Friday, July 3, 2026
Home Blog Page 3039

Gadar 2: पुन्हा अशरफ अली- तारा सिंह येणार एकमेकांसमोर, गदरचा नवा ट्रेलर प्रदर्शित

0
Gadar 2: पुन्हा अशरफ अली- तारा सिंह येणार एकमेकांसमोर, गदरचा नवा ट्रेलर प्रदर्शित

गदर २ चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला तारा, सकीना आणि तिचा मुलगा अशरफ अली कडे जात असल्याचे दिसत आहे. मात्र, पुन्हा एकदा ताराच्या तोंडून ‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा’ असे डायलॉग ऐकू येत आहे. ते पाहून तुमच्या शरीरावर शहारे येतील. ‘गदर २’ प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी ‘गदर’ हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. ९ जून रोजी काही मोजक्याच सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Source link

डॉक्टरांच्या मारहाणीला कंटाळून युवकाने जीवन संपवलं, 14 लाखांची अफरातफर केल्याचा चिठ्ठीत आरोप

0

सातारा: डॉक्टरांच्या मारहाणीमुळे कोरेगाव तालुक्यातील शशिकांत चंद्रकांत बोतालजी या युवकांने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांनी संगनमत करून 14 लाख रुपयांची अफरातफर केली असल्याचा आरोप युवकाने चिठ्ठीमध्ये केला आहे. संबंधित डॉक्टरांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी मृत युवकाच्या नातेवाईकांनी केली आहे. त्यामुळे कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शशिकांत बोतालजी हा हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्याच्या खात्यावर डॉक्टरांनी टॅक्स वाचवण्यासाठी 6 लाख 10 हजारांचे ट्रांजेक्शन केले आणि जबरदस्तीने नोटरी करून घेत डॉक्टरांनी घर नावावर करून घेतले असा आरोप या चिठ्ठीत करण्यात आला आहे. हे सगळं करत असताना डॉक्टरांनी या युवकाला बेदम मारहाण केल्याचं म्हटलं आहे.

डॉक्टरांनी केलेल्या या मारहाणीला आणि दबावला कंटाळून युवकाने चिट्ठी लिहून ठेवत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित डॉ. सुहास चव्हाण, डॉ. गणेश होळ आणि डॉ. गोपाळ साळुंखे यांना अटक झाल्याशिवाय युवकाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. नातेवाईकांनी मृतदेह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवल्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

महिलेची धरणात उडी घेऊन आत्महत्या

आपल्या भावाला फोन करून धरणात उडी मारून एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये समोर आली आहे. ही घटना 24 मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ‘मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर, असा कॉल महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावाला केला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र या महिलेने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. तर जिजाबाई भारत जोगदंड (वय 49 वर्षे, वासनवाडी फाटा, पांगरी रोड, बीड) असे मयत महिलेचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिजाबाई जोगदंड या मंगळवारी सकाळी घरात कोणालाही न सांगता पाली येथील धरणावर गेल्या. तिथून त्यांनी आपल्या भावाला मोबाईलवरून फोन केला. मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर, असे म्हणत त्यांनी फोन बंद केला. त्यानंतर जिजाबाई यांनी धरणात उडी मारून जीवन संपविले. काही वेळाने त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना परिसरातील लोकांना दिसला. त्यामुळे नागरिकांनी याची माहिती तत्काळ बीड ग्रामीण पोलिसांना दिली.

ही बातमी वाचा:

Kalyan: इन्स्टाग्रामवर प्रेम जुळलं, मग संधीचा फायदा घेऊन गुंगीचं औषध दिलं, बीडच्या आर्मी जवानाचा कल्याणमधील महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार

Source link

Adipurush: ‘जय श्रीराम’नंतर होणार ‘राम सिया राम’चा घोष; ‘आदिपुरुष’चं दुसरं गाणं या दिवशी होणार रिलीज!

0
Adipurush: ‘जय श्रीराम’नंतर होणार ‘राम सिया राम’चा घोष; ‘आदिपुरुष’चं दुसरं गाणं या दिवशी होणार रिलीज!

मनोरंजन विश्वाची म्युझिकल जोडी ‘सचेत-परंपरा’ यांनी हे गाणे गायले आणि संगीतबद्ध केलेले आहे. त्याचबरोबर मनोज मुनताशीर यांनी हे गीत लिहिले आहे. असे हे अभूतपूर्व गाणे सर्व सीमारेषा ओलांडून जगभरातील प्रेक्षकांना मोहित करणार, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चित्रपट चॅनेल, संगीत चॅनेल ते सामान्य मनोरंजन चॅनेल, संपूर्ण भारतात ७०+ पेक्षा अधिक आणि भारतभर पसरलेले रेडिओ स्टेशन, राष्ट्रीय वृत्त चॅनेल, मैदानी होर्डिंग, संगीत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, तिकीट भागीदार, चित्रपट थिएटर, व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर २९ मे रोजी दुपारी १२ वाजता गाणे प्रदर्शित केले जाणार आहे.

Source link

Kailash Kher: शिस्त शिकून या! ‘खेलो इंडिया’च्या व्यवस्थापनावर भडकले कैलाश खेर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0
Kailash Kher: शिस्त शिकून या! ‘खेलो इंडिया’च्या व्यवस्थापनावर भडकले कैलाश खेर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

कैलाश खेर पुढे म्हणाले की, ‘जर आम्हाला गाणं म्हणायला बोलावलं असेल, तर सांगा की दीड तास फक्त आमचा आहे. आता लक्ष न दिल्यास हे असेच सुरू राहणार आहे. गरज असेल तिथे आणखी कमांडो गिरी दाखवा. लक्षात ठेवा, आम्ही जगतो भारतासाठी, मरणार फक्त भारतासाठी…’ कैलाश खेर सुमारे तासभर जॅममध्ये अडकले होते. इतकंच नाही, तर त्यांच्या कर्मचार्‍यांना पोलिसांनी रोखलं, त्यानंतर हे प्रकरण आणखी वाढलं होतं.

Source link

‘असुर’चा सीझन 2 ‘या’ दिवशी रिलीज होणार, पण VOOT वर नाही…

0
‘असुर’चा सीझन 2 ‘या’ दिवशी रिलीज होणार, पण VOOT वर नाही…

सायको थ्रिलर या पठडीत मोडणारी असूर ही सिरीज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. लॉकडाऊन म्हणजे 2020मध्ये या सिरिजचा पहिला भाग लाँच झाला होता. त्यानंतर या सिरिजच्या पुढच्या सीझनची चाहते आतुरतेने वाट बघत होते.

अर्शद वारसी आणि बरुण सोबती या दोन्ही अभिनेत्यांच्या कामाची प्रचंड प्रशंसा झाली. आता मात्र ही प्रतीक्षा संपली आहे कारण लवकरच ‘असुर’चा सीझन 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘असुर’चा पहिला सीझन ‘वूट’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. आता मात्र याचा पुढील सीझन हा ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नुकतंच जिओने एका व्हिडिओमधून येणाऱ्या बऱ्याच वेबसीरिज आणि चित्रपटांबद्दल माहिती दिली. यात ‘असुर २’चा देखील समावेश आहे.

या व्हिडीओमध्ये ‘असुर’च्या दुसऱ्या सीझनची काही झलक पाहायला मिळाली आहे, पण अद्याप याचा टीझर किंवा ट्रेलर प्रदर्शित झालेला नाही शिवाय याच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दलही काही माहिती समोर आलेली नाही.
या वेबसीरिजमध्ये अर्शद वारसी, वरुण सोबती, रिद्धी डोग्रा, आणि अनुप्रिया गोएंका हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये आहेत.

हेही वाचा

अजय देवगनच्या भोला चित्रपटाचा प्राइमवर खास प्रीमियर

अनुपमा मालिकेत भूमिका साकारणारे नितीश पांडे यांचे निधन

Source link

अजय देवगनच्या भोला चित्रपटाचा प्राइमवर खास प्रीमियर

0
अजय देवगनच्या भोला चित्रपटाचा प्राइमवर खास प्रीमियर

प्राइम व्हिडिओने ‘भोला’ या हिंदी अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपटाच्या ग्लोबल स्ट्रीमिंग प्रीमियरची घोषणा केली. ही अॅक्शन फिल्म 25 मे पासून Amazon Prime Video वर पाहता येईल.

अजय देवगन दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगन मुख्य भूमिकेत आहे तर चित्रपटात त्याच्यासोबत तब्बू आणि अमला पॉल आहेत.

भोला ही एका माजी दोषीची कथा आहे जो दहा वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुक्त होतो आणि त्याला आपल्या मुलीला पुन्हा भेटायचे आहे. अनेक वर्षांपासून त्याने आपल्या मुलीला पाहिले नाही. मात्र, या सगळ्यामध्ये असे काही घडते की तो पोलिस आणि माफिया यांच्यातील युद्धाचा एक भाग बनतो.

घटना उलगडत असताना भोलाला त्याच्या भूतकाळाला सामोरे जावे लागते. अशा प्रकारे अजय देवगनच्या भोलामध्ये दमदार अॅक्शन पाहायला मिळते.

अजय देवगनच्या भोलाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 90 कोटींची कमाई केली. भोलामध्ये अजय देवगनसोबत तब्बू, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, मकरंद देशपांडे, गजराज राव आणि अमला पॉल यांसारखे अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत होते. भोलाचे बजेट जवळपास 100 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजय देवगनचा ‘भोला’ चित्रपट 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.2 कोटींची ओपनिंग केली होती, पण लवकरच अजय देवगनच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली. भोला हा साऊथचा सुपरहिट चित्रपट कैथीचा रिमेक आहे. साऊथचा सुपरस्टार कार्ती कैथीमध्ये दिसला आहे.

Source link

IIFA 2023: सलमान खानच्या बॉडीगार्ड्सनी विक्की कौशलला दिली अशी वागणूक; व्हिडीओ पाहून संतापले चाहते!

0
IIFA 2023: सलमान खानच्या बॉडीगार्ड्सनी विक्की कौशलला दिली अशी वागणूक; व्हिडीओ पाहून संतापले चाहते!

Salman Khan And Vicky Kaushal At IIFA 2023 : नुकतीच या पुरस्कार सोहळ्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी अभिनेता विकी कौशल आणि सलमान खान एकेमेकांच्या आमनेसामने आले होते.

Source link

Ashish Vidyarthi: अभिनेता आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची खोचक पोस्ट!

0
Ashish Vidyarthi: अभिनेता आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची खोचक पोस्ट!

आता आशिष विद्यार्थीची पहिली पत्नी राजोशी बरुआ उर्फ पिलू विद्यार्थी यांनी तिच्या इंस्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यात त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. परंतु, त्या त्यांच्या पोस्टमध्ये अतिविचार आणि जीवनातील गुंतागुंत याबद्दल बोलल्या आहेत. राजोशी बरुआ यांनी दोन पोस्टद्वारे आपले मनोगत व्यक्त केले आहे. पहिल्या पोस्टमध्ये, त्यांनी स्वतःला दुखावलेल्या व्यक्तीबद्दल काही शब्द लिहिले आहेत.

Source link

Vaibhavi Upadhyaya: नेमका कसा झाला वैभवी उपाध्यायचा अपघात? पोलीस म्हणतात ‘सीटबेल्ट न लावता…’

0
Vaibhavi Upadhyaya: नेमका कसा झाला वैभवी उपाध्यायचा अपघात? पोलीस म्हणतात ‘सीटबेल्ट न लावता…’

आता या अपघातात काही नवीन गोष्टी समोर येत आहेत. कुल्लूच्या एसपी साक्षी वर्मा यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, वैभवी शेवटच्या क्षणापर्यंत कारच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, या प्रयत्नात तिला अपयश आले. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. एसपींनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘वैभवीला कारच्या खिडकीतून बाहेर पडायचे होते. परंतु, तिच्या डोक्याला जबरदस्त दुखापत झाली, जी तिच्यासाठी जीवघेणी ठरली आहे.’ या अपघातानंतर तिला तातडीने बंजार येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Source link

Raavrambha: सिनेमॅटिक लिबर्टी घेत इतिहासाची तोडमोड…; ‘रावरंभा’ संदर्भातील महेश टिळेकरांची पोस्ट व्हायरल!

0
Raavrambha: सिनेमॅटिक लिबर्टी घेत इतिहासाची तोडमोड…; ‘रावरंभा’ संदर्भातील महेश टिळेकरांची पोस्ट व्हायरल!

Raavrambha Marathi Movie: ‘रावरंभा’ हा चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर यांची या चित्रपटासंदर्भातील एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Source link