Friday, July 3, 2026
Home Blog Page 3053

Tu Chal Pudha: अखेर अश्विनीला मिळाला पुढे जाण्याचा नवा मार्ग! काय असेल शिल्पीची नवी खेळी?

0
Tu Chal Pudha: अखेर अश्विनीला मिळाला पुढे जाण्याचा नवा मार्ग! काय असेल शिल्पीची नवी खेळी?


Tu Chal Pudha Latest Episode: अश्विनीला हरवण्यासाठी शिल्पीने अनेक प्रयत्न केले. पण, ती नेहमीच तोंडघडशी पडली.



Source link

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’च्या यशानंतर आता चित्रपटाचा सीक्वल येणार? मेकर्सची मोठी घोषणा!

0
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’च्या यशानंतर आता चित्रपटाचा सीक्वल येणार? मेकर्सची मोठी घोषणा!


‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील ३२००० हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे ब्रेनवॉश करण्यात आले. यानंतर त्यांना लव्ह जिहादमध्ये अडकवून त्यांना सीरियाला पाठवण्यात आले, जिथे त्यांच्यासोबत धक्कादायक घटना घडल्या. ‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. यात अभिनेत्री अदा शर्मा हिच्यासोबत योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.



Source link

Vaibhav Mangale: प्रेक्षक तिकिटाचे पैसे परत घ्यायचा विचार करत होते! वैभव मांगलेंच्या त्या संतापाचं नेमकं कारण काय?

0
Vaibhav Mangale: प्रेक्षक तिकिटाचे पैसे परत घ्यायचा विचार करत होते! वैभव मांगलेंच्या त्या संतापाचं नेमकं कारण काय?


वैभव मांगले यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलेय की, ‘पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे प्रयोग झाले संज्या छायाचे. एका ही ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती. रंगमंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला. प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात (विशेषतः बालगंधर्व पुणे, खूप डास आणि उकाडा, कोथरूड यशवंतराव.. उकाडा) प्रयोग पहात होते. एका मर्यादेनंतर नाशिकमध्ये रसिकांचा राग, हतबलता अनावर झाली. त्यांनी गोंधळ केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का याचा विचार करू लागले. पण आपण शो मस्ट गो ऑनवाले लोक. आम्ही विनंती केली की, आम्हाला ही त्रास होतोच आहे. इथे येई पर्यंत माहित नव्हतं की, एसी नाहीये. आमचे निर्माते दिलीप जाधव यांनी १७ आणि २७चे शो रद्द केले. त्या हवेचे आवागमन नसलेल्या उकाड्यात प्रयोग पार पडला. कालिदासला तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता. या सगळ्यात सगळ्यांची होलपट होतेय. कुणी कुणी आणि कुठे कुठे कशी दाद मागावी??? विचारलं तर सांगतात एसी चालू आहे, पण खूप गर्मी असल्याने एसी यंत्रणा नीट काम करत नाही. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही समस्या येत नाही. काय बोलावं या सगळ्यावर वर????????’



Source link

Kapil Sharma: कपिल शर्माचा लेकीसोबत ‘रॅम्प वॉक’ Video viral

0
Kapil Sharma: कपिल शर्माचा लेकीसोबत ‘रॅम्प वॉक’ Video viral



Kapil Sharma: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कपिल शर्मा मुलीसोबत रॅम्पवॉकवर चालताना दिसत आहे.



Source link

Khupte Tithe Gupte: ‘खुपते तिथे गुप्ते’च्या पहिल्या भागात एकनाथ शिंदे लावणार हजेरी

0
Khupte Tithe Gupte: ‘खुपते तिथे गुप्ते’च्या पहिल्या भागात एकनाथ शिंदे लावणार हजेरी



Khupte Tithe Gupte: जवळपास १० वर्षानंतर ‘खुपते तिथे गुप्ते’ हा जबरदस्त व अफलातून कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे



Source link

Sara Ali Khan: सारा अली खान-विकी कौशलच्या आगामी चित्रपटाचं नाव ठरलं! ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट

0
Sara Ali Khan: सारा अली खान-विकी कौशलच्या आगामी चित्रपटाचं नाव ठरलं! ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट


विकी आणि साराच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक नुकतेच समोर आले असून, त्यांच्या या चित्रपटाचे नाव ‘जरा हटके जरा बचके’ असे असणार आहे. यासोबतच चित्रपटाचे दोन पोस्टरही समोर आले आहेत. गेल्या आठवड्यात चाहत्यांना सारा अली खान आणि विकी कौशलच्या या आगामी चित्रपटाबद्दल नवी अपडेट मिळाली होती. यामध्ये सारा अली खान आणि विकी कौशलच्या या चित्रपटाचे शीर्षक १४ मे रोजी समोर येणार असल्याचे सांगण्यात आले होते. याच दरम्यान, सारा आणि विकीच्या आगामी चित्रपटाच्या नावाचा खुलासा झाला आहे.



Source link

Upendra Limaye: रांगडं व्यक्तिमत्व आणि भारदस्त संवाद पुन्हा एकदा अनुभवता येणार; ‘फेमस होणारच’मधून उपेंद्र लिमयेंचं कमबॅक

0
Upendra Limaye: रांगडं व्यक्तिमत्व आणि भारदस्त संवाद पुन्हा एकदा अनुभवता येणार; ‘फेमस होणारच’मधून उपेंद्र लिमयेंचं कमबॅक


‘फेमस होणारच’ या चित्रपटात उपेंद्र लिमये या दिग्गज कलाकारासह अभिनेता महेश गायकवाड, अक्षया हिंदळकर, पूजा राजपूत, तेजस्विनी सुनील, प्रदीप शिंदे, प्रेम धर्माधिकारी, विजय निकम, अक्षय अशोक म्हस्के या कलाकारांना पाहणं ही रंजक ठरणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते अक्षय नागनाथ गवसाने यांनी चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे. अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेल्या या चित्रपटाची जबाबदारी नवोदित दिग्दर्शक अक्षय गवसाने याने उत्तमरीत्या पेलवली आहे.



Source link

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना अदा शर्माने सुनावले बोल! म्हणाली…

0
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना अदा शर्माने सुनावले बोल! म्हणाली…


ट्विटरवर सुफियान खान नावाच्या ट्विटर युजरने या चित्रपटावर कमेंट करताना लिहिले की. ‘तुम्ही प्रोपगंडा फिल्म बनवून पैसे कमवू शकता, पण आदर नाही.’ त्या व्यक्तीच्या या ट्विटवर अदा शर्माने टोमणे मारत उत्तर दिले की, ‘मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. धन्यवाद! आता फक्त भारतातूनच नाही, तर जगभरातून मला इतका आदर दिल्याबद्दल..’ नुकताच केरळ स्टोरी हा चित्रपट आणखी ४० देशांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाला देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. दुसऱ्या, रविवारी या चित्रपटाने पहिल्या वीकेंडपेक्षा जास्त कमाई करून, आपला वेग अजूनही अबाधित असल्याचे दाखवून दिले आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: आमच्या घरातलं वादळ तुमच्या घरी घेऊन जातोय; ईशाच्या साखरपुड्यात यश झाला भावूक

0
Aai Kuthe Kay Karte: आमच्या घरातलं वादळ तुमच्या घरी घेऊन जातोय; ईशाच्या साखरपुड्यात यश झाला भावूक


यश सर्वांसमोर बोलतो की, ‘ईशा इतकी रडकी आहे ना, सतत तिच्या नाकावर राग असतो आणि डोळ्यात पाणी असते. पण तुला भेटल्यापासून तिच्या नाकावरचा रागही तुझ्यासाठी आहे आणि डोळ्यातलं पाणी पण तुझ्यासाठी आहे. ईशा अत्यंत मूडी आहे. क्षणाक्षणाला तिचे निर्णय, मूड बदलत असतात. ती लहानपणापासूनच अशी आहे. पण एकच गोष्ट आजपर्यंत बदलली नाहीये आणि ती म्हणजे तिचं प्रेम. तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी हे सहज सगळ्यांना सांगू शकतो. खरं तर तू आमच्या घरालं वादळ तुमच्या घरी घेऊन चालला आहेस. पण हे वादळ नुकसान करणार नाही.’



Source link

कमी वयातच भंगतय आईपणाचं स्वप्न; जीवनशैलीतील बदल ठरतोय धोक्याचा | पुढारी

0









सातारा; मीना शिंदे : आधुनिकतेच्या नावाखाली जीवनशैलीत होणारे बदल धोकादायक ठरत आहेत. वाढते ताण-तणाव, चुकीच्या आहार-विहाराच्या सवयी, व्यसनाधीनता, उशीरा वयातील लग्न, संप्रेरकांचे असंतुलन आदींमुळे महिलांच्या रजोनिवृत्तीचे वय अलीकडे आले आहे. पूर्वी 45-50 वर्षात होणारी राजोनिवृत्ती 35 ते 40 वर्षातच येत आहे. गर्भधारणेतील महत्त्वाचा दुवाच निखळत असल्याने महिलांचे आईपणाचे स्वप्नही कमी वयात भंग पावत आहे. गर्भधारणेत अडथळे येत असल्याने वंध्यत्वाचे प्रमाण वाढत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

राहणीमानात बदल झाल्याने गरजाही वाढल्या आहेत. मुला-मुलींकडून करिअरला प्राधान्य दिले जात असून नोकरी-व्यवसायात स्थिरावल्याशिवाय लग्नाचा विचारच केला जात नाही. उच्चशिक्षितांकडून लग्नासाठी आपल्या जोडीदाराच्या अपेक्षाही वाढत आहेत. परिणामी लग्नाचे वय वाढत आहे. त्यामुळे तिशीनंतर लग्न आणि पस्तीशीनंतर आपत्याचा विचार होत आहे. याची एक बाजू म्हणजे उशीरा वयातील लग्नांमुळे गर्भधारणेत अडथळे येत आहेत. तसेच वाढत्या स्पर्धेमुळे ताण-तणाव, आहार-विहारातील बदल, व्यायामाचा अभाव, फास्टफूडचा अतिरेक, व्यसनाधीनता यामुळे हार्मोन्समध्ये बदल होत आहेत. या सर्वांमुळे महिलांचे रजोनिवृत्तीचे वय पूर्वीपेक्षा दहा ते पंधरा वर्षे अलीकडे आले आहे.

दरम्यान, नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीच्या अहवालानुसार 2016 मध्ये या वयातील रजोनिवृत्तीचे प्रमाण 1.5 टक्के होते. 2021-22 मध्ये हेच प्रमाण 2.1 टक्केने वाढले आहे. मासिक चक्र हा गर्भधारणेतील महत्त्वाचा दुवा आहे. रजोनिवृत्तीमुळे हा दुवाच निखळला जात आहे. अगदी पस्तीस चाळिशीतच रजोनिवृत्ती आल्याने अशा महिला बाळाला जन्म देण्यास असमर्थ ठरतात. त्यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. बदलती जीवनशैली, नैसर्गिक गोष्टींमधील मानवी हस्तक्षेप मानवी जीवनास घातक ठरत आहे.

वंध्यत्व निवारण उपचारांची गरज वाढली

नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होण्यात अडथळे येत असल्याने वंध्यत्वाला सामोरे जावे लागते. परंतु विज्ञान तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात केली जात आहे. वंध्यत्व निवारण उपचारांची गरज वाढली आहे. या उपचारांमार्फत आयव्हीएफ, टेस्टट्यूब बेबीसारख्या तंत्रज्ञानातून कृत्रिमरीत्या गर्भधारणा करुन अपत्य जन्माला घालण्याची पध्दत सर्वमान्य होत चालली आहे.

मोठ्या शहरातील मुले-मुली उशिरा लग्न करतात. त्यांच्या या मानसिकतेचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे तरुणाईने तिशीच्या आत लग्न व पस्तिशीच्या आत अपत्य हा नियम पाळावा.
– डॉ. स्मीता कासार, स्त्रीरोग तज्ज्ञ.











Source link