Friday, July 3, 2026
Home Blog Page 3049

Aai Kuthe Kay Karte : वीणा अनिरुद्धवर डोळे झाकून विश्वास ठेवतेय, मालिकेत वेगळे वळण

0
Aai Kuthe Kay Karte : वीणा अनिरुद्धवर डोळे झाकून विश्वास ठेवतेय, मालिकेत वेगळे वळण


वीणा लगेच पेन घेते आणि त्यावर सही करण्यास तयार होते. तेवढ्यात अनिरुद्ध तिला थांबवतो आणि म्हणतो, ‘कितीही जवळचं नातं असतलं तरीही न वाचता घेतलेले निर्णय चांगले नसतात.’ ते ऐकून आशुतोष आणि वीणाला धक्का बसतो. वीणा पेपर अनिरुद्धकडे देते. तेवढ्यात अरुंधती वीणाला म्हणते की, ‘जर पेपर तू वाचणार आहेस तर ते तुझ्याकडेच राहू दे.’ ते ऐकून अनिरुद्ध चकीत होतो.



Source link

TMKOC: जेनिफरला एक्स दिग्दर्शकाचा पाठिंबा, असित मोदींना फटकारले

0
TMKOC: जेनिफरला एक्स दिग्दर्शकाचा पाठिंबा, असित मोदींना फटकारले


पुढे ते म्हणाले की, ‘मी १४ वर्षे सेटवर होतो आणि जेनिफरने कधीही माझ्यासमोर कोणाशी गैरवर्तवणुक केली नाही. तिने सेटवर कधी कोणाला शिवीगाळ देखील केली नाही. असित मोदीने जेनिफरवर अनेक आरोप केले. पण १४ वर्षात एकदाही मी तिचे असे वागणे पाहिले नाही. तिच्या वागण्याने कधीही शुटचे नुकसान झाले नाही. अनेक कलाकार सेटवर उशिरा येतात आणि आपल्याला मुंबईचे ट्राफिक माहिती आहे. त्यामुळे अर्धा तास उशिरा येणे हे सर्वांना मान्य असते. असे अनेकदा झाले आहे की कलाकारांनी १२ पुढे चित्रीकरण ढकले. १४ वर्षात जेनिफरमुळे माझे कधीही नुकसान झाले नाही. उलट अनेकदा जेनिफरने कोणतीही तक्रार न करता स्वत:चा मेकअप स्वत: केला आहे.’



Source link

सातारा : शिवेंद्रराजेंना पाडूनच रिटायरमेंट घेणार : दीपक पवार | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा-जावळी मतदार संघात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आ. शिवेंद्रराजे भोसले यांना पाडणार म्हणजे पाडणारच आहे. त्यांना पाडूनच मी रिटायरमेंट घेणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी आ. शिवेंद्रराजे यांना लगावला. तर सातारा नगरपालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याचे पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दीपक पवार म्हणाले, जावळी तालुक्यातील प्रश्नांबाबत आणि विकास कामांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. कुडाळ (ता. जावली) येथील मार्केट कमिटीच्या मैदानावर दि. 7 जूनला सकाळी 11 वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे. त्या सभेला खा. शरद पवार यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची जाहीर सभा जावली तालुक्यात झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगले चार्ज होवून कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यात चांगले वातावरण तयार झाले आहे.

दीपक पवारांनी रिटायरमेंट घ्यावी, असे आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले होते. या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, मी विधानसभेची निवडणूक लढवली आहे. माझी सातारा-जावली मतदार संघातून 2024 साठी तयारी सुरू आहे. त्याच निवडणुकीमध्ये आ. शिवेंद्रराजे यांना पाडणार म्हणजे पाडणारच. त्यांना पाडूनच मी रिटायरमेंट घेणार आहे. सातारा नगरपालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार आहोत. त्याच अनुषंगाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांच्यासमवेत बैठका झाल्या आहेत. आणखी बैठका होणार असून जागा वाटपावर चर्चा होणार आहे. आ. शशिकांत शिंदे हेही पालिकेच्या निवडणुकीत आमच्यासोबत असणार आहेत.

जावली, महाबळेश्वर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, जावली बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एकाधिकारशाही, हुकूमशाही चालू नये म्हणून माजी आ. सदाशिव सपकाळ यांना सोबत घेऊन पॅनेल टाकले. ही सहकाराची निवडणूक होती. पक्षीय पातळीवरची निवडणूक नव्हती. तरीही पक्षाविरोधात ज्यांन-ज्यांनी त्या निवडणुकीत भूमिका घेतली होती. त्याबाबतची तक्रार पक्षाकडे झाली असून पक्षाने तशी नोंद घेतल्याचे त्यांनी सांगितले.











Source link

Anurag Kashyap: दारुच्या नशेत तर्र अनुराग कश्यपला ‘या’ विमानतळावर झाली होती अटक

0
Anurag Kashyap: दारुच्या नशेत तर्र अनुराग कश्यपला ‘या’ विमानतळावर झाली होती अटक



Anurag Kashyap: अनुराग कश्यपने सांगितला विमानतळावरील किस्सा. त्याला कसे सोडण्यात आले याबाबतही त्याने खुलासा केला आहे.



Source link

सांगली : शिराळा येथे अल्पवयीन मुलीसोबत विवाह; विवाह जुळवणार्‍यासह 8 जणांवर गुन्हा | पुढारी

0









शिराळा : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी राजेद्र शंकर शेवाळे (वय 31, रा. येवती-शेवाळवाडी, ता. कराड, जि. सातारा) यास शिराळा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 22 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. हा विवाह 29 एप्रिल रोजी शिराळा येथे झाला होता. याबाबत कराड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विवाह लावणार्‍यासह आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी राजेंद्र शेवाळे तसेच संगनमताने बालविवाह लावल्याबद्दल मुलीच्या वडिलांसह आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शिराळा येथे झाल्याने शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आष्टा (ता. वाळवा) येथे कर्नाटक राज्यातील एक कुटुंब व्यवसायासाठी राहत होते. यातील एका अल्पवयीन मुलीशी राजेंद्र शेवाळे याचा विवाह करण्यात आला. हा विवाह जुळवण्यासाठी इस्लामपूर येथील ताई मोरे नामक महिलेने पुढाकार घेतला होता. या ताई सोबत राजेंद्र शेवाळे, व त्याचे मामा तातोबा वासु पाटील, मामी त्याचे चुलते बापुराव शेवाळे, चुलती यांनी मुलीच्या घरी येऊन मुलगी पाहण्याचा कार्यक्रम केला.

त्यानंतर शिराळा येथील बबन बाळकृष्ण शेवाळे यांच्या पाहुण्याचे घरी विवाह लावण्यात आला. यानंतर लग्नाच्या मध्यस्थी ताई हिने तिने फिर्यादीला शितुर (ता. शाहूवाडी) येथे मुलाचे चुलता बापुराव शेवाळे याच्या घरामध्ये बोलावुन घेऊन मुलीच्या वडिलांना व ताई या दोघांना 25 – 25 हजार रुपये दिले होते.

फिर्यादीने आपली मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहित असताना सुध्दा फिर्यादीचा विश्वास संपादन करून तिची फसवणुक करुन अल्पवयीन मुलीचा बालविवाह करुन तिच्याशी वेळोवेळी तिच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले बाबत संशयित आरोपी राजेंद्र शेवाळे याच्याविरुद्ध फिर्याद दिली. चुलता बाबुराव आनंदा शेवाळे , चुलती संगीता बाबुराव शेवाळे ( सर्व रा. येवती) , मामा तातोबा वासू पाटील , मामी ( रा.शित्तुर) , मध्यस्थी ताई मोरे ( रा. इस्लामपूर ) , लग्न लावणारा भटजी , फिर्यादीचा पती ( रा. आष्टा) , बबन कृष्णा शेवाळे ( रा. शिराळा) या आठ जणांविरुद्ध आपापसांत संगणमत करून फिर्यादी व फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीच्या वाडीलास पैसे देवुन तिचा बालविवाह लावून दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











Source link

सातारा : लघुपाटबंधारेतील कर्मचार्‍याला मारहाण; युवतीसह कुटुंबीयांवर गुन्हा; लग्न करण्यासाठी तगादा | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा : संगमनगर, ता. सातारा येथील लघुपाटबंधारे विभागातील कर्मचारी रवींद्र अशोक बोभाटे (वय 36, रा. मळुकवाडी, पो. तासगाव, ता. सातारा) यांना युवतीसह तिच्या कुटुंबीयांनी कार्यालयाच्या परिसरात मारहाण केली. या घटनेत कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी कर्मचार्‍याने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून युवतीसोबत लग्न करीत नसल्याच्या कारणातून हा राडा झाल्याचे समोर आले आहे.

ही घटना दि. 13 मे रोजी सकाळी 11.30 वाजता पाटबंधारे विभाग येथे घडली आहे. रवींद्र बोभाटे यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, त्यांची संबंधित युवतीसोबत व तिच्या कुटुंबीयांसोबत ओळख आहे. घरकूल मंजुरीसाठी युवतीसह कुटुंबीय येत होते. त्यातूनच युवतीचा मोबाईल क्रमांक तक्रारदार यांना मिळाला व 2017 पासून ते एकमेकांच्या संपर्कात आले.

मोबाईलवरून युवतीसोबत त्यांचा संपर्क वारंवार होऊ लागला. त्यातून त्यांची चांगली ओळख होऊन ते मित्र बनले. युवतीने पैसे मागितल्यानंतर वेळोवेळी तिला 5, 10 हजार तसेच एकदा 1 लाख रुपये असे एकूण 4 लाख रुपये दिले. यातून संबंधित युवती तक्रारदार यांच्या प्रेमात पडली व तिने लग्न करण्याची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने त्यांचे लग्न झाल्याचे सांगून लग्नाला नकार दिला. लग्नाला नकार ऐकताच संबंधित युवतीने तक्रारदार यांच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच तिला लागतील तेव्हा पैसे द्यायचे, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली आणि वेळोवेळी पैसे घेतले. दि. 13 मे रोजी तक्रारदार बोभाटे कार्यालयाबाहेर थांबले असताना संबंधित युवती, तिची आई व भाऊ असे एकत्र आले. संबंधितांनी पुन्हा लग्न करण्याची मागणी करीत त्यांच्याशी हुज्जत घातली. यातूनच संशयितांनी लाथा-बुक्क्यांनी व काठीने तक्रारदार यांना मारहाण केली. या घटनेत तक्रारदार जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करुन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी युवतीसह कुटुंबीयांविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पंचायत समितीमध्ये झाली ओळख

तक्रारदार यांच्या पत्नी पंचायत समितीच्या सदस्या आहेत. पत्नीसोबत त्यांचे पंचायत समितीमध्ये जाणे-येणे असायचे. यातूनच तक्रारदार यांची युवतीसह कुटुंबीयांची ओळख झाली. तसेच तक्रारदार बोभाटे यांचे एक नातेवाईक संबंधित कुटुंबीयांच्या गावात राहत असल्याने त्यांची ओळख आणखी घट्ट झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.











Source link

Prathamesh Parab: ‘दगडू’चा नवा सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, शुटिंगला सुरुवात

0
Prathamesh Parab: ‘दगडू’चा नवा सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, शुटिंगला सुरुवात


प्रथमेशने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाल्याचे पोस्ट शेअर सांगिलते आहे. या पोस्टमध्ये प्रथमेशने लिहिले आहे की, “एक नवीन सुरुवात. खूप सुंदर विषय, आणि मातृदिन सोबत या सिनेमाचे खूप गोड नातं आहे.” प्रथमेश ने दिलेल्या या कॅप्शन मुळे हा चित्रपट एका वेगळ्याच धाटणीचा असणार आहे, यात वाद नाही. शिवाय प्रथमेश देखील एका वेगळ्या रूपात या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.



Source link

Neetu Kapoor: नीतू कपूर यांनी मुंबईत खरेदी केले लग्झरी घर, किंमत ऐकून व्हाल आवाक

0
Neetu Kapoor: नीतू कपूर यांनी मुंबईत खरेदी केले लग्झरी घर, किंमत ऐकून व्हाल आवाक


यापूर्वी नीतू कपूर यांची सून अभिनेत्री आलिया भट्टने पाली हिल्स परिसरात ३७ कोटी ८० लाख रुपयांचे घर खरेदी केले. हे घर २४९७ क्वेअर फीट असून वांद्रे येथील एरियल व्ह्यू कॉपरेटिव हाउसिंग सोयासटीमध्ये आहे. आलिया भट्टने या घरासाठी २ कोटी २६ लाख रुपये स्टँप ड्यूटी भरली आहे. ज्या दिवशी हे घर रजिस्टर झाले त्याच दिवशी आलियाने बहिण शाहीन भट्टला मुंबईत दोन घरे गिफ्ट म्हणून दिली. या दोन्ही घरांची किम्मत जवळपास ७ कोटी ६८ लाख रुपये आहे.



Source link

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ची कथा सत्यच; पीडित मुली अखेर कॅमेऱ्यासमोर

0
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ची कथा सत्यच; पीडित मुली अखेर कॅमेऱ्यासमोर


अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटावर काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे तर काही ठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. चित्रपटात केरळच्या तीन मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्यांचे धर्मांतर केले जाते. या चित्रपटाची कथा खोटी असल्याचा अनेकांनी आरोप केला. आता या मुली कॅमेरा समोर आल्या असून हा चित्रपट सत्य घटनेवर असल्याचा दावा त्यांनी केला.



Source link

Arpita Khan Robbed: सलमान खानची बहिण अर्पिता खानच्या घरी झाली चोरी

0
Arpita Khan Robbed: सलमान खानची बहिण अर्पिता खानच्या घरी झाली चोरी


तक्रारीनंतर पोलीस तपासात गुंतले. त्यांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. ‘पीटीआय’नुसार, खार पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अर्पिता खारमधील १७ रोडवरील एका उंच इमारतीत राहते. तेथे अर्पिताच्या नोकराने तिचे हिऱ्याचे झुमके चोरले. तांत्रिक व इतर बाबींच्या मदतीने संदीप हेगडे याला पकडण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.



Source link