Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3036

Randeep Hooda: रणदीप हुड्डाच्या “स्वातंत्र्यवीर सावरकर”चा टीझर पाहिलात का?

0
Randeep Hooda: रणदीप हुड्डाच्या “स्वातंत्र्यवीर सावरकर”चा टीझर पाहिलात का?



Swantantrya Veer Savarkar: रणदीप हुड्डासोबत या चित्रपटात अभिनेत्री अंकिता लोखंडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील रणदीपची शरीर यष्ठी पाहून तुम्हीही चकीत व्हाल.



Source link

Pankaj Kapur Birthday: इंजिनिअरिंगमध्ये केलं टॉप अन् १६ वर्षांच्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ! वाचा पंकज कपूरबद्दल…

0
Pankaj Kapur Birthday: इंजिनिअरिंगमध्ये केलं टॉप अन् १६ वर्षांच्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ! वाचा पंकज कपूरबद्दल…


मात्र, एवढं सगळं यश मिळवल्यानंतरही पंकज कपूर यांची अभिनयाची गोडी कमी झाली नाही. यानंतरही ते अभिनय सोडण्याचा निर्णय घेऊ शकले नाहीत. नोकरी मिळाल्यानंतरही त्यांनी आपले नाटकांतील काम चालूच ठेवले आणि ते एक उत्तम अभिनेता बनले. चित्रपटांमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी पंकज यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतही नशीब आजमावले होते. त्यांनी ‘नीम का पेड’, ‘करमचंद’, ‘ऑफिस ऑफिस’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. खूप मेहनत केल्यानंतर त्यांना ‘जाने भी दो यारों’, ‘मकबूल’, ‘हल्ला बोल’, ‘रोजा’, ‘मंडी’, ‘गांधी’ आणि ‘दस’ यांसारख्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.



Source link

Sona Mohapatra: कमल हासनवर टीका करणाऱ्या चिन्मयी श्रीपादला मिळाला सोना मोहपात्राचा पाठिंबा! म्हणाली…

0
Sona Mohapatra: कमल हासनवर टीका करणाऱ्या चिन्मयी श्रीपादला मिळाला सोना मोहपात्राचा पाठिंबा! म्हणाली…


Sona Mohapatra Supports Chinmayi Sripaada: अभिनेते कमल हासन यांनी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. पण, नेमके त्याचवेळी कमल हासन यांना दाक्षिणात्य गायिका चिन्मयी श्रीपाद हिने घेरले.



Source link

Shambhuraj Desai : दोन दिवसांचा वेळ देतोय, वक्तव्य मागे घ्या अन्यथा कारवाई करणार; देसाईंचा इशारा

0



<p>Shambhuraj Desai : दोन दिवसांचा वेळ देतोय, वक्तव्य मागे घ्या अन्यथा कारवाई करणार; देसाईंचा इशारा</p>



Source link

Mrunmayee Deshpande Birthday: ‘केसरबाई’ ते ‘कुसुम’; अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या ‘या’ गाजलेल्या भूमिका पाहिल्यात?

0
Mrunmayee Deshpande Birthday: ‘केसरबाई’ ते ‘कुसुम’; अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या ‘या’ गाजलेल्या भूमिका पाहिल्यात?


Happy Birthday Mrunmayee Deshpande : मालिका, चित्रपट, नाटक असो वा वेब सीरिज अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. मृण्मयी देशपांडे हिने छोट्या पडद्यावरून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘कुंकू’ या मालिकेतून ‘जानकी’ बनून तिने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकली होती. महाराष्ट्रातील घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या मृण्मयी देशपांडेने ‘अग्निहोत्र’ या मालिकेत देखील काम केले होते. तर, काही चित्रपटांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांना कायम लक्षात राहिल्या. जाणून घेऊया अशाच काही भूमिकांबद्दल…



Source link

Butterfly Trailer : मधुरा वेलणकर उलगडणार स्वप्नांची गोष्ट! ‘बटरफ्लाय’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर बघाच

0
Butterfly Trailer : मधुरा वेलणकर उलगडणार स्वप्नांची गोष्ट! ‘बटरफ्लाय’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर बघाच


ज्येष्ठ अभिनेते, नाट्यनिर्माते अजित भुरे यांनी ‘बटरफ्लाय’ चित्रपट प्रस्तुत केला आहे. असीम एंटरटेन्मेंट आणि अॅप्रोग्रॅम स्टुडिओज यांनी बटरफ्लाय या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजित भुरे, अभिजित साटम, मधुरा वेलणकर साटम या चित्रपटाचे निर्माते आहेत. मधुरा वेलणकर साटम यांच्या संकल्पनेला विभावरी देशपांडे यांनी कथेत बांधले आहे. विभावरी देशपांडे आणि मीरा वेलणकर यांनी पटकथा लेखन, तर कल्याणी पाठारे, आदित्य इंगळे यांनी संवाद लेखन केले आहे. वैभव जोशी, गुरू ठाकूर यांनी गीतलेखन, शुभाजित मुखर्जी यांनी संगीत दिग्दर्शन, वासुदेव राणे यांनी छायांकन केले आहे. वैशाली भैसने माडे आणि हंसिका अय्यर यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. या चित्रपटात मधुरा वेलणकर साटम, अभिजित साटम, महेश मांजरेकर, राधा धारणे, सोनिया परचुरे, प्रदीप वेलणकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे.



Source link

Ashneer Grover : वाद आणि राड्यांदरम्यान अश्नीर ग्रोव्हर छोट्या पडद्यावर परतणार! ‘या’ शोमध्ये होणार एन्ट्री

0
Ashneer Grover : वाद आणि राड्यांदरम्यान अश्नीर ग्रोव्हर छोट्या पडद्यावर परतणार! ‘या’ शोमध्ये होणार एन्ट्री


Ashneer Grover Comeback on Tv Show: अश्नीर ग्रोव्हर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करताना दिसणार आहे.



Source link

Malaika And Arjun Kapoor: मलायकाने शेअर केला अर्जुन कपूरचा न्यूड फोटो; सोशल मीडियावर होतेय ट्रोल!

0
Malaika And Arjun Kapoor: मलायकाने शेअर केला अर्जुन कपूरचा न्यूड फोटो; सोशल मीडियावर होतेय ट्रोल!


मलायका अरोराने रविवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सोफ्यावर बसून आळस देताना दिसत आहे. मात्र, या फोटोमध्ये त्याने कपडे परिधान केलेले नाहीत. तर, केवळ एका लहान उशीने आपले शरीर झाकले आहे. अर्जुन कपूरचा हा फोटो जरी ब्लॅक अँड व्हाईट असला, तरी या फोटोने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे. अर्जुन कपूरचा टॅटूही या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. मलायका अरोराने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझा अतिशय आळशी मुलगा’. अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर या पोस्टचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे.



Source link

Samir Choughule Birthday: महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या समीर चौगुले यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

0
Samir Choughule Birthday: महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या समीर चौगुले यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?


केवळ टीव्हीच नव्हे, तर समीर चौगुले यांनी आपल्या अभिनयाने मोठा पडदा देखील गाजवला आहे. ‘मुंबई मेरी जान’, ‘आजचा दिवस माझा’, ‘वक्रतुंड महाकाय’, ‘अ पेईंग घोस्ट’, ‘मुंबई टाईम’, ‘विकून टाक’ अशा चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत. ‘टिकल ते पॉलिटिकल’, ‘आंबट-गोड’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘कॉमेडीची बुलेट’, ‘कुंकू’, ‘आज के श्रीमान श्रीमती’, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अशा मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तर, समीर चौगुले यांनी रंगमंच देखील गाजवला आहे. ‘असा मी असामी’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘यदाकदाचित’, ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’, ‘श्री बाई समर्थ’, ‘कॅरिऑन हेवन्स’, ‘बेस्ट ऑफ बॉटम्स अप’ अशा काही नाटकांमधून देखील काम केलं आहे.



Source link

सातारा: पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- जिल्हाधिकारी | पुढारी

0


सातारा: पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. १८ जून ते दि. २३ जून या कालावधीत सातारा जिल्हयामधून मार्गक्रमण करणार आहे. हा सोहळा शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधांचे नियोजन करुन हा आषाढी वारी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.

सातारा जिल्हयातील निरा नदी ते साधुबुवाचा ओढा या पालखी मार्गाची, पालखी मार्गावरील विसावा, दुपारचे भोजन स्थळ, पालखी तळ याचा पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाचे संजय कदम आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जयवंशी म्हणाले की, पालखी सोहळ्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, वीज, रस्ते, अग्निशमन पथक, आरोग्य सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी खंडाळा आणि फलटण तालुक्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. भाविकांची कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही, यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी. पालखी स्वागताची तयारी चांगल्या प्रकारे करावी.

शुद्ध पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात यावे. त्याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. दवाखान्यांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाने महामार्गावर असलेले अडथळे त्वरित काढावेत, तसेच सर्व यंत्रणांनी पालखी सोहळ्याचे चांगल्या पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप आणि वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी
पालखी सोहळ्यासाठी केलेल्या नियोजनाविषयीची माहिती दिली.

हेही वाचा 



Source link