या क्रू मेंबर्सपैकी एकाला अनोळखी नंबरवरून धमकीचा संदेश आला होता. या संदर्भात बोलताना पोलिसांनी सांगितले की, ‘मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने क्रू मेंबरला धमकावले आणि त्याला एकटे घर सोडू नका असे सांगितले. मोठ्या पडद्यावर ही कथा दाखवून त्याने चांगले काम केलेले नाही, असे देखील यात म्हटले आहे. धमकी मिळाल्यानंतर आता त्याला पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. परंतु, या संदर्भात कोणतीही लेखी तक्रार दाखल न केल्यामुळे एफआयआर नोंदवता आलेला नाही.



Source link

Sharad Pawar visit Bhaurao Patil Samadhi शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला अभिवादन करणार

0



<p>कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज चौसष्ठावी पुण्यतिथी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह रयतचे अनुयायी दर्शनासाठी स्मृतीस्थळावर उपस्थित.</p>



Source link

Sai Pallavi Birthday: अभिनेत्रीच नव्हे तर निष्णांत डॉक्टरही आहे साई पल्लवी! वाचा तिच्याबद्दल काही खास गोष्टी..

0
Sai Pallavi Birthday: अभिनेत्रीच नव्हे तर निष्णांत डॉक्टरही आहे साई पल्लवी! वाचा तिच्याबद्दल काही खास गोष्टी..


साई पल्लवी नेहमीच विना मेकअप चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. यामुळे ती सिनेप्रेमींमध्येही प्रचंड लोकप्रिय आहे. साई तिच्या चित्रपटांमध्ये क्वचितच मेकअप करताना दिसते. याच कारणामुळे साईने फेअरनेस क्रीमची दोन कोटींची जाहिरात देखील नाकारली होती. एका फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीसाठी तिला विचारणा झाली होती. मात्र, तिने ही ऑफर धुडकावून लावली. साई पल्लवी म्हणते की, सुंदर दिसण्यासाठी मी मेकअप कधीच वापरत नाही आणि लोकांची दिशाभूल करणाऱ्या गोष्टीचा प्रचार करण्याचा भाग बनू इच्छित नाही. जे नैसर्गिक आहे, तेच चांगले आहे, असे म्हणत तिने ही जाहिरात उडवून लावली.



Source link

Vijay Deverakonda Birthday: अभिनय सोडावा म्हणून कुटुंबाने टाकला होता विजय देवरकोंडावर दबाव! ‘हे’ होते कारण

0
Vijay Deverakonda Birthday: अभिनय सोडावा म्हणून कुटुंबाने टाकला होता विजय देवरकोंडावर दबाव! ‘हे’ होते कारण


Happy Birthday Vijay Deverakonda: आजघडीला विजय एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जात असेल, पण एक काळ असा होता जेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्य त्याच्यावर अभिनय सोडण्यासाठी दबाव आणत होते.



Source link

आम्हाला शिव्या देण्यापेक्षा काम करा; आ. अजितदादांकडून आ. महेश शिंदेंचा समाचार | पुढारी

0


कोरेगाव, पुढारी वृत्तसेवा : काही लोकप्रतिनिधींना दुसर्‍यांना शिव्या देणं म्हणजेच सभा जिंकली असं वाटतं. रयत शिक्षण संस्थेविरोधात काहीजण जाणीवपूर्वक बोलत आहेत. पवार साहेब व माझ्याविरोधातही बोलत आहेत. यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे का? आम्हाला शिव्या देण्यापेक्षा काम करा, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते आ. अजित पवार यांनी कोरेगावचे आ. महेश शिंदे यांचा समाचार घेतला. दरम्यान, कोरेगावच्या या महाभागाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्हीच संधी दिली होती. मात्र, आमदार म्हणून काम करत असताना त्याने शिस्त बिघडवून टाकली आहे. आम्ही दिलेल्या संधीचे सोने करण्याऐवजी याने राख केली, अशी खरमरीत टिकाही आ. अजित पवार यांनी केली.

कोरेगाव येथे बाजार समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार व आ. रामराजे ना. निंबाळकर यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. रामराजे ना. निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, प्रभाकर देशमुख, सारंग पाटील, सत्यजित पाटणकर, प्रदीप विधाते, सुनील माने, किरण साबळे-पाटील, सतीश चव्हाण, तेजस शिंदे, बाळासाहेब सोळस्कर, शहाजी क्षीरसागर, कांतीलाल पाटील, संभाजी गायकवाड, किशोर बाचल, राजाभाऊ शेलार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. अजित पवार म्हणाले, सध्याच्या सरकारमध्ये अराजकता माजली आहे. आताच्या सरकारमध्ये कोण कोणाला विचारत नाही. कोणीही मंत्रालयात बसत नाहीत. सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून बदल्यांचे रेट ठरवले जात आहेत. अधिकारी बदल्यांसाठी पैसे देत असतील तर सर्वसामान्यांची कामे कशी होणार? सरकार काही ठराविक आमदारांनाच सांभाळत आहे. निधी देताना मुद्दाम आडकाठी आणत आहे. आम्ही सत्तेत असताना सत्तेचा कधीच माज केला नाही, म्हणूनच अधिकारी आजही आम्हाला रिस्पेक्ट देतात. महाराष्ट्रात महापुरूषांबद्दल बेताल वक्तव्य करण्याचे सुरू झालेले काम महाराष्ट्रात यापूर्वी कधी घडले नव्हते.

आ. अजितदादा पुढे म्हणाले, आम्ही राज्याच्या राजकारणामध्ये काम करतो. मात्र, सातारा जिल्ह्यातील अनेक मंडळी आमच्याकडे कामासाठी येतात त्यांची कामे पटकन करून देतो. पालकमंत्री असताना काम केलेला जिल्हा आणि आताची सद्यस्थिती यात खूप फरक आहे. सातार्‍याची अशी अवस्था यापूर्वी कधीची पाहिली नव्हती.

बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यात काही ठिकाणी कमी पडलो. अपयशाने खचून जायचं नाही व यशाचा उन्माद करायचा नाही. या निवडणुकीत 147 पैकी 80 ठिकाणी महाविकास आघाडीच्या स्थानिक पॅनेलची सत्ता आली तर भाजप व सत्ताधार्‍यांना 47 व 38 ठिकाणी सर्वपक्षीय आघाड्या निवडून आल्या आहेत. या निकालातून राज्यकर्त्यांना जनतेने नाकारल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून धडा घेतला आहे. जनतेने उठाव केल्यानेच बाजार समितीचा निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. यावेळी खोक्याचा पैसा परत घालवायचा, हे माझ्या तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी ठरवले आणि करून दाखवले. विधानसभेलाही हेच चित्र दिसेल.

2024 मध्ये या देशात व राज्यात या लोकांचा पराभव करून लोकशाही जिवंत ठेवूया. हे आव्हान मोठे आहे पण आपण एकत्र येवून ही लढाई लढूया. पैसा स्वाभिमानाला विकत घेवू शकत नाही. आमची लढाई गलिच्छ वातावरण करणार्‍या प्रवृत्तीविरोधात आहे, अशी टीकाही आ. शिंदे यांनी केली. भास्कर कदम यांनी प्रास्तविक केले. श्रीमंत झांजुर्णे यांनी आभार मानले.



Source link

सातार्‍यात शरद पवारांचाच जलवा | पुढारी

0


सातारा, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या सातार्‍यात पावसात झालेल्या सभेने महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तास्थानाला हादरे बसले होते. पवारांच्या या करिश्म्याचा सिलसिला अद्यापही त्यांच्या बालेकिल्ल्यात शाबूत आहे. कारण राजीनामानाट्यानंतर प्रथमच सातार्‍यात आलेल्या शरद पवार यांच्या एंट्रीला निर्माण झालेला प्रचंड माहौल राष्ट्रवादीला चार्ज करून गेला. कार्यकर्त्यांची प्रचंड झुंबड, भेटण्यासाठी पदाधिकार्‍यांची रस्सीखेच, हलगीचा निनाद, फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी अशा भारावलेल्या वातावरणात सातारकरांनी त्यांचे जंगी स्वागत केल्याने पवार यांचा जलवा दिसून आला.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2019 च्या विधानसभा निवडणुकी-वेळी जिल्हा परिषद मैदान येथे राष्ट्रवादीच्या सांगता सभेवेळी पावसातील शरद पवारांच्या भाषणाने महाराष्ट्रातील सत्ता बदलली. काही दिवसापूर्वी खा. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तो मागे घेण्यास कार्यकर्त्यांनी त्यांना भाग पाडले. त्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा दौरे सुरु केले. सोमवारी सातार्‍यात त्यांची दमदार एन्ट्री झाली. सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवरून सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी त्यांची मिरवणूकच काढली. सैनिक स्कूल ते शासकीय विश्रामगृह अशा दोन्ही बाजूला कार्यकर्ते फुले घेऊन उभे होते. पवारसाहेबांच्या गाडीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. हलगीच्या निनादात त्यांना वाजत-गाजत शासकीय विश्रामगृह येथे आणण्यात आले. त्यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो, पवारसाहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. महिला आघाडीच्यावतीने औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी आ. अजित पवार, आ. दिलीप वळसे-पाटील, आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा बँक अध्यक्ष नितीनकाका पाटील, बाळासाहेब सोळस्कर, राजकुमार पाटील, उदय कबुले, राजेंद्र तांबे, शामराव गाढवे, महादेव म्हसकर, शशिकांत पवार, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, संगीता साळुंखे, समिंद्रा जाधव, स्मिता देशमुख, पूजा काळे आदी उपस्थित होते.

बर्‍याच कालावधीनंतर रेटारेटी

प्रदीर्घ कालावधीनंतर सातार्‍यात गर्दीचा माहोल दिसला. शरद पवारांविषयी जिल्ह्याच्या जनतेचे प्रेम विश्रामगृहावर दिसून आले. आ. शशिकांत शिंदे व राजकुमार पाटील यांनी केलेले परफेक्ट नियोजन कृतीत दिसले. विश्रामगृहावर बर्‍याच कालावधीनंतर रेटारेटी झाली. प्रत्येकाला राजीनामा परत घेतलेल्या शरद पवारांना भेटायचे होते. कार्यकर्त्यांचा हा उत्साह पाहून पवारांनाही आनंदाचे भरते आले.



Source link

Ajit Pawar : समाजाचं काम आहे, जनतेचा पैसा आहे, माझ्या घरचा नाही

0



<p>Ajit Pawar : समाजाचं काम आहे, जनतेचा पैसा आहे, माझ्या घरचा नाही</p>



Source link

Vidya Balan: ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार विद्या बालनचा ‘नीयत’ हा सिनेमा

0
Vidya Balan: ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार विद्या बालनचा ‘नीयत’ हा सिनेमा



Neeyat : विद्या बालनचा ‘नीयत’ हा सिनेमा एक भयपट आहे. या चित्रपटाच्या पोस्टवरुन चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढल्याचे पाहायला मिळते.



Source link

The Kerala Story: पश्चिम बंगालमध्ये ‘द केरळ स्टोरी’वर ममता बॅनर्जींनी घातली बंदी

0
The Kerala Story: पश्चिम बंगालमध्ये ‘द केरळ स्टोरी’वर ममता बॅनर्जींनी घातली बंदी


ममता बॅनर्जी यांनी स्वत: द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘द कश्मीर फाइल्स चित्रपट काय आहे? या सिनेमाने समाजातील एका वर्गाला अपमानीत केले. केरळ सिनेमाची कथा काय आहे, ही एक विकृत कथा आहे’ असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.



Source link