Saturday, July 4, 2026
Home Blog Page 3038

सातारा : कुलिंग सर्व्हिस दुकानावर वीज कोसळली | पुढारी

0









वरकुटे मलवडी : पुढारी वृत्तसेवा म्हसवड,ता. माण येथे शुक्रवारी दुपारी विजांचा कडकडाट व वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने हाहाकार उडवला. या पावसातच म्हसवड शहरातील येथील एका कुलींग सर्व्हिस सेंटर दुकानावर वीज कोसळली. त्यामुळे आग लागून दुकानातील सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. दुकानातील एसी, फ्रीजच्या गॅस टाक्यांचे स्फोट झाल्याने हवेत आगीचे लोट पसरले होते.

म्हसवड येथे शुक्रवारी वळवाच्या पावसाने हाहाकार उडाला. महादेवमळा येथे विद्युत खांब पडले. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या असून शहरातील रस्ते जलमय बनले होते. पावसाचे तांडव सुरू असताना विजांचा लखलखाट होत होता. यावेळी म्हसवड- विरकरवाडी या रस्त्यालगत दादा माणिक घोडके यांच्या कुलींग सर्व्हिस सेंटर या दुकानावर वीज कोसळली. त्यामुळे दुकानाने पेट घेतला. बघता बघता ही आग भडकली. दुकानातील एसी, फ्रीजमधील गॅसने पेट घेतला. आगीने रौद्र रुप धारण केले. नवीन एसी, कुलर, पंखे व फ्रिज जळाले. अग्नीचे तांडव पाहून कोणीच पुढे जाण्याचे करत नव्हते. शेवटी अग्निशमनच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते.











Source link

सातारा : एटीएम फ्रॉड करणार्‍या टोळीला अटक | पुढारी

0


सातारा : पुढारी वृत्तसेवा राज्यातील ठिकठिकाणीच्या एटीएम मशिनमध्ये इतर एटीएम कार्डद्वारे अडथळा आणून तांत्रिक पद्धतीने आतापर्यंत सातारा जिल्ह्यातून 3 कोटी 50 लाख रुपये काढून बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांच्या टोळीला अटक करण्यात आली. सातारा पोलिसांनी उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये जाऊन ही कारवाई करत संशयितांकडील 86 लाख रुपयांची रक्कमही गोठवली आहे. सातारा पोलिसांची ही रेकॉर्डब्रेक कामगिरी ठरली आहे. आनंद कुमार, धर्मेंद्र कुमार, गोविंद सिंह, निरज निषाद (सर्व रा.कानपूर, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील म्हसवड, वडूज, दहिवडी, सातारा, तसेच धायरी (पुणे) व कामोठे (रायगड) या जिल्ह्यातील विविध एटीएममधून चोरट्यांनी एटीएम मशिनमधून हजारो, लाखो रुपयांची रक्कम अलगद काढून फसवणूक केली होती. हा सर्व घटनाक्रम साधारण दोन महिन्यांमधील आहे. पैशांचा घोळ होत असल्याचे बँकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केली असता काही जणांनी खाते काढून ही फसवणूक केल्याचे लक्षात आले. यामुळे संबंधित बँकांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधला.

याप्रकरणी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार एटीएमद्वारे संशयितांनी एकट्या सातारा जिल्ह्यात 3 कोटी 37 लाख 72 हजार 500 रुपयांचा बँकांना चुना लावलेला आहे. तपासांनतर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील व देशभरातील किती बँकांना चुना लावलेला हे तपासात समोर येईल. दरम्यान, म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एलसीबी पथकानेही तपासाला सुरुवात केली. गेली काही दिवस तांत्रिक तपास सुरु असताना संशयित कानपूर येथे असल्याचे समोर आले. सातार्‍यातून कानपूरमध्ये जाऊन पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी संशयितांकडून 4 मोबाईल, विविध बँकांचे एटीएम कार्ड जप्त करण्यात आले. ही प्रक्रिया पार पडत असतानाच संशयितांच्या बँक खात्यांमध्ये जी रक्कम आहे त्या बँकांना पत्रव्यवहार, ई मेल करुन बँकेतील रक्कम गोठवण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, एलसीबीचे पोनि अरुण देवकर, सायबरचे पोनि सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजकुमार भुजबळ, फौजदार विशाल भंडारे, पोलिस अमित झेंडे, अजय जाधव, रविंद बनसोडे, नितीन धुमाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.



Source link

Karisma Kapoor: एक्स पतीसोबत डिनडरला जाताना दिसली करिश्मा कपूर Video Viral

0
Karisma Kapoor: एक्स पतीसोबत डिनडरला जाताना दिसली करिश्मा कपूर Video Viral


बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे करिश्मा कपूर. करिश्माने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. एकेकाळी ती तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असायची. तिने दिल्लीमधील व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केले. लग्नानंतर तिने चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. मात्र, त्यांचे खटके उडू लागल्याने तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता इतक्या वर्षांनंतर करिश्मा पुन्हा एकदा संजय कपूरसोबत दिसली.



Source link

IIFA 2023: ब्रह्मास्त्र ते गंगुबाई…; जाणून घ्या आयफा पुरस्कार विजेत्यांची यादी

0
IIFA 2023: ब्रह्मास्त्र ते गंगुबाई…; जाणून घ्या आयफा पुरस्कार विजेत्यांची यादी


दरवर्षी प्रमाणे यंदाचा आयफा अवॉर्ड २०२३ या सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. यावेळी हा पुरस्कार सोहळा अबूधाबीमधील यस आयलंडवर आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्याला सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, रकुल प्रीत सिंह, नोरा फतेही, सुनिधी चौहन, बादशाह अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावत परफॉर्म केले. यंदाच्या २३व्या आयफा पुरस्कार सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. चला पाहूया विजेत्यांची यादी-



Source link

Kamal Haasan: ‘द केरला स्टोरी’बाबत कमल हासन यांनी मांडले मत, म्हणाले ‘पोस्टरखाली सत्यघटनेवर…’

0
Kamal Haasan: ‘द केरला स्टोरी’बाबत कमल हासन यांनी मांडले मत, म्हणाले ‘पोस्टरखाली सत्यघटनेवर…’



The kerala story: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या द केरळ स्टोरी चित्रपटाबाबत कमल हासन यांनी मत मांडले आहे. त्यांच्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.



Source link

अजित पवारांच्या दौर्‍यात राष्ट्रवादीला राजकीय टॉनिक मिळणार का? | पुढारी

0


पाटण; गणेशचंद्र पिसाळ :  उपमुख्यमंत्री पदासह अनेक मंत्रिपदे भूषवून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणारे विरोधी पक्षनेते अजित पवार रविवारी पाटण मतदारसंघात येत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघातील अजित पवारांच्या दौर्‍यामुळे राजकीय वादळ उठले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांच्या विजयासाठी दादा कोणते राजकीय टॉनिक देणार व मंत्री शंभूराज देसाईंचा राजकीय समाचार कसा घेणार यासह माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मूळच्या भागातच हा दौरा असल्याने ते महाविकास आघाडीची एकी साधत महायुतीवर कसे शिरसंधान साधणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सत्तेत असताना अनेकदा अजित पवार पाटणला आले आहेत. सत्तेत असल्याने विकास कामांच्या घोषणा, आश्वासने व प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी या मतदारसंघासाठी भरभरून दिले. त्याकाळात विरोधी पक्षावर बोलण्यावर त्यांनी तितकेसे लक्ष केंद्रित केले नव्हते. बहुतेकदा येथे सत्तेत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर होते. मात्र, आता मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदललेली आहेत. राज्यातील राजकीय परिस्थितीतही मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने आता विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार यांच्या दौर्‍याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई सध्या पालकमंत्री असल्याने त्यांच्याकडून सातत्याने महाविकास आघाडीतील नेते व मित्र पक्षांबाबत अनेकदा वादग्रस्त विधाने केली जातात. आपल्या खास व निर्भिड शैलीसाठी प्रसिद्ध असलेले दादा याचा समाचार कसा घेणार याची उत्सूकता राजकीय जाणकारांना लागली आहे.अजित पवार यांचा पाटण दौरा राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना उर्जा देणारा ठरणार आहे. त्यामुळे या दौर्‍याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा..

सत्तेत नसले तरी अजित पवार यांच्याकडून आजही पाटण तालुक्याला प्रचंड अपेक्षा आहेत. प्रामुख्याने तालुक्यातील छोट्या, मोठ्या प्रकल्पांची रखडलेली कामे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्चिम घाट प्रकल्प, कोयना अभयारण्य, इको सेन्सिटिव्ह झोन आदी पर्यावरण प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांच्या जीवन हक्कांवर आलेले निर्बंध ,नियम व कडक कायदे यातून स्थानिकांना संरक्षण मिळावे, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात होणारे शेतीचे नुकसान, पाळीव प्राण्यांसह मानवी हल्ले व ढिम्म प्रशासन याबाबतही त्यांची भूमिका काय या बाबीही महत्त्वाच्या आहेत. पर्यटन पूरक प्रकल्पांवर आलेले गंडांतर बोटिंग, मासेमारी बंदी, पवनचक्क्यांना प्रकल्पांना लागलेली घरघर, रोजगार, विकासावर आलेली कुर्‍हाड यावर दादांची भूमिका महत्त्वाची आहे. विक्रमसिंह पाटणकर यांच्या मंत्रिपदाच्या काळात मंजूर झालेला नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत दादांकडून अपेक्षा आहेत.

पक्षाला उर्जितावस्था येण्यासाठी कोणता कानमंत्र देणार

अजित पवार यांचा दौरा राजकीय, सार्वजनिक बाबींसाठी विकासात्मक ठरणार का यावरही आगामी राजकारण अवलंबून आहे. गेल्या काही निवडणुकात राष्ट्रवादी तथा पाटणकर गटाची झालेली पिछेहाट त्यावर आवश्यक त्या उपाययोजना, यावर अजितदादा नक्की कोणता कानमंत्र देणार याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.



Source link

Ranveer Singh: क्षिती जोग दिसणार रणवीर सिंगसोबत ‘या’ बॉलिवूड चित्रपटात

0
Ranveer Singh: क्षिती जोग दिसणार रणवीर सिंगसोबत ‘या’ बॉलिवूड चित्रपटात


इतक्या मोठ्या स्टारकास्टसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल क्षिती म्हणते, ” अनेक वर्षं रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्येष्ठच नाही तर आताच्या काळात सुपरहिट असलेला रणवीर सिंग, आलिया भट्ट यांच्यासोबत काम करतानाही धमाल आली. धर्मा प्रॉडक्शन, करण जोहर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अफलातून होता. करण सर एक उत्तम दिग्दर्शक आहेत. समोरच्याकडून अपेक्षित सीन कसा करून घ्यायचा याचे कसब त्यांच्याकडे उत्तम आहे. एकंदरच ही प्रक्रिया खूप छान होती.”



Source link

KBC: बक्षिसाच्या रकमेबरोबरच मनोरंजनही होणार डबल! ‘या’ दिवशी सुरु होणार ‘कोण होणार करोडपती’

0
KBC: बक्षिसाच्या रकमेबरोबरच मनोरंजनही होणार डबल! ‘या’ दिवशी सुरु होणार ‘कोण होणार करोडपती’


ज्ञान हे माणसाकडे असलेलं एक उत्तम साधन आहे. त्याच्याकडच्या या साधनाचा वापर करून तो अनेक गोष्टी साध्य करू शकतो. त्याच ज्ञानाचा वापर करून पैसे मिळवण्याची संधी देणारा कार्यक्रम म्हणजे कोण होणार करोडपती. सोनी मराठी वाहिनीवर २९ मे पासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेते सचिन खेडेकर यांच्याकडे आहे. या कार्यक्रमात यंदा बक्षिसाची रक्कमही दुप्पट करण्यात आली आहे. पण, या दुप्पट रकमेसह एक आगळावेगळा ट्विस्ट देखील प्रेक्षक आणि स्पर्धकांना पाहायला मिळणार आहे.



Source link

Salman Khan: सलमान खानला प्रपोज करणारी एलीना खलफीह आहे तरी कोण?

0
Salman Khan: सलमान खानला प्रपोज करणारी एलीना खलफीह आहे तरी कोण?


गुरुवारी रात्री यास बेटावर आयफा पुरस्कार २०२३साठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सलमान खानपासून ते अभिषेक बच्चन आणि विकी कौशलसह अनेक सेलिब्रिटी याठिकाणी दिसले. या पत्रकार परिषदेतून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये विकी आणि सलमान एकमेकांशी भिडताना दिसले आहेत. त्यानंतर या पुरस्कार सोहळ्यात एलीना खलफीहने सलमानला प्रपोज केल्यामुळे चर्चा रंगल्या आहेत.



Source link

Vaibhavi Upadhyaya: पोलिसांच्या आरोपांवर वैभवी उपाध्येच्या होणाऱ्या पतीची प्रतिक्रिया, ‘सीट बेल्ट..’

0
Vaibhavi Upadhyaya: पोलिसांच्या आरोपांवर वैभवी उपाध्येच्या होणाऱ्या पतीची प्रतिक्रिया, ‘सीट बेल्ट..’


कुल्लूच्या एसपी साक्षी वर्मा यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, वैभवी शेवटच्या क्षणापर्यंत कारच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, या प्रयत्नात तिला अपयश आले. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. एसपींनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘वैभवीला कारच्या खिडकीतून बाहेर पडायचे होते. परंतु, तिच्या डोक्याला जबरदस्त दुखापत झाली, जी तिच्यासाठी जीवघेणी ठरली आहे.’ या अपघातानंतर तिला तातडीने बंजार येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.



Source link