Friday, July 3, 2026
Home Blog Page 3040

सदाभाऊ खोत यांचा साता-यात रास्‍ता रोको; तीन दिवसात निर्णय झाला नाही तर मंत्रालयावर धडक मारण्याचा इशारा | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा : कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाय, रयत क्रांती संघटनेचा विजय असो, सदाभाऊ तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली निघालेली कऱ्हाड ते सातारा ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्राचे आज साताऱ्यात आगमन झाले. तत्पूर्वी शिवराज चौकात खोत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

त्यानंतर पदयात्रा बॉम्बे चौकातून सातारा शहरातील पोवई नाका येथे आली. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. कऱ्हाड (जि.सातारा) येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन करून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कऱ्हाड ते सातारा ‘वारी शेतकऱ्यांची’ या पदयात्रेस प्रारंभ झाला होता. आज ही यात्रा साताऱ्यात दाखल झाली. तत्पूर्वी खिंडवाडी ते शिवराज पेट्रोलपंपाच्या दरम्यान, यात्रा आल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी महामार्गावरच ठिय्या मारला. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. आमच्या मागण्यांकडे लक्ष दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे सदाभाऊंनी ठणकावले. कऱ्हाडमधून साताऱ्यापर्यंत आम्ही गावगाढ्याचे प्रश्न घेवुन पदयात्रा काढली आहे. या तीन दिवसात सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देईल, अशी आशा असल्याचे खोत यांनी म्हटले आहे. तीन दिवसात निर्णय झाला नाही तर मुंबईला मंत्रालयावर धडक मारण्याचा इशाराही खोत यांनी दिला आहे.











Source link

सातारा : ग्रामसेवकाकडून विस्‍तार अधिकार्‍याने घेतली लाच | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : वडूज पंचायत समितीचा विस्‍तार अधिकारी संजय विलासराव सोनावले (सध्या रा.केसकर पेठ, सातारा. मूळ रा. पाली ता.कराड, सातारा) याने कारणे दाखवाची नोटीसच्या अनुषंगाने कारवाई टाळण्यासाठी ग्रामसेवकाकडून १२ हजार रुपयांची लाच घेतली. वडूज पंचायत समितीच्या कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडून कारवाई केली.

गुरुवारी दुपारी एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. संशयिताला एसीबी विभागाने अटक केली असून शासकीय नोकरीच्या ठिकाणी त्रास देवून पैसे उकळले जात असल्‍याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार ग्रामसेवक आहेत. तक्रारदार यांनी तक्रारीत म्‍हटले आहे की, संशयित विस्‍तार अधिकारी सोनावले हा पंचायत समितीच्या कामकाजामध्ये चुका काढून त्‍यांना मानसिक त्रास देत होता. तसेच वरिष्ठांना कसूरी अहवाल पाठवून निलंबित करु, अशा धमकीही देत होता. अशाच एका प्रकरणामध्ये तक्रारदार यांना विस्‍तार अधिकारी सोनावले याने कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीसीमध्ये कारवाई न करण्यासाठी संशयित सोनावले याने लाचेची मागणी केली.











Source link

Rang Maza Vegla: अखेर दीपाला सत्य समजणार! आयेशा विरोधातील पुरावे मिळवू शकणार?

0
Rang Maza Vegla: अखेर दीपाला सत्य समजणार! आयेशा विरोधातील पुरावे मिळवू शकणार?


कार्तिक आणि दीपा इनामदार यांच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी घाडगे वकिलाने आता आयेशा आणि तिच्या कुटुंबाला हाताशी धरलं होतं. एकाच दगडात दोन पक्षी मारता यावेत असा डाव त्याने आखला होता. मात्र, आता त्याचा हाच डाव त्याच्यावर उलटला आहे. एकीकडे त्याने आयेशाला एका गुन्हातून बाहेर काढून तिच्या कुटुंबाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. दीपाची मैत्रीण साक्षी हिचा खून कार्तिकने नव्हे तर, आयेशाने केला आहे, हे सत्य आता तो दीपाला सांगून टाकणार आहे. घाडगे वकिलाने स्वतःच्या डावात आयेशाच्या बहिणीचा मुलगा आर्यन याला देखील सामील करून घेतलं होतं. मात्र, आता हा खेळ त्याच्या जीवावर बेतणार आहे.



Source link

Tu Chal Pudha: अखेर प्रतीकला ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा येणार समोर! ‘तू चाल पुढं’मध्ये ट्वीस्ट

0
Tu Chal Pudha: अखेर प्रतीकला ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा येणार समोर! ‘तू चाल पुढं’मध्ये ट्वीस्ट


Tu Chal Pudha Latest Episode: गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीकला सतत कुणाचा तरी फोन येत आहे. हा फोन येताच प्रतीक कावराबावरा होऊन जातो.



Source link

Satara: सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कऱ्हाड ते सातारा पदयात्रा

0



<p>Satara: सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कऱ्हाड ते सातारा पदयात्रा</p>



Source link

Movies Releasing This Week: या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार हिंदी-मराठी चित्रपटांची मेजवानी! तुम्ही कोणता पाहणार?

0
Movies Releasing This Week: या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार हिंदी-मराठी चित्रपटांची मेजवानी! तुम्ही कोणता पाहणार?


रावरंभा

मराठी मनोरंजन विश्वात सध्या ‘रावरंभा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचे काही बिग बजेट चित्रपट रिलीज झाल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. अखेर हा चित्रपट उद्या म्हणजेच २६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.’रावरंभा’चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राव आणि रंभा यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. इतिहासाच्या पानांमध्ये‘रावरंभा’ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही,तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. हा चित्रपट बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे.



Source link

Arjit Singh Video: पायात चप्पल, हातात पिशवी घेऊन बाजारात सामान आणायला निघाला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक! व्हिडीओ व्हायरल

0
Arjit Singh Video: पायात चप्पल, हातात पिशवी घेऊन बाजारात सामान आणायला निघाला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक! व्हिडीओ व्हायरल


बॉलिवूड स्टार्सचा सिंपल लूक आणि स्टाईल क्वचितच पाहायला मिळते. पण, सोशल मीडियावर दिसलेल्या अरिजित सिंहच्या लूकने लोकांची मने जिंकली आहेत. या व्हिडीओमध्ये अरिजित सिंह पायात चप्पल, हातात बॅग घेऊन आणि साध्या कपड्यांमध्ये स्कूटी चालवत बाजारात जाताना दिसत आहे. अरिजित सिंहचा हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील त्याच्या मूळ गावचा अर्थात मुर्शिदाबादचा आहे. या व्हिडीओमध्ये तो इतक्या साध्या लूकमध्ये दिसत आहे की, त्याला एका नजरेत ओळखणे तुम्हाला कठीण जाईल.



Source link

Pushpa 2: ‘पुष्पा २’मध्ये झाली ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री; चित्रपटात साकारणार पोलिसाची भूमिका!

0
Pushpa 2: ‘पुष्पा २’मध्ये झाली ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री; चित्रपटात साकारणार पोलिसाची भूमिका!


मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, या चित्रपटात रणवीर सिंह एक सरप्राईज एलिमेंट म्हणून दिसणार आहे आणि त्याच्या पात्रामुळे चित्रपटात मोठा ट्विस्ट येणार आहे. मात्र, रणवीर सिंह ‘पुष्पा २’मध्ये दिसणार का, यावर स्वतः रणवीरने किंवा ‘पुष्पा २’च्या निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेता ‘पुष्पा २’मधून दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण करणार आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटातील दमदार व्यक्तिरेखेसह तो दाक्षिणात्य प्रेक्षकांना देखील आपल्या चाहत्यांच्या यादीत सामील करणार आहे.



Source link

Sunil Dutt: दिलीप कुमार यांची मुलाखत घ्यायला गेलेल्या सुनील दत्त यांना मिळाला होता पहिला चित्रपट!

0
Sunil Dutt: दिलीप कुमार यांची मुलाखत घ्यायला गेलेल्या सुनील दत्त यांना मिळाला होता पहिला चित्रपट!


Sunil Dutt Death Anniversary: अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता, राजकारणी आणि समाजसेवक सुनील दत्त यांचा आज १८वा स्मृतिदिन आहे. भारत-पाकिस्तान दंगलीतून थोडक्यात बचावलेल्या दत्त साहेबांचा नायक बनण्याचा प्रवास अगदी फिल्मी आहे. रेडिओसाठी दिलीप कुमार यांची मुलाखत घेण्याची वाट पाहत असतानाच त्यांना पहिला चित्रपट मिळाला होता. चित्रपटांव्यतिरिक्त, सुनील दत्त हे राजकारणातही सक्रिय होते. सुनील दत्त यांचा जन्म ६ जून १९२९ रोजी पंजाबमधील झेलम जिल्ह्यातील नाका खुर्द येथे झाला. बलराज दत्त हे त्यांचे खरे नाव होते. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले.



Source link

Kunal Khemu Birthday: ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहिल्यानंतर कुणाल खेमूने ४ वर्षांनी मोठ्या सोहासोबत बांधली लग्नगाठ!

0
Kunal Khemu Birthday: ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहिल्यानंतर कुणाल खेमूने ४ वर्षांनी मोठ्या सोहासोबत बांधली लग्नगाठ!


दोघांनाही आता घरच्यांना त्यांच्या नात्याबद्दल सांगावे लागणार होते. मात्र, ही गोष्ट काही सोपी नव्हती. कारण कुणाल त्याच्या पालकांसमोर स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीही बोलला नव्हता. तर, सोहा ही एका अतिशय कडक शिस्तीच्या कुटुंबातली असल्याने, कुणालबद्दल तिच्या कुटुंबियांना सांगणं तिच्यासाठी एक वेगळंच अवघड काम होतं. मात्र, दोघांनी ते यशस्वीपणे पूर्ण केलं. यानंतर सोहा आणि कुणालने कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. या लग्नाला फक्त खान आणि कपूर कुटुंबीयांनीच हजेरी लावली होती.



Source link