Friday, July 3, 2026
Home Blog Page 3046

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील त्या सीनमुळे अभिनेत्री सोनिया बलानी मिळतायत धमक्या!

0
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील त्या सीनमुळे अभिनेत्री सोनिया बलानी मिळतायत धमक्या!


‘आसिफा’ हे स्वार्थी आणि धूर्त पात्र आहे. सोनिया बालानीने सांगितले की, ‘द केरळ स्टोरी’ रिलीज झाल्यानंतर तिच्यावर एक-दोन नव्हे, तर खूप द्वेषयुक्त कमेंट्स आल्या. सोशल मीडियावर तिला धमक्या देण्यात आल्या, त्यामुळे ती खूप घाबरली होती. सोनिया म्हणाली की, हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक खूप संवेदनशील झाले आहेत. धमक्या मिळाल्यानंतर तिने घराबाहेर पडणे देखील बंद केले होते. मात्र, काहीही झाले तरी यात तिच्या कुटुंबाने तिची साथ सोडली नाही.



Source link

सातारा : ‘पुढारी’मुळे अल्पवयीन मुलांना सुसंस्काराची शिदोरी | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा शहरासह जिल्ह्यातील बालगुन्हेगारी कमी होऊन मुलांंमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी झाली पाहिजे. यासाठी ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त टीम ‘पुढारी’ने बाल निरीक्षण गृह सातारा कार्यालयातील मुलांना शेकडो पुस्तकांचे केलेले दान कौतुकास्पद आहे. ‘पुढारी’च्या या मोहिमेमुळे अल्पवयीन मुलांना सुसंस्काराची शिदोरी मिळणार असून, ही पुस्तके वाचून बालगृहाचे व स्वत:चे नाव उज्ज्वल करा, असे आवाहन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले. दरम्यान, पुस्तकदान उपक्रम ‘पुढारी’कारांचा प्रबोधनाचा वारसा पुढे नेणारा असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

जिल्ह्यातील बालगुन्हेगारी विरोधात दि. 1 जानेवारीला वर्धापनदिनी दै.‘पुढारी’ने युवकांच्या डोक्यात चांगले विचार येण्यासाठी सातारकरांना पुस्तके देण्याचे आवाहन केले होेते. या आवाहनाला जिल्हावासीयांनी भरभरुन प्रतिसाद दिल्यानंतर मिळालेल्या शेकडो पुस्तकांचे दान ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुण्यतिथी दिवशी शनिवारी येथील बालगृहात देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षक समीर शेख बोलत होेते. प्रारंभी सातारा कार्यालयात ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बालगृहात पुस्तके वाटप उपक्रम पार पडला. यावेळी ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवंधर चव्हाण, वृत्तसंपादक हरीष पाटणे, जाहिरात विभाग प्रमुख मिलिंद भेडसगावकर, बालगृहाचे संचालक शरद काटकर, बालगृहाच्या अधीक्षक संजीवनी राठोड, पोनि संजय पतंगे, पोनि विश्वजीत घोडके उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक समीर शेख म्हणाले, दै. ‘पुढारी’च्या सातारा टीमने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली असून सदृढ समाज निर्मितीत ‘पुढारी’चे योगदान मोलाचे राहिले आहे. अल्पवयीन मुलांमध्ये फोफावणार्‍या गुन्हेगारी विरोधात सुरु केलेली मोहीम पोलिस दलासाठीही दिशादर्शक ठरली. या मोहिमेने सातत्याने पोलिस प्रशासनाला प्रोत्साहीत केले. त्यातूनच आम्ही अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘उंच भरारी’ हा उपक्रम हाती घेतला असून, त्या माध्यमातून बेरोजगार युवकांना काम उपलब्ध करुन देत आहे.
शरद काटकर म्हणाले, ‘पुढारी’ परिवाराने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. अनाथ मुलांच्या हातात थोर व्यक्तींची चरित्र असणारी पुस्तके जात आहेत. त्यातून उद्याच्या भविष्यात चांगले अधिकारी घडतील.

प्रास्ताविकामध्ये हरीष पाटणे म्हणाले, दै. ‘पुढारी’चे संस्थापक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी सामाजिक बांधिलकीची शिकवण ‘पुढारी’ परिवाराला दिली. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव व ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनीही हाच वारसा जोपासत सामाजिक बांधिलकीची परंपरा अबाधित ठेवली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सातार्‍यात दै.‘पुढारी’ समाजाच्या सुख-दु:खाशी समरस असतो. ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुण्यतिथी दिवशी सातारा कार्यालयाकडून दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदा ‘पुढारी’ वर्धापनदिनापासून बालगुन्हेगारी विरोधात लढा उभारण्यात आला. अल्पवयीन गुन्हेगारी विरोधात समाजातून उठाव करतानाच अशा मुलांमध्ये वैचारिक परिवर्तन घडवण्याची जबाबदारी आम्ही उचलली. समाजाच्या सर्व घटकांनी ‘पुढारी’ला साथ दिली. अशा मुलांना संस्कारक्षम पुस्तके देण्यासाठी सातारकरांना वर्धापनदिनी आवाहन करण्यात आले होते. जिल्हावासीयांनी याला भरभरुन प्रतिसाद देत पुस्तके भेट दिली. तीच ही पुस्तके आज बाल निरीक्षण गृह व कारागृहात दिली जात आहेत. पुस्तक वाटपातून अल्पवयीन मुलांच्या मानसिकतेत बदल घडवण्याचा हा प्रयत्न आहे. यापुढेही हा सामाजिक वारसा तेवढ्याच सक्षमपणे पुढे नेणार आहोत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना मान्यवरांनी अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी बालकल्याण समिती अध्यक्ष अ‍ॅड. सुचित्रा काटकर, सदस्य स्वरूपा पोरे, जयदीप पाटील, सुनीता पवार, सुजाता देशमुख, चेतन भारती, तुषार सूरत्राण, टीम पुढारी, पोलिस उपस्थित होते.

पोलिसांच्या हातात हात घालून ‘पुढारी’ची मोहीम

अल्पवयीन गुन्हेगारीविरोधातील ‘पुढारी’चा उपक्रम स्तुत्य आहे. पोलिसांच्या हातात हात घालून ‘पुढारी’नेही ‘पुस्तकदान’ हा राबवलेला उपक्रम प्रेरणादायी असून, सातारा ‘पुढारी’ परिवाराचे करावे तेवढे कौतुक कमी आहे, असेही जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख म्हणाले.



Source link

सातारा : दुचाकी झाडावर आदळून युवकाचा मृत्‍यू | पुढारी

0









महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा महाबळेश्वर शहरापासून अंदाजे चार किमी अंतरावर क्षेत्र महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर कॅनॉट पीक पॉईंट परिसरात दुचाकी झाडावर धडकून झालेल्या अपघातात क्षेत्र महाबळेश्वर येथील ऋषिकेश विलास शिंदे (वय २०) हा युवक जागीच ठार झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महाबळेश्वर येथील रे गार्डन वाहनतळामध्ये ऋषिकेश शिंदे हा युवक कामाला होता. रात्री अकरा वाजता कामावरून तो क्षेत्र महाबळेश्वर येथे घरी जेवण्यासाठी गेला होता रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा रात्री नाईट ड्युटीवर क्षेत्र महाबळेश्वरहून महाबळेश्वरच्या दिशेने येत असताना कॅनॉट पीक पॉईंट पासून काही अंतरावर मुख्य रस्त्यावर विरुद्ध दिशेला जाऊन त्याची यामाहा आर वन फाईव्ह एम एच ११ डीजी ६०११ ही दुचाकी थेट झाडावर जाऊन आदळली.

हा अपघात इतका भीषण होता की, ऋषिकेश हा थेट जंगलामध्ये फेकला गेला. क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणाऱ्या लोकांनी अपघातग्रस्त दुचाकी पाहून क्षेत्र महाबळेश्वर मधील युवकांना संपर्क साधून या अपघाताची माहिती दिली. ऋषिकेश याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन जाण्यात आले, मात्र उपचारांआधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ऋषिकेश एक होतकरू युवक होता. त्‍याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार असून कुटुंबियांसह त्यांच्या मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचा :  











Source link

TMKOC: करिअर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या! ‘तारक मेहता..’च्या ‘बावरी’चे पुन्हा गंभीर आरोप

0
TMKOC: करिअर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या! ‘तारक मेहता..’च्या ‘बावरी’चे पुन्हा गंभीर आरोप


अभिनेत्रीने पुढे त्या दिवसांची घटना सांगितली, जेव्हा तिची दिवंगत आई कर्करोगावर उपचार घेत होती. आई रुग्णालयात असताना देखील निर्माते तिला सकाळी लवकर सेटवर येण्यास सांगायचे. तिला कोणत्याही कामाशिवाय सेटवर बोलावले जायचे. त्यावेळी तिचा कोणताही सीन देखील नसायचा. आईचे निधन झाल्यानंतरही असित मोदी यांनी तिला एकही फोन केला नाही, असा दावा तिने केला आहे. मोनिकाने पुढे आरोप केला की, निर्मात्याने तिचे करिअर बरबाद करण्याची धमकी दिली होती. मोनिका म्हणाली, ‘असित कुमार मोदीने मला मुंबईत काम न करण्याची धमकी दिली होती. मी आधीच आई गमावल्याच्या मानसिक आघातातून जात होतो आणि इथे तो मला माझे करिअर बरबाद करण्याची धमकी देत होता. याचा माझ्या करिअरला मोठा फटका बसला. नंतर मला काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.’



Source link

Adipurush : ‘आदिपुरुष’च्या नव्या गाण्याने रचला विक्रम; २४ तासांत मिळवले सर्वाधिक व्ह्यूज!

0
Adipurush : ‘आदिपुरुष’च्या नव्या गाण्याने रचला विक्रम; २४ तासांत मिळवले सर्वाधिक व्ह्यूज!


‘जय श्री राम’ गाण्याचा व्हिडीओ गेल्या २४ तासांत यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेला व्हिडीओ ठरला आहे. प्रसिद्ध झालेल्या अहवालाच्या आकडेवारीनुसार, ‘आदिपुरुष’ला २६,२९१,२३७ व्ह्यूज आणि ४,८४,१८६ लाईक्स मिळाले आहेत. या गाण्याने अक्षय कुमारच्या ‘क्या लोग तुम’ गाण्याला मागे टाकत गेल्या २४ तासांत सर्वाधिक व्ह्यूज मिळवले आहेत. गाण्याच्या लाँचिंगच्या वेळी या गाण्याच्या प्रवासाविषयी बोलताना गायक-संगीतकार अजय म्हणाले की, ‘या गाण्याचे नाव हीच आमची प्रेरणा आहे.’



Source link

Pushpa 2: ‘पुष्पा २’मध्ये होणार ‘श्रीवल्ली’चा मृत्यू? काय आहे व्हायरल फोटो मागचं सत्य? जाणून घ्या…

0
Pushpa 2: ‘पुष्पा २’मध्ये होणार ‘श्रीवल्ली’चा मृत्यू? काय आहे व्हायरल फोटो मागचं सत्य? जाणून घ्या…


सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये श्रीवल्लीचा मृतदेह तिरडीवर ठेवलेला दिसत आहे. रश्मिकाचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर ‘पुष्पा २’मध्ये श्रीवल्लीला मारले जाईल, खलनायक रश्मिकाचा जीव घेईल आणि आता पुष्पा त्याचा बदला घेईल, अशी या चित्रपटाची कथा असेल, असा अंदाज प्रेक्षक बांधत आहेत.



Source link

Abdu Rozik: ‘किसी का भाई किसी की जान’मधून अब्दूचा सीन का कापला? पाहा काय म्हणाला अभिनेता…

0
Abdu Rozik: ‘किसी का भाई किसी की जान’मधून अब्दूचा सीन का कापला? पाहा काय म्हणाला अभिनेता…


बॉलिवूड चित्रपटाचा भाग बनणे ही कुणासाठीही एक मोठी गोष्ट आहे. पण, चित्रपटातून एखाद्याचे सीन कापले गेले तर, मात्र पदरी निराशा पडते. अब्दु रोझिकच्या बाबतीतही तेच झालं. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात त्याला कास्ट करण्यात आले होते. मात्र, शेवटी या चित्रपटातून त्याचा सीन कट करण्यात आला होता. आता चाहत्यांचा संभ्रम दूर करत अब्दूने यामागचे नेमके कारण सांगितले आहे.



Source link

Aditya Chopra Birthday: फिल्मी स्टाईलने सुरू झाली होती आदित्य-राणीची प्रेमकथा; यश चोप्राही झालेले नाराज!

0
Aditya Chopra Birthday: फिल्मी स्टाईलने सुरू झाली होती आदित्य-राणीची प्रेमकथा; यश चोप्राही झालेले नाराज!


मात्र, वडील यश चोप्रा आदित्य आणि राणीच्या या नात्यावर खूप नाराज होते. यश यांच्या रागामुळे आदित्यला घर सोडून अनेक दिवस हॉटेलमध्ये राहावे लागले होते. अखेर आदित्यने २००९ मध्ये पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि २०१४ मध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीशी लग्न केले. दोघांचे डेस्टिनेशन वेडिंग इटलीमध्ये पार पडले होते. आता त्यांच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण झाली असून, या जोडीला आदिरा नावाची एक सुंदर मुलगी आहे.



Source link

Adipurush: ‘आदिपुरुष’च्या ‘जय श्रीराम’ गाण्याने जिंकलं चाहत्यांचं मन! सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ!

0
Adipurush: ‘आदिपुरुष’च्या ‘जय श्रीराम’ गाण्याने जिंकलं चाहत्यांचं मन! सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ!


Adipurush New Song: ‘आदिपुरूष’ चित्रपटातील ‘जय श्री राम’ हे गाणे प्रसिद्ध गीतकार मनोज मुंताशीर यांनी लिहिले आहे. या गाण्याला अजय-अतुल या शानदार जोडीने संगीत दिले आहे.



Source link

Tu Chal Pudha: विक्रमही सोडणार का शिल्पीची साथ? ‘तू चाल पुढं’मध्ये येणार नवा ट्वीस्ट!

0
Tu Chal Pudha: विक्रमही सोडणार का शिल्पीची साथ? ‘तू चाल पुढं’मध्ये येणार नवा ट्वीस्ट!


विद्युतशी घटस्फोट घेतल्यानंतर आता शिल्पी विक्रमशी लग्न करण्यासाठी धडपड करत आहे. विक्रमसोबत लग्न करण्यास परवानगी मिळावी म्हणून शिल्पी आई-बाबांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ती खास स्वयंपाकाचा बेत करते. आई-वडिलांशी ओळख करून देण्यासाठी विक्रमला जेवायला बोलवते. मात्र, आई-बाबा दोघेही जेवणावरून उठून जातात. यामुळे शिल्पी त्यांच्यावर प्रचंड संतापते. शिल्पीचं हे रूप पाहून आता विक्रम देखील पुरता गोंधळून गेला आहे. बाबा चिडले आहेत, हे लक्षात आल्यावर तो त्यांची समजूत काढयला जातो.



Source link