Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3037

शड्डू ठोकून विकास होत नाही: अजित पवारांचे शंभूराज देसाईंवर टीकास्त्र | पुढारी

0









ढेबेवाडी: पुढारी वृत्तसेवा: पाटण विधानसभा मतदारसंघातून जाणाऱ्या कराड – चिपळूण रस्त्याचीअवस्था काय आहे ? पाटण तालुक्याचे प्रतिनिधी काय करतात ? विजय मिळाल्यानंतर शड्डू ठोकून विकास होत नाही व जनतेच्या समस्या सुटत नाहीत, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना लगावला.

पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुढे (ता. पाटण) येथील गणेश मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

या सरकारने भ्रष्ट्राचाराची परिसीमा गाठली आहे. विरोधातील गावांचा विकास रोखण्याचे काम, शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून हवे तसे काम करून घेण्याचे उद्योग सुरू आहेत. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी दबावाला बळी पडून काम करू नये. ज्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत मराठा समाजाच्या सुरक्षेसाठी शिवसेना काढली, त्या शिवसेनेत तुम्ही मोठे झाला, शिवसेनेने तुम्हाला मंत्री केले आणि त्याच शिवसेनेशी गद्दारी करून विश्वासघात करून बाळासाहेबांच्या मुलाला सत्तेबाहेर काढले,अशा गद्दारांची विश्वासार्हता काय? भविष्यात ते जनतेशी तरी विश्वासू राहणार का ? असा टोलाही अजित पवार यांनी देसाई यांना लगावला.

हेही वाचा 











Source link

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध आणि वीणा करणार आशुतोषच्या ऑफिसमधून काम, काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?

0
Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध आणि वीणा करणार आशुतोषच्या ऑफिसमधून काम, काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?


ते ऐकून वीणा खूश होते आणि आशुतोषकडे विनंती करते. आशुतोषपण लगेच तयार होता. नितीन मात्र आशुतोषला थांबवण्याचा प्रयत्न करतो. कारण अरुंधतीला हे आवडणार नाही असे त्याला वाटते. पण आशुतोष सगळ्याला होकार देतो. आता अरुंधतीला कळाल्यावर तिची प्रतिक्रिया काय असणार? अरुंधती ऑफिसला जाणे बंद करणार का? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.



Source link

New Parliament: नव्या संसद भवनाबाबत शाहरुखने कौतुक केले की कान टोचले, ट्वीट पाहून चाहते चक्रावले

0
New Parliament: नव्या संसद भवनाबाबत शाहरुखने कौतुक केले की कान टोचले, ट्वीट पाहून चाहते चक्रावले


शाहरुख खान हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने नव्या संसद भवनाचा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने, ‘आपल्या देशाचे संविधान टिकवणाऱ्या, आपल्या या महान राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि लोकांच्या विविधतेचे रक्षण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन संसद भवन. नवीन भारतासाठी नवी संसदेची इमारत, पण भारताच्या गौरवाचे जुने स्वप्न. जय हिंद!’ या आशयाचे ट्वीट केले आहे.



Source link

Real Life Web Series: सत्य घटनांवर आधारित ‘या’ पाच वेब सीरिज पाहिल्यात का?

0
Real Life Web Series: सत्य घटनांवर आधारित ‘या’ पाच वेब सीरिज पाहिल्यात का?


दिल्ली क्राइम ही सीरिज २०१२ मध्ये झालेल्या गँगरेपवर आधारीत आहे. या सीरिजमध्ये शेफाली शाह, रसिका दुग्गल, तिलोत्तमा शोम, राजेश तैलंग आणि आदिल हुसैन महत्त्वाच्या भूमिकेत आहे.



Source link

सातारच्या संग्रहालयात शिवकालीन खजिना | पुढारी

0


सातारा; विशाल गुजर :  राजधानीचा मान मिळवणाऱ्या ऐतिहासिक सातारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाची
इमारत उभी राहिली असून याठिकाणी शिवकालीन शस्त्रे व अत्यंत दुर्मीळ वस्तूंचा  खजिना पहायला मिळणार आहे. या संग्रहालयातील
अंतर्गत दालनांची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. येत्या वर्षभरात ती कामे पूर्णत्वास येणार असून त्यानंतर अडीच हजारांहून अधिक ऐतिहासिक वस्तूंची दुर्मीळ पर्वणी इतिहासप्रेमींना भुरळ घालणार आहे.

साताऱ्यातील बसस्थानकाशेजारी असलेल्या हजेरी माळ मैदानावर ६० गुंठे क्षेत्रात नव्या शिवाजी संग्रहालयाची इमारत उभी राहिली आहे. या इमारतीचे काम काही वर्षे अनेकविध कारणास्तव रखडले होते. यानंतर कोरोना काळात इमारतीचा जम्बो कोव्हिड सेंटर म्हणून वापर केला गेला. संग्रहालयातील कॅफेट एरिया, संरक्षक भिंत, स्वच्छतागृह, अंतर्गत रस्ते, तिकीट गृह, वाहन व्यवस्था, गटार व्यवस्था अशी कामे मार्गी लागली असून शस्त्र व वस्त्र दालन निर्मितीचे काम प्रगतिपथावर आहे.

शिवकालीन तलवारी, खंजीर, चिलखते अन् बरेच काही…..

छत्रपती शिवाजी संग्रहालयात शिवकालीन तलवारी, भाले, कट्यारी, खंजीर, शिरस्त्राने, चिलखते, तलवारी, तोफगोळे, अंकुश, परशू, गुप्ती, धनुष्यबाण, गुप्तीचे प्रकार, रणशिंग, जेडची मठ, बिचवा, वाघनखे, बंदुकांचे प्रकार, दारूच्या पुड्याचा शिंगाडा, संगिनी, पिस्तुले अंगरखा, जरिबुट्टीचे कपडे, बख्तर, बाहू, आच्छादने, तुमान विविध प्रकारच्या पगड्या, शेला यासह छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ संग्रहालयात पहावयास मिळणार आहे. गेल्याच वर्षी संग्रहालयाची इमारत पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

ऐतिहासिक वस्तू बंदिस्त…

मार्केट यार्ड येथे असलेली संग्रहालयाची जुनी इमारत वस्तू संवर्धनासाठी अपुरी पडत होती. त्यामुळे ऐतिहासिक नाणी, भांडी, शिल्पे, हत्यारे, पुरातन चित्रे अशा कित्येक वस्तू पाच दशकांहून अधिक काळ बंदिस्तच आहेत. केवळ २५ टक्के वस्तू इतिहासप्रेमींना पाहता येत होत्या. वर्षभरात संग्रहालयाची इमारत पूर्ण झाल्यानंतर सुमारे अडीच हजार वस्तु इतिहासप्रेमींना पाहता येणार आहेत.

संग्रहालयाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर सर्व ऐतिहासिक वस्तू पाहण्यास उपलब्ध होतील. या व्यतिरिक्त किल्ल्यांच्या प्रतिकृती, ऐतिहासिक प्रसंगाचे डायोरामा, थ्री डी लेझर शोचाही अनुभव इतिहासप्रेमींना घेता येणार आहे. वर्षभरात संग्रहालयाचे काम मार्गी लावण्याचा पुरातत्त्व विभागाचा मानस आहे.

– प्रवीण शिंदे, छ. शिवाजी संग्रहालय अभिरक्ष

 

 



Source link

Raghav-Parineeti Wedding: ‘या’ ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग करणार परिणिती आणि राघव?

0
Raghav-Parineeti Wedding: ‘या’ ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग करणार परिणिती आणि राघव?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणिती आणि राघव हे उदयपुरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. शनिवारी सकाळी साडे नऊच्या आसपास परिणिती उदयपुरला पोहोचली होती. ती लीला पॅलेसमध्ये थांबली होती. त्यानंतर ती कुटुंबीयांसोबत उदयविलास हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली. त्यामुळे परिणिती लग्नाचे ठिकाण ठरवण्यासाठी उदयपुरला गेल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.



Source link

Gautami Patil: “तू मनोरंजनक्षेत्रातली पाटलीण”, गौतमी पाटीलसाठी किरण मानेची खास पोस्ट

0
Gautami Patil: “तू मनोरंजनक्षेत्रातली पाटलीण”, गौतमी पाटीलसाठी किरण मानेची खास पोस्ट



Kiran Mane: अभिनेता किरण मानेने गौतमी पाटीलसाठी लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. अनेकांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करत त्याला पाठिंबा दिला आहे.



Source link

शंभूराज-सदाभाऊ यांच्यात ‘भांग युद्ध’ | पुढारी

0


सातारा : पुढारी वृत्तसेवा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यात सातार्‍यात चांगलीच जुंपली. या दोघांमध्ये ‘भांग युद्ध’ रंगले. दोघांनीही एकमेकांचा एकेरी उल्लेख करत टीकेची झोड उठवली. खोत यांनी ‘सत्ता भांग पिल्यासारखी असते, नशा उतरली की सगळं गेलेलं असेल’, असे टिकास्र सोडले तर मंत्री देसाई यांनी प्रत्युत्तर देताना ‘ते स्वत:च भांग पित असतील. त्यामुळे नशा काय असते हे त्यांना माहीत’, असा पलटवार साधला. या दोघांमधील या जुगलबंदीची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

खोत म्हणाले, सत्ता भांग पिल्यासारखी असते, नशा उतरल्यावर सगळं गेलेलं असेल

सातारा : पुढारी वृत्तसेवा ; सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत हे माहीत नाही. कोण भाग्यवान माणूस आहे हे सुद्धा माहीत नाही. सत्ता ही भांग पिल्यासारखी असते. अंगात आली की माणूस डुलायला आणि नाचायला लागतो व बेहोश पडतो. मात्र, नशा उतरल्यावर शुद्धीत येतो. त्यावेळी सगळं गेलेलं असेल, अशी जहरी टिका रयत क्रांती संघटनेचे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांच्यावर केली.

सातार्‍यात यशोदा कॅम्पस येथे वारी शेतकर्‍याची या पदयात्रेच्या बैठकीवेळी खोत यांनी टिकेची झोड उठवली. ते म्हणाले, शेतकर्‍यांचा मोर्चा उन्हात निघाला मात्र पालकमंत्री यांनी साधा एक फोन केला नाही, ना आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळाला नाही, ना एक अँब्युलन्स मिळाली, एका कार्यकर्त्याला चक्कर आली. एक अँब्युलन्स गाडी नाही देऊ शकले ते. शेतकरी हा क्रांतिसिंह नाना पाटील, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या मातीतून निघाला आहे. पालकमंत्री म्हणून एक फोन नाही करू शकत. आम्हाला कोणी काय द्यावे ही आमची अपेक्षा नाही कारण आम्ही अन्नदाते आहोत.

सत्ता ही भांग पिल्यासारखी असते. ती अंगात आली की माणूस डुलायला आणि नाचायला लागतो, बेहोश पडतो. मात्र नशा उतरल्यावर शुद्धीत आलं की त्यावेळी सगळं गेलेलं असेल,अशा शब्दात खोत यांनी हल्लोबोल केला. ते पुढे म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. सातारा जिल्हा प्रशासन आमच्याशी जे वागले आहे त्याबाबत आम्ही मंत्री महोदयांना सांगणार आहे. सातारा जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा आहे. पालकमंत्र्यांनी आमचे स्वागत करावे अशा अपेक्षाही नाहीत. आमची लढाई वाडा विरुद्ध गावगाडा अशी आहे. धनदांडगे विरुद्ध सामान्य जनता अशी लढाई आहे. पालकमंत्र्यांमधून अपेक्षा नव्हत्या आणि नाहीत. त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. गेली 35 वर्षे शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत आणि सुरूच ठेवणार असल्याचे खोत म्हणाले.

मंत्री देसाई म्हणाले, ते स्वत:च भांग पित असतील, त्यामुळे नशा काय हे त्यांना माहीत

सातारा : पुढारी वृत्तसेवा सदाभाऊ स्वतःच भांग पित असतील. यामुळं त्यांना भांगेची नशा काय असते हे माहीत आहे. त्यांनाच शेतकर्‍यांचा कळवळा आहे आणि आम्हा राज्यकर्त्यांना नाही का?, शेतकर्‍यांबद्दल आमचे सरकार संवेदनशील आहे,अशा शब्दात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई यांनी सदाभाऊंवर निशाणा साधला. ते म्हणाले, सदाभाऊच भांग पित असतील, यामुळं त्यांना भांगेची नशा काय असते हे माहीत आहे. याच नशेत त्यांनी हे वक्तव्य केलय. पण त्यांच्या पदयात्रेवेळी आम्ही आंदोलनकर्त्यांसाठी सगळी सोय केली होती. सर्व प्रशासनाला योग्य ते आदेश देण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉक्टर आणि अ‍ॅम्ब्युलन्स या सर्वांन अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

जिल्हा प्रशासन, पोलीस अधिकारी त्यांच्या संपर्कात होते. सदाभाऊंनी मोर्चा काढू नये, उन्हाचा त्रास होईल म्हणून आम्ही त्यांना विनंती करत होतो परंतु त्यांनी ऐकलं नाही. सदाभाऊंना भेटायची माझी इच्छा होती पण त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौरा होता, तसेच राज्यपालही सातार्‍यातून रत्नागिरीला रवाना झाले होते. त्यामुळे मी तिकडे गेलो, असं शंभूराजेंनी स्पष्ट केलं. कोठेही आमच्याकडून दुर्लक्ष झाले नाही. आमचे मंत्रिमंडळातील सहकार मंत्री अतुल सावे हे आले होते. अतुल सावे भेटल्यानंतर ही पदयात्रा त्यांनी स्थगित केली आहे. शेतकर्‍यांबद्दल आमचे सरकार संवेदनशील आहे. त्यांनाच शेतकर्‍यांचा कळवळा आहे आणि आम्हाला राज्यकर्त्यांना नाही, असं होत नाही. लवकरच सदाभाऊंच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक घेतली जाईल आणि प्रश्न सोडवले जातील, असे देसाई यांनी सांगितले.



Source link

उत्तर कोरेगाव राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर | पुढारी

0









पिंपोडे बुद्रुक : कमलाकर खराडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत उत्तर कोरेगाव तालुका हा या पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. पक्षांतर्गत कुरबुरी सर्वत्रच पाहायला मिळतात. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सोनके ता. कोरेगाव येथे असलेला नियोजित कार्यक्रम पक्षांतर्गत गटबाजीमुळे रद्द करावा लागला आहे. यामुळे पहिल्यांदाच भागातील नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आ. अजित पवार यांनी ग्रामीण भाग पिंजून काढण्याचा सपाटा लावला आहे. याचाच एक भाग म्हणून सोनके येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आ. रामराजे ना. निंबाळकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला होता. दि. 28 रोजी हा कार्यक्रम होणार होता. त्यासंबंधीच्या कार्यक्रम पत्रिकाही जिल्ह्यातील नेतेमंडळींना पोहच झाल्या होत्या. मात्र, उत्तर भागातील राष्ट्रवादीच्याच दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांनी त्याच दिवशी साडेपाच वाजता दुसरा कार्यक्रम घेत असल्याच्या कार्यक्रम पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. यामुळे या भागातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

जिल्ह्यातील काहीं नेतेमंडळींनीसुध्दा याची माहिती घेतली असता पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल झाल्याचे कुणालाच सांगण्यात आले नव्हते. अगदी सोनके येथील कार्यक्रमाच्या आयोजकांना सुध्दा त्याची कल्पना नव्हती हे विशेष. या सर्व घडामोडी घडत असताना वरिष्ठ नेते मात्र याबाबत मौन पाळून होते. उत्तर भागात राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाल्याची वस्तुस्थिती आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतही याचे परिणाम दिसून आले. ज्या भागात भाजपला मतदान मिळणार नव्हते तेथे भाजप उमेदवारांनी राष्ट्रवादीबरोबर मते घेतली. सर्वच गावात दोन प्रबळ गट निर्माण झाले आहेत. वरिष्ठ नेते मात्र दोन्ही गटांना आपल्या पध्दतीने हाताळताना दिसतात. कधी पूर्वाश्रमीच्या तर कधी नवीन गटाला ताकद दिली जात आहे.











Source link

महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावरील अतिक्रमणे स्वत:हून काढण्यास प्रारंभ | पुढारी

0









महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा महाबळेश्वर – पाचगणी रस्त्यालगतची अतिक्रमणे हटवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. त्यानुसार या मार्गावरील अतिक्रमण केलेल्या 65 जणांना नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. हे अतिक्रमण काढून घेण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. यानंतर अतिक्रमणधारकांनी शनिवारपासून स्वत:हून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. जे लोक अतिक्रमणे काढणार नाही ती प्रशासनाकडून हटवण्यात येणार आहेत.

महाबळेश्वर-पाचगणी या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे हटवण्यासाठी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी सर्व विभागांच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. या बैठकीत रस्त्याच्या मध्यापासून 10 मीटर अंतरावरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार 65 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. स्वत:हून अतिक्रमणे काढण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्याला काही अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी प्रतिसाद देत शनिवारी स्वत:हून अतिक्रमण काढले आहे. वेण्णालेक -लिंगमळा तसेच मेटगुताड सह मुख्य रस्त्यावरील अनेक अतिक्रमणधारकांनी जाहिरात फलकासह संरक्षक भिंती, टपर्‍या, तार कुंपण, शेड अशी अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान, बांधकाम विभागाने अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. जी अतिक्रमणे निघणार नाहीत अशी अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात हटवण्यात येणार आहेत.











Source link