Thursday, July 2, 2026
Home Blog Page 3062

Rang Maza Vegla: अखेर दीपा कार्तिकला शिकवणार धडा; ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार ट्विस्ट!

0
Rang Maza Vegla: अखेर दीपा कार्तिकला शिकवणार धडा; ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार ट्विस्ट!


कार्तिक दीपाला एका मालिकेचा भाग दाखवत असताना, त्यात नायकाच्या चुकीमुळे नायिकेचा जीव जातो. त्यावेळी कार्तिक म्हणतो की, या बायका कशा असतात, पुरुषावर इतका विश्वास ठेवतात आणि जीव गमवतात. यावर दीपा म्हणते की, मी तिच्या जागी असते, तर नवऱ्याचा हात पकडून त्याला देखील स्वतःबरोबर दरीत घेऊन गेले असते. दीपाचे हे बोलणे ऐकून आता कार्तिकला धक्का बसणार आहे.



Source link

Ponniyin Selvan 2: ऐश्वर्या रायचा ‘PS 2’ प्रदर्शित होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर, जाणून घ्या कधी आणि कुठे?

0
Ponniyin Selvan 2: ऐश्वर्या रायचा ‘PS 2’ प्रदर्शित होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर, जाणून घ्या कधी आणि कुठे?



Aishwarya Rai: अभिनेत्री ऐश्वर्या राय महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ‘पोन्नियीन सेलवन’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला IMDbने देखील चांगले रेटिंग दिले आहे.



Source link

Salman Khan: सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस!

0
Salman Khan: सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस!


सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याचे कुटुंब सध्या प्रचंड चिंतीत झालं आहे. सगळ्यांनाच सलमान खानची काळजी वाटत आहे. त्यामुळे सलमान खानने सध्या शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सलमानच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, सलमान या धमकीला घाबरलेला नसून, तो सगळ्या गोष्टी अगदी सामान्य पद्धतीने घेत आहे.



Source link

पृथ्वीराज चव्हाणांचं त्यांच्या पक्षातील स्थान ए, बी, सी किंवा डी आहे हे आधी चेक करावं: शरद पवार

0


Sharad Pawar PC : “आपला पक्ष पुढे कसा जाणार हे आमच्या सहकाऱ्यांना माहित आहे. आम्ही काय करतो, त्यात आम्हाला समाधान आहे, ते लिहितील त्यांना लिहायचा अधिकार आहे. आमच्या दृष्टीने त्याला महत्त्व नाही,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘सामना’तील अग्रलेखावर (Saamana Editorial) भाष्य केलं. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रवीदाचं पार्सल या टीकेला तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘राष्ट्रवादी ही भाजपची टीम बी’ आरोपांनाही उत्तर दिलं.

‘सामना’तील टीकेबाबत शरद पवार काय म्हणाले?

पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी ठरले अशी टीका ‘सामना’तील अग्रलेखात करण्यात आली होती. त्यावर शरद पवार म्हणाले की, “आम्ही काय केलं हे त्यांना माहित नाही. आमचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही पक्षातील सहकारी अनेक गोष्टी बोलतो, वेगवेगळी मतं व्यक्त असतात. पण बाहेर जाऊन त्याची प्रसिद्धी करत नाही. हा आमच्या घराचा प्रश्न आहे. घरामधील सहकाऱ्यांना ठावूक आहे की आपला पक्ष पुढे कसा जाणार आहे. उद्या नवीन नेतृत्त्वाची फळी या पक्षात कशी तयार केली जाते याची खात्री पक्षातील सगळ्या सहकाऱ्यांना आहे. याचं उदाहरण देतो. 99 साली आम्ही राज्यात सत्तेवर आलो, त्यावेळी मंत्रिमंडळ करायचं होतं. काँग्रेस आणि आमचं संयुक्त मंत्रिमंडळ होतं. त्यावेळी त्या नव्या मंत्रिमंडळात ज्या सहकाऱ्यांना आम्ही सहभागी करुन घेतलं, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आर आर पाटील यांच्यासह अनेक नावं होती, ज्याच्या आयुष्यातील सत्तेची पहिली टर्म होती. आता जी नावं घेतली त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती केली होती. महाराष्ट्राने बघितलं आहे की त्यांनी आपल्या कर्तृत्त्व दाखवलं आहे. त्यामुळे आम्ही तयार करतो की करत नाही, हे तुम्ही लिहिलं याचं मात्र आमच्या दृष्टीने काही नाही. ते लिहितील, त्यांचा लिहायचा अधिकार आहे. आम्हाला ठावूक आहे आम्ही काय करतो आणि त्यात आम्हाला समाधान आहे. 

कुरबुरींचा महाविकास आघाडीवर परिणाम नाही

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये कुरबुरी पाहायला मिळत आहेत. परंतु या टीकेचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही, असं शरद पवार म्हणाले. “वेगवेगळी मतं असतात. पण त्यामुळे आमच्यात गैरसमज नाहीत,” असं शरद पवार यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

राष्ट्रवादीचं पार्सल पुन्हा महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर शरद पवार म्हणाले की, “काही लोकाचं वैशिष्ट्य असं की काही काम न करता फक्त शब्दांचा खेळ करायचा.”

पृथ्वीराज चव्हाणांचं त्यांच्या पक्षातील स्थान काय?

तर राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटक निवडणुकीतील प्रचारादरम्यान केला होता. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, “पृथ्वीराज चव्हाणांचं त्यांच्या पक्षात काय स्थान आहे ते ए आहे की बी, सी किंवा डी आहे हे त्यांनी आधी चेक करावं. त्यांच्या पक्षापेक्षा सहकाऱ्यांना विचारावं की यांची कॅटेगरी कोणती आहेत ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीरपणे नाही सांगणार.”

 



Source link

पवार काका-पुतण्या साताऱ्यात एकत्र, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला अभिवादन

0


Satara News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सातारा दौऱ्याचा (Satara Visit) आज दुसरा दिवस आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 64वी पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातील सेवक वर्ग मोठ्या संख्येने त्यांना अभिवादन करण्यासाठी साताऱ्यात येतात. शरद पवार आणि अजित पवार यांनीही कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांच्या समाधीला अभिवादन केलं.

देणगीदारांसह अजित पवारांचा शरद पवारांच्या हस्ते सत्कार

त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थिती लावली. यावेळी देणगीदार रामशेठ ठाकूर शकुंतला ठाकूर यांचा सत्कार करण्यात आलं. सोबतच गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात अजित पवार यांचाही शरद पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमानंतर शरद पवार पत्रकार परिषदही घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादीतील राजकीय घडामोडींनंतर पवारांचा सातारा दौरा

दरम्यान, अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार प्रथमच सातारा दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागलं आहे. शरद पवार सातारा दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाच्या निमित्ताने पवारांचा हा दौरा असला तरी राजकीय पटलावर या दौऱ्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मागील आठवड्याभरात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले आहेत. शिवाय अजित पवार देखील साताऱ्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे पवार काका-पुतण्या यांच्या सातारा दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

VIDEO : Sharad Pawar at Bhaurao Patil Samadhi : कर्मवीर भाऊराव पाटलांच्या समाधीला शरद पवारांकडून अभिवादन

शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यातील आजचे कार्यक्रम

9 मे 2023

सकाळी 08: 30 वाजता – कै.कर्मवीर भाऊराव पाटील सातारा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सकाळी 8: 45-10: 30 वाजता – कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी सोहळा
सकाळी 11: 00 वाजता – रयत शिक्षण संस्था सातारा ची वार्षिक सर्वसाधारण सभा
दुपारी 12: 15 ते 12: 30 वाजता – साताऱ्याहून जकातवाडी येथे जाणार
दुपारी 1230 वाजता – भारतीय भटके-विमुक्त विकास-संशोधन संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा
श्री. कुमार केतकर यांना फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार
दुपारी 03:30 वाजता – जकातवाडी हुन साताऱ्याच्या दिशेने रवाना
दुपारी 03: 55 वाजता – सातारा येथे आगमन
दुपाी 04: 00 वाजता – सातारा सैनिक स्कूल हेलिपॅड, येथे आगमन
दुपारी 04: 30 वाजता – पुन्हा बारामतीला पोहोचणार



Source link

आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही, ‘सामना’मधील टीकेला पवारांचं उत्तर (Video) | पुढारी

0


सातारा : पुढारी ऑनलाईन डेस्क – मला लोकांनी थांबू दिले नाही. आणखी जोमाने काम करणार. आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘सामना’मधील टीकेला उत्तर दिलं.

रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन केले.

सामनातून झालेल्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलं. शरद पवार म्हणाले- अग्रलेखाचं महत्त्व आमच्या लेखी काही नाही. आम्ही सामनाच्या अग्रलेखाला महत्त्व देत नाही. आम्ही आमचं काम करतो, त्यांना काहीही लिहू दे. राष्ट्रवादीत काय होतं, हा आमचा प्रश्न आहे.

आम्ही काय केलं हे त्यांना माहिती नाही. आम्ही काय करतो हे आम्हाला ठाऊक आहे. शब्दांचा खेळ करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न आहे. आम्हाला शून्यापासून सुरुवात करायची आहे. यावेळी चव्हाणांच्या आरोपावर शरद पवार यांनी उत्तर दिलं.

पृथ्वीराज चव्हाणांचं काँग्रेसमधील पत काय आहे? हे आधी पहा असे शरद पवार यांनी चव्हाणांच्या आरोपावर उत्तर दिलं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षाचा वारसदार ठरविण्यात अपयश आल्याची टीका दैनिक सामनाच्या अग्रलेखातून (Sanjay Raut On Sharad Pawar) करण्‍यात आली होती.

सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी म्हटले होते की, शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. मात्र, शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढं नेणारं नेतृत्व पक्षात उभं राहू शकलं नाही. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते असून त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. असं असलं तरी पक्ष पुढं नेईल, असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत.



Source link

The Kerala Story Collection: ‘द केरळ स्टोरी’ने अवघ्या ४ दिवसांत केलं बजेट वसूल; पाहा आतापर्यंतचे कलेक्शन

0
The Kerala Story Collection: ‘द केरळ स्टोरी’ने अवघ्या ४ दिवसांत केलं बजेट वसूल; पाहा आतापर्यंतचे कलेक्शन


‘द केरळ स्टोरी’मध्ये अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात केरळमधील ४ मुलींची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांना प्रथम इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते, नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS मध्ये सामील केले जाते. केरळसह अनेक राज्यांमध्ये या चित्रपटाच्या कथेला तीव्र विरोध होत आहे.



Source link

Vivek Agnihotri : ममता बॅनर्जींवर संतापले विवेक अग्निहोत्री; म्हणाले ‘मी मानहानीचा दावा करू शकतो…’

0
Vivek Agnihotri : ममता बॅनर्जींवर संतापले विवेक अग्निहोत्री; म्हणाले ‘मी मानहानीचा दावा करू शकतो…’


काश्मिरी लोकांची बदनामी करण्यासाठी काश्मीर फाईल्स बनवण्यात आल्याचे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणू शकता?, असा सवालही त्यांनी त्यांनी उपस्थित केला आहे. ‘हा चित्रपट नरसंहार आणि दहशतवादावर असल्याचे तुम्ही म्हणालात. पक्षाकडून निधी मिळाल्याचे तुम्ही कशाच्या आधारे म्हणू शकता?,’ असेही विवेक अग्निहोत्री म्हणाले. यानंतर संतापलेल्या विवेक अग्निहोत्रींनी ममता बॅनर्जींना इशारा दिला आहे. माझा चित्रपट दिल्ली फाईल्स असणार आहे, बंगाल फाईल्स नाही. त्यामुळे मी तुमच्यावर मानहानीचा दावा का दाखल करू शकत नाही? असे त्यांनी म्हटले आहे.



Source link

कोयनेच्या पाण्यावर भागते कर्नाटकची तहान! | पुढारी

0


पाटण; गणेशचंद्र पिसाळ :  ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रातील अनेक विभाग तहानलेले असताना देखील कर्नाटकच्या पिण्याच्या पाण्याच्या मागणीनंतर राज्यातील कोयना धरणातून कर्नाटकला अतिरिक्त पाणी पाजले व पाजतही आहेत. निदान यापुढे तरी कर्नाटकने सामंजस्याची भूमिका ठेवावी नाहीतर आपल्या राज्यकर्त्यांनीही केवळ पोकळ धमक्या देण्यापेक्षा त्यांना योग्यवेळी पाणी दाखवावे, अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांमधून उमटत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण धरणं व पावसाळ्यातील पाण्याच्या जीवावर कर्नाटकातील सर्वात मोठं तब्बल 125 टीएमसी पाणी साठवण क्षमतेच अलमट्टी धरण बांधण्यात आले. पाण्याबाबतची राज्य व केंद्र सरकारची ध्येयधोरणे यासाठी महत्त्वपूर्ण आहेत किंवा कर्नाटकला महाराष्ट्रानं पाणी देण्यात काही गैर नाही. पण, ज्यावेळी महाराष्ट्राने आपल्या त्यागातून हक्काचे पाणी कर्नाटकला दिले त्यावेळी त्या बदल्यात त्यांचीही सकारात्मक भूमिका अपेक्षित आहेत. मात्र, अगदी सिमावाद ते पाणी वाटप लवाद असो किंवा दरवर्षी अलमट्टीच्या पाणी फुगीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील अब्जावधीचे नुकसान असो त्या-त्या वेळी कायमच कर्नाटकच्या राज्यकर्त्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्याची आजपर्यंत अनेक उदाहरणे आहेत. त्याचा सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. पावसाळ्यात सुरुवातीच्या काळात ज्यावेळी महाराष्ट्राकडून अलमट्टी धरणातील पाणी पुढे आंध्र प्रदेशात सोडण्यासाठी विनंती होते. त्यावेळी अक्षरशः त्यांच्याकडून हावरटपणाने मोठ्या प्रमाणावर पाणी अडवण्याचा अट्टाहास केला जातो. नंतर ज्यावेळी खरोखरच महापुराची तीव्रता भीषण होते. त्यावेळी अलमट्टीतून पाणी सोडताना ते पहिल्यांदा स्वतःच्या राज्याचा विचार करतात आणि त्यापटीत पुढे कमी पाणी सोडले जाते. मग धरणात असणारे पाणी पाठीमागच्या बाजूला फुगवट्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजवते. मग पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जीवित, वित्त व अब्जावधींची वैयक्तिक, सार्वजनिक व शासकीय हानी होते.

स्वाभाविकच पाण्यासह अगदी कर्नाटकचा सीमावाद असो अथवा सीमा लगतच्या गावातील कन्नडीगांची मुजोरी असो नेहमीच महाराष्ट्राला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला आहे. सध्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी तर गेल्या काही महिन्यांत याबाबत उच्चांक केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्रातील मंत्र्यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कर्नाटकला पाणी देणार नाही, असा सज्जड इशाराही दिला होता. मात्र, त्यानंतरही कर्नाटकने आपली ताठर व मुजोर भूमिका सोडली नव्हती. मध्यंतरी कर्नाटककडून कोयना धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी तीन टीएमसीची मागणी झाली. त्यानंतर राज्य शासनानेही याला मंजुरी देत कर्नाटकला पहिल्या टप्प्यात यापैकी एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन त्या पटीत पाणी सोडण्यातही आले आहे.

दुसर्‍यांना पाणी देणे हा मानव धर्म आहे आणि राज्याने तो निश्चितच पाळावा, यात चुकीचे काहीही नाही. परंतु, एवढे औदार्य दाखवूनही जर कर्नाटक आपल्याशी कायमच मुजोरी करत असेल तर वेळप्रसंगी त्यांना अशावेळी पाणी दाखवणेही तितकेच गरजेचे आहे. सध्या तर कर्नाटक व महाराष्ट्रातही भाजपा मित्र पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे निदान या काळात तरी सकारात्मक समझोता आवश्यक असतानाही तसे चित्र पाहायला मिळत नाही. त्यामुळे जर त्यांच्यात सुधारणाच होत नसेल तर केवळ विधिमंडळात घोषणा इशारे देण्यापर्यंतच आपल्या राज्यकर्त्यांची भूमिका आहे का? असादेखील प्रश्न सामान्यांमधून व्यक्त होत आहे. या पुढे कर्नाटकला आवश्यक तो धडा शिकवावा अशाही अपेक्षा व्यक्त होत आहेत.

कर्नाटकने कर‘नाटक’ची भूमिका बदलावी

आजपर्यंत अनेकदा कर्नाटकला ज्या ज्या वेळी महाराष्ट्राची गरज पडली त्या त्यावेळी महाराष्ट्राने कायमच त्यांना औदार्याच्या भूमिकेतून मदत केली. परंतु ज्यावेळी गरज संपते आणि महाराष्ट्राला मदत लागते त्यावेळी आजपर्यंतच्या अनेक शासनात कर्नाटकने कर‘नाटक’ अशीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे निदान यापुढे तरी कर्नाटकने नेहमीची कर‘नाटक’ ही भूमिका बदलावी अशाही मागण्या होत आहेत.

The post कोयनेच्या पाण्यावर भागते कर्नाटकची तहान! appeared first on पुढारी.



Source link

Sharad Pawar at Bhaurao Patil Samadhi : कर्मवीर भाऊराव पाटलांच्या समाधीला शरद पवारांकडून अभिवादन

0



<p>कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज चौसष्ठावी पुण्यतिथी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह रयतचे अनुयायी दर्शनासाठी स्मृतीस्थळावर उपस्थित</p>



Source link