Friday, July 3, 2026
Home Blog Page 3041

Karan Johar Birthday: ‘या’ अभिनेत्रीवर जडला होता करण जोहरचा जीव; पण अधुरीच राहिली प्रेमकहाणी!

0
Karan Johar Birthday: ‘या’ अभिनेत्रीवर जडला होता करण जोहरचा जीव; पण अधुरीच राहिली प्रेमकहाणी!


करण जोहर आणि ट्विंकल खन्ना हे बालपणापासूनच मित्र आहेत. दोघेही एकाच बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होते. इतकेच नाही, तर करण जोहर जेव्हा ‘कुछ कुछ होता है’ बनवत होता, तेव्हा त्याने राणी मुखर्जीची म्हणजेच ‘टीना’ची भूमिका ट्विंकल खन्नाला ऑफर केली होती. पण, ट्विंकलने करण जोहरची ऑफर नाकारल्याने त्याचे मन दुखावले होते. यानंतर दोघांची ही प्रेमकहाणी अधुरीच राहिली. तर, ट्विंकल खन्ना हिने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्नगाठ बांधली.



Source link

Sirf Ek Bandaa Kaafi Hai: मनोज बाजपेयीचा चित्रपट म्हणजे मास्टरपीस! पाहा प्रेक्षकांना कसा वाटला ‘सिर्फ एक बंदा काफी है..’

0
Sirf Ek Bandaa Kaafi Hai: मनोज बाजपेयीचा चित्रपट म्हणजे मास्टरपीस! पाहा प्रेक्षकांना कसा वाटला ‘सिर्फ एक बंदा काफी है..’


अपूर्व सिंह कार्की दिग्दर्शित, ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटामध्ये मनोज बाजपेयीने पीसी सोलंकीची भूमिका केली आहे, ज्यांनी अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा दिला. या चित्रपटात दाखवण्यात आले आहे की, एका अध्यात्मिक गुरुवर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप आहे आणि त्याला पोक्सो कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. यानंतर मनोज बाजपेयीने साकारलेले पात्र, कोर्टात या मुलीसाठी लढतो आणि प्रक्रियेत त्याला खूप त्रास सहन करावा लागतो.



Source link

सातारा : माणदेश पुन्हा ठरला गुणवंतांची खाण; ओंकार गुंडगे यांचे यश दुष्काळी पट्ट्यासाठी अभिमानास्पद | पुढारी

0









सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा दुष्काळी पट्ट्यातील दहिवडी (ता. माण) येथील ओंकार राजेंद्र गुंडगे यांनी युपीएससी परीक्षेमध्ये देशात ३८० वी रँक मिळवत माणदेश गुणवंतांची खाण असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. दहिवडीतील पहिला आयएएस होण्याचा मान त्यांनी मिळवला असून अथक प्रयत्नातून यश मिळवून प्रशासकीय सेवेत उमटवलेली मोहोर कौतुकाचा विषय ठरली आहे. त्यामुळे दहिवडीत फटाके फोडून व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

दररोज आठ तास अभ्यास, एक तास व्यायाम तसेच खेळाला वेळ देत ओंकार यांनी आरोग्याकडे विशेष लक्ष दिले. अभ्यासाचा ताण हलका होण्यासाठी खेळ व व्यायाम आवश्यक आहे. वाचनाबरोबरच अभ्यासाची उजळणी करावी. आंधळेपणाने यूट्युबवर कोणालाही फॉलो न करता स्वतः ची शैली निर्माण करावी, असा सल्ला ओंकार गुंडगे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला.
पहिल्याच प्रयत्‍नात इंटरव्ह्यूमध्ये यश मिळवले.

आई सुवर्णा व वडील राजेंद्र गुंडगे हे दहिवडी येथील प्रतिष्ठीत कापड व्यापारी असून, मुलाच्या ध्येयप्राप्तीसाठी त्यांनी खंबीर साथ दिली. ओंकार यांनी मिळवलेले यश माणदेशासाठी गौरवाची बाब ठरली.

या यशाबाबत ओंकार गुंडगे म्हणाले, ग्रामीण भागाची नाळ जोडली असल्याचा फायदा झाला. आपली नैसर्गिक प्रकृती सांभाळून अभ्यास करावा. स्पर्धा परीक्षेसोबत प्लॅन बी तयार असणे गरजेचे आहे. आयएएस किंवा आयपीएसमध्ये जेथे संधी मिळेल तेथे शंभर टक्के योगदान देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 











Source link

Butterfly Movie: ‘मेघा’च्या आयुष्यातील रंजक गोष्ट सांगणारं ‘कोरी कोरी झिंग’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

0
Butterfly Movie: ‘मेघा’च्या आयुष्यातील रंजक गोष्ट सांगणारं ‘कोरी कोरी झिंग’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!


Butterfly Marathi Movie Kori Kori Zing: आयुष्याला लखलख लाइटिंग झाल्यामुळे, कोषातून बाहेर पडून जगणाऱ्या तिची गोष्ट ‘बटरफ्लाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.



Source link

Nitesh Pandey Death: ‘अनुपमा’ फेम अभिनेते नितेश पांडे यांचे निधन; ५१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
Nitesh Pandey Death: ‘अनुपमा’ फेम अभिनेते नितेश पांडे यांचे निधन; ५१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


नितेश यांनी ‘बधाई दो’, ‘रंगून’, ‘दबंग २’, ‘खोसला का घोसला’, ‘एक प्रेम कहानी’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ यासारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्येही काम केले आहे.



Source link

अनुपमा मालिकेत भूमिका साकारणारे नितीश पांडे यांचे निधन

0
अनुपमा मालिकेत भूमिका साकारणारे नितीश पांडे यांचे निधन



‘अनुपमा’मध्ये रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारणाऱ्या नितीश पांडे यांचे निधन झाले आहे. काल 23 मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.अभिनेता 51 वर्षांचा होता. तो आता आपल्यात नाही.

यापूर्वी ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ अभिनेत्री वैभवी उपाध्याय यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत शोककळा पसरली होती आणि आता नितीश पांडे यांच्या जाण्याने लोकांनाही धक्का बसला आहे.

लेखक सिद्धार्थ नागर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. याबाबत त्यांनी सर्वप्रथम फेसबुकवर पोस्ट टाकून माहिती दिली.

ते एका कार्यक्रमातून परतत असताना त्यांना नितीश पांडे यांच्या निधनाची बातमी मिळाली. त्यांनी सांगितले की, नितीश शूटिंगसाठी इगतपूरला गेले होते. तेथे रात्री दीडच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. 

नितीश पांडे यांनी 1995 पासून टीव्हीच्या दुनियेत काम करण्यास सुरुवात केली. ‘तेजस’, ‘सया’, ‘मंजिलें अपनी अपनी’, ‘जस्तजू’, ‘हम लड़कियाँ’, ‘सुनैना’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘एक रिश्ता पार्टनरशिप का’, ‘महाराजा की’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. जय हो’, ‘हीरो-गैब मोड ऑन’ करण्यासोबतच तो ‘अनुपमा’मध्ये धीरज कपूरच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय त्याने ‘बधाई दो’, ‘मदारी’, ‘दबंग 2’ सारख्या चित्रपटातही काम केले.



Source link

Sanya Malhotra: दिल्ली मेट्रोमध्ये सान्या मल्होत्राची छेडछाड; आपबिती सांगताना अभिनेत्री म्हणाली…

0
Sanya Malhotra: दिल्ली मेट्रोमध्ये सान्या मल्होत्राची छेडछाड; आपबिती सांगताना अभिनेत्री म्हणाली…


Sanya Malhotra : ‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला एक भयानक प्रसंग सांगितला आहे.



Source link

‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात मृत्यू

0
‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात मृत्यू


छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे निधन झाले आहे. मंगळवारी (२३ मे) रोजी एका भीषण रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला. ती ३२ वर्षांची होती. वैभवी उपाध्यायच्या निधनामुळे सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभवी उपाध्यायच्या कारचा अपघात सोमवारी (२२ मे) हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाणी झाला. हा अपघात इतका भीषण होता की वैभवीचा जागीच मृत्यू झाला.

वैभवी ही तिच्या होणाऱ्या पतीबरोबर फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी एका वळणावर त्यांची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि हा अपघात झाला. या अपघातानंतर त्यांची कार थेट दरीत कोसळली. वैभवीच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेचे निर्माते जेडी मजेठीया यांनी अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. वैभवीच्या निधनाबद्दल बोलताना जेडी म्हणाले की, “मला खरच खूप मोठा धक्का बसला आहे. ती एक सुंदर व्यक्ती आणि अफलातून अभिनेत्री होती. आयुष्य किती अनिश्चित आहे हे पुन्हा एकदा समोर आलं.”

वैभवीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘सीआयडी’, ‘अदालत’ आणि ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या तिच्या काही गाजलेल्या मालिका आहेत. यातही ‘साराभाई’ या मालिकेतील जास्मीन या पात्राने तिला विशेष ओळख मिळवून दिली. वैभवीने २०२० मध्ये ‘छपाक’ या चित्रपटातही काम केले होते. यावेळी ती प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणबरोबर झळकली होती. 

त्याबरोबरच तिने ‘तिमिर’ (२०२३) या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गुजराती कलाविश्वात तिचं मोठं नाव होतं. वैभवीने ‘क्या कसूर है अमला का’ आणि ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ या डिजीटल सीरिजमध्येही काम केले.





Source link

Akshay Kumar Video: अक्षय कुमार भोलेबाबाच्या चरणी लीन; केदारनाथमध्ये जाऊन घेतलं महादेवाचं दर्शन!

0
Akshay Kumar Video: अक्षय कुमार भोलेबाबाच्या चरणी लीन; केदारनाथमध्ये जाऊन घेतलं महादेवाचं दर्शन!


यापूर्वी अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर केदारनाथ मंदिराचा फोटो शेअर केला होता. ही पोस्ट शेअर करत त्याने ‘जय बाबा भोलेनाथ’ असे कॅप्शन लिहिले होते. अभिनेत्याच्या या फोटोवर चाहते प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत. अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो अखेर इमरान हाश्मीसोबत ‘सेल्फी’ या चित्रपटामध्ये झळकला होता. या चित्रपटात अभिनेत्री डायना पेंटी आणि नुसरत भरुचाही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकल्या होत्या. मात्र, त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. आता अक्षयकडे ‘कॅप्सूल गिल’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘ओह माय गॉड २’ असे बिग बजेट चित्रपट आहेत.



Source link

Aditya Singh Rajput: भावाला मृत्यूशय्येवर पाहून बहीण धायमोकलून रडली; व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले भावूक

0
Aditya Singh Rajput: भावाला मृत्यूशय्येवर पाहून बहीण धायमोकलून रडली; व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले भावूक


Aditya Singh Rajput Funeral: आदित्य सिंह राजपूत यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भावाच्या विरहाने बहिणीची अवस्था रडून रडून वाईट झाली आहे.



Source link