Friday, July 3, 2026
Home Blog Page 3047

Yash Chopra: रोमँटिक चित्रपटांचे जादूगार यश चोप्रा यांना बनायचे होते इंजिनिअर! पण मुंबईत आले अन्…

0
Yash Chopra: रोमँटिक चित्रपटांचे जादूगार यश चोप्रा यांना बनायचे होते इंजिनिअर! पण मुंबईत आले अन्…


Yash Chopra Life Story: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांनी पडद्यावर रोमान्स आणि प्रेमाला नवा अर्थ दिला आहे. त्यांनी ‘दीवार’, ‘कभी कभी’, ‘डर’, ‘चांदनी’, ‘सिलसिला’, ‘दिल तो पागल है’, ‘वीर झारा’ असे अनेक दमदार रोमँटिक चित्रपट केले आहेत. यश चोप्रा यांनी कधीच मद्यपान आणि धुम्रपान केले नाही. पण, त्यांना वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्याची खूप आवड होती. यश चोप्रा यांचा जन्म २७ सप्टेंबर १९३२ ला लाहोरमध्ये झाला आणि त्यांचे शालेय शिक्षण लाहोरमध्ये झाले. १९४५मध्ये त्यांचे कुटुंब पंजाबमधील लुधियाना येथे स्थायिक झाले. यश चोप्रा यांना एकेकाळी इंजिनिअर व्हायचे होते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी तो लंडनलाही जाणार होते. पण त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते. या दरम्यान त्यांना चित्रपटांची गोडी लागली.



Source link

Devoleena Bhattacharjee: लग्नाला लव्ह-जिहाद म्हणणाऱ्या नेटकऱ्यावर संतापली देवोलिना! म्हणाली ‘तुम्ही आम्हाला…’

0
Devoleena Bhattacharjee: लग्नाला लव्ह-जिहाद म्हणणाऱ्या नेटकऱ्यावर संतापली देवोलिना! म्हणाली ‘तुम्ही आम्हाला…’


Devoleena Bhattacharjee replay on Love Jihad: देवोलिना भट्टाचार्जीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या युजर्सची शाळा घेणं सुरू केलं आहे.



Source link

Salman Khan: मुंबईतील ‘या’ भागात सलमान खान बांधणार १९ मजल्यांचं आलिशान हॉटेल!

0
Salman Khan: मुंबईतील ‘या’ भागात सलमान खान बांधणार १९ मजल्यांचं आलिशान हॉटेल!


अभिनेता सलमान खान देखील वांद्र्याच्या याच भागात राहतो. त्याच्या घरापासून जवळच हा प्लॉट आहे. हॉटेलच्या प्लॉटवर आधी स्टारलेट नावाची सोसायटी होती, जिथे सलमान खान याच्या कुटुंबियांनी अपार्टमेंट खरेदी केली होती. सुरुवातीला या इमारतीचा पुनर्विकास करण्याची योजना बनली होती. मात्र, खान कुटुंबाने नंतर तो बेत बदलल्याचे सांगितले जात आहे.



Source link

3 Idiots: ‘महाराष्ट्र शाहीर’च्या यशानंतर ‘थ्री ईडियट्स’मधील मिलीमीटर दिसणार या चित्रपटात

0
3 Idiots: ‘महाराष्ट्र शाहीर’च्या यशानंतर ‘थ्री ईडियट्स’मधील मिलीमीटर दिसणार या चित्रपटात


दुष्यंत पुढे सांगतो की, नशिबाने आजवर मी केलेल्या भूमिकांमध्ये मला गेटअप साठी जास्त महत्व द्यावे लागले होते. थ्री ईडियट मध्ये मी नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला तरुण होतो, धर्मवीर मध्ये दिघे साहेबांच्या तरुण काळातला मित्र होतो, तर महाराष्ट्र शाहिर मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तरुणपणातील भूमिका होती. आता शिष्यवृत्ती सिनेमात मी जबाबदार शिक्षकाच्या भूमिकेत असणार आहे, यासाठी देखील माझा वेगळा गेटअप आहे. लवकरच तो तुमच्यासमोर येणार आहेच. जून महिन्यात शिष्यवृत्ती सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात माझ्या सोबत कमलेश सावंत, अनिकेत केळकर, उदय सबनीस, अंशूमन विचारे या कलाकारांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका असून रुद्र ढोरे प्रमुख बालकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.



Source link

Appi Amchi Collector: वडिलांना कळतील का अर्जुनचे कारनामे? मालिका रंजक वळणावर

0
Appi Amchi Collector: वडिलांना कळतील का अर्जुनचे कारनामे? मालिका रंजक वळणावर



Appi Amchi Collector Serial update: आता पियूला जे कळलं आहे ते ती बापू आणि अप्पीला सांगणार का? अर्जुनचे सत्य अप्पी समोर येईल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. 



Source link

Devara: ज्युनियर एनटीआरच्या ३०व्या चित्रपटाचं नाव ऐकलंत का? पोस्टर पाहून उडेल थरकाप!

0
Devara: ज्युनियर एनटीआरच्या ३०व्या चित्रपटाचं नाव ऐकलंत का? पोस्टर पाहून उडेल थरकाप!


ज्युनियर एनटीआरच्या ‘देवरा’ चित्रपटात सैफ अली खान आणि जान्हवी कपूर ज्युनियर एनटीआरसोबत दिसणार आहेत. ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांनी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ज्युनियर एनटीआरच्या या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे नाव ठरेपर्यंत या चित्रपटाला ‘NTR 30’ असे नाव देण्यात आले होते. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये, जोपर्यंत चित्रपटाचे शीर्षक ठरवले जात नाही, तोपर्यंत मुख्य अभिनेत्याच्या नावासोबत चित्रपटाचा क्रमांक जोडून चित्रपटाला तात्पुरते नाव दिले जाते.



Source link

सातारा : प्रांत कार्यालयातील दोन लाचखोर कर्मचारी गजाआड | पुढारी

0









कराड, पुढारी वृत्तसेवा : टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पात गेलेल्या जमिनींचे मूल्यांकन करून देण्यासाठी शेतकर्‍यांकडून वीस हजारांची लाच स्वीकारणार्‍या कराडच्या उपविभागीय कार्यालयातील दोघा कंत्राटी कर्मचार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात पकडले.

दिनकर रामचंद्र ठोंबरे (वय 70) आणि रामचंद्र श्रीरंग पाटील (70) अशी दोघा लाचखोर कर्मचार्‍यांची नावे आहेत. दिनकर ठोंबरे हे कालवा निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. कराडच्या उपविभागीय कार्यालयात त्यांना वरिष्ठ सहायक भूसंपादन या पदावर कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आले होते. तर रामचंद्र पाटील हे निवृत्त लिपिक असून त्यांना रेल्वे भूसंपादन लिपिक या पदावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात आली आहे.

या दोन्ही कर्मचार्‍यांविरोधात शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता संबंधित दोघा कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांकडे लाच मागितल्याचे समोर आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या सूचनेनुसार पोलीस उपाधीक्षक श्रीमती उज्ज्वल वैद्य, पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी शुक्रवारी सापळा लावला होता.

येरवळे येथील नऊ शेतकर्‍यांकडून उपसा जलसिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या जमिनीच्या मूल्यांकनासाठी पाठपुरावा केला जात होता. हे मूल्यांकन करण्यासाठी दोन्ही लाचखोर कर्मचार्‍यांनी मागणी केल्याप्रमाणे वीस हजाराची रक्कम स्वीकारली आणि त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी लाचखोर कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळपर्यंत शहर पोलीस ठाण्यात सुरु होती. त्यामुळे याबाबतचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.











Source link

सातारा : बंधार्‍यात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू | पुढारी

0


तारळे, पुढारी वृत्तसेवा : तारळी नदीवर असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍यावर मित्रांसोबत पोहायला गेलेल्या सतरा वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ओंकार धर्मेंद्र लोहार असे त्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच लोहार कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

बंधार्‍यात पाणी साठविण्यासाठी लोखंडी प्लेट लावून पाणी अडविण्यात आले असून त्या प्लेट योग्य पद्धतीने न बसविल्याने त्यात पोहताना ओंकारचा पाय अडकल्याचे समोर आले आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदारांच्या चुकीच्या कामाचा बळी गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. ओंकार बारावीला गेला आहे. वडील धर्मेंद्र हे लोहार काम करतात. आई गृहीणी आहे.

त्याचा मोठा भाऊ सुध्दा शिक्षण घेत आहे. ओंकार हा हुशार व चुणचुणीत असल्याने तो सर्वांचा लाडका होता. त्याचा मित्र परिवारही मोठा आहे. तो पट्टीचा पोहणारा बनला होता. पण गुरुवार मात्र त्याचा घातवार ठरला.

तारळी धरणाच्या पाण्यावर विभागातील शेती पाण्याखाली यावी यासाठी तारळी नदीवर अनेक कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. उन्हाळ्यापर्यंत नदीला पाणी रहावे यासाठी मोठ्या लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवले जाते. यासाठी कृष्णा खोरेकडून ठेकेदाराची नेमणूक केली आहे.

ओंकार नेहमीप्रमाणे मित्रांसोबत धनगरवाडी नजीक असणार्‍या कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यावर दुपारी चारच्या सुमारास पोहायला गेला होता. पोहत असताना अचानक ओंकार दिसत नसल्याचे मित्रांच्या लक्षात आले. त्यांनी इकडेतिकडे बघितले पण तो निदर्शनास आला नाही. मित्रांनी नातेवाईकांना कल्पना दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

काही तरूणांनी पाण्यात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. एका दरवाजाजवळ त्याचा मृतदेह हाताला लागत होता. पण त्याचे दोन्ही पाय लोखंडी प्लेटमध्ये अडकले होते. युवकांनी दोरीच्या सहाय्याने एकएक दरवाजा वर घेतला. पाणी कमी झाल्यानंतर ओंकार अडकलेल्या प्लेटपर्यंत तरूण पोहचले. लोखंडी प्लेट निघाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. तीन तासांच्या अथक मेहनतीनंतर ओंकारचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. कृष्णा खोरेच्या गलथान कारभाराने एका युवकाचा हकनाक बळी गेल्याचा आरोप करण्यात येत असून संबंधित अधिकारी व ठेकेदाराच्या चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

गावाला जाणार होता पण एसटी चुकली

ओंकार गुरुवारी दुपारी कोल्हापूरला नातेवाईकांकडे सुट्टीसाठी जाणार होता. पण एसटी न मिळाल्याने त्याचे जाणे रद्द झाले. यानंतर तो पोहायला गेला होता. तेथेच तो काळाच्या फेर्‍यात अडकला. या घटनेने लोहार कुटुबिय व त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे.



Source link

Shah Rukh Khan: ‘डॉन ३’ चित्रपटामधून शाहरुख खान आऊट; बॉलिवूडचा ‘बाजीराव’ करणार SRkला रिप्लेस!

0
Shah Rukh Khan: ‘डॉन ३’ चित्रपटामधून शाहरुख खान आऊट; बॉलिवूडचा ‘बाजीराव’ करणार SRkला रिप्लेस!


मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूडचा पठाण अर्थात शाहरुख खानने स्वत: या चित्रपटाची ऑफर नाकारली आहे. शाहरुखने नकार दिल्यानंतर हा चित्रपट रणवीर सिंहकडे गेला आहे. रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, शाहरुख खानला या चित्रपटाची स्क्रिप्ट फारशी रुचलेली नाही. त्याला असे व्यावसायिक चित्रपट करायचे आहेत, ज्यात प्रेक्षकांना आवडेल असाच मसाला असेल. तर, त्याच्या या यादीत ‘डॉन’ चित्रपट कुठेच बसत’ नव्हता. तर, रणवीर सिंह याने याआधी एक्सेल एंटरटेनमेंटसोबत ‘दिल धडकने दो’ आणि ‘गली बॉय’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे शाहरुखने नकार दिल्यानंतर हा चित्रपट रणवीरकडे गेला आहे.



Source link

Jr NTR Birthday: ‘आरआरआर’ फेम अभिनेता ज्युनियर एनटीआरबद्दल ‘या’ गोष्टी ऐकल्यात का?

0
Jr NTR Birthday: ‘आरआरआर’ फेम अभिनेता ज्युनियर एनटीआरबद्दल ‘या’ गोष्टी ऐकल्यात का?


Happy Birthday Jr NTR : साऊथ सुपरस्टार नंदामुरी तारका रामाराव अर्थात ज्युनियर एनटीआर आज (२० मे) आपला वाढदिवस साजर करत आहे. ज्युनियर एनटीआरचा जन्म २० मे १९८३ रोजी तेलंगणातील हैदराबाद शहरात झाला. अभिनेता ज्युनियर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांचा नातू. ज्युनियर एनटीआरचे वडील नंदामुरी हरिकृष्णा हे देखील प्रसिद्ध अभिनेते, चित्रपट निर्माता आणि राजकारणी होते. ज्युनियर एनटीआरने आपले प्रारंभिक शिक्षण हैदराबाद, तेलंगणा येथील ‘विद्यारण्य हायस्कूल, हैदराबाद’मधून केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने हैदराबाद येथील सेंट मेरी कॉलेज, हैदराबाद येथे प्रवेश घेतला आणि तेथून त्याने बी.टेक.ची पदवी प्राप्त केली.



Source link