Thursday, July 2, 2026
Home Blog Page 3066

Rang Maza Vegla: घाडगे वकिलांच्या धमक्यांमुळे आयेशाला आठवणार का भूतकाळ? मालिकेत येणार नवा ट्विस्ट

0
Rang Maza Vegla: घाडगे वकिलांच्या धमक्यांमुळे आयेशाला आठवणार का भूतकाळ? मालिकेत येणार नवा ट्विस्ट


Rang Maza Vegla Latest Episode:रंग माझा वेगळा’ या मालीकेच कथानक आहा एक वेगळ्याच ट्रॅकभोवती फिरत आहे. १४ वर्षांपूर्वी झालेला साक्षीचा खून या प्रकरणामुळे आता दीपा इनामदार, कार्तिक आणि आयेशा देशमुख यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. १४ वर्षांपूर्वी साक्षीचा आजार अचानक बळावल्यामुळे कार्तिकला तिची शस्त्रक्रिया करावी लागली होती. मात्र, याच शस्त्रक्रियेदरम्यान साक्षीचा मृत्यू झाला. साक्षीचा मृत्यू हा कार्तिकच्या चुकीमुळे झाला असून, तो एक खून होता, हे घाडगे वकिलाने कोर्टात सिद्ध केले. मात्र, त्याच्या या कृत्यामुळे कार्तिकला न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगायला लागली आहे.



Source link

सातारा : कोयना धरण परिसरात तीन रिश्टर स्केलचा भूकंप | पुढारी

0









पाटण : पुढारी वृत्तसेवा आज (रविवार) पहाटे ३.५३ वाजता कोयना धरण परिसरात तीन रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या उत्तरेस 50 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन केंद्राकडून देण्यात आली.

हा भूकंप कोयनेसह पाटण व चिपळूण तालुक्यात काही ठिकाणी जाणवला. या भूकंपात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. भूकंपाची खोली तीस किलोमीटर अंतरावर होती. मध्यरात्री अचानकपणे जाणवलेल्या भूकंपामुळे गाढ झोपत असलेले स्थानिक लोक घाबरून घराबाहेर पडले होते.

हेही वाचा :  











Source link

Shah Rukh Khan: चाहता म्हणाला आर्यनला कपड्यांची किंमत जरा कमी करायला सांगा! शाहरुख म्हणतो….

0
Shah Rukh Khan: चाहता म्हणाला आर्यनला कपड्यांची किंमत जरा कमी करायला सांगा! शाहरुख म्हणतो….


आर्यन खानच्या कपड्यांच्या ब्रँडची साईट लाईव्ह झाल्यानंतर,चाहत्यांनी D’Yavolxचे कपडे खरेदी करण्यासाठी तुफान गर्दी केली होती. मात्र, कपड्यांची किंमत पाहून अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. आता नुकतेचकिंग खानने ‘आस्क एसआरके’ सेशन आयोजित केले होते. या सेशनमध्ये त्याने पुन्हा एकदा चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर अंदाजात उत्तरे दिली. याच सेशन दरम्यान ट्विटर युझर आदित्य नारायण मिश्रा नावाच्या चाहत्याने शाहरुख खानला म्हटले की,‘D’yavolxचे हे जॅकेट थोडे १०००-२००० रुपयांमध्ये देखील बनवा. नाही तर हे खरेदी करण्यात आमची घरं विकली जातील.’



Source link

कडक स्वभावामुळे अजितबद्दल गैरसमज : शरद पवार | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  विरोधी पक्षनेते आ. अजित पवार हे फार मीडिया फ्रेंडली नाहीत. त्यांना प्रसिद्धीची फार चिंता नसते. त्यांचा आपले काम पूर्ण करण्यावर भर असतो. त्यांचा स्वभाव कडक आहे. मात्र, त्यांच्याबद्दल काही जणांकडून गैरसमज पसरवले जात असल्याचे मत खा. शरद पवार यांनी व्यक्त केले. राजीनामा नाट्यानंतर खा. शरद पवार हे सातारा जिल्हा दौर्‍यावर आहेत. शनिवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

खा. पवार म्हणाले, काही लोकांच्या कामांच्या पध्दती या वेगळ्या असतात. काही जणांना हे काम दाखवायचे असते तर काही जण आपले केवळ काम करत असतात. मी कोठेही गेलो तर तुम्ही भेटता. मला वेळ असला तर मी तुमच्याशी संवाद साधतो. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो. मात्र, अजित पवार यांच्याबाबत तसे नाही. अजितदादा फारसे मीडिया फ्रेंडली नाहीत. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की, काही लोक असे असतात ते नुसते काम करतात आणि काही लोक असे असतात प्रसार माध्यमांमध्ये नाव कसे येईल याची काळजी घेतात. अजित पवारांना प्रसिध्दीची चिंता नसते. त्यांना चिंता असते आपण हातात घेतेलेल काम पूर्णत्वास न्यायचे. त्यांचा स्वभाव कडक आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल गैरसमज होतात. माझी विनंती आहे तुम्हाला असे काहीही नाही. ते त्यांचं काम करतायत आणि ते काम राज्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, असेही खा. शरद पवार म्हणाले.











Source link

Sheezan Khan: शिजान खानची ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये वर्णी; तुनिषाची आई संतापली!

0
Sheezan Khan: शिजान खानची ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये वर्णी; तुनिषाची आई संतापली!


टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी शोच्या चॅनलला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पण, चॅनलने असे कोणतेही वृत्त फेटाळून लावले आहे. याशिवाय, शोच्या शूटिंगसाठी परदेशात जायला लागणार होते. यामुळे शिजान खानने कोर्टाकडे त्याचा पासपोर्ट परत मागितला होता. यावरही वनिता यांनी संताप व्यक्त केला आहे. एका गंभीर प्रकरणातील आरोपींना आपल्या शोमध्ये सामील करून ही वाहिनी जगाला काय संदेश देऊ इच्छित आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.



Source link

The Kerala Story BO Collection: वादात अडकूनही ‘द केरळ स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पाहा कलेक्शनचे आकडे

0
The Kerala Story BO Collection: वादात अडकूनही ‘द केरळ स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पाहा कलेक्शनचे आकडे


एखाद्या चित्रपटाबद्दल जितके वाद निर्माण होतात, तितकाच तो चित्रपट मोठा हिट ठरतो. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे शाहरुख खानचा चित्रपट ‘पठान’. शाहरुख खानच्या या चित्रपटाच्या वेळी सोशल मीडियावरील युजर्सनी ‘बॉयकॉट पठान’ हा हॅशटॅगही ट्रेंड केला होता. याशिवाय ठिकठिकाणी दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानचे पुतळेही जाळण्यात आले होते. पण, याचे परिणाम सर्वांसमोर आहेत. अशा स्थितीत ‘द केरळ स्टोरी’लाही या वादांचा फायदा मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.



Source link

Jawan: शाहरुखच्या ‘जवान’ची रिलीज डेट येताच इतर चित्रपट मागे हटले! ‘फुकरे ३’चं प्रदर्शन लांबणीवर

0
Jawan: शाहरुखच्या ‘जवान’ची रिलीज डेट येताच इतर चित्रपट मागे हटले! ‘फुकरे ३’चं प्रदर्शन लांबणीवर


Jawan Release Date Change: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या ‘ जवान‘ या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या आधी देखील अनेक तारखांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. मात्र, निर्मात्यांनी पुन्हा एकदा रिलीज शेड्यूल बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता जेव्हा या चित्रपटाला रिलीजची नवी तारीख मिळाली, तेव्हा आधीच त्यादिवशी प्रदर्शित होणारे चित्रपट अडचणीत सापडले आहेत. रिचा चढ्ढा आणि पंकज त्रिपाठी अभिनीत चित्रपट ‘फुकरे ३’ची रिलीज डेट ७ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली होती. मात्र, आता याच दिवशी शाहरुख खान याचा ‘जवान’ प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता ‘फुकरे ३’च्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे.



Source link

Ashwini Bhave Birthday: मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवणाऱ्या अश्विनी भावे; वाचा अभिनेत्रीबद्दल…

0
Ashwini Bhave Birthday: मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवणाऱ्या अश्विनी भावे; वाचा अभिनेत्रीबद्दल…


‘शाबास सुनबाई’,‘वजीर’, ‘अशीही बनवाबनवी’ अशा चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. ‘अशीही बनवा बनवी’ या चित्रपटाने त्यांच्या करिअरला कलाटणी दिली. या चित्रपटानंतर त्यांच्याकडे बॉलिवूड चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. अखेर त्यांनी‘हिना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली.‘हिना’ हा चित्रपट त्याकाळी सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटातील‘देर ना हो जाए कही देर ना हो जाए’ हे गाणे अश्विनी भावे यांच्यावर चित्रित केले गेले होते, जे आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे. कारकीर्द यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी लग्न करून परदेशी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मात्र, आजही त्या अनेक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात.



Source link

ज्या पक्षाच्या जागा जास्त, त्याचा मुख्यमंत्री : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

0









कराड, पुढारी वृत्तसेवा : पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ज्या पक्षाचे जास्त आमदार विजयी होतील; अर्थात ज्या पक्षाच्या जागा जास्त, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, अशी भूमिका काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. कराड बाजार समिती निवडणूक निकालानंतर ते कर्नाटकला प्रचारासाठी रवाना झाले आहेत. तत्पूर्वी, त्यांनी कराडमध्ये काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? हे आताच सांगता येणार नाही. आघाडीत ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील,

त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल असे सांगत, जर वंचित बहुजन आघाडीचे जास्त आमदार विजयी झाले, तर त्या पक्षाचाही मुख्यमंत्री होऊ शकतो, असेही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यातील बाजार समित्यांचे निकाल पाहिल्यानंतर जनतेच्या मनात काय आहे? हे सहजपणे लक्षात येते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीलाच बहुमत मिळेल, असा विश्वासही आ. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.











Source link

Sharad Pawar : राजीनामा माघारीनंतर शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर | पुढारी

0









साखरवाडी; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माघारी घेत असल्याचे जाहीर केले होते. व पुन्हा जोमाने सार्वजनिक जीवनात सक्रिय होणार असल्याचे पत्रकार परिषद सांगितले होते. त्यानुसार आज (दि. ६) पवार यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधील वाठार निंबाळकर येथे डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची बांधावर जाऊन भेट घेतली. यावेळी डाळिंबावर आलेल्या तेल्या, मररोग व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.

पवार (Sharad Pawar) यांनी वाठार निंबाळकर येथील प्रगतशील शेतकरी व डाळिंब उत्पादक चंद्रकांत अहिरेकर यांच्या डाळिंब बागेस भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर, तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, शेतकरी, वाठार निंबाळकर ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व शेतकरी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या अनावरण प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्यानंतर मागील तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्र सह संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते व राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या मागणीचा आदर करून त्यांनी आपण राजीनामा माघारी घेत असल्याचे जाहीर केले. व पुन्हा जोमाने सार्वजनिक जीवनात सक्रिय होणार असल्याचे पत्रकार परिषद सांगितले होते. त्यानुसार पवार यांनी आपल्या नियोजित दौऱ्याला सुरूवात केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या अनावरण प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्यानंतर मागील तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते व राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या मागणीचा आदर करून त्यांनी आपण राजीनामा माघारी घेत असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा 











Source link