
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाचे वडील, प्रसिद्ध ज्योतिषी पी खुराना यांचे निधन झाले आहे. आज १९ मे रोजी त्यांनी चंदीगढ येथील घरात अखेरचा श्वास घेतला. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मणिमाजरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाचे वडील, प्रसिद्ध ज्योतिषी पी खुराना यांचे निधन झाले आहे. आज १९ मे रोजी त्यांनी चंदीगढ येथील घरात अखेरचा श्वास घेतला. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मणिमाजरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरासह जिल्ह्यातील वाढत्या बालगुन्हेगारी विरोधात 1 जानेवारी 2023 रोजी दै.‘पुढारी’ने आक्रमक भूमिका घेऊन युवकांच्या डोक्यात चांगले विचार येण्यासाठी सातारकरांना पुस्तके देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्हावासीयांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर मिळालेल्या शेकडो पुस्तकांचे दान ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुण्यतिथी दिवशी शनिवार, दि. 20 मे रोजी सकाळी 11.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत येथील बाल सुधारगृह व जिल्हा कारागृहात केले जाणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शाळकरी, महाविद्यालयीन मुलांचा गुन्हेगारीमधील सहभाग कसा दिवसेंदिवस वाढत चालला आहे याबाबतची सातत्याने वृत्ते प्रसारित करून बाल गुन्हेगारी विरोधात ‘पुढारी’ने जोरदार आवाज उठवला. याच कालावधीत ‘पुढारी’च्या वर्धापनदिनी ‘पुढारी’ने ‘पुस्तक दान’ योजनेचे आवाहन केले. त्याला सातारकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली इनिसिएटिव्ह घेतले. समीर शेख यांनी ‘उंच भरारी’ हा उपक्रम हाती घेऊन युवकांमध्ये सकारात्मक बदल घडवला. पोलिस दलाने गेली पाच महिने मुले, युवक, त्यांचे पालक यांच्याशी संवाद साधला. संवाद साधून संबंधित युवकांना ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले आहे.
दै.‘पुढारी’ने राबवलेल्या पुस्तक दान या चळवळीत अजूनही कोणाला सहभागी व्हायचे असेल त्यांनी उद्या शनिवार, दि. 20 मे रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत दै.‘पुढारी’ कार्यालयात थोर व्यक्तींची आत्मचरित्रे, चरित्रे, जीवन सकारात्मक जगण्यासंबंधीची पुस्तके आणून द्यावीत. शनिवारी हीच पुस्तके सातार्यातील बाल सुधारगृहात व कारागृहात जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्या हस्ते दान केली जाणार आहेत.

नीतू कपूर यांनी खरेदी केलेल्या घराची बिल्डींग ही १९ मजल्यांची आहे. नीतू कपूर यांचे घर ५ बीएचके आहे. त्यांच्या घरात स्विमिंग पूल आहे ज्याचे तापमान कंट्रोल करता येणार आहे. तसेच जीम, स्क्वॅश कोर्ट आणि व्हर्चुअल गोल्फ देखील आहे. आता त्यांच्या घरातील फोटो समोर आले आहेत.
कराड : पुढारी वृत्तसेवा पुणे-बंगळूर महामार्गावर जुने टायर (स्क्रॅप) गोडावूनला काल (गुरूवार) रात्री उशिरा 11 वाजता भीषण आग लागली. अग्निशमाक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तब्बल दीड ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या विषयी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराडजवळ पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोटे- मुंढे गावच्या हद्दीत हॉटेल फर्नपासून काही अंतरावर अचानक आग लागली. आगीचे मोठ-मोठे लोट निर्माण झाल्याने काही क्षणातच महामार्गावरील वाहतूक खोळंबली.
घटनास्थळावरील काही लोकांनी अग्निशामक दलाच्या गाड्यांना फोन केला. यावेळी कराड नगरपालिका व कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्याचबरोबर कराड शहर पोलीस कर्मचारीही दाखल झाले होते. आगीमुळे विद्युत वाहक तारा जळून परिसरातील वीज पुरवठा काही वेळ ठप्प झाला होता. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा :

पुढे ती म्हणाली, ‘माझ्या आईच्या निधनानंतर मला धक्का बसला होता. सात दिवसांनंतर असितने मला फोन केला तोही शूटिंगवर परत येण्यासाठी. मी त्यांना शूट करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगितले. तर त्यांच्या टीमने आम्ही तुम्हाला पैसे देतोय त्यामुळे आम्ही सांगू तेव्हा तुम्हाला यावे लागेल. मग तुमची आई आजारी असू देत नाही तर आणखी काही. मला शूट करताना रडायला यायचं. पण माझ्याकडे पर्याय नव्हता. सेटवर असित मोदी कुत्र्यासारखी वागणूक द्यायचे.’

Get Together: “गेट टुगेदर” हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे
Source link

सध्या सोशल मीडियावर दिशा आणि राहुलचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहेत. मौनी रॉय, जस्मीन भसीन, वरुण सूद, अनीता हसनंदानी, अली गोनीसह अनेक सेलिब्रिटींनी राहुल आणि दिशाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Nawazuddin Siddiqui Birthday: आज नवाजुद्दीन सिद्दीकीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…
Source link

सलमान खानने इन्स्टाग्रामवर फोटो शेयर करत म्हटलं आहे की, संपूर्ण जगाचं ओझं तुमच्यावर आहे, असं तुम्हाला वाटतं. परंतु जगाचं जाऊ द्या, पाच किलोचा डम्बेल उचलून दाखवा, असं म्हणत सलमानने टायगर जखमी है, असं कॅप्शन दिलं आहे. टायगर ३ या चित्रपटाची शूटिंग सुरू असताना त्याच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्याचं व्हायरल फोटोतून दिसत आहे. सलमानला झालेली दुखापत किती गंभीर आहे, हे समजू शकलेलं नाही. परंतु जीम करत असताना सलमानने दुखापतीचा फोटो शेयर केल्यामुळं त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. सलमानने शेयर केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सातारा; प्रवीण शिंगटे : जिल्हा परिषदेने चालू सन 2023-2024 या वर्षातील रोजगार हमी योजनेचा 222 कोटी 46 लाख 5 हजार रुपयांचा आराखडा तयार केला असून, त्याला जिल्हा परिषदेच्या ठराव समिती सभेत मंजुरीही देण्यात आली आहे. या आराखड्यात गांडूळ खत युनिट, नाडेफ युनिट, फुलशेती, फळबाग लागवड, शेततळे, शेळीपालन शेड, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, शोषखड्डा, शौचालय, घरकुल, कुक्कुट पालन शेड, जनावरांचा गोठा, गोबर गॅस सयंत्र, पडीक जमिनीत फळबाग लागवड, ओढ्यालगत संरक्षक भिंत, पाणंद रस्ते अशी एकूण 37 हजार कामे प्रस्तावित केली आहेत. त्यामुळे गावोगावच्या नागरिकांच्या हाताला काम मिळणार आहे.
ग्रामीण भागातील बेरोजगारांना गावातच हक्काचा रोजगार मिळावा या उद्देशाने गावागावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे करण्याची मुभा ग्रामपंचायतींना देण्यात आली. मागेल त्याला गावातच वर्षभरातील किमान 100 दिवसांचा रोजगार या योजनेतून मिळावा. या उद्देशाने ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. रोजगार हमी योजनेतून ग्रामीण शेतकरी, शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा, महिला आणि दुर्बल घटकांचे सक्षमीकरण आणि पंचायतराज संस्थांना बळकट केले जात आहे.
रोहयो अंतर्गत सन 2023-24 या वर्षातील कामांचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या ठराव समितीच्या सभेत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्यात काँक्रीट नालाबांध, ग्रामपंचायत भवन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, नाला खोलीकरण, पाणंद रस्ते, पेव्हर ब्लॉक बसवणे, बिहार पॅटर्न वृक्षलागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सलग समतल चर, सार्वजनिक गोदाम, शेततळे, शोषखड्डा, सिंचन विहीर, स्मशानभूमी शेड व सुशोभीकरण, दगडी बांध, माती नालाबांध, रोपवाटिका, विहिरीतील गाळ काढणे, अंगणवाडी इमारत व किचन शेड, व्यायामशाळा, गांडूळखंत युनिट, शाळा स्वयंपाक गृह, संरक्षक भिंत, मल्टी युनिट शौचालय, शोषखड्डे, संरक्षक भिंत, खेळाचे मैदान, ओढा खोलीकरण रुंंदीकरण, सलग समतल चर अशी गाव विकासाची व शाळा विकासाची कामे करण्यात येणार आहेत.