Thursday, July 2, 2026
Home Blog Page 3065

Aamir Khan: सतत फ्लॉप चित्रपट देऊन आमिर खान थकला? नेपाळच्या विपश्यना केंद्रात पोहोचल्याने चर्चांना उधाण

0
Aamir Khan: सतत फ्लॉप चित्रपट देऊन आमिर खान थकला? नेपाळच्या विपश्यना केंद्रात पोहोचल्याने चर्चांना उधाण


आपल्या दमदार अभिनयच्या जोरावर बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारा आमिर खान सध्या ब्रेकवर आहे. २०२२मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाल सिंह चढ्ढा’ हा त्याचा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. त्याचा हा चित्रपट बिग बजेट होता. मात्र, तो बजेट देखील वसूल करू शकला नाही. यापूर्वी आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपटही काही खास कामगिरी करू शकला नव्हता. अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना कैफसह अनेक दिग्गज कलाकारांची भरणा असलेला हा चित्रपट लोकांना फारसा आवडला नव्हता.



Source link

TDM Movie: महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी! ‘टीडीएम’ चित्रपटासाठी शिरूरकरांनी काढला ट्रॅक्टर मोर्चा!

0
TDM Movie: महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी! ‘टीडीएम’ चित्रपटासाठी शिरूरकरांनी काढला ट्रॅक्टर मोर्चा!


‘टीडीएम’ या सिनेमाला चित्रपटगृहात शो नसल्या कारणास्तव संतापलेल्या चित्रपट निर्मात्यांनी, दिग्दर्शक, कलाकार मंडळींनी न्याय मागितला. दरम्यान या सर्वांना न्यायाची मागणी करताना अश्रू ही अनावर झाले होते. हा सर्व प्रकार बघून नामवंत राजकीय नेते अजित पवार यांनी देखील ‘टीडीएम’ चित्रपटांना स्क्रीन मिळण्याबाबत ट्विट केलं होत. मात्र, या सगळ्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी न राहवून आता ‘टीडीएम’ चित्रपटाला प्रेक्षकांनी साथ दिली. प्रेक्षकांनी ‘हा चित्रपट पाहायचा आहे’ असे नारे लगावण्यास सुरुवात केली आहे. ‘टीडीएम’ चित्रपटाच्या समर्थनार्थ काल छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, शिरूर येथे सर्व शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर मोर्चा काढत यांत सहभाग दर्शवला.



Source link

Jawan: ‘किंग’ शाहरुख खानसोबत झळकणार मराठीतील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पोस्ट लिहित म्हणाली…

0
Jawan: ‘किंग’ शाहरुख खानसोबत झळकणार मराठीतील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पोस्ट लिहित म्हणाली…


सध्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांची हवा पाहायला मिळत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक चेहरे बॉलिवूड चित्रपट गाजवताना दिसत आहेत. बॉलिवूडलाही आता मराठी कलाकारांची भुरळ पडू लागली आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले झळकणार आहे. गिरीजाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याची माहिती दिली आहे. ‘गेली दोन वर्ष गाळलेला घाम, अश्रू आणि रक्त… अखेर माझा चित्रपट, आपला चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार’, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.



Source link

Tejasswi Prakash: छोट्या पडद्यावरचं ‘पॉवर कपल’ साखरपुडा करणार? करण-तेजस्वीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता!

0
Tejasswi Prakash: छोट्या पडद्यावरचं ‘पॉवर कपल’ साखरपुडा करणार? करण-तेजस्वीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता!


Tejasswi Prakash-Karan Kundra Engagement: नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत करण कुंद्राला तेजस्वी प्रकाशसोबतचे नाते कधी पुढे नेणार असा प्रश्न विचारण्यात आला.



Source link

शेती हवी, पण लग्नासाठी शेतकरी नवरा नको गं बाई ! | पुढारी

0









चाफळ; पुढारी वृत्तसेवा :  सध्या लग्नाकरता सर्वत्र मुली पाहण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. मात्र आता मुलींकडून भूमिहीन, शेतमजूर, शेतकरी मुलांना नापसंती मिळत आहे. मुलाकडे शेती पाहिजे, मात्र मुलगा शेतकरी नको आहे. परिणामी मुलांच्या पालकांकडून फक्त मुलगी द्या लग्न आम्हीच करू अशी विनवणी केली जात आहे. हे बोलके चित्र शहरी व ग्रामीण भागात पाहवयास मिळत आहे.

पुरुषप्रधान समाजात उपवाराचे पूर्वी पारडे जड असायचे. हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल असायची. परंतु आता बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्या घटल्याने मुलांना मुलीं मिळणे कठीण झाले आहे. पूर्वी मुलांच्या शोधासाठी मुलींचे पालक मुलगा मिळेल का म्हणून महिनो महिने नातेवाईकांच्या घरी फिरायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. खर्च आम्हीच करू म्हणून मुलाचे पालक मुलीसाठी वन वन भटकत आहेत. निसर्गाच्या अवकृपेने व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पित्याला वाटते की आपली मुलगी चांगल्या घरी नांदावी. सध्या ग्रामीण भागातील मुलींच्या पित्यांची नजर शहरी भागातील मुलांकडे वळली आहे. श्रीमंत असो की गरीब असो, शेतकरी मुलाला मुलगी देण्यास मुलीसह तिचे पालक नकार देत आहेत. त्यामुळे प्रेम प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या विवाह इच्छुक मुलांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे.

पूर्वी मुलांचे लग्न लाखो रुपयांची उधळण करून मोठ्या थाटामाटात करत होते. मात्र शेतीच्या कर्जामुळे अल्पखर्चातच लग्न साध्या पद्धतीने केले जात आहे. मुलगी मिळने कठीण झाल्यामुळे बर्‍याच मुलांनी हुंडा दिल्याचे समजत आहे. मुलगी दाखवून लग्न जोडून देणार्‍यांना चांगले दिवस आले आहेत. शेतकरी मुलांना कोणीही मुलगी देण्यास तयार होत नाहीत. मुलींकडून सर्वात प्रथम सरकारी नोकरीवर असलेल्या मुलांना प्राधान्य दिले जात आहे. परंतु काही ठिकाणी सध्या नोकरी सोबत शेती आहे का? असाही प्रश्न पुढे येत आहे. शेतकरी नवरा नको पण शेती हवीच अशी मागणीचा जोर आहे.

फक्त मुलगी द्या, आम्ही संपूर्ण खर्च करू

अनेक गावांत तरुण लग्न करण्याकरता पुढे आले असता मुलगी मिळत नसल्यामुळे त्यांचे वय 35 वर्षांहून अधिक झाले आहे. काही ठिकाणी तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर आम्ही द्यायला तयार आहोत, लग्नाचा संपूर्ण खर्च आम्हीच करू, फक्त मुलगी द्या, असा निर्णय तरुण घेत आहेत.











Source link

Katrina Kaif Pregnancy: विकी आणि कतरिना चाहत्यांना ‘गुड न्यूज’ कधी देणार? अभिनेत्रीने स्वतः दिलं उत्तर!

0
Katrina Kaif Pregnancy: विकी आणि कतरिना चाहत्यांना ‘गुड न्यूज’ कधी देणार? अभिनेत्रीने स्वतः दिलं उत्तर!


गतवर्षात अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधल्या, तर अनेकांच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले. अशावेळी विकी आणि कतरिना कधी ही गुडन्यूज देतात, याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान आता कतरिना कैफनेही तिच्या बाळाच्या प्लॅनवर प्रतिक्रिया दिली आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, कतरिना कैफने याविषयी बोलताना सांगितले की, ‘मी विजय सेतुपती आणि फरहान अख्तरच्या चित्रपटाचे शूट पूर्ण केल्यावरच बाळ जन्माला घालण्याचं प्लॅनिंग करेन’. म्हणजेच आता कतरिना-विकीच्या चाहत्यांना येत्या काही काळातच चांगली बातमी मिळू शकते.



Source link

शरद पवार, अजित पवार आज सातार्‍यात मुक्कामी; राजकीय वर्तुळात उत्सुकता | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर पुन्हा विविध कार्यक्रमांची भिरकीट लावलेले खा. शरद पवार तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार सोमवारी सातार्‍यात मुक्कामी आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवस विविध कार्यक्रम पार पडत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे सातार्‍याकडे लक्ष लागून राहिले आहे

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीच्या अनुषंगाने गेले काही दिवस राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. या पार्श्वभूमीवर पवारांच्या दौर्‍याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खा. शरद पवार यांचे सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता सातार्‍यात आगमन होत असून त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर होणार्‍या रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी सकाळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास त्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर रयतमध्ये बैठक होणार असून जकातवाडी येथील कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4 वाजता ते बारामतीला रवाना होणार आहेत.

विरोधी पक्षनेते अजित पवार सोमवारी सकाळी 10.30 वाजता कोरेगाव येथे बाजार समितीच्या विजयी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी 4 वाजता सातार्‍यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांचा सपत्नीक सत्कार व यशवंत गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा त्यांच्या हस्ते पार पडत आहे. सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर होणार्‍या रयतच्या बैठकीस ते उपस्थित राहतील. मंगळवारी कर्मवीर पुण्यतिथी सोहळ्यासह विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी खा. सुप्रिया सुळे यांच्यासह खा. श्रीनिवास पाटील, आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. दिलीप वळसे-पाटील, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीची नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी सायंकाळी फलटण येथे आ. रामराजे ना. निंबाळकर यांचा अमृतमहोत्सव सोहळा होत असून यावेळी आ. अजित पवार, आ. जयंत पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. विश्वजित कदम हेही सोमवार व मंगळवारी सातार्‍यात आहेत. नाना पटोले सोमवारी सायं. 6 वाजता सातार्‍यात येत आहेत. मंगळवारी कर्मवीर पुण्यतिथी सोहळ्यास ते उपस्थित राहतील. त्यानंतर कार्यक्रम, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी अशा विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. त्यांच्यासोबत आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. विश्वजित कदम हेही उपस्थित राहणार आहेत.











Source link

Shiv Thakare Video: आईचा आशीर्वाद अन् प्रेम गाठीशी बघून शिव ठाकरे निघाला नव्या प्रवासाला! व्हिडीओ व्हायरल

0
Shiv Thakare Video: आईचा आशीर्वाद अन् प्रेम गाठीशी बघून शिव ठाकरे निघाला नव्या प्रवासाला! व्हिडीओ व्हायरल


सोशल मीडियावर शिव ठाकरे आणि त्याच्या आईचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिव आपल्या आईचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. तर, शिवची आईदेखील त्याचं औक्षण करून त्याला शुभेच्छा देत आहे. दूर देशात चाललेला आपला मुलगा जिंकून परतावा म्हणून शिवची आई त्याला अनेक आशीर्वाद देत आहे. माय-लेकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होता आहे. चाहते देखील त्याच्या या व्हिडीओवर कमेंट्स करून त्याला शुभेच्छा देत आहेत.



Source link

Viral Video: ‘कच्चा बदाम’ गर्ल अंजली अरोराने समुद्र किनाऱ्यावर दाखवला सिझलिंग अंदाज; व्हिडीओ होतोय व्हायरल

0
Viral Video: ‘कच्चा बदाम’ गर्ल अंजली अरोराने समुद्र किनाऱ्यावर दाखवला सिझलिंग अंदाज; व्हिडीओ होतोय व्हायरल


अंजली अरोराच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका चाहतीने लिहिले की, ‘अंजली, तुझा हा ड्रेस खूप सुंदर आहे.कधीतरी मलाही दे’. तर, एका चाहत्याने म्हटलेय की, ‘मला माहित नाही की, मी हा व्हिडीओ किती वेळा पाहिला आहे… तरीही प्रत्येक वेळी तुम्ही अगदी नवीन आणि वेगळ्या दिसत आहात.’ आणखी एकाने लिहिले की, ‘तुम्ही खूप छान दिसत आहात.’ तर एका चाहत्याने तिची स्तुती करताना लिहिले की, ‘तुम्हाला देवाने खूप वेळ घेऊन बनवले असेल.’ अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.



Source link

Tu Chal Pudha: शिल्पीच्या कटात आईचे होणार हाल; कुटुंब वाचवण्यासाठी अश्विनी काय निर्णय घेणार?

0
Tu Chal Pudha: शिल्पीच्या कटात आईचे होणार हाल; कुटुंब वाचवण्यासाठी अश्विनी काय निर्णय घेणार?


आईची अवस्था पाहून अश्विनी आणि श्रेयस त्यांना पाणी द्यायचा प्रयत्न करतात. मात्र, शिल्पी त्यांना रोखणार आहे. तिचा पण तुम्ही मोडू नका, असं म्हणून शिल्पी आपल्या आईलाच पाणी देण्यापासून रोखणार आहे. शिल्पीचं वागणं पाहून अश्विनीचा मात्र संताप होणार आहे. आपल्या कुटुंबाला होणारा त्रास पाहून अश्विनी आता मोठा निर्णय घेणार आहे. अश्विनी आपल्या कुटुंबासोबत घरातून बाहेर पडणार की, शिल्पीला धडा शिकवणार हे येत्या भागांमध्ये कळणार आहे.



Source link