Thursday, July 2, 2026
Home Blog Page 3067

बुद्ध जयंतीनिमित्त फलटण मध्ये भव्य मिरवणूक; विविध उपक्रम घेत मोठ्या उत्साहात जयंती साजरी

0
बुद्ध जयंतीनिमित्त फलटण मध्ये भव्य मिरवणूक; विविध उपक्रम घेत मोठ्या उत्साहात जयंती साजरी

फलटण : तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५८६ वी जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बुद्ध जयंती महोत्सव कमिटी आणि साहस क्रीडा मंडळाच्या वतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी आकर्षक सजावट, देखावे, आतिषबाजी बघण्यासाठी शहरातील लोकांनी एकच गर्दी केली होती.

बुद्ध जयंतीच्या निमित्ताने महोत्सव कमिटी आणि साहस क्रीडा मंडळाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले होते. यामध्ये नगर परिषदेतील कामगारांना मसाला दूध वाटप. शहरातील विविध हॉस्पिटल मधील रुग्णांना फळे वाटप तसेच कालकथित प्रेमा वसंत काकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली.

जयंतीच्या मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबडेकर चौक येथे हजारो उपासक उपासिका यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन भगवान बुद्धांना अभिवादन आणि वंदन करण्यात आले. यानिमित्ताने चौकात बुद्धांची मूर्ती असलेली भव्य देखावा आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती.

या मिरवणुकीमध्ये छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त, शाहू महाराज तसेच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबडेकर आणि भगवान बुद्धांची प्रतिमा असलेल्या सहा ट्रॉली आकर्षक सजावट करून तयार करण्यात आल्या होत्या. शहरातील मंगळवार पेठ येथून या मिरवणुकीची सुरवात करून विविध भागातून हि मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीचा प्रारंभ तुषार मोहिते (आयकर सह आयुक्त मुंबई (भारत सरकार ), ऋषिकेश अहिवळे (विक्रीकर सहाय्यकआयुक्त पुणे), नेहा मोहिते (उपअभियंता जलसंपदा विभाग), मंजुषा भोसले (आरटीओ इन्स्पेक्टर), अमितकुमार अहिवळे (सहाय्यक कक्ष अधिकारी गृह विभाग मंत्रालय), आयु निलेश धेंडे (सहाय्य कक्ष अधिकारी नियोजन विभाग ) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी फलटण नगर परिषदेचे नगरसेवक सनी अहिवळे, सचिन अहिवळे, वैशाली अहिवळे तसेच जयंती महोत्सव कमिटी, साहस क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार यांचा राजीनामा हे पूर्वनियोजित नाटक; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याची टीका | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता पण आता नाही. राष्ट्रवादीचे नेते आपसात भांडणात गुंतले आहेत. येणाऱ्या सर्व निवडणुका भाजप जिंकणार आहे. शरद पवार यांनी दिलेला राजीनामा हा पूर्वनियोजित रचलेले नाटक होते, अशी टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी शरद पवार यांच्या राजीनामा प्रकरणावरून केली.

यावेळी मंत्री अजयकुमार मिश्रा म्हणाले की, दिल्लीमध्ये सुरु असलेल्या मल्लांच्या आंदोलनात ब्रिजभूषण बाबत कायदेशीर कारवाई होईल. भाजपचे नेते दोषी आणि अपराधी कमी आहेत, दुसऱ्या पक्षात ती संख्या अधिक आहे. भ्रष्टाचारी असतील तर कारवाई होणारच, आम्ही कोणाला सोडणार नाही, असे मिश्रा यांनी सांगितले.

कर्नाटकात निवडणुका सुरू आहेत. मागील निवडणुकीत भाजपने 108 जागा जिंकल्या आहेत. 2019 च्या निवडणुकीत राज्यात पूर्ण बहुमत दिलं होत. मात्र काही लोकांनी खुर्चीच्या मोहापायी युती तोडली, त्यामुळे महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेला आहे. एक वर्षांपूर्वी आम्ही पुन्हा महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं असून येणाऱ्या निवडणुकीत आम्ही पूर्ण बहुमत घेऊन निवडणूक जिंकणार असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम पाहून ते इतर देशांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. पंतप्रधान मोदींना हटवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले. पण विरोधकांकडे कोणताही अजंडे नाही. विरोधक एकत्र आले तर त्यांना जनता स्वीकारत नाही. जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढं आम्ही मजबूत होत आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : 











Source link

Viral Video : हिंदू दाम्पत्याने मशिदीत बांधली लग्नगाठ; व्हिडीओ शेअर करत एआर रहमाननं केलं कौतुक!

0
Viral Video : हिंदू दाम्पत्याने मशिदीत बांधली लग्नगाठ; व्हिडीओ शेअर करत एआर रहमाननं केलं कौतुक!


‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या वादादरम्यान आता एआर रहमान यांनी हा व्हिडीओ शेअर केल्याने तो चर्चेत आला आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात ३ महिलांची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांचे ब्रेनवॉश करून इस्लामिक धर्म स्वीकारायला लावला जातो. यानंतर त्यांचा ISIS या दहशतवादी संघटनेत समावेश होतो. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. अभिनेत्री अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.



Source link

Tu Chal Pudha: घर बळकावण्यासाठी शिल्पी घेणार आईचा आधार? ‘तू चाल पुढं’मध्ये काय घडणार? वाचा…

0
Tu Chal Pudha: घर बळकावण्यासाठी शिल्पी घेणार आईचा आधार? ‘तू चाल पुढं’मध्ये काय घडणार? वाचा…


बरेच दिवस घरापासून लांब असलेले श्रेयस आणि शिल्पीचे बाबा आता घरी परतून आले आहेत. मित्राच्या मृत्यूमुळे ते अचानक खचून गेले आहेत. यावेळी त्यांनी मित्राचं उदाहरण गाठीशी बांधून स्वतःचं मृत्यूपत्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आपली संपत्ती अर्थात राहतं घर त्यांनी दोन्ही मुलांमध्ये समान वाटणी करून देण्याचं ठरवलं आहे. मात्र, यात त्यांच्या पत्नीने विरोध दर्शवला आहे. घर दोन्ही मुलांमध्ये वाटणी करण्याऐवजी एकट्या शिल्पीला ते देण्यात यावं असं तिने म्हटलं. यावर जरी बाबांनी आक्षेप घेतला असला, तरी आईने आपला हट्ट लावून धरला आहे.



Source link

सातारा : जिम ट्रेनर राम सिंगला सातारा पोलिसांनी घेतले ताब्‍यात | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा अल्‍पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेल्‍या हाय प्रोफाईल जिम ट्रेनर राम सिंगला आज (शनिवार) सकाळी सातारा शहरातील एका हाय प्रोफाईल बंगल्यातून ताब्यात घेण्यात आले. सातारा पोलिसांकडून आता त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा :  











Source link

Rang Maza Vegla : अखेर दीपाला कळणार कार्तिकचं सत्य; ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार धक्कादायक वळण!

0
Rang Maza Vegla : अखेर दीपाला कळणार कार्तिकचं सत्य; ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार धक्कादायक वळण!


Rang Maza Vegla Latest Episode: दीपा कार्तिक बंद असलेल्या तुरुंगात जाणार आहे. यावेळी त्या कोठडीतील दृश्य बघून दीपाच्या पायाखालची जमीन सरकरणार आहे.



Source link

Adipurush Trailer: एक-दोन नव्हे, तब्बल ७० देशांत ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘आदिपुरुष’चा ट्रेलर!

0
Adipurush Trailer: एक-दोन नव्हे, तब्बल ७० देशांत ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘आदिपुरुष’चा ट्रेलर!


Adipurush Trailer Update: नुकतीच ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या ट्रेलर संबंधातील एक मोठी अपडेट समोर आली आहे.



Source link

Kartik Aryan: कार्तिक आर्यनच्या आईने दिली कॅन्सरला मात! अभिनेत्याने शेअर केली इमोशनल पोस्ट…

0
Kartik Aryan: कार्तिक आर्यनच्या आईने दिली कॅन्सरला मात! अभिनेत्याने शेअर केली इमोशनल पोस्ट…


Kartik Aryan Mother: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. मात्र, आता अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. कार्तिकची आई माला तिवारीने कॅन्सरसारख्या धोकादायक आजारावर मात करून आयुष्यातील एक कठीण लढाई जिंकली आहे. कार्तिकने त्याच्या इंस्टाग्रामवर एक अतिशय भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने चाहत्यांना सांगितले आहे की, गेल्या काही महिन्यांमध्ये तो आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून गेला होता. पण, आता कार्तिक त्याच्या आयुष्यातील सुखद प्रवासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. कार्तिकने या पोस्टमध्ये म्हटले की, त्याच्या आईने आता कर्करोगावर मात केली आहे. अभिनेत्याने हा आनंद त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.



Source link

The Kerala Story Collection: ‘द केरळ स्टोरी’ची धमाकेदार सुरुवात; कमाईत ‘द काश्मीर फाईल्स’लाही टाकले मागे!

0
The Kerala Story Collection: ‘द केरळ स्टोरी’ची धमाकेदार सुरुवात; कमाईत ‘द काश्मीर फाईल्स’लाही टाकले मागे!


दिग्दर्शक सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात ३ महिलांची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांचे ब्रेनवॉश करून इस्लामिक धर्म स्वीकारायला लावला जातो. यानंतर त्यांचा ISIS या दहशतवादी संघटनेत समावेश होतो. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. अभिनेत्री अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.



Source link

Pathaan: शाहरुख खानच्या चित्रपटाचा नवा विक्रम! ‘पठान’ पुन्हा रिलीज होणार? जाणून घ्या…

0
Pathaan: शाहरुख खानच्या चित्रपटाचा नवा विक्रम! ‘पठान’ पुन्हा रिलीज होणार? जाणून घ्या…


शाहरुख खानचा ‘पठान’ हा चित्रपट २५ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. ‘पठान’ हा चित्रपट आजही लाखोंची कमाई करत आहे. रिलीजच्या ४ महिन्यांनंतरही जगभरात ‘पठान’चा प्रभाव कायम आहे. ‘पठान’ अजूनही यूके, यूएस, ऑस्ट्रेलिया, यूएई आणि कॅनडा यांसारख्या देशांमध्ये हाउसफुल कमाई करत आहे. ‘पठान’ चित्रपटाने भारतात ६५० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. तर, या चित्रपटाने परदेशात १००० कोटींहून अधिकचा आकडा पार केला आहे. बंगलादेशात रिलीज झाल्यावर या कमाईचा आकडा आणखी वाढणार आहे.



Source link