Saturday, October 3, 2026
Homeसातारासाताऱ्यात पिस्तुल दाखवून दीड लाखांची रोकड पळवली | पुढारी

साताऱ्यात पिस्तुल दाखवून दीड लाखांची रोकड पळवली | पुढारी

[ad_1]








सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरात शनिवारी (दि. ८) रात्री पिस्तुलचा धाक दाखवून कपड्याच्या दुकानातून रोख दीड लाख रुपये लुटल्याची घटना घडली. अजंठा चौकात ही घटना घडली असून साताऱ्यातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अजंठा चौक येथे कपड्यांचे दुकान आहे. रात्री दुकान बंद करण्याची तयारी सुरू असताना तेथे दोघेजण आले. त्यांनी पिस्तुल दाखवून दुकानदाराला धमकावले. या घटनेने दुकानातील मालक, कर्मचारी हादरून गेले. संशयित दोघांनी बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. दुकानदाराने गल्ला मोकळा करत सर्व कॅश चोरट्यांना दिली. सुमारे १० मिनिटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत पैसे घेऊन दुचाकीवरून रहिमतपूर दिशेने पोबारा केला.

चोरटे गेल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्ह्यात रात्री नाकाबंदी करून चोरट्यांची माहिती घेण्यास सुरुवात झाली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. प्राथमिक माहिती नुसार मधील दिसत असलेली बंदूक खरी की खोटी याबाबत पोलीस साशंक आहेत. मात्र चोरट्यांनी केलेल्या या लुटमारीमुळे सातारकर हादरून गेले आहेत.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments