Friday, July 3, 2026
Home Blog Page 3045

Karishma Kapoor: घटस्फोटानंतर या व्यक्तीला डेट करतेय करिश्मा कपूर

0
Karishma Kapoor: घटस्फोटानंतर या व्यक्तीला डेट करतेय करिश्मा कपूर


करिष्माने २००३मध्ये उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले होते. सुरुवातील दोघेही आनंदी होते. पण लग्नाच्या पाच-सहा वर्षांनंतर दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. त्यांनी लग्नाच्या जवळपास १३ वर्षांनंनतर विभिक्त होण्याचा निर्णय घेतला.



Source link

सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणार : उदय सामंत | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  शिंदे-फडणवीस सरकारने 13 हजार उद्योजक निर्माण केले असून आगामी काळात मोठ्या संख्येने रोजगारनिर्मितीही करणार आहे. सातारा जिल्ह्यासाठीही आयटी पार्कबाबत विचार करू. शिवाय लवकरच स्कील डेव्हलपमेंट सेंटर, कामगारांच्या रुग्णालयास जागा, एमआयडीसीसाठी प्रादेशिक अधिकारी देण्याचे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सातारा येथील यशोदा कॅम्पसमध्ये महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

मेळाव्यास पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. रणजीतसिंह निंबाळकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, माजी आमदार आनंदराव पाटील, डॉ. दिलीप येळगावकर, माजी सभापती सुनील काटकर, धैर्यशील कदम, राजेंद्र यादव, यशोदाचे संस्थापक प्रा. दशरथ सगरे, काका धुमाळ, संग्राम बर्गे, प्रीतम कळसकर, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ आदी उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे. रोजगार निर्मितीबरोबरच उद्योजकांची निर्मिती करायची आहे. येत्या वर्षभरात 25 हजार उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. टुरिझमसाठी उद्योग विभागाने सहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. युवकांनी मिळालेली नोकरी प्रामाणिकपणे करण्याबरोबरच स्वत:चा व्यवसाय सुरू होईल याकडे लक्ष द्यावे.

खा. उदयनराजे म्हणाले, आपला भविष्यकाळ हा आपल्या हातात असतो. त्यामुळे युवकांनी आपले ध्येय ठरवावे, जिद्दीने पाठपुरावा करावा. नोकरी मागणारे नव्हे तर देणारे व्हावे. संधी एकदाच दार ठोठावते, परत येत नाही. आपल्याला इतिहासजमा व्हायचं नाही. तरुणांच्या रोजगारासाठी वाट्टेल ते करु.

संग्राम बर्गे यांनी प्रास्ताविक केले. नोकरीची संधी मिळालेल्या उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्ती पत्र, जिल्हास्तरीय लघूउद्योग पुरस्कारांचे वितरण व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्ज वाटपाचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

सातबारा नाही, तर दिल बडा होना चाहिए…

खा. उदयनराजे भोसले हे महाराष्ट्रातील सर्व सातबाराचे मालक आज या व्यासपीठावर आहेत; पण त्यांना ते तसं म्हटलेलं आवडत नाही. त्यांचं म्हणणं आहे ‘सातबारा नाही तर दिल बडा होना चाहिए।’ संग्राम बर्गे यांच्या या सूचक वक्तव्याला खा. उदयनराजेंनी दाद दिली. खा. उदयनराजे यांनी समोरील तरुणाईकडे पाहत, ‘माझा सातबारा तुम्हीच आहात. आपण जन्माला यायच्या अगोदरपासून हे डोंगर, ही झाडी आहे. माझा सातबारा म्हणजे कागदाचा चिटूर नाही, तर तुम्ही बसलेले तरुण आहात. वेळ एकदाच येते, संधी एकदाच येते, फायदा कधी घ्यायचा हे आपल्याला कळलं पाहिजे’, अशी भावुक साद खा. उदयनराजेंनी घातली. दरम्यान, एमआयडीसीला उद्योगधंद्यांसाठी लागणारी जमीन शासनाकडून उपलब्ध न झाल्यास मी देतो, असे आश्वासनही खा. उदयनराजे भोसले यांनी दिले.



Source link

Ajaz Khan Video: तुरुंगातून बाहेर पडलेल्या ‘बिग बॉस’ फेम एजाज खानवर संतापले नेटकरी! म्हणाले ‘हसतोय तर असा…’

0
Ajaz Khan Video: तुरुंगातून बाहेर पडलेल्या ‘बिग बॉस’ फेम एजाज खानवर संतापले नेटकरी! म्हणाले ‘हसतोय तर असा…’


२०२१मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता एजाज खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली. कथित ड्रग्ज तस्कर फारुख शेख उर्फ बटाटा याचा मुलगा शादाब शेख उर्फ शादाब बटाटा याच्या चौकशीत त्याचे नाव समोर आले होते. शादाब हा देखील ड्रग्ज पेडलर आहे. माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी त्यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, ‘चौकशीदरम्यान एजाज खानचे नाव समोर आले आणि आम्हाला त्याच्याविरुद्ध काही आक्षेपार्ह पुरावे मिळाले आहेत.’ एजाजच्या अटकेनंतर त्याच्याकडे काही झोपेच्या काही गोळ्या सापडल्या होत्या. या प्रकरणी तो तुरुंगात शिक्षा भोगत होता. आता त्याला जामीन मिळाला असून, तो तुरुंगातून बाहेर आला आहे.



Source link

Ashok Rane: मराठमोळ्या समीक्षकाचा कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरव; अशोक राणेंना मानाचा पुरस्कार प्रदान

0
Ashok Rane: मराठमोळ्या समीक्षकाचा कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरव; अशोक राणेंना मानाचा पुरस्कार प्रदान


या महिन्याच्या सुरुवातीलाच अशोक राणे यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. फिप्रेस्की इंडिया या संस्थेतर्फे सिनेमासंदर्भातलं उत्तमोत्तम लेखन करणाऱ्या लेखकाला हा पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी २०२१मध्ये अरुणा वासूदेव यांना तर, २०२२मध्ये शनमुगदास यांना सत्यजित रे स्मृती पुरस्कार देण्यात आला आहे. अशोक राणे हे गेली ४६ वर्ष सिनेमा संदर्भात लेखन करत आहेत. त्यांना या लेखनासाठी आजवर तीनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. असा पुरस्कार मिळवणारे ते मराठीतले एकमेव लेखक आहेत.



Source link

Sara Ali Khan: विकी कौशलसह सारा अली खान पोहोचली अजमेर शरीफ दर्ग्यावर! १८५ सदस्यांच्या कुटुंबाची घेतली भेट!

0
Sara Ali Khan: विकी कौशलसह सारा अली खान पोहोचली अजमेर शरीफ दर्ग्यावर! १८५ सदस्यांच्या कुटुंबाची घेतली भेट!


सारा अली खान आणि विकी कौशल या आपल्या लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. चाहत्यांच्या प्रचंड गराड्यात हे दोन्ही कलाकार बराच वेळ अडकले होते. मात्र, या गर्दीतून देखील ते दर्ग्यापर्यंत पोहोचले. यानंतर अस्तानामध्ये व्हरांड्यावर बसून सारा अली खानने काही वेळ प्रार्थना केली. त्याच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटासाठी दोघांनी प्रार्थना केली. कुणालाही कुणकुण लागू नये म्हणून हे कलाकार ऑटो रिक्षाने दर्गा शरीफ येथे पोहोचले होते. मात्र, तरीही लोकांनी त्यांना ओळखले.



Source link

Mukta Barve: नाट्यगृहांची वाईट अवस्था दाखवणाऱ्या कलाकारांनंतर आता मुक्ता बर्वेचा व्हिडीओ होतोय व्हायरल! म्हणाली…

0
Mukta Barve: नाट्यगृहांची वाईट अवस्था दाखवणाऱ्या कलाकारांनंतर आता मुक्ता बर्वेचा व्हिडीओ होतोय व्हायरल! म्हणाली…


आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नाटक, चित्रपट असो वा मालिका ती सगळ्याच अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुक्ता वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृह दाखवताना दिसत आहे. या नाट्यगृहाची चोख व्यवस्था, नाट्यगृह प्रशासन घेत असलेली काळजी, स्वच्छता या सगळ्या गोष्टी तिने आपल्या व्हिडीओमधून दाखवल्या आहेत. ‘चारचौघी’ या नाटकाच्या प्रयोगासाठी मुक्ता विष्णुदास भावे नाट्यगृहात होती. या दरम्यान तिने हा व्हिडीओ बनवला आहे.



Source link

Drishyam: कोरियन्सनाही बॉलिवूडची भुरळ! कान्समध्ये झाली ‘दृश्यम’ चित्रपटाच्या कोरियन रिमेकची घोषणा!

0
Drishyam: कोरियन्सनाही बॉलिवूडची भुरळ! कान्समध्ये झाली ‘दृश्यम’ चित्रपटाच्या कोरियन रिमेकची घोषणा!


Drishyam Movie Korean Remake: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्या ‘दृश्यम’ या चित्रपटाच्या कोरियन रिमेकची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.



Source link

Taarak Mehta : ‘तारक मेहता’च्या सेटवर कलाकारांची छळवणूक होते! ‘रिटा रिपोर्टर’नेही सांगितली आपबिती

0
Taarak Mehta : ‘तारक मेहता’च्या सेटवर कलाकारांची छळवणूक होते! ‘रिटा रिपोर्टर’नेही सांगितली आपबिती


प्रिया म्हणाली, ‘या उलट असित मोदी अनेकदा आपल्याला म्हणायचे की, तुला काम करण्याची गरज काय आहे?नवरा कमावतोय, तू राणीसारखी जगतेस.’ दरम्यान, मालवकडे काम असल्याने आणि ती बाकीचे शो देखील करत असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला नाही. पण मालवने शो सोडल्यापासून, असित मोदीने तिला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही आणि निर्मात्यांनीही तिच्याशी संपर्क साधलेला नाही. या सेटवर चुकीची आणि अपमानस्पद वागणूक मिळत असल्याची गोष्ट देखील तिने बोलून दाखवली. तर, इतर कलाकारांच्या आरोपांवर देखील तिने आपलं मत व्यक्त केलं.



Source link

Bharat Jadhav: पुन्हा रत्नागिरीत नाटक करणार नाही! भरत जाधव संतापले! नेमकं प्रकरण काय?

0
Bharat Jadhav: पुन्हा रत्नागिरीत नाटक करणार नाही! भरत जाधव संतापले! नेमकं प्रकरण काय?


‘एसी नसताना बंदिस्त नाट्यगृहात कशी अवस्था होते, हे कलाकाराच्या नजरेतून देखील पाहायला हवं. प्रचंड प्रकाशात काम करताना उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होते. प्रेक्षकांना तर उकाड्यासोबतच डासांचा त्रासही होतोय. तरीही प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकतात?’ असा सवाल करत त्यांनी रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही असे म्हटले आहे. तर, यावेळी त्यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी देखील मागितली आहे. केवळ भरत जाधवच नाही तर, अनेक कलाकारांनी नाट्यगृहांच्या अवस्थेवर वेळोवेळी भाष्य केलं आहे. मात्र, प्रशासनाला कधी जाग येणार, असा सवाल सगळेच करत आहेत.



Source link

Tu Chal Pudha: मयुरी-प्रतीकच्या प्रेमाला अश्विनी देणार का होकार? ‘तू चाल पुढं’मध्ये नवा ट्वीस्ट!

0
Tu Chal Pudha: मयुरी-प्रतीकच्या प्रेमाला अश्विनी देणार का होकार? ‘तू चाल पुढं’मध्ये नवा ट्वीस्ट!


Tu Chal Pudha Latest update: शिल्पीच्या खेळीला बळी पडून घराबाहेर निघालेली अश्विनी आता स्वतःचा संसार नव्याने उभा करत आहे. यात तिला पती श्रेयससह अनेकांची साथ मिळत आहे.



Source link