प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की आशुतोष अनिरुद्धसाठी कॉफी आणतो. तो अनिरुद्धतला म्हणतो, “मिस्टर देशमुख, कॉफी घ्या.” अनिरुद्ध आशुतोषकडे पाहातो आणि म्हणतो, ‘नको, यशला परत घरी घेऊन गेल्याशिवाय माझ्या घशाखाली काही उतरणार नाही. हा कधी कधी जगातील सगळ्यात मॅच्युअर मुलगा असल्यासारखा वागतो आणि दुसऱ्याचं क्षणी असं काही तरी करुन बसतो. तो खूप इमोशनल आहे, आर्टिस्ट आहे शेवटी.” प्रोमोच्या शेवटी दिसत आहे की यश हा शुद्धीवर येतो आणि अशुतोषला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करतो.
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकत असतो. त्याने आजवर तामिळ, तेलुगू, इंग्रजी, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले. ९०चे दशक सुनील शेट्टीने गाजवले होते. नुकताच त्याने एका मुलाखतीमध्ये “९० च्या दशकात मला अंडरवर्ल्डमधूल फोन येत असे” असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Tu Chal Pudha Latest Update: अश्विनीने जसं आपल्याला आपल्या मुलापासून दूर केलं, तसचं आता तिला तिच्या मुलींपासून दूर करायचं आणि आपला बदला पूर्ण करायचा असा निर्णय शिल्पीने घेतला आहे.
सातारा: पुढारी वृत्तसेवा: सातारा तालुक्यातील परळी येथील उरमोडी धरणात रविवारी दुपारी दोन तरूण पोहण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने धरणात बुडाले. याबाबतची माहिती रविवारी सायंकाळी त्यांच्या कुटुंबीयांना दिली.
रात्री उशिर झाल्यामुळे बुडालेल्या तरूणाचा शोध घेता आला नाही. त्यामुळे आज सकाळी सातारा तालुका पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीम, स्थानिक ग्रामस्थ व कातकरी यांच्या मदतीने शोध कार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, दुपारी बाराच्या सुमारास एका तरूणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. तर आणखी एका तरूणाचा शोध सुरू आहे. घटनास्थळी कुटुंबीय तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध घेण्यास अडथळा येत आहे.
सातारा : पुढारी वृत्तसेवा महाबळेश्वर तालुक्यातील हरोशी येथे कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे घाबरलेले-बिथरलेले सांबर थेट घराच्या छतावरून पत्रा तुटल्यामुळे घरात कोसळून जखमी झाले. ही घटना (रविवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. वनविभाग रेस्क्यू टीम पुणे, सह्याद्री प्रोटेक्टर्सच्या प्राणीमीत्रांच्या सहकार्याने त्याला उपचारांसाठी पुणे येथे नेण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुत्र्याने केलेल्या पाठलागामुळे घाबरलेले सांबर बचावासाठी हरोशी येथील गणपत कोंडीबा उतेकर यांच्या घराबाजूला असलेल्या दरीवरून घराच्या पत्र्यावर चढले. सांबराच्या वजनाने सिमेंटचा पत्रा तुटल्याने ते सांबर थेट घरामध्ये कोसळले. उंचावरून पडल्याने ते जखमी झाले.
या सांबाराच्या पायास दुखापत झाल्याने ते उभे राहू शकत नव्हते. अचानक आलेल्या या पाहुण्यास पाहून उतेकर परिवार काहीसा घाबरला. मात्र या घटनेची माहिती तातडीने वनविभाग वनरक्षक बजरंग वडकर, वनमजूर गणेश वागदरे यांना दिली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पुणे रेस्क्यू टीमला जखमी सांबारा बाबतची माहिती कळविली. सायंकाळी रेस्क्यू टीम सह्याद्री प्रोटेक्टर प्राणीमित्र व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने या जखमी सांबारास विशेष वाहनाने उपचारांसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.
गौतमीने पाटील हे आडनाव काढावे का या विषयी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, “महिलांनी आपले गुण आणि कर्तृत्व सर्वांना दाखविले आहे. सात वर्ष ताराराणीने औरंगजेबाशी लढा दिला तेव्हापासून महिला सबलीकरण सुरू झाले आहे आणि शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिला आहे. कलाकरांना संरक्षण मिळाले पाहिजे या मताचा मी आहे.”
झायराच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘अगदी बरोबर.. तुझं उत्तर मला आवडलं…’ तर दुसरा युजर म्हणाला, ‘झायरा तू ग्रेट आहेस…’ सध्या सर्वत्र झायरा वसीम हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. शिवाय तिच्या पोस्टवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
सातारा; पुढारी वृत्तसेवा : येथील श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने आयोजित केलेल्या मशाल महोत्सवाने रविवारी सायंकाळी शेकडो मशालींनी शिवतीर्थ उजळून निघाला. तसेच महाआरतीने राजधानी सातार्यात वीरश्री संचारली होती. मशाल महोत्सव पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.
शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने सातार्यात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवतीर्थ पोवईनाका येथे रविवारी सायंकाळी 350 मशाल महोत्सव व महाआरतीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे मुख्य प्रतोद आ. भरत गोगावले होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, समितीचे कार्याध्यक्ष व दै. ‘पुढारी’चे वृत्त संपादक हरीष पाटणे, स्वागताध्यक्ष विनोद कुलकर्णी, अध्यक्ष राजू गोरे, उपाध्यक्ष अमोल मोहिते, रविंद्र झुटींग, रविंद्र माने, पत्रकार दिपक शिंदे, राजेश सोळसकर, प्रशांत जगताप, युवा उद्योजक विक्रम पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर मशाल महोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव ,जय जिजाऊ जय शिवराय, भारत माता की जय, हिंदु धर्म की जय अशा विविध घोषणांनी शिवतीर्थ परिसर दणाणून गेला. शिवतीर्थावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवतीर्थावर चारही बाजूंनी 350 मशाली प्रज्वलित केल्याने परिसर उजळून निघाला होता.मशाली प्रज्वलित केल्यानंतर तुतारीचा निनाद व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या नयनरम्य सोहळ्यामुळे जणू शिवकालच अवतरला असल्याचा भास झाला होता. मशाल महोत्सवाचा नयमरम्य सोहळा पाहण्यासाठी शहर व परिसरातील शिवभक्तांनी मोठी गर्दी गेली होती. त्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मशाल महोत्सवानंतर आ. भरत गोगावले यांच्या हस्ते महाआरती झाली. त्यानंतर शिवप्रेरणा मंत्र झाला. शिवराज्याभिषेक सोहळयाच्या महाआरतीने राजधानी सातार्यात वीरश्री संचारली होती.
एकदा तरी रायगडावर शिवप्रेमींनी भेट द्यावी : आ. भरत गोगावले
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांना अभिवादन करतो. दि.2 जून रोजी 350 वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा रायगडावर होणार असून त्या पार्श्वभुमीवर श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने सप्ताहाचे आयोजन केले आहे. छत्रपतींच्या इतिहासात दोन गाद्यांना महत्व आहे. त्यात सातारची गादी महत्वाची मानली जाते. हा 350 शिवराज्याभिषेक दिन सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे. भाविक राज्यासह देशातील तिर्थस्थळांना भेटी देत असतात त्याप्रमाणे एकदा तरी किल्ले रायगडाला शिवप्रेमींनी भेट द्यावी, असे आवाहन आ. भरत गोगावले यांनी केले.
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील ३२००० हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे ब्रेनवॉश करण्यात आले. यानंतर त्यांना लव्ह जिहादमध्ये अडकवून त्यांना सीरियाला पाठवण्यात आले, जिथे त्यांच्यासोबत धक्कादायक घटना घडल्या. ‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. यात अभिनेत्री अदा शर्मा हिच्यासोबत योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.